Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
बारहा म्हणजे बारा (१२). उदा:
बारहा म्हणजे बारा (१२).
उदा: ११ = ग्यारह
१३= तेरह
१४ = चौदह
तसेच
१२ = बारह
मास्तुरे ~ Analysis ला दोन्ही
मास्तुरे ~
Analysis ला दोन्ही अर्थ [विश्लेषण आणि पृथक्करण] जरी लागू असले तरी त्यांचा वापर स्वंतत्र छ्टा दाखवितात. उदा. लॅबोरेटरीमध्ये केमिस्ट्री/फिजिक्स प्रॅक्टिकल्सच्या वेळी प्रयोगाअंती आलेल्या रीझल्ट्स [ज्याना 'रीडिंग' असे संबोधिले जाते] वेगवेगळ्या प्रकारे येते, ते का आणि कसे आले याची कारणमीमांसा म्हणजेच 'विश्लेषण'.
तर एखाद्या घटनेविषयी तुम्ही अंती काढलेल्या अनुमानाला 'पृथक्करण' असे म्हणतात. उदा. सरड्याच्या रंग बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष तुमचा काही भाग वा हात नसतो, ती एक नैसर्गिक देणगी आहे. पण एक अभ्यासक म्हणून त्या रचनेचा तुम्ही अभ्यास करता आणि त्यावरून काढलेल्या अनुमानाचे जे अॅनॅलिसिस ते म्हणजे पृथक्करण.
औषध निर्माण केन्द्रामध्ये Analytical Chemist नामक एक पोस्ट असते. शासकीय परिभाषेत त्याला यासाठीच 'विश्लेषण रसायशास्त्रज्ञ' असे नाम आहे.
तर एखाद्या घटनेविषयी तुम्ही
तर एखाद्या घटनेविषयी तुम्ही अंती काढलेल्या अनुमानाला 'पृथक्करण' असे म्हणतात. <<< मला पटले नाही. त्याला निष्कर्ष म्हणता येईल.
माझ्या माहितीनुसार पृथक्करण - एखाद्या क्लिष्ट गोष्टीतले मूलभूत घटक वेगवेगळे करून दाखवणे.
उदा. एखाद्या अन्नपदार्थात प्रथिनं, कर्बोदकं, मेद प्रमाण. किंवा एखाद्या रसायनातील मूलद्रव्यांचं विश्लेषण.
गजानन बरोबर सहमत.
गजानन बरोबर सहमत. रसायनशास्त्रात 'पाण्याचे पृथक्करण करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करणे' असे वाचले आहे.
गजाननराव...... मी खुलासा
गजाननराव...... मी खुलासा करण्यामध्ये किंचित कमी पडलो आहे असे वाटते. असो.
दुसरे उदाहरण घेऊ या : लोलकातून आपण किरण सोडतो आणि त्यातून इन्द्रधनुष्यातील सात रंगाचे पृथक्करण केले जाते असे म्हटले जाते. इथे 'पृथक्करणा'ची प्रक्रिया आपण करत नसून ती आपसूकच घडली आहे. त्यावर बाहेरून कोणतेही प्रयोग घडलेले नाहीत {वरील सरड्याचे उदाहरण}.
पण 'विश्लेषणा' त आपण काहीतरी प्रयोग करीत आहोत. केमिस्ट्री लॅबमध्ये एकाच प्रयोगाचे तुमचे रिडींग व माझे रिडींग वेगवेगळे येऊ शकतात. ते कसे आले याचे विश्लेषण करण्यास लॅब. इन्स्पेक्टर आपणास सांगू शकतो.
लोलकातून आपण किरण सोडतो आणि
लोलकातून आपण किरण सोडतो आणि त्यातून इन्द्रधनुष्यातील सात रंगाचे पृथक्करण केले जाते असे म्हटले जाते. <<< इथं पांढर्या प्रकाशातून ते रंग वेगळे होतात म्हणून त्याला पृथक्करण म्हणतात असे मला वाटते.
क्रिया आपोआप होतेय किंवा केली जातेय यावरून त्याला पृथक्करण म्हणावे की नाही हे ठरले जाते ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे.
"रंग वेगळे होतात...." राईट.
"रंग वेगळे होतात...."
राईट. मला हेच म्हणायचे आहे की, 'रंग वेगळे करण्याची' प्रक्रिया 'होते' ती आपण 'करत' नाही. ते वेगळे कसे होतात त्याचा अभ्यास म्हणजेच त्या प्रोसेसचे पृथक्करण.
"विश्लेषण" वर विवाद होऊ शकतात. माझा कोर्ट केसीसशी या ना त्या निमित्ताने संबंध येत असतो [मी वकील नाही.....] त्यामुळे कोर्टासमोर आलेल्या काही खुनाच्या केसीस च्या वेळी 'Viscera Analysis' प्रकरण समोर येते त्यावेळी साक्षीसाठी बोलाविलेल्या दोन डॉक्टरांच्या 'विश्लेषणात' कसा काय फरक पडला ? या मुद्द्यावर दोन्ही बाजूंच्या वकीलांनी घातलेली हमरीतुमरी मी पाहिली आहे.
न्यायाधिश त्या अनुषंगाने स्टेनोला मराठीतून प्रोसिडिंग डिक्टेट करताना सांगतात, "सरकारी वकीलांनी विचारलेल्या प्रश्नाला साक्षीदार डॉक्टर अ म्हणाले की त्यानी केलेले रक्ताचे विश्लेषण तपासणीसाठी दिलेल्या व्हीसेराला लागलेल्या रक्ताशी मेळ खाते."
इथे 'पृथक्करण' चा वापर केला गेला नाही, कारण 'विश्लेषण' हे एक मत आहे. ते स्वीकारावे की नाही ती बाब कोर्ट निकालाच्यावेळी ठरवेल.
व्यावहारिक या शब्दाचा नक्की
व्यावहारिक या शब्दाचा नक्की अर्थ काय? याचा धार्मिक भाषेत काही विषेश अर्थ आहे का?
चंद्रकोरीला इंग्रजी मध्ये काय
चंद्रकोरीला इंग्रजी मध्ये काय म्हणायचे. पौर्णिमेच्या चंद्राला फूल मून. अमावस्येला नो मून. तसं चंद्रकोरीला काय? शाळेत असताना एका इंग्रजी कविते मध्ये "हंच बॅक मून" (कुबड आलेल्या पाठीचा शब्द :-() असा अरसिक शब्द ऐकला होता.
चन्द्रकोर= क्रिसेन्ट
चन्द्रकोर= क्रिसेन्ट मून
व्यावहरिक= व्यवहार शब्दाचे भाववाचक नाम.
व्यावहरिकला धार्मिक क्षेत्रात
व्यावहरिकला धार्मिक क्षेत्रात विशेष अर्थ असेल असे वाटत नाही. (हे पेन्डसे गुरुजींच्या अपरोक्ष बोलत आहे याची नोन्द घ्यावी::फिदी:)
चन्द्रकोर= क्रिसेन्ट
चन्द्रकोर= क्रिसेन्ट मून
>>
धन्यवाद
श्री.बाळू जोशी... तुम्ही
श्री.बाळू जोशी...
तुम्ही उपयोगात आणलेले
"(हे पेन्डसे गुरुजींच्या अपरोक्ष बोलत आहे याची नोन्द घ्यावी.")
~ हे पेन्डसे गुरुजींच्या परोक्ष बोलत आहे याची नोन्द घ्यावी.
असे असायला हवे असे मला वाटते. आपले मत ?
अशोक पाटील
वरती कुणितरी बारहा या शब्दाचा
वरती कुणितरी बारहा या शब्दाचा अर्थ विचारलाय. माझ्या मते त्याचा अर्थ वारंवार असा होत असावा. देव आनंद चं अत्यंत फेमस गाणं... कभी खुद पे कभी हालात पे
मधल्या शेवटच्या कडव्यात बारहा हा शब्द आलेला आहे. पहा...
किस लिए जीते हैं, हम किस के लिए जीते हैं
बारहा ऐसे सवालात पे रोना आया
दक्षिणा.... अगदी
दक्षिणा....
अगदी अगदी.....'बारहां' [हा वर एक नुक्ता आहे] चा तोच अर्थ आहे जो तुला देव आनंदच्या त्या गाण्यात अभिप्रेत आहे.
एका सुंदरीच्या रुपाचे वर्णन करणारी 'चाँद' नावाची कविता आहे. त्यातील एक ओळ
"जिस जिस पर पड़ गयी कातिल तेरी नज़र
झुक झुक कर उसने तुझे बारहां हुजूर कहा है...."
~ इथेही 'बारहां' अर्थ तू म्हणतेस तसा 'वारंवार' हा आहे.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
अशोक्जी. परोक्षबद्दल तुमचे मत
अशोक्जी. परोक्षबद्दल तुमचे मत शिरोधार्य आहे. माझयासारखेच बरेच लोक्ते चुकीने वापरतात ... ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी 'सारखेच
ज्यासी आपंगिता नाही त्यासी
ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी
याचा अर्थ काय? पं भिमसेन यांच्या अभंगात आहे.
मोहनराव ~ संत तुकारामाचा हा
मोहनराव ~
संत तुकारामाचा हा अभंग ~
जे का रंजले गांजले / त्यासी म्हणे जो आपुलें
तोची साधू ओळखावा / देव तेथेची जाणावा
म्रुदु सबाह्य नवनीत / तैसे सज्जनाचे चित्त
ज्यासी आपंगिता नाही / त्यासी धरी जो हृदयीं
दया करणे जे पुत्रासी / तेची दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती / त्यचि भगवंताच्या मूर्ती
~ इथे 'आपंगिता' चा अर्थ 'सहारा'....'त्यागलेले' : इंग्रजीत ज्याना Forsaken म्हटले जाते असे दीन लोक....."त्यासी धरी जो हृदयी..." असे तुकोबा म्हणतात.
अशोक पाटील
श्री.बाळू जोशी ~ अहो मीदेखील
श्री.बाळू जोशी ~
अहो मीदेखील कित्येक वेळा या परोक्ष-अपरोक्षच्या जाळ्यात सापडलो होतो. फार फसवा शब्द आहे हा. तसे पाहिले तर मी तुम्हाला ते भीतभीतच विचारले होते.
एक परोक्ष भूतकाळ असतो म्हणे
एक परोक्ष भूतकाळ असतो म्हणे संस्कृतात. तो कसा व कोणता?
administrative wing याचा
administrative wing याचा मराठी शब्द प्रशासकीय विभाग बरोबर आहे का?
हिंदीमधे प्रशासकीय स्कंध असे भाषांतर केले आहे.
लास्य म्हणजे काय.
लास्य म्हणजे काय. भैरप्पांच्या 'मंद्र; मध्ये हा शब्द आला आहे.
दिठी म्हणजे काय?
दिठी म्हणजे काय?
दिठी = दृष्टी / नजर लास्य =
दिठी = दृष्टी / नजर
लास्य = लज्जा???
जसा शंकराच्या नृत्याला
जसा शंकराच्या नृत्याला "तांडव" म्हणून ओळखले जाते तसे पार्वतीचं नृत्य "लास्य" म्हणून ओळखले जाते. जेव्हा तिच्या बाळाचे शीर शंकर उडवतात तेव्हा ती क्रोधाने जे नृत्य करते ते लास्य होते (बहुतेक). शक्तीचे लास्य फार मोठा उद्रेक निर्माण करते झाले असते आणि ते विश्वाला झेपले नसते म्हणून शंकरांनी दुसरे शीर आणून बाळाला लावतो असेल सांगितले.
गूगलवर असा अर्थ दिसला की तांडवाला शांत करणारं प्रसन्नता आणणारं पार्वतीचं नृत्य
Administrative Wing =
Administrative Wing = प्रशासकीय विभाग हे बरोबर आहे; पण बाह्यअंगाने. उदा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला लागून असलेल्या बिल्डिंगमध्ये प्रशासनाचा कारभार चालत असेल तर त्या बिल्डिंगला 'अॅडमिनिस्ट्रटिव्ह विंग' म्हटले जाते. मात्र मुख्य इमारतीच्या आतच प्रशासकीय विभागाचे कामकाज चालत असेल तर अशावेळी Administrative Section अशा नामाने त्या विभागाला ओळखले जाते.
अश्विनी के. ~ तुम्ही दिलेल्या
अश्विनी के. ~ तुम्ही दिलेल्या 'लास्य' नृत्यामागील कारणमीमांसा रोचक आहे. तरीही पार्वतीचे त्या नृत्याला 'लास्य' चे म्हणावे का ? असाही प्रश्न माझी मनी आला आहे, कारण लास्यचा मी वाचलेला अर्थ = सुकुमार वा मनोहर असा होता. अर्थात भरत नाट्यशास्त्रात शंकराच्या तांडव नृत्याच्या बरोबरीने पार्वतीच्या 'लास्य' नृत्याचाही उल्लेख आलाच आहे; पण भरतमुनींच्या व्याख्येत शंकराच्या तांडवाने, रौद्राने त्रिलोक डळमळीत होऊ लागला त्यावेळी शंकराला रिझविण्यासाठी पार्वतीने जे 'मनोहर' नृत्य केले त्यालाच 'लास्य' नाव पडले.
[ही माहिती तशी त्रोटक आहे, पण असा उल्लेख भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे हे मात्र पक्के. तुम्ही दिलेल्या 'लास्य = क्रोध नृत्या'च्या अनुषंगाने काही संदर्भ मिळतात का ते पाहतो.]
अशोककाका, तुमची माहिती बरोबर
अशोककाका, तुमची माहिती बरोबर असेल. पण ते पार्वतीचे नृत्य आहे हे कन्फर्म आहे
राउळ म्हणजे काय?
राउळ म्हणजे काय?
Pages