Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
तणका शब्द तू कुठे ऐकलायस,
तणका शब्द तू कुठे ऐकलायस, वाचलायस त्याचा संदर्भ दे ना. मी तण्का / तनका हे मराठीत कधी ऐकले / वाचले नाहीत.
उगाच हिंदी शब्दाचा अर्थ दिला म्हणुन कुरबुरु नकोस. तिनका शब्द वापरलेली तीन अति परिचित गाणी आठवली लोकांना. तणका / तनका याचा वापर तू कुठे ऐकलायस त्याचा संदर्भ दे आधी .
मोल्सवर्थ चा कोश आहे ऑनलाईन तो शोधलास का ?
विवाह ज्ञापन म्हणजे 'मेमोरँडम
विवाह ज्ञापन म्हणजे 'मेमोरँडम ऑफ मॅरेज'मध्ये डावीकडे, वर कोपर्यात बारीक अक्षरात "य.का.मु.-२,००,०००-८-८१ एएल-म.(ईए) ३७१" असं लिहिलंय
त्यातल्या "य.का.मु." चा अर्थ कोणी सांगू शकेल का?
वर्षा. ते यकामु नसून येकामु
वर्षा. ते यकामु नसून येकामु असते. त्याचा अर्थ 'येरवडा कारागृह मुद्रणालय' . असा असून पुढचा आकडा छापलेल्या प्रतींची संख्या, छपाईचे साल इ. आहे. पुढचे कोड्स हे स्तेशनरीच्या फॉर्मच्या नमुन्याचे आहेत्.येरवडा येथे सरकारी मुद्रणालय असून कैद्याना तेथे काम दिले जाते. सरकारची प्रकाशने ग्याझेटे, स्टेशनरी , फॉर्म्स तिथे छपले जातात. बहुधा नागपूरलाही आनखी एक प्रेस आहे.
मला वाटलेले लग्न करणार्या
मला वाटलेले लग्न करणार्या लोकांना ' यडपट का मुर्ख' असे म्हणत असावेत
भास व आभास याचा अर्थ व फरक
भास व आभास याचा अर्थ व फरक काय?
मृद या शब्दाचा अर्थ काय?
मृद या शब्दाचा अर्थ काय?
मृद = माती असावे (मृत्तिका
मृद = माती असावे (मृत्तिका वरून आलाय का हा शब्द??)
मृद्गंध = मातीचा गंध
प्राधिकरणाच्या माहिती पत्रकात
प्राधिकरणाच्या माहिती पत्रकात 'जल आणि मृद संधारणा साठी' अस वाक्य आहे. त्या नुसार योग्यच वाटतयं... धन्स निंबुडा
हल्लीच "एजंट विनोद" मधलं "कुछ
हल्लीच "एजंट विनोद" मधलं "कुछ तो है तुझसे राबता...." गाणं ऐकलंय. राबता म्हणजे काय? "नातं" अशा अर्थी का?
मृद असा स्वतन्त्र शब्द नसून
मृद असा स्वतन्त्र शब्द नसून मृदा = माती असा शब्द आहे...
बाळू जोशी, अनेक धन्यवाद. हे
बाळू जोशी, अनेक धन्यवाद. हे माहित नव्हते.
माझ्याकडील प्रिंटमध्ये "ये" च्या ऐवजी "य" च आहे पण ती छपाईची चूक असेल मग.
बाजो, आय डाउट. माझ्या
बाजो, आय डाउट. माझ्या आठवणीप्रमाणे मृद् असा शब्द आहे संस्कृतमध्ये.
पण बाजो मराठीतल्या मृदेबद्दल
पण बाजो मराठीतल्या मृदेबद्दल बोलताहेत.
मराठीत 'मृदा' असा शब्द आहे, आणि तो वापरातही आहे. गाळाची मृदा, काळी मृदा इत्यादी शब्द सरकारी कागदपत्रांमध्ये हमखास वाचनात येतात. हाच शब्द गूगलही करून पाहता येईल.
संस्कृत मध्ये क्रियापदे हलन्त
संस्कृत मध्ये क्रियापदे हलन्त असतात... नाम नाही... त्यामुळे मृदाच बरोबर वाटते आहे.. आकारान्त स्त्रीलिंगी..
आणि जल आणि मृदा संधारणासाठी असे वाक्य असणार...
निंबुडा | 6 April, 2012 -
निंबुडा | 6 April, 2012 - 15:18
हल्लीच "एजंट विनोद" मधलं "कुछ तो है तुझसे राबता...." गाणं ऐकलंय. राबता म्हणजे काय? "नातं" अशा अर्थी का?
>>>
नो प्रतिसाद येट???
तेच - नाते, बंध.
तेच - नाते, बंध.
ओके. धन्स, गजानन.
ओके. धन्स, गजानन.
गोचर, अगोचर, आणि दृगोचर ...
गोचर, अगोचर, आणि दृगोचर ... म्हणजे काय?
एखादी गोष्ट दृगोचर होणे =
एखादी गोष्ट दृगोचर होणे = दृष्टिपथात येणे (बहुदा)
अगोचर = आगाऊ
गोचर : ??? :डोके खाजवणारी बाहुली:
धन्स निंबुडा. 'गोचर' असं
धन्स निंबुडा.

'गोचर' असं ज्योतिषशास्त्रात वापरतात बहुतेक. 'गोचरीचा शनी' वै. ऐकलय!
पण गोचर म्हणजे काय?
दृगोचर = दिसण्यास
दृगोचर = दिसण्यास योग्य
कर्णगोचर - ऐकू येण्यास योग्य
गोचर = जाणून / समजून घेता येण्याजोगे , फिरणारे, चल. याचा अजून एक अर्थ 'गायींचे चरण्याचे रान' असाही होतो.
गोचरीचा शनी म्हणजे फिरणारा, त्या स्थानी तात्पुरता असणारा शनी.
अगोचर = जे अस्तित्वात असूनही जाणून घेता येत नाही, किंवा दिसत नाही, अदृश्य. उदा., आत्मा
१. गोचर = स्वयं अनुभूती घेणे.
१. गोचर = स्वयं अनुभूती घेणे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा 'भास' होणे ती स्थिती. उदा. मृगजळ. प्रत्यक्ष वाळवंटात भटकताना आपल्याला कुठेतरी 'जल' आहे असा भास होतो, प्रत्यक्षात जल नसतेच, म्हणजे आपल्याला दृष्टीगोचर झाला.. दुसरे उदाहरण म्हणजे आत्मा-परमात्म्याचे. एखादी प्रिय व्यक्ती कालवश झाली आहे पण केव्हातरी ती कुठेतरी गर्दीत वा अन्यत्र तिचा आपल्याला तिच्या अस्तित्वाचा 'भास' होतो. ते कृत्य म्हणजे गोचर. [दृष्टीगोचर, मनोगोचर अशा पूर्ण अर्थाने वापर होतो.]
२. अगोचर = हे संबोधन थेट त्या 'प्रेतात्म्या'ला उद्देशून आहे. कोकणात याचा देवतंत्रमंत्र प्रकरणात उल्लेख होतो. जे नको आहे तेच समोर आले म्हणून त्या वस्तुमानाला 'अगोचर' असे म्हटले जाते. त्याची शांती रितिरिवाजाप्रमाणे करण्यात येते. जादूटोण्याचाच हा एक प्रकार आहे असे म्हटले तरी चालेल.
३. दृगोचर = वर निंबुडा यानी खुलासा केला आहे. सहमत
तिन्हीही टर्म्स एकमेकाशी संबंधित असल्याने अर्थातही फार सूक्ष्म असे फरक आहेत.
धन्स सर्वांना. काल
धन्स सर्वांना.
काल सद्गुरुचरित्र वाचतांना "अगोचर' शब्द आला म्हणुन मनात हे प्रश्न उभे राहिले.
>>> गोचर, अगोचर, आणि दृगोचर
>>> गोचर, अगोचर, आणि दृगोचर ... म्हणजे काय?
गोचर हा शब्द ज्योतिषशास्त्रात वापरला जातो. उदा. गोचरीचा शनी. याचा अर्थ आज किंवा वर्तमानकाळात ज्या राशीत शनि आहे ती रास.
अगोचर - अर्थ वर इतरांनी दिलेला आहे.
दृगोचर - हा शब्द दृग्गोचर असा लिहितात (चूभूदेघे). याचा अर्थ "दिसणे", "लक्षात येणे". उदा. वरील प्रसंगात त्याचे अनेक अवगुण दृग्गोचर झाले.
आर्या ~ सद्गुरुचरित्रातील
आर्या ~
सद्गुरुचरित्रातील 'ती' नेमकी ओळ इथे देऊ शकाल ? मला काहीशी उत्सुकता आहे, तिथे हे नाम कोणत्या अर्थाने अवतरले आहे.
चिं.त्र्यं.खानोलकर यांची "अगोचर' या नावाची अशाच विषयाशी संलग्न असलेली एक कादंबरी आहे. त्यातील विषयही भानामतीशी संबंधित असाच आहे.
चालेल्..आज संध्याकाळी घरी
चालेल्..आज संध्याकाळी घरी गेल्यावर पाहुन सांगते उद्या.
सुमिरन चा अर्थ काय? सकाळी
सुमिरन चा अर्थ काय?
सकाळी विविधभारतीला भक्तीगीतं लागतात हिंदी.. (आस्था वर लागतात तसली) त्यात सुमिरन करले सुमिरन करले अशी ओळ ऐकली आहे.
सुमिरन = स्मरण
सुमिरन = स्मरण
सुमिरन >>> शास्त्रीय
सुमिरन >>> शास्त्रीय चीजांमध्ये मी ही हा शब्द ऐकला आहे. त्याचा अर्थ आज कळला.
अमोघ चा अर्थ काय? रामायण
अमोघ चा अर्थ काय?
रामायण वगैरे मध्ये "अमोघ अस्त्र" असा शब्द प्रयोग ऐकला आहे.
Pages