Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
अशोकजी... गुरुचरित्र १४व्या
अशोकजी...
गुरुचरित्र १४व्या अध्यायातला ९वा श्लोकः
|| जयजया जगद्गुरु, त्रयमुर्तीचा अवतारु| अविद्यामाया दिससी नरु, वेदां अगोचर तुझी महिमा ||
अमोघ = भरवशाचा.
अमोघ = भरवशाचा.
अमोघ = लक्षभेदी, गणपतीचे एक
अमोघ = लक्षभेदी, गणपतीचे एक नाव
मोघम = लक्ष नसलेला, वरवरचा
'नेति नेति ति' म्हणजे काय?
'नेति नेति ति' म्हणजे काय? बर्याचशा धार्मिक ग्रंथांमधे वाचण्यात येतं!
'प्रमद' म्हणजे काय? शृंगारिक
'प्रमद' म्हणजे काय? शृंगारिक का?
गजा, 'आपल्या अमोघ वाणीने
गजा, 'आपल्या अमोघ वाणीने त्यांनी श्रोतृवृंदाला खिळवून ठेवले' यातील अमोघ म्हणजे काय?
अमोघ वाणी >> जर का अमोघ =
अमोघ वाणी >>
जर का अमोघ = लक्षभेदी असेल तर मंजूडी च्या वाक्यात त्याचा अर्थ exact target hit करणारे थोडक्यात श्रोत्यांच्या मनाला /काळजाला/ बुद्धीला वै. हात घालणारे (आणि म्हणूनच श्रोतृवृंदाला खिळवून ठेवणारे) असा असावा!
मी_आर्या, ते `नेति नेति इति'
मी_आर्या, ते `नेति नेति इति' असं आहे का?
`नेति नेति' हे ब्रह्माचं वर्णन आहे - ते कसं आहे सांगता येत नाही, कसं नाही त्याचं वर्णन करता येईल, म्हणून `असे नाही, असे नाही' असं ब्रह्माचं वर्णन केलय. (कुणी? कुठे? हे आठवत नाही. फक्त `यद् नेति नेति वचनैवचसामअवोचस' एवढंच आठवतंय. जाणकार अधिक माहिती सांगतीलच.)
नेति नेति ती/ति(?) असच वाचलय
नेति नेति ती/ति(?) असच वाचलय मी बहुतेक.
घरी जाऊन पुन्हा एकदा बघते.
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे या गाण्यात पण नेति नेति असे शब्द आहेत ना ?
नेति = न इति. 'असं नाही' हे
नेति = न इति. 'असं नाही' हे बरोबर.
ब्रह्म हे वर्णनातीत आणि एकमेवाद्वितीय असल्याने कशाच्या तुलनेत त्याचं वर्णन करता येत नाही. 'मेथड ऑफ एलिमिनेशन'नेच त्याबद्दल बोलावं लागतं.
सुंबरान चा अर्थ काय? एका
सुंबरान चा अर्थ काय? एका मराठी सिनेमाचे नाव आहे.
सुम्बरान म्हणजे (देवाचे)
सुम्बरान म्हणजे (देवाचे) स्मरण ... हिन्दित सुमिरन. सुंबरान हा धनगरांचा शब्द आहे.. धनगरी लोकसंगितात (धनगरी ओव्या) 'सुंबरानं मांडिलं द्येवा सुंबरानं मांडिलं ... असे आवाहन असते. 'सुंबरान' हा सिनेमा बहुधा धनगरी जीवनशैलीवर आधारीत आहे......
'सुंबरान' हा सिनेमा बहुधा
'सुंबरान' हा सिनेमा बहुधा धनगरी जीवनशैलीवर आधारीत आहे......
>>>
करेक्ट. म्हणूनच सिनेमाचा उल्लेखही केला मी प्रश्न विचारताना. म्हणजे त्या अनुषंगाने माहितगार उत्तर देईल. धन्स, बाजो
आर्या.....गुरुचरित्रातील त्या
आर्या.....गुरुचरित्रातील त्या श्लोकाबद्दल धन्यवाद. आता तो संदर्भ अधिक स्पष्ट झाला. आभारी आहे.
[कामानिमित्य बाहेरगावी असल्याने नेटवर येऊ शकलो नाही, त्यामुळे आभार मानण्यास वेळ झाला आहे.]
मला काही हिंदी शब्दांचा अर्थ
मला काही हिंदी शब्दांचा अर्थ हवाय. माझ्याकडील शब्दकोशांमध्ये नाहीये.
1) "अमुमन" हर रोज: "almost" every day?
2) फुट्टा (as in the sentence "अपने मन में एक फुट्टे की कल्पना करें जो एक थर्मामीटर की तरह का है।": Is it a "scale"?? म्ह्णजे मराठीत पट्टी म्हणतात तसं काही आहे का?
3) पायखाना: What is it?
अमुमनचा संदर्भावरून 'बहुतेक'
अमुमनचा संदर्भावरून 'बहुतेक' असा अर्थ लागला.
पायखाना = शौचालय
रमाबाई रानडेंच्या 'आमच्या
रमाबाई रानडेंच्या 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' मध्ये झाडावरच्या कैर्या पाडताना सोन्याचा `छंद' गहाळ झाल्याचा उल्लेख आहे. 'छंद' हा दागिना असतो का? कसा?
"अमुमन" चा अर्थ आहे =
"अमुमन" चा अर्थ आहे = वेळोवेळी....वा सर्वसाधारणतः
हा हिंदीपेक्षा भोजपुरीला जवळचा शब्द आहे. याचे एक उदाहरण देतो म्हणजे अर्थछटा लक्षात येईल :
"..... स्त्री वर्ग को अच्छी सेहत पाने के लिये प्रतिदिन आधा घंटा मॉर्निंग वॉक करनी चाहिए, लेकिन अमुमन देखा जाता है कि एक-दो मौसम में ही उनका रूझान टीव्ही के प्रति ज्यादा और सेहत प्रश्न से कम हो जाता है।...."
अमुमन = सर्वसाधारणतः हा अर्थ
अमुमन = सर्वसाधारणतः हा अर्थ पटला
व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काय?
व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काय?
व्यवच्छेदक लक्षण म्हणजे
व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एखाद्याची "उल्लेखनीय अंगभूत मिळकत".... किंवा असेही म्हणता येईल की इतरांपेक्षा अधिकचे कौशल्य अंगी असणे.
उदा. लताचा दैवी आवाज हेच तिच्या यशाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते.
व्यवच्छेदक लक्षण म्हणजे
व्यवच्छेदक लक्षण म्हणजे खास ओळख असलेले वैशिष्ट्यपूर्ण लक्षण , की जे फक्त त्याच गोष्टीचे लक्शण असते dishtiguishing Character.
@भरत मयेकर, अशोक, धन्यवाद मला
@भरत मयेकर, अशोक, धन्यवाद
मला अमुमनचा अर्थ ऑल्मोस्ट अशासाठी वाटला कारण संदर्भ असा आहे:
प्र. विगत दो सप्ताहों के दौरान, कितनी बार आपको नीचे दी गई किसीभी समस्या से परेशानी हुई?
समस्या ए पासून एचपर्यंत बर्याच आहेत.
उदा. दु:खी, उदास या निराशाजनक लगा
टीकमार्क करायचे पर्यायः
कभी भी नही
कई दिनों तक
आधे से ज्यादा दिनों तक
अमुमन हर रोज
मग या ठिकाणी अर्थ "साधारणपणे रोज" (जनरली/नॉर्मली एव्हरीडे) घ्यायचा का? मला वाटलं की गोष्ट गेल्या दोन आठवड्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्या काळातील बहुतेक सर्व दिवशी हा त्रास झाला, असं म्हणायचंय. तुम्हाला काय वाटतं?
अमुमन या शब्दाचा अर्थ mostly,
अमुमन या शब्दाचा अर्थ mostly, almost असा आहे.
'आज अमुमन प्रत्येक राजनेता भ्रष्ट है|'
'बेरोजगारी अमुमन सभी राज्यों में एक बड़ी समस्या है|'
वेल.... काही शब्दांचा असा
वेल.... काही शब्दांचा असा ट्रिकी अर्थ होत असल्याने त्या त्या संदर्भात बसणाराच अर्थ घेणे शेवटी क्रमप्राप्त होते. वर श्री.चिनुक्स म्हणतात तसा "ऑलमोस्ट" त्यानी दिलेल्या उदाहरणासाठी जसा फिट बसतो तसाच त्या 'व्यायामाचे महत्व' उदाहरणातही अमुमन 'सर्वसाधारणपणे' या ध्वनीने तिथे अवतरतो.
वर्षा यानी दिलेल्या 'अमुमन हर रोज' साठी = "जवळपास दररोज" असाही घेता येईल वा "ऑलमोस्ट एव्हरी डे".
[अवांतर : "फुट्टा" = समांतर रेषा ? असे वाटते. खात्री नाही]
धन्यवाद अशोक. फुट्टा म्हणजे
धन्यवाद अशोक. फुट्टा म्हणजे पैमाना म्हणजे स्केल, असे कळले.
बारहां म्हणजे काय ???
बारहां म्हणजे काय ???
Analysis या शब्दाचा योग्य
Analysis या शब्दाचा योग्य अर्थ "विश्लेषण" होतो की "पृथक्करण"? या दोन मराठी शब्दांचा नक्की अर्थ काय?
स्वस्ती, 'बारहा'ला काही
स्वस्ती, 'बारहा'ला काही संदर्भ आहे का?
Pages