भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
बरोबर. भारताची श्रीलंका किंवा
बरोबर. भारताची श्रीलंका किंवा ऑसीजशी गाठ पडू नये असे वाटते. त्यामुळे आज ऑसीज व उद्या आपण जिंकले पाहिजे.
आज ऑसीज हारायच्या बेताता
आज ऑसीज हारायच्या बेताता दिसतायत (आता तरी) म्हणजे खरं तर ऑसी किंवा श्रीलंकाच येणार बहुतेक. मग काय भारत उद्या मुद्दाम हरुन श्रीलंकेपेक्षा ऑसीजशी लढणं पसंत करणार की काय? लगेच दिसुन येइलच खेळामधून.
ऑसीज सर्वबाद १७६.
ऑसीज सर्वबाद १७६. ऑस्ट्रेलियाने १९९२ च्या विश्वचषकात एका सामन्यात २०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी त्यांचा इतक्या कमी धावसंख्येत ऑलआऊट झाला. पाकड्यांना जिंकायची उत्तम संधी आहे. ऑसीजना पाकड्यांनीच १९९९ मध्ये हरविले होते. त्यानंतर ते कधीही हरलेले नाहीत. आज ऑसीज हरले तर हा त्यांचा विश्वचषकातला सलग ३४ अपराजित सामन्यानंतरचा पहिलाच पराभव असेल.अर्थात ऑसीजची लढाऊ वृत्ती लक्षात घेता ते सहजासहजी हारणार नाहीत.
आज ऑसीज हरले तर उद्या आपण विंडीजबरोबर जिंकलेच पाहिजे. म्हणजे उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेऐवजी ऑसीजशी गाठ पडेल. पाकड्यांनी हरविल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले असेल. तसेच दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने श्रीलंकेपेक्षा ऑसीज परवडले.
एकंदरीत उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाज अतिशय उपयुक्त सिध्द झालेले दिसत आहेत.
पाकड्यांनी चांगली बॉलिंग
पाकड्यांनी चांगली बॉलिंग केलेली दिसतिये.. स्कोर तसा कमी झालाय ऑस्ट्रेलियाचा.
हा 'मुद्दाम हरणे' प्रकार मला कधी कळलेलाच नाहीये. फक्त भारतीय (किंवा भारतीय उपखंडातील) लोक असा विचार करत असावेत. आज मुद्दाम हरूनसुद्धा पुढे कधीच श्रीलंकेशी खेळावे लागणार नाही ह्याची ग्यॅरंटी नाही. मग काय उपयोग? मुद्दाम हरलं तरीसुद्धा आत्मविश्वास नक्कीच कमी होतो. मग कमी आत्मविश्वासासकट ऑस्ट्रेलियाशी खेळण्यापेक्षा, आहे ती मॅच जिंकून आत्मविश्वासाने श्रीलंकेशी खेळायला काय हरकत आहे? एवढी चांगली टीम असून असला पळपुटेपणाचा विचार करत असतील तर हरलेलेच बरे. May the best team win.
Come on, let us think like
Come on, let us think like champions for becoming one! Now we will take on any team, anywhere and win! Let others bother when and where to fight us !! All the Best, India.
आय होप दे डु फचिन आणि भाऊ.
आय होप दे डु फचिन आणि भाऊ.
आज बांगला ही असच काहीसं करेल असं वाटलं होतं.
भाऊ
भाऊ
अरे तेच ते परत का लिहित आहात.
अरे तेच ते परत का लिहित आहात.
आली तर येऊदेत ऑस्ट्रेलिया! पाहून घेऊ ह्यावेळेस. लै झालं.
रिव्ह्यू चा नक्की फंडा काय
रिव्ह्यू चा नक्की फंडा काय आहे? रिव्ह्यू पाहून मैदानावरचाच अंपायर पुन्हा निर्णय घेतो का? रिव्ह्यू म्हणजेच थर्ड अंपायर असं नाहीये का?
आज पाकडे जिंकणार! माझा अंदाज
आज पाकडे जिंकणार!
माझा अंदाज बरोबर आला !
अंपायरनी डिसीजन दिला (उदा:
अंपायरनी डिसीजन दिला (उदा: कॅच, एल बी किंवा रन आऊट..) आणि जर कोणत्याही संघाला तो बरोबर नाहीये असं वाटलं तर ते हाताचा टी दाखवून रिव्ह्यु घेतात. रिव्ह्यु मध्ये जर वर बसलेल्या अंपायर मग विडियो रिप्ले (हॉकाय ना?) पाहून परत दुसरा डिसीजन देतो. एल बी मध्ये मात्र गंमत होते. ते २.५ मिटर, आऊटसाईड द लाईन पिचींग आणि स्टंपला ओझरता लागला असत की प्लंब लागला असता ह्यावरुन डिसीजन दिला जातो.
प्रत्येक संघाला एका इनिंग मध्ये दोन चान्स असतात.
हा 'मुद्दाम हरणे' प्रकार मला
हा 'मुद्दाम हरणे' प्रकार मला कधी कळलेलाच नाहीये. फक्त भारतीय (किंवा भारतीय उपखंडातील) लोक असा विचार करत असावेत. आज मुद्दाम हरूनसुद्धा पुढे कधीच श्रीलंकेशी खेळावे लागणार नाही ह्याची ग्यॅरंटी नाही >>>>
मुद्दाम हरणे हे पैशासाठी असते - म्हणजे दाउदला (आणी स्वता:ला) पैसे मिळवुन देण्यासाठी!
कोणाशी खेळावे लागेल किंवा नाहि यासाठी नसते! 
<< एल बी मध्ये मात्र गंमत
<< एल बी मध्ये मात्र गंमत होते. ते २.५ मिटर, आऊटसाईड द लाईन पिचींग आणि स्टंपला ओझरता लागला असत की प्लंब लागला असता ह्यावरुन डिसीजन दिला जातो.>> हो, व तो चेंडू "नो-बॉल" नव्हता ना हेही पाहिलं जातं.
स्टंपला ओझरता लागला असत की
स्टंपला ओझरता लागला असत की प्लंब लागला असता ह्यावरुन डिसीजन दिला जातो
>>
अच्छा. पण ऑस्ट्रेलियाने दोन एलबीचे अपील केले, त्यात पहिल्या आणि दुसर्या अपीलमध्ये बॉल साधारण त्याच प्रकारे लेग स्टंपवर लागेल असे ते हॉक आय दाखवत होते. पण पहिला नॉट आऊट्चा निर्णय कायम ठेवला आणि दुसरा आऊटचा निर्णय कायम ठेवला.
पण पहिला नॉट आऊट्चा निर्णय
पण पहिला नॉट आऊट्चा निर्णय कायम ठेवला आणि दुसरा आऊटचा निर्णय कायम ठेवला. >>
पंच फिक्स असतील मग!
फिफामधे देखील फिक्स असतात . फिफाने स्वताच कबुल केले आहे . हाय काय नाय काय! 
ते २.५ मिटर चा तर फुल घोळ
ते २.५ मिटर चा तर फुल घोळ घातलाय! पंच फिक्स नसतील तर असे हिउ शकते का ?
योग तुझ्यासाठी खास तुझ्या
योग तुझ्यासाठी खास तुझ्या लाडक्या धोनीकडून
http://cricket.yahoo.com/cricket/news/article?id=item/2.0/-/story/cricke...
ब्रेट ली ऑन हॅट्रीक!!!!!!
ब्रेट ली ऑन हॅट्रीक!!!!!!
दोघं खेळणारे बॅट्समन आणि
दोघं खेळणारे बॅट्समन आणि अफ्रिदी, अबदुर रज्जाक राहिलेत त्यामुळे जिंकु शकतं पाकिस्तान.
फचिन, न दिलेल्या कॉल मध्ये बॉल इन लाईन पिच्ड होता पण लेग स्टंप ला अगदी ओझरता लागणार होता आणि मुख्य म्हणजे फिल्ड वरच्या अंपायर नी डिसीजन "आऊट नाही" असा दिला होता (ऑसीज नी ऑपशन एक्सरसाईज केला). अगदी ओझरता लागणार असल्यामुळे फिल्ड वरच्या अंपायरचा डिसीजन "स्टँड" झाला.
आऊट दिला तेव्हा, फिल्ड अंपायर आऊट म्हणत होता आणि पाकिस्ताननी ऑप्शन एकसर्साईज केला. बॉल पिच्ड इन लाईन होता आणि प्लंब लेग स्टंपला लागणार होता म्हणून थर्ड नी पण आऊट दिला. इथे जर फिल्ड अंपायर नी आउट नाही असं सांगितलं असतं तर तो डिसीजन रद्द झाला असता. फक्त गंमत अशी आहे (असामी, भाऊ, निलीमा, किंवा फारेंड किंवा कोणीही सांगा माहित असल्यास) जर इथे स्टंपला ओझरता लागला असता तर मग तरी बेनेफिट अंपायर ला देत आऊट चा डिसीजन स्टँड झाला असता का? माझ्यामते तरी आऊट दिला असता. ओझरता का होईना पण लागला असता म्हणुनच अंपायरच्या डिसीजनला मान देत, आऊट दिला असता थर्ड नी.
<हा 'मुद्दाम हरणे' प्रकार मला
<हा 'मुद्दाम हरणे' प्रकार मला कधी कळलेलाच नाहीये. फक्त भारतीय (किंवा भारतीय उपखंडातील) लोक असा विचार करत असावेत.>
ऑस्ट्रेलिया ने असे विचार १९९९ नंतर कधी केले नसावेत. आणि ते जर कधीच हरले नाहीत तर २००३, २००७ हे दोन्ही विश्वचषक त्यांनीच जिंकले का? त्यांचे ते धोरण त्यांना, त्या वेळी उपयोगी पडले.
तेंव्हा काय परिस्थिती होती, आजची काय याचा विचार केलाच पाहिजे. आज आपला संघ एकदा हरला आहे नि एकदा जिंकू शकला नाही. खात्री आहे का की यापुढे कुणाशीहि खेळून जिंकूच?
नसेल तर हुषारीने डावपेच केलेच पाहिजेत.
बाकी 'फक्त भारतीय' हे पटत नाही. एव्हढे काही भारतीय लोक जगावेगळे नाहीत. इतर देशांनीहि असे विचार केले असण्याची शक्यता आहे, की आपल्याला माहित नाही म्हणजे ते नाहीच?!!
जर इथे स्टंपला ओझरता लागला
जर इथे स्टंपला ओझरता लागला असता तर मग तरी बेनेफिट अंपायर ला देत आऊट चा डिसीजन स्टँड झाला असता का?>>हो, कारण फिल्ड वरच्या अंपायरने आउट दिले आहे आणि त्यांचा view point vs probability of DRS ह्यात आधीच्या गोष्टीला वेटेज दिलय. नियम काय आहे नक्की माहित नाहि.
इतर देशांनीहि असे विचार केले
इतर देशांनीहि असे विचार केले असण्याची शक्यता आहे, >>नीटसे आठवत नाहि पण steve waugh वर पण स्लो खेळून असे adjust करायचा प्रयत्न केला असा आरोप झाला होता एव्हढे आठवतेय.
अफ्रिदी त्याला माहित होतं
अफ्रिदी
त्याला माहित होतं तिकडे लाँग ऑन ला फिल्डर उभा आहे! इतके कमी रन बाकी असताना काय गरज होती!!!
त्याला माहित होतं तिकडे लाँग
त्याला माहित होतं तिकडे लाँग ऑन ला फिल्डर उभा आहे! इतके कमी रन बाकी असताना काय गरज होती!!! >>
आता प्रत्येक वेळी तेच काय सांगायचे!
जरा समजुन घ्या! मैच interesting कशी होणार ? 
चला आता उद्या जिंकलो तर
चला आता उद्या जिंकलो तर ऑसींशी सामना नाहीतर श्रीलंका...
धमाल येईल दोन्ही पैकी कुठल्याही मॅचमध्ये...
दोन्ही संघांविरुद्ध आपण जिंकू असे अजिबात वाटत नाहीये...
मास्तर, पाकडे जिंकले. अपना
मास्तर, पाकडे जिंकले. अपना अंदाजा सही!
पण खरेतर रिव्ह्यू करताना
पण खरेतर रिव्ह्यू करताना कोणत्या संघाने अपील केले आहे आणि मैदानावरच्या अंपायरने काय निर्णय दिलाय यांचा विचार करण्याची गरजच काय आहे? एकंदरित गोंधळच दिसतोय.
टेनिसमध्येही वापरतात ही रिव्ह्यूची पद्धत. पण तिथेतर त्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. म्हणजे बॉल लाईनच्या अगदी एक मिलिमीटरने आत बाहेर असेल तरी इन्/आऊट चे निर्णय बदलतात.
नसेल तर हुषारीने डावपेच केलेच पाहिजेत.
>> झक्की, अहो खेळताना, टीम निवडताना हुशारीने डावपेच वगैरे ठीक वाटते. मुद्दाम हरणे हा काही डावपेच वाटत नाही. उद्या एखादी टीम जिंकावी म्हणून मॅच फिक्सिंग केले तर त्यालाही डावपेच म्हणाल!
हे सगळं इतकं नाटकी (सेट अप)
हे सगळं इतकं नाटकी (सेट अप) वाटतय की उद्या उगाचच आता आपण जिंकणार असं वाटतय! असो.... बघायला मजा येणार. डावपेचांचा भाग म्हणुन ऑसीजशी खेळायचं असेल तर उद्या जिंकावेच लागेल. आता बघु धोनी काय टीम उतरवतोय मैदानात. बातम्यात सांगतायत की रैना आणि अश्वीन आत येणार.
MS Dhoni (c/wk)Virender Sehwag (vc)Ravichandran Ashwin Piyush ChawlaGautam Gambhir Harbhajan SinghZaheer KhanVirat KohliAshish NehraMunaf PatelYusuf PathanSuresh RainaSreesanthSachin TendulkarYuvraj Singh
रैना आला तर मग बाहेर कोण? गंभीर की कोहली की पठाण? आपल्या सगळ्यांच्या लिखाणात आपण गंभीर बाहेर असच मी वाचलय. अश्वीन आला तर नेहरा बाहेर? तीन स्पीनर्स खेळवले तर खरं काही वाईट नाही पण जरा गेल, सॅमी, स्मिथ, पोलार्ड वगैरेंनी मरता मरता धोपटाधोपटी केली तर आपल्या बॅटिंगचे काय? अश्वीन, चावला, झहिर आणि मुनाफ अगदीच कच्चे आहेत बॅटिंग ला.
गोंधळ नाही वाटत मला. सगळेच निर्णय जर हॉकाय द्यायला लागला तर वेळ भरपुर लागेल. तोही एक मुद्दा आहे. आता अंपायरला विचारायचच नाही म्हंटल्यावर मग दोनच चान्स का? त्यापेक्षा जास्त वेळा टीम्स ऑपशन कॉल करतील. मग तर खुपच वेळ जाईल. टेनिस सारखे फक्त लाईन बेस्ड आऊट असे क्रिकेटचे ऑन फिल्ड स्ट्रकचर नाहीये. कॅच आहेत, एल बी आहेत, रन आऊट आहेत. फिल्ड वर अंपायर आहे म्हंटल्यावर जास्तीत जास्त २ वेळा म्हणजे टोटल इनींग मध्ये चार वेळा हॉकायचा वापर करता येइल. त्या नंतर अंपायर बोले सू कायदा. हॉकाय एकूण ८ वेळा वापरणे हे देखिल खुप मोठी सुविधा आहे.
(No subject)
उद्या आपण हरलो आणी रनरेट
उद्या आपण हरलो आणी रनरेट घसरला - तर आपण ४थ्या नंबर वर - म्हणजे भारत - पाक !
Pages