विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मास्तुरे, इतर - भारत-विंडीज मॅच टाय झाली किंवा वॉश आउट झाली तर या समीकरणात काय होईल ते ही इंटरेस्टिंग असेल.

फारेन्डा, छान! छान! मास्तरला काम लावून द्यायचा चांगला प्रयत्न! Lol

श्रीलंकेने न्यूझीलंदला १५३ धावात गुंडाळलं ! इंग्लंडसारखंच लंकेच्या स्पिनर्सचे ७ बळी !! सचिनसारखंच मुरलीदेखील [ ८षटकं, २५ धांवा देऊन ४ बळी] हा विश्वचषक गाजवूनच मग निवृत्तिचा विचार करायचं ठरवून आलाय कीं काय !!! सावधान !!!

भाउ,
तरी ऑसीज-लंका मॅच पावसानी थांबली, मजा आली असती बघायला.
एडिट , श्रीलंका आले गृप ए मधे टॉप वर , पण ऑसी- पाक मॅच नंतर ऑस्ट्रेलियानी रहावं टॉप ला..

भाऊ, केदार,

आफ्रिकेने बांगला ला हरवलं (थोडक्यात बांगला स्पर्धेच्या बाहेर) तर धोणी अश्विन, चावला यांना खेळवेल, भज्जी ला विश्रांती देईल असे वाटते. कारण तो सामना आपण हरलो तरी आपण पुढील फेरीत जावू.
रैना कोहली च्या जागी येईल, युसुफ ला खरं तर ही अजून एक "प्रॅक्टीस" संधी आहे.. आणि त्याला बसवण्यापेक्षा अधिक सराव देणं आत्मविश्वास देण केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. त्यासाठी कोहलीचा बळी द्यावा लागेल- ठीक आहे. खरं तर धोणीच्या दृष्टीकोनातून या बर्‍याचश्या फायद्याच्या गोश्टी विंडीज विरुध्धच्या सामन्यात आहेत, अर्थात बांगला हरले तर आणि आपण हा सामना हरलो तरी हरकत नाही पण संघ संतुलनाचा प्रयोग्/संधी म्हणून विंडी़ज विरुध्धच्या सामन्याकडे बघितलं तर..
एकंदरीत आता वाढते तापमान बघता सर्व खेळपट्ट्या आपला मुळचा रंग्/फिरकीला अनुकूल दाखवायला सुरुवात करत आहेत.. ताहीर, आफ्रिदी, मुरली, स्वान, यांना आनंद झाला असेल.. Happy

ताहीर, आफ्रिदी, मुरली, स्वान, यांना आनंद झाला असेल. >> आणि भारतीय स्पीनर्स...??? Wink

बाकी बांग्ला बाहेर जायला हवी.. अन्यथा समोरच्या ग्रुपला फायदा.. आधीच ते सगळे संघ आरामात पुढच्या फेरीत पोहोचले आहेत..

बॉलिंगच्या जोरावर मारली श्रीलंकेनी! श्रीलंकेला ऑसिज नी हे जमू दिलं असतं का? थोडक्यात श्रीलंकेनी चांगली बॉलिंग केली हे जरी खरं असलं तरी न्यु झिलंड नीट खेळलय का?

क्वा. फायनल मॅच शक्यता

भारत व ऑस्ट्रे : पाक ने ऑस्ट्रे ला हरवले, भारताने वे. इंडी ला व द. आफिकेने बांग्ला ला हरवले तर . पाक ने ऑस्ट्रे ला हरवने कठिण वाटते.

शक्यता - कमी.

भारत व न्युजी: ऑस्ट्रे ने पाकला, भारताने वे. इंडी ला व द. आफिकेने बांग्ला ला हरवले तर .

शक्यता - सगळ्यात जास्त.

भारत व श्रीलंका:ऑस्ट्रे ने पाकला, वे. इंडी ने भारताला व द. आफिकेने बांग्ला ला हरवले तर .

शक्याता - आहे ...भरपुर शक्यता आहे.

भारत व पाक : पाक ने ऑस्ट्रे ला हरवले, वे. इंडी ने भारताला, व बांग्ला ने द. आफिकेला.
किंवा ऑस्ट्रे ने पाकला, भारताने वे. इंडी ला, व बांग्ला ने द. आफिकेला.

शक्यता - क्रिकेट आहे... काहीही होउ शकते. Happy

चिमण Happy नाही कोणी आधीच ते केलेले आहे का बघतो होतो.

क्रिकईन्फो वर केले आहे

तसे होण्याने इंग्लंड किंवा बांग्लाला धोका आहे. भारताला नाही.

पूर्वी असली कॅल्क्युलेशन्स आपल्या डोक्यात रोज अपडेट व्हायची. आणि आपले लोक ही अचाट खेळून ती करायला भाग पाडायचे. यावेळेस जमले नाही.

इंगलंडशी हारलो नाही म्हणून जरा कमी धोका आहे आपल्याला. नाहीतर आपण आणि बांगला होतो चौथ्या क्रमांका करता! Proud

टिल्लू चांगला अ‍ॅनेलिसीस आहे. यावरून त्या वरती लिहीलेल्या मॅचेस कोठे होतील काही अंदाज? त्यावरूनही फरक पडू शकेल. म्हणजे भारत श्रीलंका कोलंबोत होणे आणि अहमदाबाद्ला होणे यात.

येल्ले रे फारेंडा.

Wed Mar 23 04:30 EDT 2011 Quarter Final - TBC v TBC (A1 v B4). Shere Bangla National Stadium. Mirpur
Thu Mar 24 05:00 EDT 2011 Quarter Final - TBC v TBC (A2 v B3). Sardar Patel Stadium. Motera. Ahmedabad
Fri Mar 25 04:30 EDT 2011 Quarter Final - TBC v TBC (A3 v B2). Shere Bangla National Stadium. Mirpur
Sat Mar 26 05:00 EDT 2011 Quarter Final - TBC v TBC (A4 v B1). R Premadasa Stadium. Colombo

टिल्लुच्या शक्यता.
१) A3 V B2, Ind Vs Australia (Mirpur)
2) parat A3 V B2, Ind Vs New Zealand (Mirpur)
3)A2 V B3 Ind Vs Sri Lanka Motera. Ahmedabad
4) a1 Vs B4 India Vs Pakistan (Mirpur)

आपण व अफ्रिका मॅच जिंकणार. त्यामुळे आपण B2 पर्यायाने आपली क्वार्टर फायनल मिरपूर

आणि विरुद्ध पार्टीत न्युझिलंड. (आणि पाकडे जिंकले तर ऑसी)

कसेही करुन ANZ सोबत आपण असणार. मजा येइल ऑस्ट्रेलिया सोबत. आणि सचिनचे १०० तिथेही! शंभराचा भाबडा आशावाद नाही. आजपर्यंतचे सचिनचे रेकॉर्ड फायनल्स मध्ये त्यांच्यासोबत नेहमीच चांगले आहे. अपवाद २००३! आणि २००३ ला भरून काढण्यासाठी सचिन त्या मॅचची वाट पाहत आहे!!!! इंग्लंड, अफ्रिका नंतर त्यांचाच नंबर!

वरच्या अ‍ॅनॅलिसिस वरुन आणि बाकीच्यांच्या रिप्लाईजवरुन असे दिसतेय की आपल्याला आपल्या टीम वर काँफिडन्स नाही तेवढा बाकीच्या टीम्स वर आहे Wink (म्हणजे ऑसि पा़क ला हरवेल, साआ बांगलाला हरवेल).

मो, आपल्या टिमची नेहमीच 'कागदी वाघ' अशी अवस्था असते. :|

केदार QF नंतर डायरेक्ट फायनल ला पोचलास!!! Wink

मला पण शक्यता नं २ वा ३ होईल असेच वाटतेय. शक्यता नं २ परवडली, पण लंकेविरूध्द कठीण आहे.
<<< हो गं पन्ना.. लंका नकोच.. आले तर खरच अवघड आहे ! ते इडन गार्डन चं पानीपत आठवतं :(.............
न्युझिलंड चांगली ऑप्शन आहे :).

मो, त्या जोड्या तुल्यबळ टीमांमध्ये नाहीयेत म्हणुन. बाकी कॉन्फिडन्स कमी आहे हे ही खरच आहे म्हणा. Happy

अरे काय हे कॉन्फीडन्स का कमी आहे? आपण हारलो अन बांग्ला जिंकले तरी आपण चारात असणार. सध्या स्ट्राउस अन आख्या इंग्लंड ने जिझसला पाण्यात ठेवले आहे. बांग्ला जिंकू नयेत म्हणून. गणपतीची बारी अजुन आली नाही.

मो, अपून बोलरेला है ना की WI हो अपून मारेगा!>> Lol तू आणि मी ऑलमोस्ट एकाच वेळी पोस्ट टाकली, त्यामुळे तुझा रिप्लाय पाहिला नव्हता.
माझ्या, पन्नाच्या आणि फारेंडच्या रिप्लाय वरुन मी तसे म्हणत होते (फारेंडने लंका भारत सामन्याबद्दल विचारले, ती परिस्थिती येईल विंडीज ने आपल्याला हरवले तर...)
असो, 'कागदी वाघ' मैदानात येऊन वाघासारखे खेळले तर आनंदच आहे रे, आणि सपोर्ट पण त्यांनाच आहे, पण फार अनप्रेडिक्टेबल आहेत, त्यामुळे कॉन्फिडंटली त्यांच्याबद्दल काही म्हणायचे आणि बरोब्बर त्यांनी पोपट करायचा हे होते (सचिन अपवाद).

धन्यवाद बुवा.

दीपाली - लंकेला नंतर धुतलाय की - इडन आठवण्यापेक्षा १९९९ किंवा २००३ चे कप आठव Happy

केदार - बरोबर. २००३ मधे मॅग्राथ चा फॉर्म हे ही एक कारण होते.

गौतम७स्टार >> मला ही तेच वाटते.
फारएण्ड,वैद्यबुवा>> म्ह्णजे दोनच चॉईस मिरपुर किंवा अहमदाबाद.
जर मिरपुर असेल तर तेथे आपला रेकॉर्ड चांगला आहे. पहिली मॅच मधे तेथेच ३७० रन्स काढल्यात.
तेथे मागिल ७ मॅच मधे २५०+ रन्स आहेत भारताचे. न्युझी चा तेथे सगळ्यात जास्त २३२ रन्स काढ्ल्यात.

जर अहमदाबाद येथे असेल तर, मागील मॅच मधे(२००५) श्रीलंकेने तेथे भारताला हरवलेले आहे.
श्रीलंकेचा चांगला रेकॉड आहे या मैदानावर.

केदार QF नंतर डायरेक्ट फायनल ला पोचलास!!! >>> अगं, मी फक्त क्वाटर्स मध्येच आयदर न्युझिलंड वा ऑसी येतील (पाकने हारवले तर) असे लिहित आहे.
अजुन सेमी अन नंतर फायनल. तेवढा लांबचा चष्मा नाही. Happy

विंडीज आपल्या विरूध्द चंदरपॉलला खेळवतील का? >> नक्कीच कारण त्यांची ती महत्वाची मॅच आहे. आणि सरवान, चंदरपॉल हे भारता विरुध्द हमखास चालणारे आहेत्(गेलला पण अ‍ॅडा)

खरंय टिल्लु, लंकेसोबत नकोच ईतक्यात, दिलशान पेटलाय आधीच Happy

ओह, समजलं समजलं Happy
ऑसीज आले तर विरू आणि सचिन दोघही पेटले पाहिजेत! विरू सुरवातीला आणि सचिन ३० ओव्हर्स नंतर!! धमाल येईल!!

गौतम, ह्म्म.... काल चंदरपॉलला न खेळवून विंडीजनी चूक केली असं वाटलं.

Pages