अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'छैलाबाबू' वर कुणी काही लिहिलंय का आधी? जबरदस्त पोटेन्शियल आहे अ आणि अ साठी. राजेश खन्ना एकाच वेळी ड्रायव्हर, लाइफगार्ड, चोर, पोलिस इन्स्पेक्टर, टांगेवाला, आणि इंडियन जेम्स बाँड पण असतो. बहुतेक करियर मध्ये राहून गेलेल्या सगळ्या रोल्सची हौस पूर्ण करणारा पिक्चर होता हा Happy

चार दिवस न्हवते. बरीच प्रगती झालेली दिसते आहे. स्वप्ना तु हातिमताई बघण्या पर्यंत प्रगती केलीस!!! मानलं तुला.

स्वप्ना ला काय काय सिनेमे बघायला मिळतात. स्वप्ना सारखं नशीब फळफळून मलाही गेल्या विकांताला वीराना हा सिनेमा (शेवटचा काही भाग) बघायला मिळाला.

''आयी मिलन की रात हा'' एक असाच अअ सिनेमा होता. त्यात शाहीन आणि अविनाश वाधवान होते. मध्यंतरापर्यंत सर्व काही ठीक असतं पण मग ध्यानीमनी नसताना सिनेमा नाग-नागिणीवर घसरतो. यात ''काला शा काला'' हे मस्त गाणं आहे.

स्वप्ना Rofl खतरनाक पोस्ट! पंख असूनही हात हलवत उडते हे कहर आहे!

मी नुकतेच ते पुस्तक वाचले. (बालसाहित्य!) पहिल्याच प्रकरणात, हातीमचा जन्म होतो, त्याच वेळी त्या राज्यात तब्बल सहाशे बाळं जन्म घेतात असं लिहीलं आहे. आणि जोवर त्या सर्व सहाशे बाळांचं पोट भरत नाही, तोवर बाळ हातीम दूधाचा थेंब तोंडात घेत नाही असं लिहीलं आहे चक्क! Rofl इतका तो परोपकारी आणि नि:स्वार्थी होता! आणि तुम्ही त्याची टर उडवा! Proud

जोवर त्या सर्व सहाशे बाळांचं पोट भरत नाही, तोवर बाळ हातीम दूधाचा थेंब तोंडात घेत नाही असं लिहीलं आहे चक्क>>> Rofl

स्वप्ना..______/\_______

स्वप्ना Lol भारी

मीही त्यावेळेलाच हातिम पाहिला... बरे झाले लिहिलेस... पूर्ण पाहिलाच पाहिजे असा सिनेमा आहे तो...

हातिम मधल्या वेषभूषा ... पहिलितल्या मुलांच्या गॅदरिंगमधल्या वेषभूशांनाही लाजवतील अश्या आहेत अगदी.. Happy त्या संगिता बिजलानी चे पंख थर्माकोलचे आहेत हे दिसतेच अगदी...

त्यात अजून एक बाई आहे.. तिला शाप मिळून तिला दाढी आणि हातावर अस्वलासारखे केस वगैरे आले असतात... तर ते हातावरचे केस म्हणजे पारदर्शक बाहीला काळे केस चिटकवलेले आहेत हे सपष्ट दिसते... जितू भाय तिला बरा करतो...की लगेच बाही गायब आणि ती परत पूर्ववत... ह्या वेषभूशेचे त्यांनी पेटंट का घेतले नाही कुणास ठाउक...

स्वप्ना सही Happy
मला लहानपणी ते हातीमताई -'हातीम ताई ' असे वाटायचे. आणि मग ही कोण ताई
त्याचा हा पिक्चर बघुन उलगडा झाला. अर्थात पुर्ण पिक्चर बघण्याएवढी प्रगती झाली नव्हती
तोपर्यंत.

स्वप्ना. Lol

मला लहानपणी ते हातीमताई -'हातीम ताई ' असे वाटायचे. आणि मग ही कोण ताई
>> काय अर्थ आहे हातिमताई चा? Uhoh

चिंगी अगदी अगदी Happy

आलोकनाथ च्या तोंडी असले एक्से एक उर्दू संवाद आहेत ना की ब्बास... टॉम अल्टरला संस्कॄत बोलायला सांगितले तर कसा बोलेल तसेच आलोक्नाथचे उर्दू...

आलोकनाथ परी राज्याचा शहेनशहा वगैरे... म्हणजे अतीच... बहुतेक हातिमताई पूर्व एखाद्या सिनेमात... परिराज्याचा राजाचा मुलगा आजारी वगैरे पडला असावा... आणि भिकारी आलोकनाथ तिथे फिरत फिरत आलेला असावा आणि त्याने त्या मुलाला बरे केले असावे मग खूश होऊन मूळ राजाने त्याला राज्य बक्शिस दिले असावे नाहीतर आलोकनाथ शहेनशहा होणे म्हणजे भज्जीला विकेट मिळण्याइतकी अशक्यप्राय गोष्ट आहे Happy

नीरजाला सांगायला पाहिजे की तिने ते उस्गाव मध्ये जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा 'हातिमताई' पाहिला असता तरी तिला खूप काही शिकायला मिळाले असते वेषभूशेबाबत...

स्वप्ना/फारेंड्/श्र :हातिमताई बघणेचे करावे... आणि तिघांनीही तीन स्वतंत्र परीक्षणे टाकावित ही नम्र विनंती

हातीम ताई काल यु ट्युबावर अर्धा- चतकोर पाहिला.... आता उरलेला बघायचा आहे.. एक बार देखा है, दुसरी बार देखने की हवस है... याचा अर्थ समजला Proud

विकिपीडियावर हातिमताई (किंवा हातिम-अल-ताई) म्हणजे ताई नावाच्या जमातीतला हातिम असे दिले आहे.

मी पण मागे हातिमताईचा शेवट बघून पोस्ट टाकले होते. जुन्या माबोची लिंक नंदिनीने दिली आहे वर, त्यात आहे बहुधा.

स्वप्ना, तुला 'आज बचना है मुश्किल तेरा..' (हे प्रेक्षकांना उद्देशून असावे!) गाणे बघायला मिळाले का? त्यात मधूनमधून अमरीश पुरीचे अशक्य क्लोजप टाकले आहेत.
आज बचना है मुश्किल तेरा..

नमस्कार ,हा धागा अतर्क्य सीन बद्दल आहे,पण थोडेसे अवांतर=

"जाने भी दो यारो "कुणी पाहिलाय का? उत्कृष्ट आणि अप्रतिम!!!!!!!!!!!

खरोखर अशा दिग्दर्शकांना भारत-रत्न द्यायला हवे !!!

स्वप्ना........:G कोपरापासून हात जोडून नमस्कार तुला.......
तुफान हसलो आहे तुझी एकेक निरीक्षणे वाचून.....
बादवे,
जो 'गुंडा' पाहतो, तो प्रेमातच पडतो त्या सिनेमाच्या......
तो चुकवू नकोस स्वप्ना.......

मामी ....''आयी मिलन की रात हा'' एक असाच अअ सिनेमा होता. त्यात शाहीन आणि अविनाश वाधवान होते. मध्यंतरापर्यंत सर्व काही ठीक असतं पण मग ध्यानीमनी नसताना सिनेमा नाग-नागिणीवर घसरतो. >>>>>त्यांना शाप दिला जातो कि दिवसा हिरो साप होणार आणि रात्री हिरोईन सापिन होणार ..असे काहितरी ..मग त्यात विरह गाणे टाकले आहे एकदा हिरोच्या हातात साप तर एकदा हिरवीनच्या हातात साप........ईईईईईई

>>>..मग त्यात विरह गाणे टाकले आहे
त्यात हे पण गाणं आहे की ...
कितने 'दिनों'के बाद है आयी सजना 'रात' मिलन की
ह्या वरुन पिक्चरची स्टोरी 'नॉर्वे' मध्ये घडत असावी अशी शंका येतेय. Wink

भयंकर आहे... भयंकर विनोदी.. प्रचंड खोकला झालाय म्हणून घरी बसलेय... घुसमटले खोकून खोकून इतकी हसले..
स्वप्ना-राज, बाई... तुला साष्टांग नमस्कार आहे...

मंडळी धन्स Happy

>>त्यांना शाप दिला जातो कि दिवसा हिरो साप होणार आणि रात्री हिरोईन सापिन होणार ..असे काहितरी ..मग त्यात विरह गाणे टाकले आहे एकदा हिरोच्या हातात साप तर एकदा हिरवीनच्या हातात साप

ब्यॉक....मग ती मिलनकी रात कशी काय जमवतात? बहुतेक 'रात्रीचा दिवस करत' असावेत Proud

काल 'जहरीला' नावाचा पिक्चर थोडासा पाहिला. त्यात मिथुन चक्रवर्ती सिरियल रेपिस्ट आणि ओम पुरी नामचीन वकिल असं अजब कास्टिंग आहे. सध्या 'लाईफ ओके' चॅनेलवर चालू असलेल्या 'देवोंके देव महादेव' ह्या सिरियलमधल्या दक्षाच्या पत्नीचं (आणि सतीच्या आईचं) काम केलेली अभिनेत्री आणि मिथुनदा ह्यांचं एक गाणं पाहिलं की आपल्याला इन्द्रासारखे हजार डोळे नाहीत ह्याबद्दल अपार समाधान वाटतं.

हा पिक्चर तेव्हढा कोणीतरी बघा.

'रात्रीचा दिवस करत' असावेत

रात्रीचा दिवस काय आणि दिवसाची रात्र काय.... कुणीतरी एकजण सापच असणार.

हा 'जहरीला' केप फिअरचा रिमेक आहे म्हणे!!! हे जर खरं असेल तर डि निरो जीव देईल!
आणि हो त्यात कश्मिरा शाह ओम पुरीची बायको आहे!

Pages