भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
. नियम काय आहे नक्की माहित
. नियम काय आहे नक्की माहित नाहि. >>रिव्हू घेतल्यानंतर पण मैदानातिल अंपायर त्याचा निर्णय कायम ठेवू शकतो. त्याचावर सोडले आहे, म्हणून रन आउट सारखे डिस्प्ले वर दाखवत नाहीत तर अंपायरला कळवतात.
निलिमा तुमचे इतर मुद्दे पटले पण काही नाही, जसे २.५१ कि २.४९. ३४ ला नापास पण ३५ ला पास असे आहे ते. अन्यथा अगदी बॉल खूप मागे टाकला व तो स्टम्प वर असला तरी तो पिच इन लाईन असाच गृहित धरल्या जाणार.
हा नियम त्यांनी टाकला कारण किती फ्रंट फुट बॅटसमन खेळतो तो जुना नियम गृहित धरल्या गेला असणार. अर्थात सिस्टीम जटील नसून सोपी असावी ह्या तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे.
रिव्हू घेतल्यानंतर पण
रिव्हू घेतल्यानंतर पण मैदानातिल अंपायर त्याचा निर्णय कायम ठेवू शकतो.>>>>> एल बी च्या बाबतीत हे खरं नाहीये ना पण? रिव्ह्यु घेतल्यावर फिल्ड अंपायर आऊट म्हंटला आणि थर्ड आऊट नाही म्हंटला तर डिसीजन आऊट नाही असा असणार ना? एकदा थर्ड नी आऊट नाही सांगितल्यावर परत फिल्ड अंपायर त्याचा आधीचा निर्णय कायम नाही ना ठेवु शकणार?
>>> मास्तर, पाकडे जिंकले.
>>> मास्तर, पाकडे जिंकले. अपना अंदाजा सही!
चिमण,
पाकडे जिंकतील असा काही तुझा अंदाज नव्हता. ऑसीजविरूध्द पाकड्यांना तुझा फक्त पाठिंबा होता.
असो. आज ऑसीजचा सर्व संघ सामन्यासाठी अत्यंत निरूत्साहाने मैदानात उतरला होता. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून त्यांची देहबोली व कंटाळवाणा खेळ बघून असे वाटत होते की आज केवळ नाईलाज म्हणून ते सामना खेळत आहेत. कदाचित कोलंबोच्या कडक उन्हामुळे ते वैतागले असतील.
>>>>>>> रिव्हू घेतल्यानंतर पण मैदानातिल अंपायर त्याचा निर्णय कायम ठेवू शकतो.>>>>> एल बी च्या बाबतीत हे खरं नाहीये ना पण? रिव्ह्यु घेतल्यावर फिल्ड अंपायर आऊट म्हंटला आणि थर्ड आऊट नाही म्हंटला तर डिसीजन आऊट नाही असा असणार ना? एकदा थर्ड नी आऊट नाही सांगितल्यावर परत फिल्ड अंपायर त्याचा आधीचा निर्णय कायम नाही ना ठेवु शकणार?
पायचितचा निर्णय जर संशयास्पद असेल (म्हणजे पाय क्रीजच्या खूप पुढे असेल किंवा चेंडू यष्ट्यांना जेमतेम चाटून जात असेल) तर थर्ड अंपायरने रिव्ह्यू करून काहिही निर्णय दिला तरी मैदानावरचा पंच आपला निर्णय कायम ठेवू शकतो. याला बहुतेक "On Field Call" असे म्हणतात.
असाम्या, धोणी आजकाल नुसता
असाम्या,
धोणी आजकाल नुसता बोलतो... सचिन सारखी फलंदाजी नाही किमान सराव केला तरी खूप झाले.
असो.
थोडक्यात ब गटात आपण ३, ४ कुठल्याही क्र. वर आलो तरी कप जिंकायला ऊर्वरीत सर्व सामने जिंकावे लागणार हे साधे गणीत आहे. फक्त लंकेपेक्षा ऑसीज पुढच्या फेरीत परवडतील कारण सध्ध्या लंका जरा अधिक बर्या फॉर्म मध्ये आहे. पुढच्या फेरीतील सर्व सामने अटितटीचे होतील यात शंका नाही पण एकंदर सर्व खेळपट्ट्या फिरकी वा मंद झाल्याने लंका, पाक, भारत यांना अधिक फायद्याचे ठरेल.
सचिन, थांबून येणारा चेंडू खेळायची मुद्दाम प्रॅक्टीस करतोय यावरून पुढील सामने गोलंदाजांचे अन कमी धावसंख्येचे असतील असे वाटते आहे.
मजा आयेगा.... फायनल मध्ये भारत वि. लंका आणि सचिन, विरू वि. मुरली हे फारच रोमांचकारी असेल.. आणि कागदावर दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ वा तितकेच कमकुवत आहेत.
पाँटींगने आउट झल्यावर आफ्रीदी
पाँटींगने आउट झल्यावर आफ्रीदी बरोबर काय वाद घातला...का ढकला ढकली करत होता तो?
>> चिमण, >>पाकडे जिंकतील असा
>> चिमण,
>>पाकडे जिंकतील असा काही तुझा अंदाज नव्हता. ऑसीजविरूध्द पाकड्यांना >>तुझा फक्त पाठिंबा होता.
मास्तर, खास तुझ्यासाठी मी माझी जुनी पोस्ट शोधून आणली आहे. त्या अंदाजात झालेल्या चुका खालील प्रमाणे
१> ऑसी नेट रन रेट मुळे श्रीलंकेच्या वर असतील तसं झालं नाही.
२> वे. इंडिज इंग्लंडला मारतील असं वाटलं होतं तसं झालं नाही.
==========================
प्रतिसाद चिमण | 16 March, 2011 - 16:21
मी वर्तवलेला अंदाज --
ए ग्रुप
-----
पाक - १० (पाकडे ऑसीजना मारतील कारण मॅच कोलंबोत आहे, ते स्लो पिच आहे)
ऑसी - ९ (नेट रन रेट जास्त असेल म्हणून)
श्रीलंका - ९
न्यूझीलंड - ८
बी ग्रुप
-----
द. आफ्रिका - १० (भारताला हरवल्यामुळे)
भारत - ९
वेस्ट इंडिज - ८ (इंग्लंडला मारतील म्हणून)
इंग्लंड - ७
==========================
ऑसीजनी आज हारून आपली पंचाईत
ऑसीजनी आज हारून आपली पंचाईत करून ठेवली आहे. उपांत्यपूर्व फेरीत आता आपल्याला श्रीलंका किंवा ऑसीजशी खेळायला लागेल. आज ऑसीज आणि उद्या आपण जिंकलो असतो तर आपल्याला तुलनेने कमकुवत अशा किवींशी खेळायला लागले असते. आपण उद्या जिंकलेच पाहिजे. उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेपेक्षा मनोधैर्य खचलेल्या व फारशी भेदक गोलंदाजी नसलेल्या ऑसीजशी खेळणं जास्त सोपं.
अरे लेको लंका भारतात खेळली
अरे लेको लंका भारतात खेळली आपल्याविरूद्ध तर जड नाही, फक्त कोलंबोत सांगता येत नाही.
मास्तुरे भारतानेही लंकेला १९९९ आणि २००३ मधे (दणदणीत) हरवले आहे. १९९२ मधे बहुधा वॉश आउट झाली होती. पिच स्लो असेल तर ते चांगले खेळतात कारण लंकेत तशीच पिचेस आहेत.
बुवा तो रेफरल चा प्रश्न नीट कळाला नाही. पण रिप्ले मधे on field call ठरले एखाद्या मुद्द्यावर तरच पुन्हा फिल्ड अंपायर ठरवू शकतो. नाहीतर तिसर्या अंपायरचा निर्णय जो असेल तो. मी पाहिलेल्या रिप्लेज मधे - एलबीच्या- १. नो बॉल होता का? २. स्टंप्स च्या रेघेत टप्पा पडला का (जर शॉट मारण्याचा प्रयत्न केला नाही तर हे बघायची गरज नाही. फक्त ऑफ ला पडला ना एवढेच बघायचे) ३. 'इम्पॅक्ट' स्टंप पासून किती लांब झाला आणि ४. बॉल स्टंपला लागला असता का - हे चार पॉइन्ट्स बघत होते. तो इग्लंड विरूद्ध बेल चा निर्णय केवळ २.५ मी असल्याने पुन्हा फिल्ड अंपायर कडे दिला गेला आणि त्याने आधीचा निर्णय कायम ठेवत नाबाद दिले त्याला.
त्यानंतर आयसीसीने मधेच यात काहीतरी बदल केलेला आहे तो मी वाचला नाही अजून.
माझ्यामते तरी आऊट दिला असता.
माझ्यामते तरी आऊट दिला असता. ओझरता का होईना पण लागला असता म्हणुनच अंपायरच्या डिसीजनला मान देत, आऊट दिला असता थर्ड नी.>>> बुवा पुन्हा वाचल्यावर आले लक्षात. मला वाटते इम्पॅक्ट स्टंपच्या जवळ असता तर ओझरता लागूनही आउट दिला असता. पण बॉर्डर केस आहे त्यामुळे सब्जेक्टिव्ह आहे.
आणि एलबीच्या बाबतीत - जोपर्यंत अंपायरची १०० टक्के खात्री नाही तोपर्यंत फलंदाज नाबाद ठरवणे हाच नियम आहे.
उद्या सेहवाग खेळणार नाही
उद्या सेहवाग खेळणार नाही बहुतेक.
http://in.reuters.com/article/2011/03/19/idINIndia-55713820110319
DRS चा माझ्या दृष्टीने
DRS चा माझ्या दृष्टीने सगळ्यात प्रचंड फायदा.. ऑसीज हरायला लागले की जोरदार अपीलिंग करून अंपायर वर दबाव आणून नेमक्या वेळेला त्यांना फेव्हरेबल निर्णय मिळवायचे. आता बॅट्समनला रिव्ह्यू घेता येत असल्यामुळे हा फाजिलपणा आज कमी वाटला.
झहीरला ही विश्रांती द्यायला
झहीरला ही विश्रांती द्यायला पाहिजे आज. श्रीशांत ला खेळवून. कदाचित मुनफ ला ही.
http://www.espncricinfo.com/i
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...
ही लिन्क बघून मला कळत नव्हते की भारत दुसर्या किंवा तिसर्या नं. वर आला तरे अहमदाबादलाच कसा खेळणार. मग क्रिकईन्फो च्या "Fixtures" च्या लिन्कवर कळाले की भारताच्या पुढच्या सर्व मॅचेस भारतातच होणार.
त्यामुळे क्वा. मधे कोणाशीही खेळलो तरी अहमदाबाद, आणि सेमीमधे मोहाली नक्की. फायनल तर मुंबईलाच आहे. भारताला तो एक जबरदस्त अॅडव्हांटेज आहे.
वरती कोणीतरी मुद्दाम
वरती कोणीतरी मुद्दाम हरण्याबद्दल उल्लेख केलेला होता आणि वॉ ने सुद्धा कधीतरी केल्याचे म्हंटले आहे.
मुद्दाम हरण्याचे धंदे सुद्धा पूर्वी काही टीम्स नी केलेले आहेत पण १९९९ च्या कप मधे स्टीव वॉ ने विंडीज विरूद्ध मुद्दाम स्लो खेळल्याचे आरोप झाले होते आणि मला अंधुक आठवते - नंतर त्याच्या पुस्तकात त्याने मान्य ही केले होते.
ही ती मॅच आणि कोझियर चा रिपोर्टः
http://static.espncricinfo.com/db/ARCHIVE/WORLD_CUPS/WC99/SCORECARDS/GRO...
११० रन करायला ४० ओव्हर्स घेतल्या होत्या ऑसीज नी
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65220.html
असे केल्यावर विंडीज पुढे सुपर सिक्स मधे येणार होते, न्यू झीलंड ऐवजी (पण तसे झाले नाही). अर्थात हे पूर्णपणे निगेटिव्ह म्हणता येणार नाही. कारण तेव्हाच्या नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाने विंडीज वि चे पॉइन्ट्स पुढे कॅरी केले असते, पण न्यू झीलंड वि. ते हरले होते लीग मधे, त्यामुळे न्यू झीलंड जर सुपर सिक्स मधे आले तर ऑसीज चे पॉइंटस कमी काउंट झाले असते (तसेच झाले).
बुवा पुन्हा वाचल्यावर आले
बुवा पुन्हा वाचल्यावर आले लक्षात. मला वाटते इम्पॅक्ट स्टंपच्या जवळ असता तर ओझरता लागूनही आउट दिला असता. पण बॉर्डर केस आहे त्यामुळे सब्जेक्टिव्ह आहे.
आणि एलबीच्या बाबतीत - जोपर्यंत अंपायरची १०० टक्के खात्री नाही तोपर्यंत फलंदाज नाबाद ठरवणे हाच नियम आहे.>>>>> धन्यवाद फारेंडा.
मला वाटलं की एकदा टीम नी फिल्ड अंपायरचा एल बी "आऊट" चा निर्णय चॅलेंज केला की मग थर्ड अंपायर हॉक आय बघुन तू सांगितलेले सगळे मुद्दे तपासून बघणार. नो बॉल नसेल, २.५ ची कंडिशन फुलफील होत असेल, लाईन मध्ये असेल आणि स्टंप ला अगदी ओझरता न लागता प्लंब लागणार असेल तर मग थर्ड अंपायर पण आऊट देणार. आता इथे जर स्टंपला ओझरता लागला असेल तरी अंपायरच्या जजमेंटला मान देत थर्ड अंपायर आऊटच देइल का? असा माझा प्रश्न होता. माझ्या मते देइल.
ह्याच उदाहरणात कॉनवर्स जर बघितलं (आणि त्याचच उत्तर मला जाणून घ्यायचय) तर समजा,
फिल्ड अंपायर नी डिसिजन "नॉट आऊट" दिला.
थर्ड अंपायर नी परत सगळे क्रायटिरिया लावले आणि मुख्य म्हणजे हॉकाय नी बघितल्यावर क्लियर दिसतय की बॉल स्टंप ला ओझरता वगैरे न लागता प्लंब लागणार होता. हे सगळं बघुन थर्ड अंपायरनी "आऊट" असा निर्णय दिला तर मग तरी पण फिल्ड अंपायर त्याचा "नॉट आऊट" चा डिसीजन मेंटेंन करु शकतो का? मला नाही वाटत. तसं केलं तर मग हॉकाय वापरायच्या मुळ मुद्द्यालाच धक्का लागतो.
इथे जर स्टंपाला बॉल ओझरता लागणार असला असता तर मग थर्ड अंपायरच बाकी सगळे एल बीचे क्रायटेरिया लावून सुद्धा बेनेफिट ऑफ द डाऊट फिल्ड अंपायरला देऊन निर्णय "नॉट आऊट" च देतो हे मी स्वतः पाहिलय.
बेल च्या निर्णयाबद्द्ल मला प्रश्न नाहीये कारण फिल्ड अंपायर नी नॉट आऊट दिला आणि थर्ड अंपायरला हॉकाय मध्ये अंतर २.५ मि पेक्षा जास्त दिसले आणि त्यानी सुद्धा नॉट आऊटच निर्णय दिला.
थर्ड अंपायर नी परत सगळे
थर्ड अंपायर नी परत सगळे क्रायटिरिया लावले आणि मुख्य म्हणजे हॉकाय नी बघितल्यावर क्लियर दिसतय की बॉल स्टंप ला ओझरता वगैरे न लागता प्लंब लागणार होता. हे सगळं बघुन थर्ड अंपायरनी "आऊट" असा निर्णय दिला तर मग तरी पण फिल्ड अंपायर त्याचा "नॉट आऊट" चा डिसीजन मेंटेंन करु शकतो का? मला नाही वाटत. तसं केलं तर मग हॉकाय वापरायच्या मुळ मुद्द्यालाच धक्का लागतो.>>> सहमत.
इथे जर स्टंपाला बॉल ओझरता लागणार असला असता तर मग थर्ड अंपायरच बाकी सगळे एल बीचे क्रायटेरिया लावून सुद्धा बेनेफिट ऑफ द डाऊट फिल्ड अंपायरला देऊन निर्णय "नॉट आऊट" च देतो हे मी स्वतः पाहिलय.>>> या केस मधे "On field call" म्हणून फिल्ड अंपायरकडे परत दिला जातो - म्हणजे त्यानेच निर्णय घ्यायचा, फक्त या नवीन माहितीवर. बेल चा निर्णय तसाच होता. फक्त अशा केस मधे मग फिल्ड अंपायर स्वतःचा निर्णय फिरवण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.
एकूणः थर्ड अंपायर निर्णय पूर्ण फिरवू शकतो आणि तो निर्णय फिल्ड अंपायरवर बंधनकारक असतो. पण On field call निर्णय दिला, तर फिल्ड अंपायरने पुन्हा ठरवायचे. अशा वेळी बहुधा थर्ड अंपायरला दिसलेली माहिती फिल्ड अंपायर ला सांगितली जात असावी, कारण आपल्याला दिसते तसे फिल्ड अंपायर ला रिप्ले दिसत नाही.
कारण आपल्याला दिसते तसे फिल्ड
कारण आपल्याला दिसते तसे फिल्ड अंपायर ला रिप्ले दिसत नाही.>>>>>>>> Exactly!!!! सही रे फारेंडा. म्हणुनच मला वाटत होतं की एकदा सगळं तपासून निर्णय दिला की तो फ्लिड अंपायर ला रद्द नाही करता येत.
Good Info! Thanks! तू एक भरवशाचा रिसोर्स आहेस क्रिकेट च्या माहिती करता.
बुवा, अमोल थांबा घाई करू नका.
बुवा, अमोल थांबा घाई करू नका. हे बघा, असे दिसतेय कि final decision has to be made by on-field umpire only.
http://static.icc-cricket.yahoo.net/ugc/documents/DOC_2F720C5CFBDA32A9CD...
Section 3.3 and 3.4
सही रे असाम्या. मी ह्या साईट
सही रे असाम्या. मी ह्या साईट वर गेलो पण पुढे आणखिन काही बघायची तसदी घेतली नाही.
The on-field umpire must then make his decision based on those factual questions that were
answered by the third umpire, any other factual information offered by the third umpire and
his recollection and opinion of the original incident.
k) The on-field umpire will reverse his decision if the nature of the supplementary information
received from the third umpire leads him to conclude that his original decision was
incorrect.
थोडक्यात, टेकनिकली, थर्ड अंपायर हा डिसीजन देत नसतो तर फक्त हॉकायचा फॅक्चुअल डॅटा त्याला सांगतो. असामी, इथे मी आणि अमोल म्हणतोय ते ही वॅलिड राहतं पण. थोडक्यात फॅक्चुअल डॅटा जर एखादा डिसिजन (फिल्ड अंपायरच्या विरुद्ध डिसिजन) डेफिनिटीवली देत असेल, जसं स्टंप प्लंब हिट होतायत एल बी च्या डिसीजन मध्ये तर अर्थातच फिल्ड अंपायर ह्या केस मध्ये स्वतःचा निर्णय बदलेल, जरीही तो फायनल अथॉरिटी असला तरीही.
प्रत्येक संघाला फक्त २
प्रत्येक संघाला फक्त २ रिव्ह्युची मुभा आहे का?
मला वाटतं प्रत्येक डावादरम्यान दोन चुकीच्या रिव्ह्युंची मुभा आहे (म्हणजे रिव्ह्यु मागूनही निर्णय विरोधात गेला की एक संधी हुकली, पण निर्णय बाजूने लागला तर आणखी दोन संधी कायम). आता फक्त दोनच का तर प्रत्येक निर्णायावर रिव्ह्यु घेत बसले तर एकदिवसीय सामना पाच दिवस चालेल.
टेनिसमध्ये प्रत्येक सेटमागे प्रत्येक खेळाडूला ३ (चुकीचे) रिव्ह्यु असतात. टायब्रेकरला एक वाढवून मिळतो.
धन्यवाद असामी. हे नियम मीही
धन्यवाद असामी. हे नियम मीही पूर्ण वाचलेले नाहीत. मी फक्त पाहिलेल्या मॅचेस मधे जे दिसले त्यावरून सांगितले. पण आता वाचतो.
टीव्हीवर बघताना असे वाटले की थर्ड अंपायर निर्णय देतोय. आज नीट पाहातो
आता थोडे लक्षात आले - बहुधा अंपायर रिव्यू असेल तर तेथील स्क्रीन वर थेट दिसते. पण प्लेयर रिव्यू असेल तर टीव्हीवर आपल्याला दिसते पण तेथील (मैदानावरील) स्क्रीन वर दिसत नाही. मग प्रश्न फक्त हा आहे की आपल्याला रिप्ले दिसत असताना प्रेक्षकांचा आवाज त्याप्रमाणे कमी जास्त कसा होतो 
अर्थात निर्णय फिल्ड अंपायर देत असला तरी थर्ड अंपायरकडून निर्णय स्पष्टपणे फिरवणारी माहिती मिळाल्यावर त्याला निर्णय बदलावाच लागत असेल (जर ऑन फिल्ड कॉल नसेल तर).
सर्व क्रिकेट प्रेमींना
सर्व क्रिकेट प्रेमींना होळीच्या शुभेछा..
आणी हो थोड्या शिव्या आणी बोंबलणे जपुन ठेवावे.. ऑस्ट्रेलिया बरोबरची मॅच हारल्यावर ऊपयोगाला येईल
चला आता चित्र बरेचसे स्पष्ट
चला आता चित्र बरेचसे स्पष्ट झाले आहे
अ गट
१. पाकडे
२. श्रीलंका
३. ऑसिज
४. न्यूझि.
ब गट (आज भारत जिंकणार)
१. आफ्रिका
२. भारत
३. इंग्लंड
४. वेस्टींडिज
उप उपात्य सामने
१. पाकडे X वेस्टींडिज - पाकडे
२. श्रीलंका X इंग्लंड - श्रीलंका
३. ऑसिज X भारत - भारत
४. न्यूझि. X आफ्रिका - आफ्रिका
उपांत्य
१. पाकडे X भारत - भारत (मोहालीवर पाकड्यांना हरवणे अवघड जाईल जरा)
२. श्रीलंका X आफ्रिका - श्रीलंका
अंतिम
भारत X श्रीलंका - भारत
कसे वाटतेय हे गणित?
UDRS विषयी : मला वाटते अंतिम निर्णय on field पंच देतो... तिसरा पंच फक्त त्याला सगळी माहिती पुरवितो.... त्यामुळे सगळी माहिती जवळजवळ सारखी असूनही वेगळे निर्णय लागले आहेत...
जसे की चेंडू लेग स्टंपला फक्त चाटून जात असेल अशी माहिती UDRS ने दिली पण on field पंचाचा मूळ निर्णय out असेल तर तो स्वतःच्या intuition वर भरवसा ठेवून out देतो... मात्र जर त्याचा मूळ निर्णय not out असेल आणि UDRS नुसार चेंडू फक्त चाटून जात असेल तर तो not चा निर्णय कायम ठेवतो...
एकंदरीत UDRS या मालिकेत तरी
एकंदरीत UDRS या मालिकेत तरी फ्लॉप ठरले आहे... कारण सिस्टीम फुल प्रूफ नाही, नियमांबद्दल संदीग्धता आहे आणि खेरीज ईतके असूनही technology 100% accurate नसल्याने पुन्हा "मानवी चूक" होवू शकते.
तात्पर्यः स्निको व hot spot फक्त खालील एका गोष्टीसाठी udrs वापरावे:
१. झेलबाद- चेंडूला बॅट लागली का नाही हे ठरवायला (मैदानावरील प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोशामूळे अन काही बारीक edges अंपायरच्या नजरेतून सुटू शकतात!).
पायचित चा निर्णय संपूर्णपणे मैदानावरील पंचांचा असावा. (चेंडू आधी बॅट लागला की पॅड ला यासाठी udrs वापरता येईल).
ईतर सर्व निर्णय तपासायला (धावचित, यष्टीचीत, नोबॉल, सीमारेषेला स्पर्श, चौकार्/षटकार, ईत्यादी) तिसरा पंच वापरला जावा. थोडक्यात वरील सर्वच तपासणीला "तिसरा पंच" वापरता येईल- udrs ची वेगळी गरज रहात नाही.
---------------------------------------------------------------------------------
काल "लोकप्रिय आणि जंतमन" पाँटींग ने चेंडूला व्यवस्थित ग्लोव्ज लावले असले तरी "मला माहितच नाही" अशा थाटात मैदानावर ऊभा राहिला. थोडक्यात udrs असल्याने आता अशा प्रकारांना अधिक ऊत येईल असे वाटते- कारण एकंदरीत खेळाडू नैतीकता वगैरे सोडून, आहे ना udrs मग करा वापर या मानसिकतेकडे अधिक झुकतील असे वाटते.
याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्टीव्ह बकनर सारखे चंपट पुन्हा वादग्रस्त निर्णय द्यायला मोकाट सुटतील. पण त्यावर कारवाई करणे कदाचित शक्य ठरेल.
बर्याच जणांचा टेक्नॉलॉजीच्या
बर्याच जणांचा टेक्नॉलॉजीच्या अतिवापराला विरोध असतो [ माझाही कल त्याच बाजूला] कारण मग नियमांची क्लिष्टता वाढतच जाते व खेळाचीं खरीं सौंदर्यस्थळं मात्र तितकींच दुय्यम होत जातात; त्यापेक्षां मग पंचांच्या चूका अधिक सुसह्य वाटायला लागतात व खेळाडूंच्या चूकांप्रमाणे त्याही खेळाचाच भाग म्हणून स्विकारार्ह वाटतात. क्रिकेटमधे हवामान, खेळपट्ट्यांचा लहरीपणा, टॉस, इ.इ. अनेक आपल्या आवाक्याबाहेरचे घटक असतातच; त्यांत आणखी एक पंचांच्या " genuine human errors" समजायचं झालं. शिवाय, "Glorious uncertainties of cricket" हें गोंडस वर्णन इंग्रजानी अशासाठी करून ठेवलं आहेच !
मी टेक्नॉलॉजीद्वेष्टा आहे असा कृपया गैरसमज करून घेऊं नये. पण जोपर्यंत खेळाचा रसभंग न करतां वापरतां येईल अशी १००% खात्रीलायक टेक्नॉलॉजी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तसा वापर करून खेळाचा चुथडा करूं नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
भाऊ, एकूण सहमत पण खेळाचा
भाऊ,
एकूण सहमत पण खेळाचा रसभंग याशी टेक्नॉलॉजी चा संबंध नाही/असू नये असे वाटते.
In fact the most important objective of using any such technology in the game/esp. cricket is to be 100% objective at its best during the decision making process, thus eliminating any human interference. Until that is assured it will always remain a grey area and will be perceived as mix of human and technical inputs and therefore subjected to interpretations again- not a good thing for the dynamic sport such as cricket.
I agree let it be "glorious uncertainties of cricket"
Speaking of gloroius uncertainties, yesterday Pak came up with one against AUS and today we will see if Ashvin can be on the right side of this glorious uncertainty?
As far Indian team goes following can be glorious uncertainties:
१. साहेब: (ऊर्वरीत मालिकेत) कुठल्याही संघाविरुध्ध भोपळा
२. विरू: एक तरी सामना ५० षटके संपूर्ण खेळणे
३. गंभीरः एक तरी सामना बाहेर बसणे
४. कोहली: एकाच क्रमांकावर ऊर्वरीत सर्व सामन्यात फलंदाजीस येणे
५. रैना: सातत्त्य
६. युवी: शतक?
७. धोणी: हेलिकॉप्टर शॉट मारणे
८. युसुफः गरज असेल तेव्हा नेमके सामना जिंकून देणे
९. झहीरः १४५+ च्या वेगाने एखादा तरी चेंडू फेकणे
१०. भज्जी: चेंडू वळवणे
११. मुनाफः एक तरी यॉर्कर टाकणे
१२. चावला: सूर मारून चेंडू अडवणे
१३. अश्विनः सामना खेळणे
१४. नेहरा: ऊर्वरीत मालिकेत शेवटचे षटक टाकणे
१५. श्री: नो लॉकेट, नो नमस्कार, नो चमत्कार, फक्त बेसिक्स!
योगजी, रन-आऊट, जमिनीलगत
योगजी,
रन-आऊट, जमिनीलगत घेतलेले झेल, सीमारेषेवर अडवलेला फटका/ घेतलेला झेल याबाबत संबधित खेळाडूपण निश्चितपणे नाही सांगू शकत व त्याबाबतीत १००% खात्रीलायक टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे; तिथे टेक्नॉलॉजीचा जरूर उपयोग करावा, एलबीडब्ल्यूसाठी अजून तरी नको, एवढंच !
तुमच्या यादीत आण़ही एक -
ऑसीजच्या सामन्यात ऑसीजनी एकही रीव्यू न मागणे !
आपली पहिली फलंदाजी आहे. आज
आपली पहिली फलंदाजी आहे. आज सेहवाग आणि नेहरा बाहेर असून रैना आणि अश्विन आत आहेत. विंडीजचे गेल आणि रोच बाहेर आहेत आणि कर्क एडवर्डस व रवी रामपॉल आत आहेत. रोच विरूध्द सचिन ही चकमक बघायला मजा आली असती.
हो ना... (रोच चा आत्मविश्वास
हो ना...
(रोच चा आत्मविश्वास शाबूत रहावा म्हणून विंडीज ने त्याला तंबूत ठेवला असेल.).
आजच्या सामन्यात साहेबांना विश्रांती देता आली असती का? १००-१०० ला आज पुरेपूर वाव आहे!
आयला इथे विलो वर सुरु नाही
आयला इथे विलो वर सुरु नाही झाली मॅच अजुन!!! आपली बॅटिंग का? वा वा !!!
गेल आणि रोच नाही?? म्हणजे विंडीज पण क्वार्टरचाच विचार करतय डायरेक.
तेंडल्या सरळ चालायला लागला! रिव्यु वाया घालू नये म्हणुन की स्पिरीट म्हणून? असो....
जरा हवा गेल्यासारखं झालय पण चलताय.
Pages