चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३ब मीही पाहिला पण सुरवातीपासुन पाहिला नव्हता. तरीही ब-यापैकी पकड घेतो पिक्चर. माधवनचे काम खुपच आवडले (जरा ओवर्वेट वाटतो).. ती जुन्या टिवीवरची बातमीदार खुप आवडली त्यातली. मला तरी अ.अ. नाही वाटला...

वेक अप सिद बघितला, दोनदा बघितला Happy मस्तय एकदम. रणबिर कोंकणाचे काम मस्तच. सुप्रिया पाठक अफलातुन. राहुल खन्ना किलिंग Happy सिदच्या जाड्या मैत्रिणीचे पण काम आवडले. अनुपम खेरला असा रोल झोपेत सुद्धा सहज करता येइल. एकंदर सीडी विकत घेऊन ठेवणार. डाउन टाइमला असा हलका फुलका चित्रपट उपयोगी पडतो.

मी पण वेक अप सिद पाहिला... बरा आहे. खरंतर सुप्रिया, अनुपम, कोंकणा आणि रणबिर यांनी तो अभिनयाच्या जोरावर चालवलाय. कथेत बर्‍याच चूका पण आहेत.

काल Y.M.I. ये मेरा इंडिया पाहिला... चित्रपटाला एक सलग अशी कथा नाही. पण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, बर्‍यापैकी फसलाय तो.. कारण चित्रपट तुकड्यात घडतो आणि त्यात एकसंधता मला तरी जाणवली नाही.... असे तुकडे चित्रपट बरेच होते, इतकं डिसकनेक्शन नाही जाणवलं कधी. एकूण ठिकठाक सिनेमा...

'द कलर पर्पल' दोन दिवसां पुर्वी बघितला. उदास उदास करुन टाकलं या सिनेमानी. वुपी आणि ओपरा च्या व्यक्तीरेखा, गेटअप अप्रतिम. कथेबद्दल नंतर लिहीन.

<<<<<<फक्त ती नवी हिरवीण अभिनयात खुपच कच्ची.... लाडिक लाडिक बोलणं तर चीड आणतं >>>>>>>>>>>
रॉकेटसिंगमधली लाडिक लाडिक बोलणारी हिरॉईन म्हणजे शाहझान पदमसी , अलेक पदमसी आणि शॅरोन प्रभाकरची मुलगी . हा तिचा डेब्यू रोल होता . Happy

मला उद्यापासून रीलिज होणारा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा सिनेमा बघायची उत्सुकता लागली आहे. विषय छानच आहे. हे काय चाललंय. गेल्या काही दिवसांत सुंदर सुंदर चित्रपट पाहायला मिळताहेत. आधी अवतार, मग थ्री इडियट्स आणि आता हरिश्चंद्राची फॅक्टरी. तरी तो नटरंग राहिलाच आहे अजून.

श्रुती, द कलर पर्पल खूप जूना आहे. कुठे मिळाल्यास, सेराफिना, नावाचा साऊथ आफ्रिकन सिनेमा अवश्य बघा.

इश्किया जबरी!! नासिरभाई को फिरसे सलाम. अरे काय काम करतो हा माणूस. त्याचे संवाद, ती बोलण्याची स्टाईल नुसती ऐ क त रहावी आणि एक्स्प्रेशन्स पहात रहावे. विद्या इतकी सेन्शुअस दिसते पण तरी नासिर आणि ती एकत्र स्क्रीनवर असले की लक्ष नासिरकडेच रहाते Happy अर्शदनेही मस्त साथ दिलेय. विद्या बालन आणि नासिरचं रिलेशन जास्त एक्स्प्लोर करायला हवं होतं असं वाटतं अजून पण.
स्क्रिप्ट एकदम कॉम्पॅक्ट. जराही लूजएन्ड नाही कुठे. अर्थात त्याबाबत विशाल भारद्वाज आणि अभिषेक चौबे दोघे एकत्र असल्यावर काही बोलायलाच नको. सिनेमॅटोग्राफी ही देखणी. एका सीनमधे उतरत्या संध्याकाळी जेव्हा नासिर उदास होऊन नदीच्या दगडी पायर्‍यांच्या काठावर बसला आहे आणि त्याच्या भोवती वडाच्या पारंब्यांचं जाळं पसरलय तो काय देखणा शॉट आहे! गुलझारचं दिल तो बच्चा है आणि नासिर इतकेही खरं तर थिएटरपर्यन्त खेचून घेऊन जायला पुरेसं आहे बाकी सब अ‍ॅडेड बोनस.

मी आज 'हरिश्चन्द्राची फॅक्टरी' पाहिला. चांगला वाटला. उत्कृष्ट नाही, पण आवडण्यासारखा आहे.

हा इश्कियां आला रे आला की बघायलाच ह्वा. नवीन आहे ना? म्हणजे डीव्हीडी आली नसेल ना?

शर्मिला,
जरा सविस्तर लिही बघू. हे काय आपले एका वाक्यात उडवून टाकले. हा एका वाक्यात उत्तरे द्या, असा प्रश्न नसून संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, असा प्रश्न आहे. तुला मार्क नको आहेत का? Proud

तुम्हाला हे झेंडा, नटरंग, हरीशचंद्राची फॅकटरी वगैरे सारखे मराठी चित्रपट इथे अमेरीकेत कुठे बघायला मिळतात?

इश्किया नवीन आहे का? पहायला हवा.

मी थेटरात कुठे बघायला मिळेल का असे विचारत होते. कारण कधी कधी काही मराठी चित्रपट रेलीज होतात इथे. ... मला वरचे वाचून वाटले की काहि लोकांनी थेतरात जावून पाहिले.
असो. माहितीबद्द्ल धन्यवाद.

मायबोलीवर खरेदी मधे हे चित्रपट नाहीत का उपलब्ध डिवीडी मध्ये थोड्या काळाने.

मी इश्किया चा ट्रेलर बघितला. नासिर किती तरुण दिसतो आहे त्यात !! ट्रेलर मात्र कथेबाबत गोंधळात टाकणारे आहेत.
कुणी बघितला, तर त्यात संकलनात मदतनीस म्हणुन आलाप माजगावकर चे नाव आहे ते सांगाल का ? (तो माझा चुलत मावस भाऊ.)

झेंडा पहिला चितपटाच कलात्मक मुल्य कधि पावली कधि अधेली असे हिंदाळत रहाते. पण चित्रपट आशय पोचवण्यात पाचा उत्तरी सफल होतो.

गानी : सावधान आणी विठठला आवडली

एकदा पहाण्याजोगा

मला ते एकदम 'थोतरात' असे दिसले

मलाही Proud मी मग परत एकदा वाचले...

इश्किया पाहते पुढच्या आठवड्यात.... मलाही खुप उत्सुकता आहे. आणि नासिरला अ वेनस्डे नंतर बघितलेच नाहीये...

आपली मराठी वर झेंडा ची सेंसोर प्रिंट आहे,. म्हणजी मालवणकरचे पानवलकर झाले नसतानाची प्रिंट आहे. एकदा पाहण्यासारखा आहे. सगळ्यांना माहित असलेले राजकारण चांगले मांडले आहे.

'झेंडा' मागल्या आठवड्यात पाहिला. ती राजकीय कात्री लागलीय ते बरेच झाले. कार्यकर्त्यांचा सिनेमा आहे हा. त्यात ते उद्धव आणि राजसदृष पात्रे उगीचच आहेत. उद्धव आणि राज सारखे दिसण्या-बोलण्या-वागण्यातच त्यांचा सारा वेळ जातो. (पुष्कर श्रोत्री आणि राजेश शृंगारपूरे). एवढे करून ते फारसे जमलेले नाहीत, ते वेगळेच. (लोक मात्र नेमके तेच पाहायला आले आहेत, हे लगेच लक्षात येते. राजच्या काही संवादांना नेहेमीप्रमाणेच शिट्या अन टाळ्या पडतात.)

कार्यकत्यांची घुसमट संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर यांनी समर्थपणे दाखवली आहे. सचित पाटीलचा कॉर्पोरेट वर्ल्डचा हस्तक मात्र पटत नाही. (हे मिलिंद नार्वेकर (उद्धव चा पीए) सदृष पात्र आहे बहुतेक, पण चित्रपटात राजला मॅनेज करताना दिसतं. यावरून मनसेने गोंधळ घातला होता वाटतं.)

दांडगाई कुणासाठी करायची, जीव कुणावर ओवाळून टाकायचा या चक्रव्युहात फसलेले कार्यकर्ते काठ्यालाठ्या बाजूला ठेवतात. आणि शेवटी परत उचलतात, ते एखाद्या नेत्यासाठी नाही, तर आपल्यातल्याच कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी- हा शेवटही आवडला.

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती.. हे गाणं आधीच सुपरहिट झालंय. सिनेमात त्याचा मस्त वापरही करून घेतला आहे.

अ‍ॅशबर्न ह्या वॉशिंग्टन डी. सी. च्या ऊपनगराजवळ स्टर्लींग नावाचे दुसरे ऊपनगर आहे. तिथल्या मल्टी प्लेक्स थेटरात गेले महिनाभर 'थ्री ईडीयट्स' हाऊस फुल्ल नाही तरी गेला बाजार विकेंड गर्दीचा सुरू आहे.

हा चित्रपट नितांत सुंदर असून दोनदा पहाण्या जोगा आहे.

ज्यांनी तो पाहिला आहे त्यांच्या साठी ही काही व्यक्तीगत निरीक्षणे.
शिक्षण क्षेत्रातली जाचकता, नियमांची चौकट, परिक्षार्थीपणा ह्याचा आमिर खानला आणी त्याच्या मित्रांना राग आहे. शिक्षणाच्या बाबतीत त्याला 'शांती निकेतन' स्टाईल लिबरल आर्ट पद्धतीचं शिक्षण आवडतं. शिक्षक त्यांच्या विषयात एकदम डॉन असावेत, त्यांना सिलॅअबस ठरवायची पूर्ण मुभा असावी, त्यांनी एकदम सुमडीमध्ये असा पेपर काढावा आणी सांगाव की पोरांनो जा काय पण करा, वेळेच लिमीट नाही पण हे दोनच प्रष्ण सोडवून आणा. मग पोरांनी आउट ऑफ बॉक्स थिंकींग करून पेपर सोडवावा. अशा त्याच्या शिक्षणा विषयीच्या रोमँटीक कल्पना आहेत.

काल बद्ध असाइनमेंट्ची त्याची चिड किमान तीन प्रसांगातून दिसून येते. उदा. पोराच्या घरी इमर्जन्सी असते म्हणून त्याला सबमिशनला लेट होतो तर प्राध्यापक म्हणतो की For you I have sympathy, not extension. दुसर्‍या प्रसंगात ह्या तीन पोरांना परीक्षेत पेपर लिहून सुपरवायझरला द्यायला ऊशीर होतो. सुपरवायझर म्हणतो तुमची ऊत्तरपत्रीका घेणार नाही. मग आमीर विचारतो की तुम्हाला आमचा रोल कॉल नंबर माहिती आहे का म्हणून. सुपरवायझर म्हणतो नाही म्हणून. मग पोरं टेबलावरच्या ऊत्तर पत्रीका आणी त्यांच्या ऊत्तर पत्रीका भरा भरा मीक्स करतात. आणी तो सुपरवायझर 'अरे अरे' म्हणे पर्यंत वर्गाबाहेर धूम ठोकतात.

आता आपण सगळे यातून गेलोय. ईंजीनियरींगला सबमिशनच्या अगोदरच्या रात्री जीट्या मारल्यात. रात्रीचे अकरा वाजालेत. होस्टेलला कोपर्‍यातल्या विंगेतला पांडे कधीच झोपी गेलाय - सबमिशन पूर्ण करून. त्याची ओरिजन सध्या भाटिया जीटी मारतोय. त्यानंतर खांडेकर. त्यानंतर अस्मादिक. म्हणजे रात्रीचे तीनच. बोंबला. वर्गात विषय जेंव्हा शिकवला होता तेंव्हा मस्त समजला होता. पांडेसारखं वेळेत बसलो असतो तर ही वेळ आली नसती. आता पुढच्या वेळी..

एकूणात काय तर वेळेवर काम करणे हा एक संस्कार आहे. तुमच्या पंधरा, सोळा, अठरा वर्षाच्या शिक्षणात हा संस्कार शिकून घ्यावा. पुढे कामी येतो. रँचो सारखे वेळेचे नियम फाट्यावर मारून यशस्वी होणारे तुरळक असतात. बाकीच्यांनी शहाण्यासारखं वागावं. लक्षात घ्यावं की हे जग टाईम कमिट्मेंटवर टाईम बाऊंड चालतं. होस्टेलला कोपर्‍यात रहाणारा पांडे यशस्वी झालाय, पिक्चर मधला चतुर पण मिलिनियर आहेच की.

चला. मध्यरात्र झालीये. टाईम बाऊंड झोपाव. शहाण्यासारखं

दुसरे निरीक्षण पुन्हा कधीतरी. कदाचीत ऊद्या...

झक्कास.

इश्किया पाहिला.. मस्त मुव्ही ! विद्या बालन, नसरुद्दिन आणि अर्शद वारसी तिघांनीही मस्त काम केलय..
ग्रामिण बाज एकदम सही संभाळलाय.. कथेचं बेअरींग कुठेही सुटत नाही.. नक्की बघाच..

काल इश्किया बघितला. ट्रेलर्स बघून खूप अपेक्षा होत्या, पण ठीकच वाटला. नासिर, विद्या आणि अर्शदचं काम मात्र मस्तच.

Pages