Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज ऑफिस गँगमुळे जबरदस्तीने
आज ऑफिस गँगमुळे जबरदस्तीने हाउसफुल्ल २ बघितला. संपुर्ण सिनेमाच अचाट आणि अतर्क्य मधे मोडतो. साजीद खान हा काय अशक्य इरिटेटिंग माणुस आहे हे परत एकदा कळलं.
कितने 'दिनों'के बाद है आयी
कितने 'दिनों'के बाद है आयी सजना 'रात' मिलन की
ह्या वरुन पिक्चरची स्टोरी 'नॉर्वे' मध्ये घडत असावी अशी शंका येतेय >>>
काल "फिल्मी" चॅनलवर
काल "फिल्मी" चॅनलवर "पातालभैरवी" लागला होता. २ मिनीटेच पाहु शकलो. मिनीस्कर्ट घातलेला जितेंद्र आणी शक्ती कपुर पाहुन पुढे पहायची हिम्मतच झाली नाही.
स्वप्ना, हातीमताईची पोस्ट
स्वप्ना, हातीमताईची पोस्ट

(हा सिनेमा आम्ही कॅसेट आणून बघितला होता)
मिनीस्कर्ट घातलेला जितेंद्र
मिनीस्कर्ट घातलेला जितेंद्र >>
स्वप्ना, रानी और लाल परी
स्वप्ना, रानी और लाल परी नावाचा पिक्चर पहाच. (आणि लिहीच
,मला ; अलका मधे खुप गर्दी होती , भयानक आणि अजिबात परी न वाटणारी परी होती आणि मी ६ ५स्टार खाल्या होत्या ह्या पलिकडे आठवत नाही. )
मी पाहिलेला पहिला सिनेमा (वय वर्ष ५). रानी अवर लाल परी अस नाव वाटायच मला. लाल परी अरुणा इराणी आहे
गिरीकंद , हो ५ मिनिटे पाहिला
गिरीकंद , हो ५ मिनिटे पाहिला मि. . .
त्यात असरानी जदूगाराला (नट कोण ? - कादरखान बहुतेक) तो खरच जदूगार आहे हे सिद्ध करायला लावत असतो . कसे? - अजुबाजूच्या लोकांच्या डोक्यावर टोप्या चढव , त्यांच्या अंगावरचे कपडे कढायला लाव (याला ते लोक आणि जादूगार नकार देतात ) . . बाकि कहिच नही तर मग नर्तिकेच्या पूतळ्याचे खर्या नर्तिकेत रूपांतर ... मग पूतळ्यावर क्लोज्-अप ..स्क्रीन वर आडव्या रेघा येतात ... झाली नर्तिका तय्यार !!!
मग काय डायरेक्ट नाच्-काम . . .
तेव्हाचे सगळ्यांचेच कपडे "धन्य" आहेत ...
गिरीकंद "पातालभैरवी"
गिरीकंद
"पातालभैरवी" मिनीस्कर्ट घातलेला जितेंद्र आणी शक्ती कपुर पाहुन पुढे पहायची हिम्मतच झाली नाही.
कमाल पोष्टी आहेत एक एक...
कमाल पोष्टी आहेत एक एक...
मित्रांनो, अचाट आणि अतर्क्य
मित्रांनो, अचाट आणि अतर्क्य हे शब्द छोटे ठरावेत असा एक महान चित्रपट आहे..नागदेवता नावाचा..
रमेश भाटकर, रेखा राव आणि मीनाक्षी..
ह्यातले नागिणीचे कॉस्च्युम्स तर अफाट आहेत..आणि त्या नागिणीचे जिभल्या चाटणे प्रकरण तर महा अशक्य!
http://www.youtube.com/watch?v=ACFCZy1ntqw
कोणी (म्हणजे स्वप्ना) बघितला असेल तर तुमच्या शैलीत लिहा जरा!
इन्ना, क्या याद दिलाई. माझा
इन्ना, क्या याद दिलाई. माझा पण फेवरिट आहे रानी अवर लाल परी. त्यात जीतेंद्र राजकुमार व नीतू सिंग सिंड्रेला असलेली सिंड्रेलाची कथा आहे. राणीची आई मरते का हरवते आणि ती आईला शोधत जाते असा काहीतरी पिक्चर आहे. ती राणीचे काम करणारी मुलगे अगदी करूण रस पाघळते. आईवडिलांचे काम केलेले नट नटी फारच थोराड आहेत. तू ६ फाइव स्टार खाल्लीस आणि तुला घेउन कोणी बरे दिली? आम्हाला घरनं मारी बिस्किट आणि वॉटर ब्याग घेउन पाठ्वायचे.
अशक्य पोस्टी आहेत एक एक.
अशक्य पोस्टी आहेत एक एक. स्वप्ना + श्र + फारेंड तिघांनीही खरंच लिहा हातीम ताईचे परीक्षण तुमच्या नजरीयातून
अमा, मला हे काsssssही आठवत
अमा, मला हे काsssssही आठवत नैये.
५* ओनली. 

माझ्या मामा बरोबर गेले होते. ( बिचारा मामा)
मला पहायचाच आहे आता.
स्वप्ना
स्वप्ना _______/\_______
अलोकनाथ जबरी.
लिस्ट वाढलेय ग बाये आता

बिबाब
गुंडा
हातिम्ताई
आयी मिलन की रात
नाग्देवता
अनेकदा आपण आपल्या आवडीचा
अनेकदा आपण आपल्या आवडीचा कलाकार असल्यावर अनेक गोष्टींकडे कानाडोळा करतो. त्यात अमिताभ असेल तर अनेकदा हा प्रमाद आपल्या कडुन घडतो. अमिताभ च्या अनेक चित्रपटात भयानक घोळ आहेत.
अमर अकबर अँथनी = एका बाईला तिन माणसे रक्त देतात. कोण आहेरे तो डॉक्टर? आणि कुठे आहे ते दिव्य इस्पितळ?. म्हातारी आई खुरडत खुरडत साई बाबांच्या दरबारात येते. बाबा तिला द्रुष्टी देतात. अकबर आपला गातोय. म्हातारी आंधळी असली तरी खुरडत खुरडत बरोब्बर नेम धरुन बाबांच्या मुर्तिच्या दिशेने येते. तिला बरोब्बर दिशा कशी कळते? अख्खी दुनिया शेवटी ओळखते की वेष बदललेले अमर्+अकबर्+अँथनी आहेत. पण ते येडे व्हीलन मात्र मुर्खा सारखे सुट टाय लावुन बावळटा सारखे हसत त्यांच्या कडे बघता बघता गंडतात.
ग्रेट गँबलर = दोन अमिताभ चा घोळ चांगला घातला आहे. लिस्बन ला नीतु सिंग आणि तिचे वडिल इफ्तेकार रहात असतात. इफ्तेकार च्या मित्राची जुळी मुलं म्हणजे दोन अमिताभ लहान पणी बिछडलेली असतात. इफ्तेकार नुसत्या वडिलांच्या नावा वरुन अख्खी फॅमिली हिस्टरी सांगतो. एका अमिताभ ला माहितच नसते की आपली बहिण होती. शेवटच्या मारामारी च्या वेळेला ती बहिण येते. त्याला भय्या अशी हाक मारते. तो हसतो . बास. ( बजेट चे वांदे झाले असावेत शेवटी शेवटी) अरे लेका आयुष्यात पहिल्यांदा जी बहिण भेटते तिला तु असा भेटतोस? बरं नंतर बरच फुटेज ती बहिण बावळटासारखी इकडे तिकडे बघत असते. तेंव्हा तरी तो तिला भेटेल. छे नाव नको. तो झीनत कडे बघण्यात मग्न. बाकी पण एकंदर घोळ खुप आहे.
अजुन असे बरेच आहे. लिहिते जसे आठवतात तसे. राम बलराम तर कहर आहे.
कुठलेही ( जुने, सत्य) साईबाबा
कुठलेही ( जुने, सत्य) साईबाबा काहीही करु शकतात.. त्यानी सचिनला खासदारकी दिली . तिथं दोन डोळे किस झाड की पत्ती.
अलिबाबा ४० चोर...
अलिबाबा ४० चोर... http://www.youtube.com/watch?v=FdyZMNaXrt4&feature=watch-now-button&wide=1
>>आणि हो त्यात कश्मिरा शाह ओम
>>आणि हो त्यात कश्मिरा शाह ओम पुरीची बायको आहे!
हायला, खरंय. मला तर आधी ती त्याची मुलगी आहे असंच वाटलेलं इतकं ते कास्टिंग चिवित्र होतं.
हायला, खरंय. मला तर आधी ती
हायला, खरंय. मला तर आधी ती त्याची मुलगी आहे असंच वाटलेलं इतकं ते कास्टिंग चिवित्र होतं.>> हे तर काहीच नाय, सिनेमात त्या दोघांचं एक 'गंमतगाणं' पण आहे
>>रमेश भाटकर, रेखा राव आणि
>>रमेश भाटकर, रेखा राव आणि मीनाक्षी.
रमेश भाटकर??????????
हे राम!!!
प्लीज जुन्या शिरडी
प्लीज जुन्या शिरडी साईबाबनदद्ल काहि बोलु नये
लव्ह इन टोकियो सिनेमात एक
लव्ह इन टोकियो सिनेमात एक प्रसंग आहे. आशा पारेख आंघोळ करत असते तेव्हा नोकर जॉय मुखर्जीची चिठ्ठी घेऊन येतो. ती अंगाला टॉवेल गुंडाळून बाहेर येते. जॉय मुखर्जीने आपण पाचच्या विमानाने भारतात परत जात आहोत असं लिहिलं असतं. ती ते वाचते तेव्हा घडयाळात पाचला दहा मिनिटे कमी असतात. पुढ्च्याच सीनमधे ती पाचच्या ठोक्याला एअरपोर्टवर पोचते, टक्सी पकडून. तेव्हा पूर्ण मेकअप, केशभूशा, साडी वगैरे सगळा व्यवस्थित जामानिमा असतो. हे बघून दहा मिनिटात सगळं कसं आटोपलं हा प्रश्न पडला होता.
चीकू >> ते उद्याचे ५ असतील
चीकू >> ते उद्याचे ५ असतील
...
आज दुपारी झी क्लासिकवर एका
आज दुपारी झी क्लासिकवर एका अत्यंत क्लासिक चित्रपटाचा अंश पाहिला. मिथूनदा फाटके बनियान आणि फाटकी लुंगी अशा वेषात झोपडीतल्या जमिनीवर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मूल . एका हाताने त्या मुलाला थोपटत आहेत. दुसर्या हाताने दोरखंडांनी बनवलेल्या पाळण्यात झोपलेल्या तान्ह्या बाळाला दोरखंडानेच झोके देत आहेत.
दुसर्या दृश्यात ते मदारी होऊन कडेवर एक मूल घेऊन कुत्र्याकडून कसरती करून घेत आहेत. टाळ्या न आल्याने निराश होऊन मग स्वतःच माकडचेष्टा करतात. पैसे मागायला गेल्यावर बहुतेक पब्लिक गुल होते. दोघेतिघे पैसे देतात. त्यातून गरीबाच्या पोटाला दूध-पाव लागतं.
पुढचं दृश्य. सकाळ झाली. डोक्यावरपर्यंत पांघरुणे (अजिबात न फाटलेली) घेऊन झोपलेली मंडळी दिसतात. प्रथम एक माकड स्वतःहून उठते. माकडाने कपडे घातलेले आहेत. बालदीतले पाणी मोठ्या तांब्याने घटाघटा पिऊन मग ते कुत्र्याला उठवते. मग दोन मुलांना उठवते. यातली एक बेबी गुड्डी : रजनी -प्रिया तेंडुलकरची - मुलगी. कुत्रा हे घेऊन दूध केंद्रावर जाऊन रांग मोडून, पण पैसे देऊन दुधाच्या बाटल्या घेतो. माकड भाजीवाल्याच्या गाडीवरच्या भाज्या निवडून पारखून/वास घेऊन घेते. पैसेही देते. त्यातच एक नारळ विकत घेतलेला असतो. तो मारुतीच्या देवळात जाऊन फोडतो.
यानंतर माझी बाहेर जायची वेळ झाल्याने अत्यंत नाइलाजाने टीव्ही बंद करावा लागला. चित्रपटाचे नाव 'परिवार'
भरत, हा सिनेमा वाट्टेल ते
भरत, हा सिनेमा वाट्टेल ते करुन मिळवुन पहाण्यात येइलच. फारच एंटरटेनिंग दिसतो आहे.
भम, परिवाराची व्याख्या भारी
भम,
परिवाराची व्याख्या भारी लवचिक दिसते.
भरत, ह्या सिनेम्याबद्दल इथे
भरत, ह्या सिनेम्याबद्दल इथे लिहिल्याने पुण्य मिळालं आहे तुम्हांला. यूट्युबेवर पूर्ण शिन्मा आहे. भक्तांनी लाहाभ घ्यावा. मी पण पाहणार आजच.
यु ट्युबवर फिरकणारच असाल तर
यु ट्युबवर फिरकणारच असाल तर देसी स्पायडरमॅन पण बघा. काही नाही तर स्पायडरमॅन स्पायडरमॅन हे गाणे तर ब घा च..
श्रद्धे, नुस्ता पाहू नकोस.
श्रद्धे, नुस्ता पाहू नकोस. लगोलग परीक्षण पायजेल. विश्वात्मा परीक्षणाची अज्जून वाट बघतोय आम्ही
"मा का चमत्कार" पाहिलाय का
"मा का चमत्कार" पाहिलाय का कोणी?
Pages