विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंडीजने बरेच काळ ओडीआय रँकिंगमध्ये आपल्या वर असलेल्या संघाला हरवलेले नाही. शेवटचे भारताला विंडिजमध्ये हरवले होते.

<< हरभजनचा इकॉनॉमी रेट ४.४१ आहे. चावलाचा ६.२१ पठाण ४.९६ युवराज ५.०९ >> मयेकरजी,शेन वार्न, कुम्बळे यासारखे एकदिवसीय सामन्यात ४.५ च्या आसपास एकॉनॉमी रेट ठेवणारे महारथी सोडले, तर लेग्-स्पिनरनी असा रेट ठेवणे किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे खरंच शक्य/योग्य आहे का ? चावला जादूची कांडी फिरवेल असं मला सुचवायचं नाहीय. पण अगदीच सुमार व बोथट असलेल्या आपल्या गोलंदाजीला चावलामुळे निदान विविधतेची तरी धार येईल, एवढंच मी म्हणतोय.शिवाय, उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर जर लेग-स्पिनर यशस्वी होताहेत असं दिसतंय, तर चावलाचा पर्याय वापरणं फायदेशीर ठरूं शकतं, हा माझा प्रथमपासूनचाच कयास आहे.कदाचित हे मी पुन्हा पुन्हा म्हणतो म्हणून चावला मला महान गोलंदाज वाटतो असा गैसमज झाला असेल,तर मात्र ती माझीच चूक असावी.

>>उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर जर लेग-स्पिनर यशस्वी होताहेत असं दिसतंय,

भाऊ,
हे तर त्रिकालाबाधित सत्त्य आहे.. प्रश्ण एव्हडाच आहे की ऐन मोक्याला किंवा एकंदर सामन्यात चावला गोलंदाजी किमान अचूक टप्पा अन दिशा ईतपत करू शकतो का?---ऊर्वरीत गोष्ट खेळपट्टी करेल. Happy

>>> इंग्लंडला ऑस्ट्रेलिया दौर्‍यामुळे मी एक दावेदार समजत होतो पण इंग्लंडची टीम अतिशय टुकार आहे. सगळ्या मॅचेस रडत पडत हारल्या वा जिंकल्या.

इंग्लंडचे सर्व ६ सामने अतिशय चुरशीचे झाले. २ वेळा त्यांनी कमी धावसंख्येचे लक्ष्य ठेवलेले असताना व प्रतिस्पर्धी जिंकण्याच्या परिस्थितीत असताना सुध्दा सामने जिंकले.
(आफ्रिका इंग्लंडच्या १७१ धावांचा पाठलाग करताना एक वेळ ३ बाद १२६ अशा सुस्थितीत होते. तरी शेवटी ते ६ धावांनी हरले.
काल विंडीज २४४ धावांचा पाठलाग करताना एक वेळ ४० षटकांत ६ बाद २२२ होते. तरी शेवटी ते हरले).

आपल्या ३३८ या डोंगराचा त्यांनी यशस्वीपणे पाठलाग करताना सामना टाय केला तर नेदरलॅन्ड्सच्या २९२ धावांचा पाठलात त्यांनी यशस्वीपणे ४९ षटकांत केला.

बांगलाविरूध्द त्यांनी अत्यंत बेभरवशाचा खेळ करून स्वतः फक्त २२५ धावाच केल्या व नंतर बांगलाला ८ बाद १६९ अशा हरलेल्या अवस्थेतून जिंकून दिले.

आयर्लॅन्डविरूध्द ३२७ धावा करूनही अत्यंत खराब गोलंदाजी करून सामना हरले.

पाकडे आणि इंग्लंड हे अत्यंत बेभरवशाचे संघ आहेत.

नेदरलँड्स चांगले खेळले. शेवटची ओव्हर मात्र अगदी भारतीय लौकिकाला शोभेल अशी खेळले मात्र. Proud

>> ही हाराकिरी विंडीजला नवी नाही
तशी ती ८३ पासून आपल्याला माहिती आहे. सरवान आणि रसेल नी मॅच खेचली होती जवळ जवळ. आपल्यासारखंच वेष्ट्यांना पण वाटतं की चौकार/षटकार मारल्याशिवाय मॅच जिंकताच येत नाही. Wink

एखाद्या बॉलरचा इकॉनॉमी रेट ८ जरी असला पण तो २/३ महत्वाच्या विकेटी काढू शकत असेल तरी मी त्याला ठेवेन.

मला इंग्लंड जिंकण्याचं दु:ख नाही, पण आता त्या संघाची भरमसाट स्तुती करणारे लेख येतील... विशेषतः मायकेल व्हॉन सारखे ज्यांना अ‍ॅशेस जिंकल्यापासून इंग्लंड नं १ टीम आहे असंच वाटायला लागलंय त्यांचे लेख वाचावे लागणार त्याचं दु:ख आहे. Sad

नेदरलँडसची शेवटची ओव्हर म्हणजे महान विनोद होता.. ४ रन आऊट आणि त्यातले ३ एका पाठोपाठ एक.. आणि शेवटचा शेवटच्या बॉलला... अचरटपणाचा कळस होता..

त्यांचे लेख वाचावे लागणार >>
हे काहीपण हं चिमण. वाचु नकोस की. Proud

आपल्यासारखंच वेष्ट्यांना पण वाटतं की चौकार/षटकार मारल्याशिवाय मॅच जिंकताच येत नाही. >> Lol
अगदी अगदी त्यांच्या नावात पण इंडी आहे ना. त्यामुळे असेल. कालच्या मॅचमधे अगदी आपल्या सारखेच ६ विकेट जाऊनही इंग्लंडला २०० च्या पुढे जाऊन देणे, ६ विकेट गेल्यावर मॅच खेचणे व अगदी मॅच सहज जिंकते आहे असे वाटत असतानाच गळती लागणे सगळे अगदी आपल्यासारखेच.

>> हे काहीपण हं चिमण. वाचु नकोस की
अरे केप्या, ते किती बँड लावताहेत ते बघावसं वाटतंच ना?

खरच! कधी कधी मला वाटतं आपण क्रिकेट वेष्ट्यां कडून शिकलो की काय? Proud

NZ नं आत्तापर्यंत तरी श्रीलंकेला चांगला थोपवलाय. ५९/२ १४ ओव्हरी!

अरे काय वेडेपणा चालवलाय!! मक्कलम नी घेतलेला कॅच दिला नाही!!!! त्याची बोटं बॉल आणि जमिनीच्या मधे होती!!!!
काय झालय आमिश साहिबाला? कॉमेंटेटर लोकं पण बोंब मारतायत!!! जयवर्देने बॅट्समन.

बुवा, पहाटे उठून मॅच बघतोयस काय?

भारताला डीआरएस विरुद्ध भरपूर खाद्य मिळालंय या स्पर्धेत पण! माझा टीमने रिव्ह्यू घ्यायचा की नाही यालाच विरोध आहे. प्रत्येक डिसीजन हा तंत्रज्ञानाच्या मर्यादेनुसार जास्तित जास्त बरोबर कसा देता येईल ते बघा! टीमचे रिव्ह्यू संपले किंवा टीमने रिव्ह्यू घेतला नाही याला काही अर्थ नाही.. ठीके, थोडा जास्त वेळ जाईल. काय फरक पडतो त्यान? टीम्सना निदान रिव्ह्यूचं टेन्शन तरी नाही येणार!

आयर्लंड - नेदरलँड मॅच जास्त इंटरेस्टींग झाली आहे... काय धोपटा धोपटी केलीये दोन्ही टीम्सनी..

चिमण उठल्या उठल्या मॅचच लावतो आधी. अरे इथे बाकी डिसीजन डी आर एस नीच दिलाय!!! आमिश साहिबा वर बसलेला आहे, फिल्ड वर नाहीये! कॅच घेतला की नाही हे बघायला फिल्ड वरच्या अंपायर (असाद रऊफ बहुतेक) नी कनसल्ट केलं साहिबा ला!
म्हणून तर जास्त वैताग आला बघून.

मला माहिती आहे डिसीजन डी आर एस नीच दिलाय ते! जर कॅच नीट घेतलेला स्वच्छ दिसत असेल आणि तरीही त्या अंपायरच्या .... वर लाथ घालून हाकलला पाहीजे. नीट दिसत नसेल तर बेनेफिट ऑफ डाउट बॅट्समनला जाणार हे सगळ्यांना माहिती आहेच.

शिवाय मी अजून एक मुद्दा उपस्थित केला की टीमने रिव्ह्यू घ्यायचा की नाही याला काही अर्थ नाही. सगळेच डिसीजन्स तंत्रज्ञानाच्या मर्यादेनुसार जास्तित जास्त बरोबर कसे देता येतील ते बघितलं पाहीजे.

हा खुप महागात पडु शतो न्यु झिलंडला त्यामुळे बाहेर काढला तरच बरोबर आहे. Ridiculous!

चिमण, स्वच्छ दिस्तय म्हणजे कोणाला दिसतय? शेवटी लास्ट अथॉरिटी कोणीतरी असतच ना? फिल्डवरच्या क्रिकेटिंग निर्णयाबद्दल मॅच रेफरी कडे तर नाही ना जाऊ शकत?

डी सी आर चा तुझा मुद्दा पटला फक्त मी ह्या कॅच च्या संदर्भात टीम रिव्ह्युचा संबंध नव्हता असं सांगत होतो.

आता गेलाय वाटतं जयवर्धेने बहुतेक. एल बी. गेला!!! थोडाच महागात गेला असं म्हणणार होतो पण ते आता कोण जिंकलं आणि कितीनी त्याच्यावरुनच ठरेल.

आता संगकारा गेल्यावर पुढचे कसे खेळतात ते बघायचंय. आपल्यासारखे की प्रोफेशनल्स सारखे. बहुतेक आपल्यासारखेच खेळतील असं वाटतंय.

ब गटात खूपच इंटरेस्टिंग परिस्थिती आहे. फक्त आफ्रिकेचे उपांत्यपूर्व फेरीत स्थान नक्की झाले आहे. आयर्लॅन्ड व नेदरलॅन्ड्स आधीच बाहेर पडले आहेत. इंग्लंड, भारत, विंडीज व बांगला यांतले ३ संघ पुढे जातील. सर्व संघांना पुढे जायची थोडीफार संधी आहे.

आता फक्त २ च सामने शिल्लक आहेत. भारत वि विंडीज आणि आफ्रिका वि बांगला

(१) आफ्रिका वि बांगला

(अ) बांगलाचा पराभव
बांगला हरले तर बांगलाचे ६ गुण होतील. इंग्लंडचे व भारताचे आधीच ७ गुण
असल्याने ते पुढे जातील. विंडिजचे ६ गुण आहेत.
- जर विडीज भारताविरुध्द हरले तर बांगला व विंडीज यांच्यात जास्त धावगती असणारा संघ पुढे जाईल. आता बांगलाची धावगती -०.७६५ आहे तर विंडीजची धावगती +१.६५ आहे. म्हणजेच भारताने विंडीजला फार मोठ्या फरकाने (३०० हून अधिक धावांनी किंवा ३५-४० षटके राखून) आणि बांगला आफ्रिकेकडून खूपच थोड्या धावांनी हरले (१० पेक्षा कमी) तर बांगला पुढे जाईल व विंडीज बाहेर पडेल.
- विंडीजने भारताविरूध्द बरोबरी केली किंवा भारताला हरविले, तर अथातच
विंडीज पुढे जाईल व बांगला बाहेर पडेल.

म्हणजे बांगला आफ्रिकेविरूध्द हरले तर ते बाहेर पडल्यासारखेच आहेत.

(ब) बांगला-आफ्रिका सामन्यात बरोबरी
या पर्यायात बांगलाचे ७ गुण होतील. इंग्लंडचेही व भारताचेही ७ गुण आहेत. भारत धावगतीत बांगला व इंग्लंडच्या खूपच पुढे आहे. त्यामुळे टाय करताना सुध्दा बांगलाला आपली धावगती खूपच वाढवावी लागेल.
तसेच विंडीजला आत येण्यासाठी भारताला हरवावे लागेल किंवा बरोबरी करावी लागेल. जर विंडीज हरले तर ते बाहेर पडतील व बांगला आत येईल.

(क) बांगला-आफ्रिका सामन्यात बांगलाचा विजय
या पर्यायात बांगला आत येईल. भारत-विंडीज सामना विंडीजने जिंकला तर इंग्लंड बाहेर पडेल, बरोबरी झाली तर सरस धावगतीच्या आधारावर विंडीज आत येऊन इंग्लंड बाहेर पडेल आणि भारताने जिंकला तर इंग्लंड आत येऊन विंडीज बाहेर पडेल.
अर्थात विंडीजने भारलाला खूप मोठ्या फरकाने हरविल व भारताची धावगती निगेटिव्ह झाली तर भारत बाहेर पडेल.

म्हणजेच उर्वरीत ४ संघापैकी कोणताही संघ बाहेर पडण्याची कमीजास्त शक्यता आहे. बांगला बाहेर जाण्याची शक्यता सर्वात जास्त आहे तर भारत बाहेर पडण्याची शक्यता सर्वात कमी आहे. इंग्लंड व विंडीजवर टांगती तलवार आहे.

कालच्या इंग्लंड-विंडिज मॅचमध्ये विंडिजची शेवटची विकेट रन-आऊट होती. ३४ बॉलमध्ये २० रन हवे आहेत (म्हणजे बॉल तसे पुष्कळ आहेत) आणि एकच विकेट राहिली आहे, अशा परिस्थितीत रिस्की दोन रन घ्यायच्या नादात रन- आऊट होणे म्हणजे कमाल आहे! ह्या लोकांना काही डोकं बिकं असतं की नाही असंच वाटायला लागलं मला काल. गल्ली क्रिकेट खेळणार्‍याला पण कळेल एवढं साधं.

विकेटी पडल्या तरी श्रीलंकेनं २६५ पर्यंत मजल मारली. ४२ व्या ओव्हरीत संगकारा गेल्यावर २१० होता. मुख्य म्हणजे पूर्ण ५० ओव्हरी खेळले. बघा! बघा!

<< प्रश्ण एव्हडाच आहे की ऐन मोक्याला किंवा एकंदर सामन्यात चावला गोलंदाजी किमान अचूक टप्पा अन दिशा ईतपत करू शकतो का?--- >> योगजी, अशा प्रश्नांची उत्तरं स्टँप-पेपरवर लिहून नाही देतां येत. आपली एकंदर गोलंदाजी, खेळपट्ट्या, विरुद्ध संघांची लेग्-स्पिन खेळण्याची कुवत व विशिष्ठ गोलंदाजाची नेटवरची प्रॅक्टीस हे सारं लक्षात घेऊन एखादा गोलंदाज प्रभावी ठरेल का हा अंदाज बांधायचा असतो. चावला हा ग्रेट नसला तरी निश्चितच टाकाऊ गोलंदाज नाही. प्रोत्साहन, विकेट मिळाल्या तर तो आत्मविश्वासाने चांगली गोलंदाजी करेल, असा मला विश्वास वाटतो. त्याची गुगली टाकण्याची अ‍ॅक्शन लेग-ब्रेक टाकण्यासारखीच आहे व म्हणून अधिक फसवी पण आहे.

चावलाला खेळवाच व तो नाही चमकला तर मी मिशाच उतरवून ठेवीन, असा कांही माझा पवित्रा अजिबात नाही ! कोणाच्याही कोंबड्याने कां होईना, उजाडलं कीं झालं !! Wink

मास्तुरे, इतर - भारत-विंडीज मॅच टाय झाली किंवा वॉश आउट झाली तर या समीकरणात काय होईल ते ही इंटरेस्टिंग असेल.

NZ लैच बावळट आहे. प्लंब असताना पण टेलरने रिव्हू घेतला. कधी कधी हे रिव्ह्यू फार मजेशीर असतात. Happy

प्लंब असताना पण टेलरने रिव्हू घेतला.>>अरे कदाचित तो लेगच्या बाहेर पडला असेल वाटले असणार त्याला अँगलमुळे म्हणून घेतला असेल.

हो चेपॉकवर चावला घ्यावे. माझे पहिले स्टेटमेंट मी मागे घेतो. भाऊंशी व तुझ्याशी चेन्नई साठी सहमत. स्पेशली बिसूला पाहिल्यावर. पण अश्वीनही असावा. भज्जीला बसवणे कठीण आहे. कारण दोनच अनुभवी गोलंदाज म्हणजे झहिर व तो त्यामुळे तो सर्व मॅच डिफॉल्ट खेळेल. पठाणला व विराटला बसवावे. रैना साठी चेपॉक तसे लक्कीच आहे. (IPL Happy )

विराट >> रैना. घेतले नाही तर विराटला ४ नं पाठवावे. भले २५० वर २ असले तरी!
नेहरा >> श्री. कॉन्फिडन्स साठी आवश्यक. अन्यथा त्याला नॉक आउट मध्ये घेणारच नाहीत.
पठाण >> अश्वीन कॉन्फिडन्स साठी आवश्यक. शिवाय IPL मध्ये चेपॉक
१ बॉलर जास्त, १ बॅटसमन कमी. पहिले ६ भरपूर व्हावेत ह्या माझ्या मतावर मात्र ठाम. तसेही बांग्ला हारले तर असे करून पाहायला वावच वाव कारण आपण हरलो तरी ४ थ्या नंबरवर असूच!

श्रीलंका NZ ला गुंडाळत आहे. मस्त बोलींग. पाहायला मजा येतेय!

त्या मक्कलम चा कॅच जयवर्देनेनीच घेतला म्हणे! क्रिकेट इज अ फन्नी गेम यु सी! Happy न्यु झिलंडचा सुपडा साफ एकदम १०० % !

Pages