अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा, परिवार चे जागतिक हक्क घेऊनच टाक मग.

संघमित्रा - देसी स्पायडरमॅन म्हणजे तो गोविंदा किमी चा का? पूर्वी त्यावर या किंवा जुन्या माबोवरच्या बाफवर बरेच आहे.

नाही नाही.. अरे नवीन आहे एकदम. नटनटी माहितीतले नाहीत.. भोजपुरी लोकांची कास्ट आहे. तिथलेही स्टार नाहीचेत ते. मुव्ही आवडणार्‍या काही हौशी लोकांनी अतिशय मनापासून लोएस्ट बजेट पिच्चर बनवलाय.
फक्त हे गाणं पाहिलंस तर पूर्ण पिच्चर नक्की शोधशील Happy

http://www.youtube.com/watch?v=3-RW3nUHs8g

हिंजेवाडीच्या शेजारच्या शेतात शूटींग झालेय म्हणे.

श्रद्धा, पाहिलात का 'परिवार'? या आठवड्यात परत कधीतरी लागला होता झी सिनेमावरच. यावेळी पाहिलेल्या दृश्यात मिथुनदा किचनमध्ये आपले पाककौशल्य आजमावत आहेत. त्यांनी न फाटलेली, बर्‍यापैकी स्वच्छ बनियन घातलेले आहेत. पण त्यात काहीतरी विचित्र आहे. विस्तववारच्या पातेल्यातले पदार्थ ढवळताना तोंडाची टकळी पण चालू आहे. त्यातून बोध हा होतो, की रात्री त्यांच्या आश्रयाला आलेल्या मीनाक्षीअम्मा सकाळी गायब झाल्याने मिथुनदांच्या हृदयाला तडे गेलेले आहेत. हा एकपात्री प्रयोग काही काळ चालल्यावर खांद्याला शबनम बॅग लावलेल्या मीनाक्षीअम्मा अवतरतात. त्या म्हणे नोकरी शोधायला गेल्या होत्या. उगाच मिथुनदांच्या कोवळ्या खांद्यांवर आपला भार नको म्हणून. नोकरी न मिळाल्याने मिथुनदांच्या डोंबार्‍याच्या खेळात त्या पार्टनरशिपची ऑफर देतात. मिथुनदा खुश. ते पाठमोरे झाल्यावर कळते की बनियन उलटे (पोटाची बाजू पाठीकडे) असे घातलेले आहे. आधीच्या दृश्यात पाहिलेली मुले इथे दांना डॅडी आणि अम्माला मम्मी म्हणू लागतात.
रस्त्याने चालत जात असलेल्या मिथुनदांना एक कारप्रवासी आपल्या घरी घेऊन जातो. त्याला मिथुनदांच्या पोराला दत्तक घ्यायचे आहे. निपुत्रिक शेटजींनी त्या गुणी बालकास लँपपोस्टखाली अभ्यास करताना पाहिलेले होते. शेटाणीच्या भूमिकेत प्रदीपकुमार कन्यका बीना कपाळी मोठा टिळा व तोंडाला त्याहीपेक्षा मोठे कुलूप लावून बसलेली आहे.

http://www.youtube.com/watch?v=wz0YlFbhGrY&feature=watch_response

भारतीय स्पायडर मॅन चा फायटिंग सीन. हा चित्रपट पूर्ण पाहिल्याशिवाय मरणार नाही अशी घनघोर भीष्मप्रतिज्ञा मी करत आहे. कुणाला डीव्हीडी, कॅसेट, १६ एम एम काहीही मिळाले तर जरूर कळवा. फेड एक्स चा खर्च ही मीच करेन.

विकु Happy ही टीव्ही सिरीयल असावी.

"परिवार" ताबडतोब पाहण्याच्या चित्रपटांच्या टॉप टेन लिस्ट मधे वर वर चढत आहे.

अजून पूर्ण नाही पाहिला. पण माकडाची भाजीखरेदी पाहिली.

इथे सिंगापुरात 'दाइसो' नावाची जपानी दुकानसाखळी आहे. त्यात घरगुती वापराच्या गोष्टी मिळतात. प्रत्येक गोष्टीची किंमत दोन डॉलर. तर तो भाजीखरेदीचा सीन पाहून मला त्या दुकानाची आठवण झाली. कारण माकडाने घेतलेली भाजी सुद्धा 'कोई भी सब्जी लो, दो रुपिया' अशा भावाने होती. माकडाने एकूण दहा रुपयांची भाजी घेतली.

'रामखिलावन भय्या बंबईमां सब्जी बेचत रहे. बंदर रोज का रोज दस रुपियेका सब्जी लैके उका अमीर बनावत रही. रामखिलावन ऊ पैसा लेके परदेस जाईके दुकान खोले. ऊही दाइसो. बंदर की याद मां हर चीज का दाम दो डॉलर रखे. जै राम जी की.'

नुकताच हम आपके है कौन परत एकदा पाहिला. माधुरी च्या कपड्यांपेक्षा त्यात अजून काही अचाट नाही बहुतेक Happy अतिशय विचित्र रंगसंगती, भयानक डिझाइन.. माधुरीच्या सौंदर्याची वाट लावली आहे अगदी Sad
उदा.
तिच्या एंट्री चा सीन : रंगीबेरंगी गोधडीच्या कपड्यातून शिवलेला ढगळ कोट/जाकीट
वाह वाह रामजी गाणे: किरमीजी चनिया चोली आणी त्यावर चप्प अंबाडा Sad
सम्धी सम्धन गाणे: सोनेरी भड्क डिझाइन असलेला गडद गुलाबी सलवार कमीझ
जूते दे दो: हिरवी/पांढरी चनिया चोली/घागरा आणी अजिबात शोभून न दिसणारे दागिने
मौसम का जादू: लेसचा लाल मिडी आणी सोन्याचे दागिने Sad
List is never ending Sad इतके वाइट कपडे घालायचं माधुरी ने कसं मान्य केलं काय माहिती. जोडीला भडक मेकअप. दिदी तेरा देवर मधली साडी त्यातल्या त्यात बरी होती.
मला संपूर्ण सिनेमात एकदाच तिची वेषभूषा आवडली. मुझसे जुदा होकर गाणे ती फोन वर म्हणते तेव्हा साधा फिकट निळा सलवार कमीझ/कमीत कमी मेकप/ काहीही दागिने नाहीत त्या गेटप मधे ती कमालीची सुंदर दिसते.

श्रद्धा Lol

परवरिश (अमिताभ - विनोद) शेवटचा सीन. दोघे नायक नुकतेच समुद्राचा तळ शोधून वर आलेले. पाणबुड्याच्या पोशाखात.विनोद खन्नाने त्याच्या अपराधांची कबुली दिलेली. शम्मी कपूर विनोद खन्नाला त्या तशाच अवस्थेत(अवगुंठित हात, पाठीला प्राणवायूचे नळकांडे) हातकड्या चढवतो. याच दृश्यातला अमजद खानचा केशसंभार बघण्यासारखा आहे.

अरे, काय एकेक पोस्टी टाकल्या आहेत. मला ऑफिसमध्ये हसू आवरत नाहिये आणि बाकीचे लोक हिला बहुतेक वेड लागलं अश्या नजरेने बघत आहेत Proud

चेन्नईत एका हाटेलात जेवत बसलो होतो आणि तिथल्या टीव्हीवर गाणी लागली होती.
ऑर्डर येईपर्यंत बघत होतो तर 'जांबाज' सिनेमातलं एक गाणं लागलं होतं.
गाणं आठवेना, पण ड्युएट आहे.
त्यात डिंपल त्या स्नूकरच्या टेबलावर झुकलेली असते मागून अनिल कपूर येतो आणि पार्श्वभागावर चापट मारतो. गाण्याच्या म्युझिकमध्ये तो चापटीचा आवाजही ऐकू येतो चाबूक वगैरे मारल्यासारखा. हे असं गाण्यात दाखवण्यामागे काय लॉजिक असावं?
हाटेलातल्या गाणं बघणार्‍यांची बेक्कार हालत झाली होती.

चेन्नईत एका हाटेलात जेवत बसलो होतो आणि तिथल्या टीव्हीवर गाणी लागली होती.>> चैतन्य, चेन्नईमधे तुम्हाला हिंदी गाणी वाजवत होते हे वाचूनच मला अचाट आणि अतर्क्य वाटतय. आम्ही तरी जिथे जाऊ तिथे "ड्रीमम वेकपम्"टाईप तमिळ गाणी चालू अस्तात. Happy

आज "राज तिलक" या अ आणि अ चित्रपटातला काही भाग पाहिला.
दृश्याची सुरुवात होते एका राजवाड्यात एक राणी रडत असते. तिच्या लहान मुलाला तिच्या प्रधानमंत्र्यानं मारून टाकलेलं असतं. म्हणजे समोर एका पांढर्या कपड्यात बांधलेलं गाठोडं टाईप काहितरी असतं, बर ते उघडून पाहण्याची तसदी ती घेत नाही. तिकडे महाराज युवराज युवराज म्हणत असतात. मग ही आपल्या भावाला(प्राण) सांगते की तुझा मुलगा(बाळ क्र.१) मला दे. तो लगेच आपला मुलगा आणायला जातो, त्याची बायको बेशुद्ध पडते. परत प्रधानमंत्री तिथे येतात आणि म्हणतात, मी जातो राणीकडे याला घेऊन. मग प्रधानमंत्री बाळ क्र.१ ऐवजी आपला मुलगा देतात(बाळ क्र.२). बाळ क्र.१ ला प्रधानमंत्री मारणार असतात पण त्यांची बायको तसं करू देत नाही. पण खरा चमत्कार तर पुढेच आहे, खरा राजकुमार जिवंत असतो, जो एका कबिलाप्रमुखाला मिळतो(बाळ क्र.३).
मग अचानक राज कुमार(जानी वाला Happy हा कोण आहे नक्की हे मला कळले नाही) बाळ क्र.३ ला शोधायला बाहेर पडतो आणि त्याला शोधल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.
मग एकदम काही वर्षांनंतर...
बाळ क्र.१ - सुनील दत्त(हा जानीचा शिष्य झालेला दाखवलाय)
बाळ क्र.२ - याचं नाव माहित नाही(हा प्रधानमंत्री का खून असल्यामुळे वाईट विचारांचा) समशेर
बाळ क्र.३ - कमल हासन(बंजारा झालेला पण शूर वै.वै.)

त्यात भरीस भर म्हणून प्राणची आणखी दोन मुले दाखवली आहेत, धर्मेन्द्र आणि अजून एक कोणीतरी.
सुनील दत्तची बहिण हेमा आहे, आणि दोन नट्या आहेत. एक बंजारा(१) तिला कमल हासन आवडत असतो. हेमाला धर्मेन्द्र एक महाप्रचंड झाड तिच्या रथाच्या मार्गातून बाजूला केल्यामुळे आवडायला लागतो. एक अजून बंजारा(२) जिला सुनील दत्त आवडतो पण ती धर्मेन्द्रच्या भावाला आवडत असते. एक राजकुमारी जिला कमल हासन आवडत असतो आणि त्यालाही तीच आवडत असते. पुढे बंजारा(१) वर समशेरची बुरी नजर पडते, तिला वाचवताना धर्मेंद्रचा भाऊ मरतो. मग धर्मेंद्र समशेरला त्याच्या घोड्यासह पाडतो तेही सहज हात लावून, जोर वै लावायची गरज नाही. पुढे माझी सहनशक्ती संपुष्टात आली.

क्रिश .......... या चित्रपटाच्या एका गाण्यात प्रियांका चोप्डा लाल कलर ची साडी नेसुन गाणे म्हणताना दाखवली आहे.. तिचा पदर रितीकवर ओढला जातो.. पुढच्याच दृष्यात रितीक हातात "लाल स्कार्फ" घेउन गाणे म्हणताना दाखवले आहे............... सुपर हिरो ने लाल साडीचा लाल स्कार्फ बनवला का ?????????

इशकजादे मध्ये सुरवातीलाच एक सीन आहे. त्यात हीरवीन तीच्या आईशी हेडफोन्सवर बोलत अस्ते तो.. तो आयपॉड आहे असं वाटतंय कारण त्या हेडफोन्सला माइक च नाहीये नुसत्याच प्लेन वायर्स आहेत Happy

साक्षी.... तुम्ही लिहिलेल्या 'राजतिलक'च्या वर्णनावरून दण्डी च्या 'दशकुमारचरितम' ची आठवण झाली. दहावीच्या संस्कॄत च्या पुस्तकात यातला एक उतारा होता. दशकुमारचरितम ची माहिती होती थोडीफार दिलेली. त्यात अशीच दहा राजकुमारांची अदलाबदली/ हरवाहरवी / पळवापळवी आणि बरंच काही होते म्हणे. सगळ्या दहा कथा आता उपलब्ध नाहीत, पण ज्या आहेत त्याही बर्याच कॉम्प्लिकेटेड आणि इंटरेस्टिंग आहेत म्हणे
Happy

Pages