विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेले साहेब.. glorious uncertainties Happy

>>Rampaul to Tendulkar, OUT, Done in by the short ball. Ravi Rampaul has gone berserk. Windies said they had a plan. It wasn't a bouncer, just leaped from short of length below chest high, above waist and straightened outside off, Tendulkar stabbed at it by taking the bottom hand off the handle but the ball popped up to the keeper. umpire ruled not out, tendulkar walked, though.

udrs अजूनही हवय क कुणाला.? Happy

(अंपायरने बाद कसे दिले नाही पण? कमाल आहे... साहेबांनी पाँटींग ला संदेश दिलाय का?:) बरे झाले law of avaerages याच सामन्यात साहेबांच्या भेटीस आले!)

सचिन Sad मस्त बॉल होता तो!
अंपायर नॉट आऊट म्हणून मान हलवतोय तरी हा त्याच्याकडे न बघता माघारी फिरला!

बुवा, दिसत्ये की विलोवर..

योगजी, टेक्नॉलॉजीमुळें खेळातली जीं सौंदर्यस्थळं दुय्यम ठरतात असं मी म्हणालो, त्यातलं एक सचिनने
आत्ताच साकार करून दाखवलं !

पन्ना, हो हो, आता दिसतेय. दुसरी फीडची लिंक ट्राय केली आणि सुरु झाली.
आज सगळे पिलेयर (आपले) एकदम यमी पेक्षा सहापट गोरे दिसतायत, का काय माहीत? Proud

बाकी, ती मधेच ट्रंपेट (भोंपु)वाजते आणी त्यानंतर पबलीका मोठ्यानी आवाज का करते? सगळ्याच मॅच मध्ये एकायला मिळते हे.

हे खास असाम्यासाठी: Happy
>>Rampaul to Gambhir, FOUR, Edged but between lone slip and gully! It was yet another shortish delivery cutting and bouncing across Gambhir who hangs his bat away from the body. A lame push. The ball flies of the edge but goes through safe zone.

4.3
Rampaul to Gambhir, no run, More trouble. Another short delivery, this time in the zone outside off, Gambhir has a lame poke at it and the ball rushes past the edge.

4.2
Rampaul to Gambhir, no run, The bouncer arrives and Gautam is in a tangle. He was in an awkward position and tries to use his bat as a face shield but the leather zips over his right shoulder.

बुवा Lol अजून गंमत म्हणजे एकाच स्टाईल ने पब्लिक ओरडते.. आणि आवाजाची पातळी पण नेहमी तेवढीच असते Proud

योग, (असाम्यासाठी असलं तरीही Wink ) ती ओवर मस्त होती.. रामपॉल बॉलींग चांगली टाकतोय. ...

गंभीर पण गेला..

काय सकाळी सकाळी उठून विकेटी बघायला लावतायत! श्या.....
आता गप गुमान, १५० पर्यंत तरी कन्सॉलिडेट करा आणि मग जरा यॅक्सिलेटर वर पाय द्या.

पन्ना Proud

TVN sports वर पण technical difficulties मुळे दिसत नाहिये. क्रिकेट-३६५ डॉट नेट वर चकटफु दिसते आहे.

क्रॅकलिंग शॉट! मस्त! युवराज.
हा राम पॉल मला बळच "शाना" वाटतोय. नीट खेळलं तर इतकी अवघड नाही वाटत त्याची बॉलिंग.

अरे हे पिच नंतर डिटिरियोरेट होणार आहे का? आता तर बॉल चांगला बॅट वर येतोय? तेंडल्या काय म्हणे मग बॉल बॅट वर ने येण्याची प्रॅक्टीस करत होता ?

युवी चा कॅच ड्रॉप!!!

युवी स्ट्राईक रोटेट का करू शकत नाही? ६ ओव्हर्स झाल्या एकही चौकार नाही! इम्पेशंट नाही पण हे म्हणजे आपले चाचपडणे. युवी निट कनेक्टच होत नाही आणि विराटला संधीच मिळत नाही!

लिहिताना एक सिक्स गेला बॉ. Happy पण अफ्रिका, इंग्लंड ह्यांसोबत आपण ६ + ने धावा काढल्या अन आता ४.९!

>>लिहिताना एक सिक्स गेला बॉ. पण अफ्रिका, इंग्लंड ह्यांसोबत आपण ६ + ने धावा काढल्या अन आता ४.९!
जरा दमानं घ्या ना राव.. आधि धाव होत नव्हत्या तर तक्रार आता कमी रन रेट ने होतायत तरी तक्रार.. खेळू दे दोन्ही पोरांना, रैना ला काय आज बॅटींग मिळायलाच पाहिजे असे कुठे आहे? Happy
रच्याकने: या दोघांनी ५० षटके खेळून काढली तर रैना अन युसुफ ला पुढील सामन्यात धोणी घेणार काय? त्या दोघांना या सामन्यात गोलंदजी नक्कीच मिळेल मात्र Happy

सध्या रन रेट स्लो आहे पण साऊथ अफ्रिकेच्या मॅच मध्ये केलं तसं व्हायला नको म्हणून थोडं जपून खेळलं तरी चालेल. अजुन सोळा ओव्हर बाकी आहेत त्यामुळे १२० रन व्हायला काही हरकत नाहीये. युवी टिकला तर नंतर सॉलिड हाणामारी करु शकतो. त्याला बरं नाही वाटत आहे पण म्हणे. डिहायड्रेशन वाटते.

धोणी च काय कळेनासं झालय.... रैना ला घेवून स्वतः वर खेळायला आलाय?
आयला. रैना ने नक्कीच कहितरी वाईट्ट घोडं मारलय धोणीचं.. Happy (आणि म्हणे प्रत्त्येक खेळाडूला एक तरी सामना प्रॅक्टीस द्यायची असे तो म्हणत होता.. रैना ला नक्की कसली प्रॅक्टीस देणार आहेत भाऊ?) Sad

आणी अजूनही तिसरा पॉ.प्ले. घेतला नाहीये...:( काय चाल्लय काय??
मगाशी कोहली युवी खेळत होते तेव्हा का नाही घेतला? आता स्वतः ऑट झाल्यावर पॉ.प्ले. घेवून परत पायावर कुर्‍हाड मारणार बहुतेक..
(आता युवी बाद झाला तर पुन्हा आपली अवस्थ बिकट होणार कारण या पिच वर येवून थेट हाणामारी चालू करणे तितके सोपे नाहीये.. थोडक्यात युवी, रैना दोघांनी आता ५० षटके खेळायला हवीत)

चुकीची कप्तानशिप. धोणी स्वतः यायच्या ऐवजी रैना यायला हवा होता. आता त्यावर प्रेशर देणार, धावा निघतील का नाही ते माहित नाही, युवीला पोट घेऊन खेळता येत नाही. दर दोन बॉल पाठीमागे तो बसतो. आणि धोणी चान्स घ्यायला जाऊन आउट.

परत एकदा आपल्या २०० धावा असतील तरी मला चालतात, पण आपण "कसे खेळतो" हे माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. त्यामुळे मला गंभीरची बॅटिंग आवडली, अ‍ॅटिट्युड हवा. त्यांची बॉलींग अजिबात ग्रेट नाही. बिशूचा बॉल फार वळत नाही, डेक टू डेक जरुर आहे. विकेटही फार स्लो वगैरे नाही, युवीने मारामारी करावी वा विकेट फेकावी व पठाणला संधी द्यावी. २८५ होतील का?

एकदा चुकल्यावर परत तेच करणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा ठरेल. ५० ओवर बॅट केल्याच पाहिजेत. स्ट्रोक प्ले जपुनच.

रैना गेला!! पठाणला आता संधी आहे!!!! युवी नी जपून खेळलं आणि एखाद दुसरा बॉल हाणला तर चालेल. आपले टेलेंडर आजिबातच बॅट नाही करु शकत. एक बाजू लावून धरली पाहिजे. अर्थात दोन्ही बाजू!

केदार,
अगदी... हा सामना जर आपल्यासाठी "निर्णायक" असता तर धोणी च्या नावाने पब्लिक ने लय शिमगा केला असता.. चांगल्या परिस्थितीत असताना स्वतः ची अत्यंत फालतू अन बिंडोक फलंदाजी करून त्याने निव्वळ षटके खल्ली अन रैना वर प्रेशर आणले ते वेगळेच.. dhoni has completely lost it in my opinion. and again no powerply taken taht tells u he was never sure of the strategy.. pathetic captaincy!!

पर्फेक्ट विश्लेषणः
Tim: "One of India's major problems is their confidence. They genuinely don't believe they can protect a score of 250. Their batting panic's trying to get enormous scores and their bowlers panic when partnerships build in the chase. They need more cool heads, like Tendulkar."
(cricinfo.com)

गेला पठाण ही!!! खरय, नुसते साले कागदी शेर, आजिबात कॉन्फिडन्स नाही! धोनी आणि पठाण टोटल वेस्ट!!! काही मजा पण नाही राहिली उरलेली मॅच बघायला. धोनीनी अक्षरशः फेकली विकेट (त्याच्यात अणि अफ्रिदी मध्ये काहीच फरक नाही म्हणणार होतो पण अफ्रिदी कमीत कमी बॉलिंग तरी करतो). पठाण सुद्धा इतक्या फालतु बॉल वर आऊट झाला! असले बॉल डोकं थंड असताना आराम सिक्स ला हाणले आहेत. सरळ स्टंप वर येणारा बॉल होता.

रैना गेला [बिचारा, "unglorious" uncertainty of criket !], युवी, पठाणही गेले !!

पुन्हा एकदा ५० षटके आपण खेळणार का?.... could be another one in my list of glorious uncertainties of cricket for Indian Team in this tournament Happy

खरं तर अचूक गोलंदाजी केली तर या पिच वर २६०+ सुध्धा निर्णायक धावसंख्या आहे. भज्जी, अश्विन, युवी यांना विकेट्स मिळतील जास्त.. आणि अखेरीस चेंडू रिव्हर्स स्विंग होईल तेव्हा झहीर भेदक ठरेल असे वाटते. मुनाफ ची धुलाई निश्चीत वाटते..

रामपॉल ने भन्नात गोलंदाजी केलीये.. ४ विकेट्स तर यॉर्कर वर.. आपल्या गोलंदाजांनी यॉर्कर साठी शिकवणी लावायला हरकत नाही. Happy

आत्मविश्वासाची बोंब दिसली.. बॉडी लँगवेज तर एकदमच ढूस्स !!! हा बहुदा सेंकडलास्ट सामना आपला.. सुधारणा कुठेच दिसत नाही.. Sad पंचेचाळीसाव्या षटकापर्यंत हिटींग केलीच नाही.. मागचा अनुभव म्हणून थोडे टरकूनच दबावाखाली खेळले.. Sad

walking_0.JPG

खेळ खल्लास..२६८. (४९.१ षटके)
पुन्हा एकदा शेपूट मारायला जावून बाद झाले आहे.. अथात रामपॉल ची गोलंदाजी भन्नाट.

anyone still betting on this indian team against AUS or LANKA? Happy

Pages