Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
आम्ही चकलीचा फन्ना केला. लाडू
आम्ही चकलीचा फन्ना केला. लाडू फस्त केले. अशी वाक्ये मराठीत वापरली जातात.
यातील फन्ना हा शब्द कुठुन आला? उर्दुत फना म्हणजे नाश, विध्वंस अशा अर्थाचा शब्द आहे त्यावरुन म्हणजे फारसीतून हा शब्द आला आहे का?
फस्त हा शब्द कसा आला ?
हवालदिल ह्या शब्दाचा अर्थ काय? मराठीत आपण हा शब्द हतबल, निराश या अर्थी वापरतो. हा शब्दही फारसीतून आला असावा. पण कुणी ह्यातील शब्दांची फोड करुन अर्थ स्पष्ट करेल का?
वरीलपैकी 'हवालदिल' विषयी मी
वरीलपैकी 'हवालदिल' विषयी मी सांगू शकेन.
हवालदिल याची व्युत्पत्ती 'हौलदिल' मूळ फारसी अवस्थेत असून "हौल = भयावह स्थिती, गांजलेली अवस्था" अशा अर्थाने घेतली जाते. मग अशा स्थितीतील व्यक्तीच्या "दिल"ची जी अवस्था तिला हौलदिल म्हटले जाते. मराठीत मात्रांचा लोप होऊन हौल चे हवाल झाले.
मात्र मराठीत 'हवाल' ला स्वतंत्र आणि वेगळे रूप आहे. एखाद्या जागेची वा परिस्थितीची खबर म्हणजे हवाल. यातूनच अशी खबरबात, वा नोंद करणार्या जबाबदार व्यक्तीला 'हवालदार' म्हटले जाते.
उर्दूत 'हाल-ए-दिल' सांगण्याचा एक प्रकार आहे. तक्रार या अर्थाने एरव्ही घेतला जातो. पण काव्यात्मकपणानेदेखील याचा उपयोग केल्याचे आढळते. सुमन कल्याणपूर यांचे 'हाल-ए-दिल उनको सुनाया ना गया' असे एका चित्रपटात मधुर गीतही आहे.
फारच चांगली उपयुक्त माहिती
फारच चांगली उपयुक्त माहिती पुरवलीत.
आभार.
मूळ फारसी असणारे मराठी शब्द विचारात घेतले तर त्यात दार आणि गार ने शेवट होणारे अनेक शब्द आहेत (उर्दूत गारचा गर (ग + नुक्ता) होतो) .
उदा. हवालदार, किल्लेदार, ठाणेदार, इमानदार, दिलदार, खजिनदार, जहागीरदार वगैरे.
आणि जादूगार, किमयागार, सल्लागार, माहितगार वगैरे
ह्या प्रत्ययांना आपला असा अर्थ आहे का? जसे करणारा, बाळगणारा वगैरे?
शेंडे बुवा 'दार' म्हनजे
शेंडे बुवा
'दार' म्हनजे 'ताब्यात असनारा' 'in charge of something'
हवालदार म्हणजे हवालात(कस्टडी) चा ताबेदार , फौजदार -फौजेचा ताबा असणारा, किल्लेदार- किला ताब्यात असणारा किंवा किल्याचा इनचार्ज (मालक नव्हे )
'गार' म्हणजे बहुधा 'करणारा/देणारा' च्या जवळपास. माहीतगार शब्द उर्दू पर्शियन मध्ये दिसत नाही.मराठीच आहे असे वाटते.तसेच किमयागार शब्दही इतर भाषात आढळला नाही. 'गोरक्षनाथांचे गोरक्ष किमयागार' म्हणून पुस्तक आहे त्यामुळे हा शब्द उर्दू पर्शियन असण्याची शक्य्ता वातत नाही.
.
.
फारसीमधे महतदी (नक्की उच्चार
फारसीमधे महतदी (नक्की उच्चार ठाऊक नाही. कारण उच्चाराची चिन्हे काने, मात्रे वेलांटी सदृश ही फारसी लिपीत सहसा वापरली जात नाहीत) असा काहीसा शब्द आहे. त्याचा अर्थ दिशा, मार्गदर्शन (direction, guidance, lead) असा आहे. हा माहितीच्या जवळ जाणारा शब्द वाटतो.
दारचा तुम्ही दिलेला अर्थ बराचसा बरोबर वाटतो. पण दिलदार च्या बाबतीत तसा अर्थ तितकासा पटत नाही.
मालदार म्हणजे श्रीमंत, गब्बर वगैरे. तिथेही. जबाबदारचे काय? उत्तर देणारा असा अर्थ असावा.
जबाबदारचे काय? उत्तर देणारा
जबाबदारचे काय? उत्तर देणारा असा अर्थ असावा.
जबाबदार हे answerable याचे मराठीत केलेले शब्दशः भाषांतर वाटते.
हा शब्द हिंदी/उर्दूत नाही (जिम्मेदार हा शब्द आहे) तेव्हा, फारसी शब्द (जबाब) आणि फारसी उपसर्ग (दार) वापरून बनवलेला हा शुद्ध मराठी शब्द असावा!
नाही. जवाबदार हा शब्द मला
नाही. जवाबदार हा शब्द मला फारसी शब्दकोषात सापडला. तेव्हा हा मूळ फारसीच.
असे अनेक शब्द आहेत जे अरबी वा फारसीतून थेट मराठीत आले आहेत पण हिंदी वा उर्दूत फारसे आढळत नाहीत.
जाहिरात हा एक शब्द. हिंदीत /उर्दूत इश्तेहार. पण मराठीत जाहिरात.
राजीनामा. हिंदीत इस्तेफा.
अजूनही आहेत.
'डोंगर' शब्दाचे मुळ काय
'डोंगर' शब्दाचे मुळ काय आहे??एम टिव्हीवर 'डुंगर दुख न दे' असे सिंधी गाणे ऐकण्यात आले .
भागानगरी या शब्दाचा अर्थ
भागानगरी या शब्दाचा अर्थ काय?
श्री गजाननविजय मध्ये हैदराबादला उद्देशून भागानगरी हा शब्द वापरला आहे त्याला काही संदर्भ आहे का?
Hyderabad was known
Hyderabad was known originally as Bhagyanagar, a city Sultan Muhammad Quli of the Qutub Shahi dynasty had founded and named after his beloved Bhagmati or Bhagyamati in 1590. Once she entered the royal household and embraced Islam, she was rechristened Hydermahal and as a natural consequence, the city got its second name, Hyderabad
"भागानगरी" जरूर संदर्भ आहे,
"भागानगरी" जरूर संदर्भ आहे, माधवराव.
१५ व्या शतकानंतर दक्षिणेवरील हिंदु सम्राटांची सत्ता बहामनी राजांनी संपुष्टात आणली व तिथून त्या भागावर मुघल पातीतील कुतुबशाहीचे राज्य सुरू झाले. हैद्राबाद शहराची नव्याने उभारणी झाली ती त्या शाहीतील सुलतान मुहम्मद कुली कुत्ब शाह याच्याकडून...सन १५९१. त्या शहराच्या बांधणीचा पायाभरणी करताना या नव्याने होऊ घातलेल्या शहराला त्याने नाव दिले ते आपल्या 'भागमती" या पट्टराणीच्या नावाने....'भाग्यनगर'. भागमतीने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि मग त्या धर्मातील तिने नाव स्वीकारले 'हैदरमहल".
हीच दोन्ही नावे लोकांच्या तोंडी बसली...सुरुवातीला 'भाग्यनगरी' वा 'भागानगरी'....नंतर हैदरमहालवरून 'हैदराबाद".
[आपल्या महाराष्ट्रात का कोण जाणे "हैद्राबाद" असे त्या गावाचे नाव लिहायची पद्धत आहे....पण मी पाहिले आहे...राहिलो आहे त्या गावात, तेथील मुस्लिमच नव्हे तर मराठी वंशाची जनतादेखील 'हैदराबाद' असेच लिहित असते...जे योग्य आहे.]
धन्यवाद बाजो, अशोकजी. नविन
धन्यवाद बाजो, अशोकजी. नविन माहिती मिळाली.
"खंडपीठ" ला इंग्रजीमध्ये काय
"खंडपीठ" ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
बेंच.
बेंच.
थँक्स चिनूक्स
थँक्स चिनूक्स
विवेकाने ज्याने सुघटितसमाजा
विवेकाने ज्याने सुघटितसमाजा टिकविले
महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले
लसद्भक्ती-ज्ञाने तरतरविला धार्मिकतरू
तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन करू.
ज्याने समाजाची विवेकबुद्धी जागृत करून समाज सुसंघटित केला, गीता मराठीत ज्ञानेश्वरीरूपाने आणून समाजात भक्ती आणि ज्ञानाचं रोप उंचावून त्याचा वृक्ष केला, त्या ज्ञानेशाला आपण विनम्र भावाने वंदन करू हा अर्थ समजतो, पण 'लसद्भक्ती' म्हणजे काय? नवविधा भक्ती इत्यादी प्रकार असतात ते कोणते? त्यातलाच हा आहे का?
नवविधा भक्ती असा सर्च
नवविधा भक्ती असा सर्च दिल्यावर हे सापडलं.
स्वाती....तुम्ही दिलेल्या
स्वाती....तुम्ही दिलेल्या लिंकवर भक्तीची नऊ रूपे नामानिशी तसेच त्या त्या व्याख्येनुसार उपलब्ध आहेत. आनंद वाटला त्याबाबतची माहिती मिळाल्याने. धन्यवाद.
समर्थ रामदासांचा नवविधा भक्तीवर एक अभंग आहे, तो वरील व्याख्येनुसारच भक्तीचे वर्णन करतो :
"श्रवण म्हणजे ऐकतची जावे
बरे विवरावे ग्रंथांतरी
ग्रंथांतरी कळे ते मुखे बोलावे
कीर्तन जाणावे त्याचे नाव
नाव घ्यावे साचे सर्वदा देवाचे
तिसरे भक्तीचे लक्षण हे
लक्षण चौथीचे ते ऐसे जाणावे
पाऊल सेवावे सदगुरुचे
गुरुदेव पूजा तेची ते अर्चन
सहावे वंदन नमस्कार
नमस्कार कीजे सर्व दास्यभावे
भक्तीचे जाणावे लक्षण हे
सांगावे जीवींचे देवापाशी
देवापाशी होता उरेना मीपण
आत्मनिवेदन रामदासी"
@ प्रज्ञा
'लसद्भक्ती' चा उल्लेख नवविधा भक्तीत आढळून येत नाही. पण आता याचा अर्थ शोधलाच पाहिजे, इतका छान आणि कोड्यात टाकणारा शब्द आहे हा.
अशोक पाटील
अभियान हा मराठी शब्द आहे का?
अभियान हा मराठी शब्द आहे का? नसेल तर त्या अर्थाचा मराठी शब्द कोणता?
चळवळ
चळवळ
स्वाती, धन्यवाद !
स्वाती, धन्यवाद !
अभियान हा संस्कृतोद्भव शब
अभियान हा संस्कृतोद्भव शब असल्याने तसाच्या तसा मराठीत वापरायला काय हरकत आहे. तसा हा शबद 'सिन्थेटिक'च् आहे..
नवविधा भक्तीचे तिथे दिलेले
नवविधा भक्तीचे तिथे दिलेले विवेचन चूकीचे आहे.
कयामत ह्या शब्दाचा नक्की अर्थ
कयामत ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय?
मुस्लिमांमधे 'कयामत म्हणजे शेवटचा दिवस ज्या दिवशी सर्वांच्या पाप-पुण्याचा हिशोब केला जाईल' अशी काहीतरी कन्सेप्ट असल्याचे सिनेमांमधूनच कळले होते.
पण काही गाण्यांमधे प्रेमिकेच्या अदा कयामत वै. असल्याचे उल्लेख असतात. "आपका आना कयामत.." वगैरे. किंवा "कयामत ढाना" अशा अर्थाचा वाक्प्रचारही हिंदीत आहे. मग इथे कयामतचा अर्थ वेगळा आहे का?
नाही, कयामतचा अर्थ तोच आहे.
नाही, कयामतचा अर्थ तोच आहे. सगळा हिशेब त्याच दिवशी समक्ष द्यायचा असल्याने तो दिवस भयंकर आहे असे मानण्याची पद्धत आहे. म्हणून त्या अदा / येणे हे कयामत ढानेवाले वगैरे असतात.
'आपल्या' धर्मात असलेल्या
'आपल्या' धर्मात असलेल्या 'प्रलयदिना'शी जवळीक असणारी कल्पना आहेती
हं @ बाजो. प्रलयाच्या वेळी
हं @ बाजो.
प्रलयाच्या वेळी सगळे जग बुडते, एकादाच मनु वाचविला जातो. त्याच्या सोबत सगळे प्राणी जगतात. (मनुसोबत किंवा नोहा सोबत कोणती स्त्री होती हे मला कुणी सांगेल काय?)
'कयामत का दिन' म्हणजे परवरदिगाराला आयुष्याचा हिशोब देण्याचा दिवस. याच्या प्रतिक्षेत सगळे मृतात्मे असतात.
पण कयामत म्हणजे भीषण संकट. (Maybe, for the simple reason, की त्या दिवशी सगळ्यांनीच केलेली पापं 'फेडावी' लागतात.. प्रत्येकालाच ते संकट वाटत असेल?) it refers more to the 'end of time'
'आपल्या'कडेही चित्रगुप्त हा
'आपल्या'कडेही चित्रगुप्त हा पापपुण्याचे डेबिट क्रेडित पाहून स्वर्गात पाठवायचे की नरकात याचा निर्नय घेतो. त्या दिवसाची आठवण झाली की आस्तिक माणसाचे पाय लटपटू लागतात. पण त्या दिवसाला विशिष्ट असे नाव नाही....
बाजो, इस्लामनुसार आजवर
बाजो, इस्लामनुसार आजवर जन्मलेल्या अन मरणार्या तमाम मानवांचा हिशोब एकसमयवच्छेदेकरून घेतला जाणार असतो. एकसाथ कोरी पाटी मग नवा डाव अशी काहीशी आयडिया आहे. Its more like End of Time.
आपले चित्रगुप्त काका फुरसतीत जो खपला त्याचा हिशोब क्लोज करून अकाऊंटस कंप्लीट करत असतात...
Pages