अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजतिलक पाहताना कागद पेन घेऊनच बसायला हवे. कोण कोणाचा कोण आणि कोणाला कोण आवडते याची बरीच कॉम्बिनेशन्स दिसतात. भरपूर फ्लो चार्ट्स होतील Proud

पूनम, +१.

मी सलामेइश्क बघताना तसं खरंच केलं होतं. तरी ते सोहेल खान आणि इशा कोप्पीकरचा अख्ख्या स्टोरीशी काय संबंध ते शेवटपर्यंत लक्षात आलं नव्हतं. (आधी तर दुसरी डीव्हीडी बघाय्ला सुरूवात केली, भंजाळल्यावर मग परत पहिली डीव्हीडी घातली, आणि मग तर फुल्ल्टू भंजाळले होते!!!)

पण हा त्याहून अति राज तिलक इंटरेस्टिंग दिसतोय. Happy

साक्षी, हा राजतिलक म्हणजे धरमवीरचा सुपरशक्तिशाली सीक्वेल असल्यासारखा दिसतोय. बघायला हवा>>> Lol हो श्रद्धा, नक्की पहा आणि मग समग्र चिरफाड येऊ देत Happy

दशकुमारचरितम ची माहिती होती थोडीफार दिलेली. त्यात अशीच दहा राजकुमारांची अदलाबदली/ हरवाहरवी / पळवापळवी आणि बरंच काही होते म्हणे. सगळ्या दहा कथा आता उपलब्ध नाहीत, पण ज्या आहेत त्याही बर्याच कॉम्प्लिकेटेड आणि इंटरेस्टिंग आहेत म्हणे>> याज्ञसेनी, या लोकांनी त्यावरूनच इणस्पिरेशन घेतलंय असं दिसतंय Happy

२ मिनिटात झलक पाहिली>>> मीही बंद करणार होते पण मग whos who खेळत बसले Proud
पौर्णिमा, फ्लो चार्टस Lol त्यात क्रॉस कनेक्शन्स पण आहेत.. वेड लागायचं राहिलं मला तेव्हढ्या १०-१५ मिनिटात Happy
स्वप्ना, नंदिनी, तुमच्या दोघींचं जबरा परिक्षण वाचायला आवडेल राज तिलक वरचं Happy

आज ट्रान्स्पोर्टर २ पुन्हा एकदा पाहिला. बरेच अ आणि अ सीन्स आहेत पण एक महानच आहे. व्हिलनचा एक माणूस ट्रान्सपोर्टरच्या (ट्रान्स्पोर्टर हाच सिनेमाचा हिरो) कारला खाली एक टाईमबॉम्ब बसवतो. ते ट्रान्स्पोर्टरला जमिनीवर असलेल्या पाण्यात त्या टाईमबॉम्बचं प्रतिबिंब दिसल्याने लक्षात येतं. तो अतिवेगानं गाडी चालवत एका रॅम्पवरून ती अशी उडवतो की समोर उभ्या असलेल्या उंच क्रेनच्या हुकाला बरोब्बर तो गाडीखालचा टाईमबॉम्ब अडकतो आणि गाडीपासून वेगळा होतो.

नेमका त्याचवेळी व्हिलननं बटण दाबल्यानं त्या बॉम्बचा हवेतल्या हवेत स्फोट होतो. ट्रान्स्पोर्टर गाडी अचूकपणे जमिनीवर मांजरासारखी बरोबर चार चाकांवरच उतरवतो आणि पुढे मार्गक्रमण करत राहतो आणि मग पाण्याच्या अगदी जवळ जाऊन बरोबर थांबवतो.

साक्षी, तरीही बराच पेशन्स दिसतो आहे तुमच्यात आणि बरंच काही व्यवस्थित लिहिलं आहे की! म्हणजे कोण कोणाचं मूल आणि कोण कोणाला आवडतं वगैरे Happy मला पोस्ट वाचतानाच भंजाळायला झालं! Lol

चीकू, हम आपके है कौनचे सोडा हो... माधुरीचे कपडे हाच एक अचाट प्रकार असायचा तिच्या सगळ्याच मूवीत.
आता कुठे त्यातल्या त्यात बरे कपडे घालते झलक दिखलाजा मध्ये फक्त. पर्सेनल एवेंट मध्ये तर तशीच बेक्कार साडी, तिसर्‍याच रंगाचा ब्लॉउज वगैरे वगैरे.

सन ऑफ सरदार पाहिला... १५ व्या मिनीटाला शिव्या घालत उठाल किंवा टीवी फोडाल रागात स्वतःचीच अक्कल काढत इतका अचाट सीन्स आहेत ह्यात. शहाळ्याचा सीन्सचा मी बराच वेळ विचार केला व वैतागून सोडले.
दिल्ली/पंजाबात शहाळी मिळायला इतकी मारामारी आहे अजूनही , इथे तर रेल्वे स्टेशनात विकताना दाखवलाय..

विमानात करायला(?) काहीच न्हवते म्हणून अर्धा तास सहन केला चित्रपट.... Proud

साक्षी, तरीही बराच पेशन्स दिसतो आहे तुमच्यात आणि बरंच काही व्यवस्थित लिहिलं आहे की! म्हणजे कोण कोणाचं मूल आणि कोण कोणाला आवडतं वगैरे>>> शैलजा, अहोजाहो नको प्लीज..
आधी वैतागले होते पण मग हा कोण आहे , ही कोण आहे ते समजेपर्यंत बघू असं करत करत वेळ गेला Proud

या बाफच्या क्रुपेने मी राजतिलक पाहिला . अगदी It is so bad that it is good लेव्हलचा आहे .
नायक नायिकांच्या जोड्या तर सोडा , प्रत्येकाला हा /ही आपला मुलगा /आई /बाप आहे याचा आपोआपच साक्षात्कार / Intuition होत असतो (नात माहीत नसतानाही) आणी मग मुलगा आपल्या बापाला "खुशनसीब होगा वो बेटा जिसे आप जैसा बाप मिला है" आणी बाप Vice versa डायलॉग मारतो .
रच्याकने , व्हिलनचा मुलगा व्हिलनच आणी हिरोचा मुलगा हिरोच होतो , ते त्यांच्या रक्तातच असत , कुणी त्याना वाढवल , काय संस्कार केले याने काहीच फरक पडत नाही Happy

व्हिलनचा मुलगा व्हिलनच आणी हिरोचा मुलगा हिरोच होतो , ते त्यांच्या रक्तातच असत , कुणी त्याना वाढवल , काय संस्कार केले याने काहीच फरक पडत नाही >>> हे तर फारेंड/स्वप्नाने लिहीलेल्या सिनेमाच्या नियमावलीत अ‍ॅड करायला हवं. Happy

मोहब्बतेमधे ते 'पैरोमे बंधन है' गाणं दिवाळीच्या वेळी असतं ना? सुरवातीला गावात रोषणाई दाखवतात तिथे तर एका दुकानावर चक्क 'Happy valentine's day' झळकत असतं Happy अर्थात पूर्ण चित्रपटच अचाट आणि अतर्क्य असल्याने ते चालून गेलं असेल Happy

यमला पगला दिवाना २ विकांताला टीव्हीवर लागला होता. त्यात एका सीनमध्ये व्हिलनचे लोक सनी देओल वर चाल करुन येतात तेव्हा तो मोठ्याने ओरडतो आणि त्या ध्वनीलहरींच्या शक्तीमुळे सगळे लोक इकडेतिकडे उडून पडतात. किती हे कल्पनादारिद्र्य!

किती हे कल्पनादारिद्र्य! >>> यालाच तर प्रतिभा म्हणतात. कुणाला सुचलं असतं का हे ?
यावरून आठवलं..
तुम जिस तरफ खडे हो वहां से ये नंबर छह नजर आ रहा है, लेकिन मै जहां खडा हूं वहां से मुझे यह नंबर नौ नजर आ रहा है, ना तुम गलत हो, ना मै ! - सीनियर अमिताभ, ज्यु अमिताभास (अभिषेक नव्हे). आखरी रास्ता

भागमभाग मध्ये अरबाज खानचा खून होतो तेंव्हा परेश रावलचा झब्बा रक्ताने पूर्ण माखलेला दाखवला आहे, पण ते सगळे कपडे बदलतात तेंव्हा बनियनवर एक रक्ताचा थेंबही दिसत नाही. झब्बा वॉटरप्रूफ होता का काय???

यमला पगला दिवाना २ विकांताला टीव्हीवर लागला होता. त्यात एका सीनमध्ये व्हिलनचे लोक सनी देओल वर चाल करुन येतात तेव्हा तो मोठ्याने ओरडतो आणि त्या ध्वनीलहरींच्या शक्तीमुळे सगळे लोक इकडेतिकडे उडून पडतात. किती हे कल्पनादारिद्र्य!>>>>>>>>> तस असेल स्वप्ना तर मग रजनीकांतच्या पिक्चरना काय म्हण्शील?

कृपया महामानव अतिमानव मानवाधिमानव परमपुज्ज्य श्री श्री श्री श्री रजनिकांत यांची तुलना इतर खाजगिण्तीत नसणार्याबरोबर करु नये...

रजनी - कान्ट ....

येन्ना रास्कला

माईंडिट .. Biggrin

शारुखचा अत्ताच येउन गेलेला पिक्चर..... नाव नाही आठवत (गरज पण नाही वाटत, पुढे वाचल्यावर इथले चाणाक्ष प्रेक्षकच सांगतिल ते नाव) तर..... परदेशात टॅक्सी ड्राईव्हर असलेला माणुस भारतात येउन डायरेक्ट आर्मीमधे बॉम्ब डिस्पोझल एक्सर्पट म्हणून जॉईन होतो....... आता बोला

"तेज" नावाचा चित्रपट ज्या दिग्दर्शकाने बनवला असेल त्याला रेल्वेचा मिनिस्टर बनवा रे...

१) लोकल ट्रेन परदेशातल्या ज्या ८० मैल वेगाने धावत असतात अश्या लोकल ट्रेन्स एकाच ट्रॅक वर एकमेकांच्या दिशेने धावु शकतील का ? समोरुन लोकल ८० मैल च्या स्पिड ने येत आहे हे कंट्रोलरुम ला दोघांमधे फक्त ५ मिनिट अंतर असताना कळते ? Biggrin भारतात सुध्दा क्वचितच घडेल हे ..एकाच ट्रेक वर दोन लोकल समोरासमोर..

२) चला आता लोकल समोरासमोर आल्या तर काय करायचे एकीचा ट्रॅक बदलायचा ..कंट्रोलरुम मधे बसणारा बोमन इराणी ट्रेन ७० मैल स्पिड मधे असताना ट्रॅक बदलतो तब्बल २ वेळा व्वा..... इथे भारतात साधा ट्रेक बदलायचा झाला तर ट्रेन जास्तीत्जास्त १० किमी चा स्पीड वर चालते.....इथे तर ७० मैल स्पीड..

३) प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या अड्ड्यावर पोलीस पकडायला जाताना सायरन वाजवत का जातात हेच कळत नाही ....? हा सायरन गुन्हेगाराला समजावे की पोलीस आले तु पळुन जा लवकर...या साठी वाजवतात का

शारुखचा अत्ताच येउन गेलेला पिक्चर..... नाव नाही आठवत (गरज पण नाही वाटत, पुढे वाचल्यावर इथले चाणाक्ष प्रेक्षकच सांगतिल ते नाव) तर..... परदेशात टॅक्सी ड्राईव्हर असलेला माणुस भारतात येउन डायरेक्ट आर्मीमधे बॉम्ब डिस्पोझल एक्सर्पट म्हणून जॉईन होतो....... आता बोला
>>>>>>>>>>>>>>>>>>>>> जब तक है जान...:(

प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या अड्ड्यावर पोलीस पकडायला जाताना सायरन वाजवत का जातात हेच कळत नाही ....? हा सायरन गुन्हेगाराला समजावे की पोलीस आले तु पळुन जा लवकर...या साठी वाजवतात का >> हा प्रश्न मलाही दरवेळी पडतो. Uhoh

लोकानी वाहनकोंडी करु नये, त्याना चटकन रस्ता द्यावा. यासाठी त्याना सयरन असतात. <<< आणि मग उगाच वाहनकोंडी नको म्हनुण गुन्हेगार पळुन जाउन रस्ता मोकळा करतात का?

Pages