Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
नक्की नक्की अश्विनी के....
नक्की नक्की अश्विनी के.... "लास्य" आणि पार्वती ही दोन्ही नावे अविभाज्यच आहेत, त्यात शंका नाही. प्रश्न आहे तो त्या मागील कारणमीमांसेचा....'क्रौधभावना'' की 'मोहभावना'.
दुष्मनोंमेभी कभी यार नजर आते
दुष्मनोंमेभी कभी यार नजर आते है
बारहा फूलभी तो, हार नजर आते है
अशी एक बेगम परवीन सुलताना यांनी गायलेली गझल आहे. मी योग्य असे ऐकले असेल, अशी आशा करतो.
बरहा, याचा अर्थ कानडीत बोलणे, असा होतो ना ? ते सॉफ्टवेअर तर वापरतोच आपण.
बरहा, याचा अर्थ कानडीत बोलणे
बरहा, याचा अर्थ कानडीत बोलणे >> नाही नाही, लिहिणे असा होता अर्थ कानडीत.
कोकणीत बरप ( लिखाण) बरौचे ( लिहिणे ) असे शब्द आहेत.
बरहा चा अर्थ कन्नडमध्ये लीपी
बरहा चा अर्थ कन्नडमध्ये लीपी असा होतो ना?
माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणाला माहित आहे का? 'छंद' अश्या नावाचा कुठला दागिना असतो का ?
पोस्ट संपादित
पोस्ट संपादित
वरती कुणितरी बारहा या शब्दाचा
वरती कुणितरी बारहा या शब्दाचा अर्थ विचारलाय. माझ्या मते त्याचा अर्थ वारंवार असा होत असावा.>>>>>
मीच ती ! धन्यवाद दक्षिणा
एका पब्लिक ट्रस्टच्या
एका पब्लिक ट्रस्टच्या नोंदणीच्या प्रमाणपत्रावर उजवीकडे कोपर्यात "विशेष/ध.आ./मु.सा.वि./२म." असं लिहिले आहे. त्यातील "ध.आ" म्हणजे "धर्मादाय आयुक्त" असेल का? कारण या प्रमाणपत्रावर सहायक धर्मादाय आयुक्तांची (डेप्यु.चॅरीटी कमिशनर) सही शिक्का आहे. आणि मग बाकीच्या संक्षिप्त अक्षरांचा अर्थ काय आहे?
मु.सा.वि. = शासनाच्या विविध
मु.सा.वि. =
शासनाच्या विविध विभागासाठी लागणारी छापील पत्रके तसेच लिखाणासाठी लागणारी कोरी कागदपत्रे एका विशिष्ट अशा शासकीय मुद्रणालयात छापली जातात. सदर विभागाकडूनच कोणत्या खात्यासाठी कोणती स्टेशनरी+फॉर्म्स तयार केली त्याची नोंद शिवाय छपाईचा आकडा/साल या बाबीही मुख्य पानाच्या उजव्या बाजूस नोंद करण्यात येते.
"ध.आ./मु.सा.वि./२म. = धर्मादाय आयुक्त/मुद्रण सामग्री विभाग असे ते पूर्ण रूप असून २ म हा त्या खात्याच्या संकेतक्रमांक असतो.
अशोकजी खूप खूप धन्यवाद!!
अशोकजी खूप खूप धन्यवाद!!
अश्विनी आणि अशोकजी, लास्य
अश्विनी आणि अशोकजी, लास्य मधला मूळ शब्द 'लास' आहे. त्यावरून विलास, लास्य, विलसीत असे शब्द बनले आहेत. मूळ शब्दाचा नक्की अर्थ माहीत असेल तर लास्यचा अर्थ लावणे सोपे होईल.
मनोहर नाही पण 'सुकुमार' हा अर्थ पण बरोबर वाटतोय. शंकराचे (पुरुषाचे) नृत्य हे जोशपूर्ण असते. त्याउलट पार्वतीचे (स्त्रीचे) नृत्य हे सुकुमार असते.
चिमुरी, राउळ म्हणजे मंदिर.
चिमुरी, राउळ म्हणजे मंदिर.
'मंद्र' मुंमग्रसंला परत केले
'मंद्र' मुंमग्रसंला परत केले आहे, त्यामुळे नक्की कोणता अर्थ अचूक बसतोय ते पडताळणे सध्या तरी शक्य नाही. गाणे आणि शरीर - दोन्हींच्या वर्णनासाठी लास्य हा शब्द वापरल्याचे अंधुक आठवतेय.
सख्यत्व हा शब्द बरोबर आहेत
सख्यत्व हा शब्द बरोबर आहेत का?
सखा->सख्य ही उपपत्ती अर्थाच्या दृष्टीने योग्य वाटते आहे. पुढे सख्यत्व कसे काय?
'अमोघ'चा अर्थ माझ्याकडच्या
'अमोघ'चा अर्थ माझ्याकडच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात of unquestioned potency असा आहे. पण या शब्दाची फोड कशी करायची?
सद्गुरुचरित्रात 'हिंपुटी' हा
सद्गुरुचरित्रात 'हिंपुटी' हा शब्द आलाय.
त्याचा अर्थ काय?
हिंपुटी, हिंपुटा = sad,
हिंपुटी, हिंपुटा = sad, depressed
धन्स भरतजी
धन्स भरतजी
अवो ताई, जी नका ना लावू!
अवो ताई, जी नका ना लावू!
श्री.मयेकर ~ 'अमोघ' च्या
श्री.मयेकर ~
'अमोघ' च्या निमित्ताने 'मोघ' चा शोध घेतला असता "निरुपयोगी, उदासीनता, आळसपणा' तत्सम गुण [वा अवगुण] दर्शविणारी स्थिती मिळाली. त्या अनुषंगाने विचार केल्यास 'अ' ही त्या स्थितीची उलट बाजू समोर आणते.
"आपल्या अमोघ वाणीने अत्र्यांनी सभा जिंकली....' असा प्रयोग जेव्हा आपण वाचतो, त्याचा अर्थ 'उल्हसित, प्रभावी, तेजस्वी, मंत्रमुग्ध, बिनतोड' आदी प्रभाव दर्शवितात. थोडक्यात जे 'मोघ' नाही ते 'अमोघ' अशी एक सहज पुढे येणारी फोड करता येईल....असे वाटते.
अशोक पाटील
आणखी एक अर्थ इथे आहे :
आणखी एक अर्थ इथे आहे : हिंपुटी = हीन
इथे मोघ या शब्दाचा अर्थ
इथे मोघ या शब्दाचा अर्थ व्यर्थ , निष्फळ असा मिळाला. अमोघ म्हणजे जे कधीही निष्फळ होणार नाही असे अस अर्थ घेतला तर तो अमोघ अस्त्र, अमोघ वाणी (जे कधीही वाया जात नाही, नेहमी योग्य परिणाम साधते) यांच्याशी जुळतोय.
अमोघचा एक अर्थ 'अजेय invincible' असा मिळाला. तो अ+मोघ अशाने निष्पन्न होणार्या अर्थाचे एक्स्टेन्शन वाटतोय.
एका नकारात्मक (व्यर्थ, निष्फळ) अर्थाच्या शब्दाला उपसर्ग लावून त्यापासून सकारात्मक शब्द बनल्याचे आणखी उदाहरण आहे का? (अमर हा एक आठवला, पण मृत्यू हा नकारात्मक शब्द आहेच असेही नाही, )
धन्यवाद....पाहिली मी तो
धन्यवाद....पाहिली मी तो संदर्भ. मोघ = निष्फळ तसेच व्यर्थ - vain, fruitless या अर्थानेही चपखल बसतो.
'अमर' च्या रांकेत 'अमोल, अजित, अभय, अचल, अभिनव.....' अशी काही नामे समोर येतात. तसे पाहिल्यास 'अमर' ही नित्यनेमाने मृत्यूशीच संबंधित येईल असेही काही नसावे. 'कधीही पुसून न जाणारी आठवण' या साठीही आपण अमर वापरतोच. 'लताचे गाणे अमर आहे' ही भावना त्याच पठडीतील.
अभिष्टचिंतन, या शब्दाचा नेमका
अभिष्टचिंतन, या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? या शब्दाचा विग्रह कसा करायचा? अभि + इष्ट + चिंतन हे बरोबर आहे का?
१) 'गजांत लक्ष्मी' हा शब्द
१) 'गजांत लक्ष्मी' हा शब्द गडगंज श्रीमंती ह्या अर्थाने वापरतात. इथे "गज" म्हणजे हत्ती ह्या शब्दाचा संदर्भ काय आहे. भव्यतेच्या दृष्टीकोनातून आहे का?
२) गजगती आणि गजगामिनी ह्यामध्ये दृत गतीने चालणे हा संदर्भ आहे की मंद चाल अपेक्षित आहे?
निंबुडा >> १) बहुधा 'हत्ती
निंबुडा >>
१) बहुधा 'हत्ती सुद्धा पोसू शकतील एवढे श्रीमंत' असा अर्थ अपेक्षित आहे.
२) गजगती = मंद चाल अपेक्षित आहे.
गजगती आणि गजगामिनी --> हे समानर्थी शब्द नव्हेत ना?
अमोघ म्हणजे जे कधीही निष्फळ
अमोघ म्हणजे जे कधीही निष्फळ होणार नाही असे अस अर्थ घेतला तर तो अमोघ अस्त्र, अमोघ वाणी (जे कधीही वाया जात नाही, नेहमी योग्य परिणाम साधते) यांच्याशी जुळतोय.
>>>
हम्म्... असेच काहीसे अपेक्षित होते. धन्यवाद भरत!
मला वाटते गजगती आणि गजगामिनी
मला वाटते गजगती आणि गजगामिनी याचे अर्थ वेगवेगळे आहेत.
गजगती = मंद गती
गजगामिनी = हत्तीसारखी (डौलदार) चाल असणारी
गजगती = राजेशाही चाल तसेच
गजगती = राजेशाही चाल तसेच धीरगंभीर वर्तन [मंदगती या अर्थाने वापरले जात नाही].
गजगामिनी = वर गौरी यानी दिलेला अर्थ अचूक आहे. एखाद्या रुपगर्वितेच्या चालीला दिलेले हे नाम असू शकते.
याशिवाय
"गजगौरी" = हे आणखीन् एक याच संदर्भात सामोरे येणारे नाम; जे हत्तीरूढ झालेल्या पार्वतीला उद्देश्यून म्हटल जाते.
अशोक पाटील
गजगती आणि गजगामिनी --> हे
गजगती आणि गजगामिनी --> हे समानर्थी शब्द नव्हेत ना?
>>>
समानार्थी आहे म्हणायचं नव्हतं. पण एखाद्या व्यक्तीची चाल ह्या अर्थी त्या शब्दांत संदर्भ आहे म्हणून विचारलं. धन्यवाद सर्वांना!
अभिष्टचिंतन, या शब्दाचा नेमका
अभिष्टचिंतन, या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? या शब्दाचा विग्रह कसा करायचा?
Pages