Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
"मोहरून" शब्दाचा एक अर्थ
"मोहरून" शब्दाचा एक अर्थ समोरून, पुढून असाही आहे का?
तसं असल्यास 'म्होरं' हा शब्दही तिथूनच आलाय का?
मोहरे -->
मोहरे --> म्होरं
=समोर/पुढ्यात.
ओवाळु आरत्या कुर्वंड्या
ओवाळु आरत्या कुर्वंड्या येती
यात कुर्वंडी म्हणजे काय?
कुर्वंडी म्हणजे ताम्हनात
कुर्वंडी म्हणजे ताम्हनात हळदकुंकू, दिवा, सुपारी इत्यादी घेऊन केलेली आरती.
एरवी 'होम करणे', 'अग्नीच्या अधीन करणे' या अर्थीही हा शब्द वापरला जातो.
धन्स चिनुक्स! कालच रविंद्र
धन्स चिनुक्स!
कालच रविंद्र भटांचं समर्थ रामदासांच्या जीवनावरचं 'वन्ही तो चेतवावा' वाचलं! त्यात खुप वेळेस हा शब्द आला आहे. तो मला 'प्राणत्याग करणे', 'जीव ओवाळुन टाकणे' या अर्थी वाटत होता.
अभिर म्हणजे काय? 'न घाबरणारा'
अभिर म्हणजे काय? 'न घाबरणारा' का? (भिरू = घाबरणारा यावरून लावलाय तो अर्थ मी)
अभिर म्हणजे सामर्थ्यवान..
अभिर म्हणजे सामर्थ्यवान.. (शक्तीशाली.)
'आपात्कालीन' शब्द बरोबर आहे
'आपात्कालीन' शब्द बरोबर आहे का?
असल्यास, आपात्कालीन कक्ष म्हणजे इमर्जन्सी युनिट का?
मराठीत आपत्कालीन असा शब्द
मराठीत आपत्कालीन असा शब्द आहे.
हिंदीत आपात्कालीन वापरताना बघितलं आहे. आपात्कालीन कक्ष म्हणजे इमर्जन्सी युनिट हे बरोबर.
धन्यवाद चिनूक्स
धन्यवाद चिनूक्स
स्वयंपाक या शब्दात 'स्वतः
स्वयंपाक या शब्दात 'स्वतः रांधून खाणे' असा अर्थ अपेक्षित आहे का ?
cooking साठी संस्कृतात पाक शब्द आहे पण हे स्वयं कधी जोडले गेले ?
(एका चांगल्या कल्पनेची अनिष्ट रूढी झालेली दिसते)
खरं म्हणजे हे या ठिकाणी योग्य
खरं म्हणजे हे या ठिकाणी योग्य नाहीये, पण कुठे टाकावं कळत नाहीये. (योग्य बीब सांगा, तिथे हलवीन)
बिट्स लि. या भाषांतर सेवा पुरवणार्या कंपनीने भाषांतरस्पर्धा आयोजित केली आहे.
फ्रेंच>इंग्लिश, जर्मन>इंग्लिश, जपानी>इंग्लिश, स्पॅनिश>इंग्लिश, इंग्लिश>हिंदी या जोड्यांमध्ये स्पर्धा घेतली जाईल.
विजेत्याला "Aspiring Professional Translator of the Year 2012" हे अॅवार्ड (रु. ११,००० कॅश प्राईज) दिले जाईल. भाषांतराचा उतारा इमेलद्वारे किंवा कंपनीत जाऊन घेता येईल. ईमेलः contest@bitsindia.co.in
अधिक माहितीसाठी खालील पोस्टर पहा.
अवनी > (एका चांगल्या कल्पनेची
अवनी > (एका चांगल्या कल्पनेची अनिष्ट रूढी झालेली दिसते) >
'सजयती सिण्दुरवदनो' चे
'सजयती सिण्दुरवदनो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल्????याचा अर्थ काय??
क्रूपया वरील प्रश्नाचे उत्तर
क्रूपया वरील प्रश्नाचे उत्तर द्यावे.धन्यवाद
cooking साठी संस्कृतात पाक
cooking साठी संस्कृतात पाक शब्द आहे पण हे स्वयं कधी जोडले गेले ?
कुकिंगला योग्य पर्यायी शब्द पाकसिद्धी असेल (असं मला वाटतं.)
चिन्मय, सजयति असा शब्द नाही.
चिन्मय, सजयति असा शब्द नाही. "स जयति सिन्दूरवदनो" असा आहे का? पूर्ण श्लोक सांग.
स जयति सिंदुरवदनो देवो
स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकज:स्मरणम्
वासरमणिरिवतमसाम् राशिंनाशयति विघ्नानाम्
म्हणजे बहुधा 'ज्याप्रमाणे सूर्य उगवला की तमाचा नाश होतो त्याप्रमाणे सिंदुरवदन देवाच्या पदकमलांचं स्मरण केल्याने विघ्नांच्या राशी नाश पावतात' असं असावं.
क्ष्,स जयती पण असु शकते
क्ष्,स जयती पण असु शकते स्वाती आंबोळेंनी लिहिल्याप्रमाणे.पण सीडीच्या कव्हरवर सजयती सिंदुरवदनो लिहिले आहे.बाकी 'स जयती सिंन्दुरवदनो' म्हणजे काय??
चिन्या, स म्हणजे, 'तो' जयती
चिन्या, स म्हणजे, 'तो' जयती म्हणजे जिंकतो, सिंदुरवदनो देवो म्हणजे सिंदुरवदन देवाच्या, यत (जो) पाद (पाय) पंकजः (कमळ)(ला)-पदकमलाला स्मरणम (आठवण करतो. स्मरतो.)
ते सजयति सिंदुरवदनो असं नाहिये. स जयती नंतर ब्रेक, मग सिंदूरवदनो देवो.
हाकानाका
चिनूक्स | 4 June, 2012 -
चिनूक्स | 4 June, 2012 - 11:35
कुर्वंडी म्हणजे ताम्हनात हळदकुंकू, दिवा, सुपारी इत्यादी घेऊन केलेली आरती.
एरवी 'होम करणे', 'अग्नीच्या अधीन करणे' या अर्थीही हा शब्द वापरला जातो.
<<
यालाच औक्षण असे म्हणतात ना? जिवाची कुर्वंडी करणे असा वाक्यात उपयोग वाचल्याचं आठवतंय. जीव ओवाळून टाकणे असा प्रकार वाटतो तो.
कुर्वंडी म्हणजे 'ओवाळून
कुर्वंडी म्हणजे 'ओवाळून टाकणे'. (आपल्याकडे भाकरतुकडा वगैरे ओवाळून टाकण्याची पद्धत आहे.)
"स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी प्राणांची कुर्वंडी/कुरवंडी केली" अशा प्रकारची वाक्यं वाचली असतील.
इब्लिस धन्यवाद. सिन्दुरवदन या
इब्लिस धन्यवाद. सिन्दुरवदन या शब्दाचा अर्थ काय्??सिन्दुरी रंगाचा चेहरा असलेला??
सिन्दुरवदन या शब्दाचा अर्थ
सिन्दुरवदन या शब्दाचा अर्थ काय्??सिन्दुरी रंगाचा चेहरा असलेला?? >> अरे हा मंगलाचरणाचा पहिला श्लोक आहे तेंव्हा अर्थातच गणपतीची स्तुती आहे. "ज्याच्या मुखाला शेंदूर लावलेला आहे असा तो"
ok ok. dhanyavaad!!!
ok ok. dhanyavaad!!!
अंशदान हा अनुदान चा समानार्थी
अंशदान हा अनुदान चा समानार्थी शब्द आहे का ?
अंशदान contribution अनुदान
अंशदान contribution अनुदान grant
अंशदान म्हणजे ग्रॅच्युइटी
अंशदान म्हणजे ग्रॅच्युइटी बहुधा
'तरफणे' चा अर्थ काय? बहुधा
'तरफणे' चा अर्थ काय? बहुधा एकं यन्त्र आहे. कसे असते?
अंशदान = कॉन्ट्रीब्यूशन हे
अंशदान = कॉन्ट्रीब्यूशन हे बरोबर आहे. शेअर होल्डरला एरव्ही आपण 'भागधारक' असे म्हणतो पण शासकीय भाषेत त्याला 'अंशधारक' असे म्हटले जाते.
ग्रॅच्युईटीला "उपदान" नाम आहे. हा देखील शासकीय शब्द आहे.
Pages