भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
Our boys are back in the
Our boys are back in the game!!!! जियो पठ्ठो!!!
युवराज लै भारी!!! धोनी ला पण क्रेडिट!!! मस्त रोटेट केली बॉलिंग.
<< मैदानावर कुत्र! >> आपलं
<< मैदानावर कुत्र! >> आपलं शेपूट सदाचच शेपूट घालताना पाहिलंय त्याने, भारत व वे.इंडीज दोघानाही ! आलं असेल प्रेमान त्याना भेटायला !!
अहो काय भाऊ? असो... आता
अहो काय भाऊ?
असो... आता जिंकणार आपण. हे तर आपल्यापेक्षा ही डेंजर चोकर्स निघाले.
सॉरी, रॉन्ग नंबर लागला होता
सॉरी, रॉन्ग नंबर लागला होता
जिंकले (एकदाचे!)..
जिंकले (एकदाचे!)..
जय हो!
जय हो!
जिंकवले वे.इंडीजने आपल्याला !
जिंकवले वे.इंडीजने आपल्याला !
आयडिअली पुढची मॅच शेवटची
आयडिअली पुढची मॅच शेवटची असायला हवी आपली.
आयडिअली पुढची मॅच शेवटची
आयडिअली पुढची मॅच शेवटची असायला हवी आपली.
असे नका हो लिहू! क्लेश होती जीवा.

अजून तीन सामने खेळायचे आहेत. जिंकू आपण.
हे शेवटच्या १० ओवरांचा
हे शेवटच्या १० ओवरांचा प्रॉबलेम कायच्या कै आहे? आणि संसर्गजन्य पण आहे वाटतं. आज विंडीज ३२ रनांमध्ये ८ विकेट? अबाबाबाबाबाब.....
आयडिअली पुढची मॅच शेवटची
आयडिअली पुढची मॅच शेवटची असायला हवी आपली.>> हो, नाहितरी आयपीएल चा सिझन जवळ आलेला आहे, प्रॅक्टिस करायला नको?
वैद्यबुवा तुम्हाला धोनी का
वैद्यबुवा तुम्हाला धोनी का इतका आवडतो
असो. आधी म्हटल्याप्रमाणे विंडीज च्या बेकार खेळामुळे जिंकलो खरे.
अब खाली तीन मॅच अपनी मुठ्ठी
अब खाली तीन मॅच अपनी मुठ्ठी मे करलो.. और वर्ल्डकप को काबीज कर लो ! जय हो !
सरदार पटेल, मोतेरा च्या
सरदार पटेल, मोतेरा च्या मैदानावर आत्तापर्यंत भारताने १२ एकदिवशीय सामने खेळले आहेत त्यातले पाचच जिंकले आहेत. ऑस्ट्रोलियाने ५ सामने खेळले आहेत आणि ४ जिंकले आहेत.
भारत वि. ऑस्ट्रोलियाचे २ सामने झाले . एक ऑसीजनी (८४) तर एक भारताने (८६) जिंकला आहे.
(साभारः क्रिकइंफो)
bret lee v/s sachin....n
bret lee v/s sachin....n shoun tat v/s sehvag (if he played).....n jaheer khan v/s watson......
its intresting....to see
आवडतो असं नाही. आज त्यानी
आवडतो असं नाही. आज त्यानी वेडेपणा केलाच आहे बॅटिंग, पावरप्ले इत्यादी गोष्टींमध्ये पण जे चांगलं केलं ते फक्त बोलून दाखवलं. आता मागच्या वेळी युवी मिसफायर झाला, ह्यावेळी रैना आणि पठाण (दुसर्यांदा). पुढच्यावेळी पठाणला नाही घेतला तरी मला वाईट नाही वाटणार.
़़करेक्शन ! भारत वि.
़़करेक्शन !
भारत वि. ऑस्ट्रोलियाचे ३ सामने झाले . एक ऑसीजनी (८४) तर २ भारताने (८६) (२०११) जिंकला आहे.
मला वाटतं पठाण व मुनाफ यानी
मला वाटतं पठाण व मुनाफ यानी आपण विश्वचषक दर्जाचे खेळाडू नाही हे पुरेपूर सिद्ध केलंय. यापुढच्या खर्या कसोटीच्या सामन्यांत बलवान संघांविरुद्ध तर त्यांच्यावर विसंबणं घातक ठरूं शकतं. म्हणून, विरू संघात असला तरीही आता रैनाला घेऊन सात फलंदाज [ त्यातले युवी व रैना गोलंदाज म्हणूनही वापरून] झहीर, भज्जी , नेहरा/ श्रीसंथ व चावला/ अश्विन, असा संघ बाद फेरीपासून खेळवण्याशिवाय गत्यंतर दिसत नाही. हें आदर्श कॉम्बिनेशन नसले, तरीही सद्य परिस्थितीत एकमेव विजयी कॉम्बिनेशन ठरण्याची अधिकतर शक्यता आहे .
पठाणच्या जागी रैना. पठाणला
पठाणच्या जागी रैना. पठाणला खूप संध्या मिळाल्या.
नेहरा/मुनाफच्या जागी श्री. खरं तर जास्त फरक पडत नाही पण मुनाफ्/नेहरा मैदानावर इतके मेंगळट वाटतात की त्यांच्याकडे बघितलं कि ज्याच्या अंगात जोश आहे तो पण थंड पडेल. श्री कमीत कमी मैदानावर तरी आक्रमक देहबोलीने वावरतो.
अश्विन चावलाच्या जागी कायम रहावा. आणि जमलं तर उर्वरित सामन्यांत धोनीला बसवा....
खरय. धोनीनी सुद्धा बसायला हवं
खरय. धोनीनी सुद्धा बसायला हवं खरं. नाहीये फॉर्म तर कशाला जागा आडवायची?
श्रीसंत काय माहित कितपत चांगला आहे नेहरा आणि मुनाफ पेक्षा. बॉलिंग धड असेल तर आक्रमकपणा उपयोगाचा. तो पण फ्रस्ट्रेट झाला की काहीच्या काही भिकार बॉलिंग करतो.
>>> ह्या मुनाफ पटेलला विकेट
>>> ह्या मुनाफ पटेलला विकेट मिळतात का कधी? मैदानावरतर एकदम मेंगळटासारखा वावरतो. आंघोळ न केल्यासारखा अवतार, केस विस्कटलेले, दाढी वाढलेली, शर्ट पुढून इन मागून आऊट. नेहमी असाच दिसतो. काय प्रॉब्लेम आहे त्याचा कळत नाही.
तो आयुष्यात कधी काळी सामनावीर झालाच तर त्याला बक्षिस म्हणून सुलभ स्वच्छतागृहाचे वर्षभराचे तिकीट (आंघोळीसाठी), लाईफबॉय्/लक्स अशा साबणांच्या वड्या, दाढीचे सामान, उटणे, उटणे नसेल तर डाळीचे पीठ इ. गोष्टी द्याव्यात.
असो. पठाण आणि मुनाफला लायकीपेक्षा खूप जास्त संधी मिळाली. पठाणची यापूर्वीच हकालपट्टी व्हायला पाहिजे होती. पुढच्या सामन्यात या दोघांना हाकलून स्रिसंथ व सेहवागला आत आणावे. खरं तर भज्जीचीही हकालपट्टी आवश्यक आहे. पण तो कदाचित ऑसीजविरूध्द चालेल.
आजही धोनीचे डावपेच समजत नव्हते. झहीरला २ रे व ४ थे षटक दिल्यावर त्याने पुढची सलग २५ षटके फिरकी गोलंदाजांना दिली. विंडीज एक वेळ २९ षटकात २ बाद १४८ इतक्या मजबूत स्थितीत होते. त्यानंतर झहीरला आणल्यावर त्याने ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि विंडीजची पडझड सुरू झाली. त्याला आणायला अजून उशीर केला असता तर कदाचित आपण हरलोही असतो.
विंडीज आपल्यापेक्षा बेभरवशाचे निघाले. उपांत्यपूर्व फेरीत आता त्यांनी एडवर्डच्या ऐवजी गेल, बिशूच्या जागी कीमार रोच आणि सर्वन ऐवजी चंद्रपालला आत आणावे.
उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलॅन्ड, भारत, विंडीज व इंग्लंड जिंकावे अशी इच्छा आहे.
जमलं तर उर्वरित सामन्यांत
जमलं तर उर्वरित सामन्यांत धोनीला बसवा....>>धोनीनी सुद्धा बसायला हवं खरं. >> आहे खरं पण या सेरीजसाठी दुसरा कोणी कीपर नाहीये. त्यामुळं धोनीतर राहणारच टीममध्ये.
ऑसीजविरुध्द सराव सामन्यात रैनापेक्षा पठाण बरा खेळला म्हणुन त्याला घेतील. पण ४ बॉलरनीशी उतरण म्हणजे मोठी रीस्कच आहे...
रच्याकने मोटेरावर आपण याआधी ०२ मध्ये जिंकलो आहे शेवटचे...ऑसीजविरुध्द पहिली बॅटींग केल्यास बरे पडेल.
>>> ऑसीजविरुध्द पहिली बॅटींग
>>> ऑसीजविरुध्द पहिली बॅटींग केल्यास बरे पडेल.
ऑसीजविरूध्द पाठलाग करणे अवघड आहे. आपण पहिली बॅटिंगच केली पाहिजे.
आपण पहिली बॅटिंगच केली
आपण पहिली बॅटिंगच केली पाहिजे.>>हो, आणी ३००च्या वर मस्ट आहे कारण बॅटींग पीच आहे...३००-३२५ आरामात चेस झालाय आधीचे रेकॉर्ड बघता...
http://stats.espncricinfo.com/india/engine/records/team/match_results.ht...
सो बरीच टफ आहे क्वा.फा. आपल्याला
धोणी आजवरचा आपला उत्कृष्ट
धोणी आजवरचा आपला उत्कृष्ट विकेट्किपर आहे यात वाद नाही.. कप्तान म्हणून मात्र त्याचे सध्ध्याचे डावपेच अगदीच फ्लॉप आहेत.
असो. विंडीज लौकीकाला जागले (हे लोकं मेंदू ड्रेसिंग रूम मध्ये सोडुन मैदानावर येतात असं कुणितरी म्हटले आहे... पठाण त्याच वाटेने चालला आहे असे वाटते.) आणि आपण जिंकलो.
मास्तुरे,
झहीर जुन्या चेंडूवर अधिक परिणाम्कारक ठरेल हे ऊमगल्याने धोणीने त्याला नंतर आणले हे ऊघड आहे..तेव्हा ते राहू दे.
ऑसी वि. गंभीर, रैना, युसुफ कुणीच चालणार नाही कारण यांना निव्वळ बाऊंन्सर्स टाकून ऑसी बाद करतील. पण दुसरे पर्याय नसल्याने, युसुफ ला बसवावा आणि त्याच्या जागी श्री/नेहरा ला आणावे. चावला आता फक्त पाणी आणण्यासाठी ठेवावा. भज्जी हळू हळू फॉर्म मध्ये येतोय आणि अनुभवाच्या जोरावर तो ऊर्वरीत सामन्यात असायलाच हवा, ऑसी वि. तर नक्कीच. तयचे फेवरेट आहेत ते
थोडक्यात आजचाच संघ कायम ठेवून (दोन ऑफ स्पिनर संघात असू नयेत असं कुठे आहे?) फक्त युसुफ च्या जागी अजून एक गोलंदाज ठेवावा.. कारण युसुफ आता निव्वळ गोलंदाज म्हणून संघात वावरतोय पेक्षा खराखुरा गोलंदाज बरा..
मुनाफ हा धोणीचा आवडता "बैल" असल्याने तोही असेलच..
फक्त परिस्थितीनुसार रैना ला वर किंवा खाली पाठवावे.. फक्त कुठल्याही परिस्थितीत निश्चीतच धोणीच्या वर
----------------------------------------------------------------------------------
ऑसी वि. ली आणि जाँसन यांना ऊगाच फाजील धोका न पत्करता चेंडूनुसार खेळले तर १५ षटके बाद न झालेले विरु, साहेब आणि उर्वरीत षटके ऑसी चे कमकुवत गोलंदाज ही नक्कीच विजयाची रेसिपी ठरु शकते. ऊगाच ली आहे म्हणून खुन्नस ने किंवा निव्वळ मानसिक प्राबल्य प्रस्थापित करायला फाजील धोका विरू/साहेब यांनी पत्करू नये- ते जमलं तर नक्कीच ऑसी प्रचंड दबावात येतील.
योग्या, उलट ली ला धोपटला तर
योग्या, उलट ली ला धोपटला तर बाकीच्या बोलरवर जबरी प्रेशर येईल. आणि सेहवाग बॉल आणि बोलर बघून खेळतच नाही.
ऑसीज विरुद्ध जो कोणी खेळतो त्याला माझा पाठिंबा असतो. तेव्हा या वेळेला भारताला. भारत जिंकणार आणि ऑसीजना बाहेर काढण्याचं पुण्य लाभणार!
भाऊ, सचिन चालल्याचे कार्टून
भाऊ, सचिन चालल्याचे कार्टून आवडले!
विंडीज च्या टीम मधे २५०+ चे टारगेट चेस करण्याची क्षमता नाही.
पाकिस्ताननी आरामात हरवलं ऑसीज
पाकिस्ताननी आरामात हरवलं ऑसीज ना! आपण ही हरवू शकतो. श्रीलंका जड गेली असती जरा. आता बघु. ऑसीजना हरवलं तर मग गाठ पाकिस्तानशी आहे. मोहाली आहे म्हणा पण That doesn't mean anything, doesn't it?
उपांत्यफेरीपासून पुढील
उपांत्यफेरीपासून पुढील चर्चेसाठी वेगळा धागा उघडला आहे. यापुढील चर्चा तिथे करावी.
http://www.maayboli.com/node/24494
Pages