Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
इस्लामनुसार आजवर जन्मलेल्या
इस्लामनुसार आजवर जन्मलेल्या अन मरणार्या तमाम मानवांचा हिशोब एकसमयवच्छेदेकरून घेतला जाणार असतो
>>>
म्हणजे अॅडमिशन कधीही घ्या , परीक्षा आणि रिझल्ट सगळ्यांचा एकाच दिवशी :फिदी:.
नाही, अॅडमिशन, परीक्षा (
नाही, अॅडमिशन, परीक्षा ( "सारे जीवन हीच एक परीक्षा" वगैरे
) वेगवेगळे. फक्त रिझल्ट एकाच दिवशी 
ओके. "हम इंतझार करेंगे, हम
ओके.
"हम इंतझार करेंगे, हम इंतझार करेंगे, खुदा करे के कयामत हो और तू आये"... ह्यात प्रियकर त्या कयामत च्या भयंकर दिवशी येण्याचे लॉजिक काये मग?
कयामत भयंकर कोणाला? जो वाईट
कयामत भयंकर कोणाला? जो वाईट वागतो, गुन्हे करतो त्याला. पण जो चांगला वागतो त्याला हा दिवस वाईट असेल/ असे मानले असेल असे वाटत नाही. जसे आपल्याकडे चित्रगुप्त चांगले वागलेल्या मृतात्म्याला स्वर्ग देतो अन वाईट वागलेल्याला नरक तसेच चांगले वागलेल्याला कयामत हा चांगला दिवस असावा. हे माझे मत, नक्की माहिती नाही.
आता >हम इंतझार करेंगे, हम इंतझार करेंगे, खुदा करे के कयामत हो और तू आये < यात मी जगाच्या अंतापर्यंत वाट पाहिन अन देवकृपेने कयामतीचा दिवस येईल तेव्हा तू येशीलच. असा मला अर्थ लागतोय. खरे खोटे कवी जाणो. अन त्यातही जे न देखे रवी ते देखे कवी आहेच म्हणा
आपले सध्याचे जे अस्तित्व आहे,
आपले सध्याचे जे अस्तित्व आहे, ते मृत्यूनंतर देखील पण कयामतच्या दिवसापर्यत (अंशरुपाने का होईना )
राहणार आहे, तोपर्यंत मी तूझी वाट पाहीन, असा अर्थ आहे.
हा अर्थ मीराबाईने फार सुंदर रित्या एका रचनेत सांगितला आहे,
कागा कागा सब तन खाईयो, के चून चून खांईयो मांस
दो नैना मत खाईंयो, इन्हे पिया मिलनकी आस...
हे गाणे पूर्ण नाही, पण या ओळी लताच्या आवाजात, पिया मिलनकी आस ( अमिता. मनोजकुमार ) चित्रपटात
आहेत.
दिनेश छान आहेत ओळी.
दिनेश छान आहेत ओळी.
वा दिनेशदा ! फार फार सुरेख
वा दिनेशदा !
फार फार सुरेख आहे ते गाणं. "आस" या वरचा आलाप नुसता आठवूनही अंगावर काटा येतो....
भिमण्णांच तर फार आवडतं मला
कागा कागा सब तन खाईयो, के चून
कागा कागा सब तन खाईयो, के चून चून खांईयो मांस
दो नैना मत खाईंयो, इन्हे पिया मिलनकी आस...
>>
हे मीराबाईचे नाही .सूफी कवी शेख बाबा फरीद चे आहे. हीर रांझा व्हर्शन मधले. हीर म्हणते ते...
कागा कागा सब तन खाईयो, के चून
कागा कागा सब तन खाईयो, के चून चून खांईयो मांस
दो नैना मत खाईंयो, इन्हे पिया मिलनकी आस...
>>>
रॉकस्टार मधेही "ओ नादान परिंदे, घर आजा..." ह्या गाण्यात ह्याच अर्थाच्या पुढील ओळी आहेतः
कागा रे कागा रे, मोरी इतनी अरज तोसे
चुन चुन खाईयो मास
खाईयो ना दो नैना मोरे
खाईयो ना दो नैना
इन्हे पिया के मिलन की आस
म्हणजे मीराबाईच्या काळापासून
म्हणजे मीराबाईच्या काळापासून काव्यचोरी होत होती की काय ! असो. आदर सर्वच कविंबद्दल आहे मला.
'मोढा' चा शब्द्कोषातील अर्थ :
'मोढा' चा शब्द्कोषातील अर्थ : ओहोळ, ओघळ, खोरे.
आता अनिल अवचटांच्या लेखातील एक वाक्य बघा : ... सुनिताबाई त्या मोढ्यावर बसून फोन घेत.
तेव्हा 'मोढा' चे अनेक अर्थ दिसताहेत. कोणी स्पष्ट करेल?
मोढा = डमरुसारखी दिसणारी, वेत
मोढा = डमरुसारखी दिसणारी, वेत / बांबूपासून बनवलेली बुटकी बैठक. मुंडू असा शब्द पण ऐकलाय त्यासाठी.
धन्स माधव.
धन्स माधव.
मला मायबोलीवर वापरल्या
मला मायबोलीवर वापरल्या जाणार्या "रच्याक" या शब्दाचा अर्थ हवा आहे.
आर्.एस्.टि., इथे बघा
आर्.एस्.टि., इथे बघा
म्हणजे मीराबाईच्या काळापासून
म्हणजे मीराबाईच्या काळापासून काव्यचोरी होत होती की काय
>>
दिनेशदा तुम्ही माझी वरची पोस्ट पाहिलेली दिसत नाही . त्या ओळी बाबा फरीद यांच्या आहेत...
त्या ओळी वाचूनच मी लिहिले आहे
त्या ओळी वाचूनच मी लिहिले आहे ! या ओळी मीराबाईच्या नावावर पण खपवल्या गेल्या आहेत !
खंडपीठ म्हणजे नक्की काय
खंडपीठ म्हणजे नक्की काय होते?
बेंच म्हणजे बाकडे होते ना?
खंडपीठ = division bench?
खंडपीठ = division bench?
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Division_bench
बेंच = खंडपीठ
बेंच = खंडपीठ http://en.wikipedia.org/wiki/Bombay_High_Court
हम इंतझार करेंगे, हम इंतझार
हम इंतझार करेंगे, हम इंतझार करेंगे, खुदा करे के कयामत हो और तू आये >> तो वाट पाहातोय, पण ती येत नाही आहे तेंव्हा तो काहीशा उद्वेगाने बोलतोय कि कयामत येवो म्हणजे तू नक्की येशील, कारण कयामतच्या दिवशी सगळे येणे अपेक्षित आहे.
हे मीराबाईचे नाही .सूफी कवी शेख बाबा फरीद चे आहे. हीर रांझा व्हर्शन मधले. हीर म्हणते ते.>> हिर रांझाबाबत अनुमोदन. कोणाचे आहे ते माहित नाही.
शाद्वला, समीच, विह , स्मय या
शाद्वला, समीच, विह , स्मय या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का कोणाला ?
संदर्भ देउ शकाल का ?
संदर्भ देउ शकाल का ?
एका कानडी कवींच्या
एका कानडी कवींच्या नातवंडांची नावे आहेत ( बहुतेक के व्ही पुट्टप्पा ). त्यांच्या राहत्या घरात एक वस्तु संग्रहालय आहे . तिथे त्यांनी त्यांच्या नातवंडांची नावे ठेवलेली आहेत असे लिहिलेले होते.
समीच = समुद्र विह = आकाश स्मय
समीच = समुद्र
विह = आकाश
स्मय नक्की नाही माहित पण विस्मय शब्दाच्या उलट अर्थ असायला हवा.
विस्मयच्या उलट काय असतं?
विस्मयच्या उलट काय असतं?
स्मय = आश्चर्य शाद्वला =
स्मय = आश्चर्य
शाद्वला = हरीत. हिरवीगार....
पारंपरिक हा शब्द बरोबर की
पारंपरिक हा शब्द बरोबर की पारंपारिक? मी दोन्ही प्रकारे लिहिलेले व बोललेले पाहिले आहे.
जसे की सार्वजनिक, नागरिक त्या प्रमाणे पारंपरिक असायला हवे असे माझे मत!
मी लावलेलं लॉजिक असं आहे.
मूळ शब्द सर्वजन. त्याचे 'इक' प्रत्यय लावून विशेषण झाले "सार्वजनिक" इथे पहिले अक्षर होते 'स'. ते झाले आकारान्त! पण शेवटच्या अक्षरामागे (म्हणजे) 'न' च्या मागे जे अक्षर होते ('ज') ते तसेच राहिले.
सेम विथ नगर - त्याचे झाले नागरिक
मग 'परंपरा' ह्या शब्दाला तोच रूल अप्लाय केला तर पारंपरिक हे बरोबर असावे असे वाटतेय.
कुणी जाणकार सांगणार का?
पारंपरिक बरोबर आहे.
पारंपरिक बरोबर आहे.
Pages