चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

avatar - IMAX 3D ह्यानंतर बाकी काही बघण्यासारखे उरते असे मला वाटत नाही Happy

बघायचाय, बघायचाय अवतार, पण मेला तो 'वेळ' का काय म्हणतात तोच मिळत नाहिये Happy ...
नानबा, उदय चोप्रा ने काही नाही केले तरी पण रागच येतो गं ... यश चोप्रांच्या पुत्रप्रेमाने गहीवरुन आले. किती पराकाष्ठेचे प्रयत्न, मुलाला नायक बनवण्याचे. आणि तुषारकपुरने 'गोलमाल' मधे थोडे तरी हसवले त्यामुळे तो हल्ली एक पायरी वर आहे उदयबाबु पेक्षा. Happy

काल आमच्यात वाद सुरु होता..

क्रिशन कुमार (गुलशनचा भाउ) आणि उदय चोप्रा यांच्यात कोण बेटर आहे? Wink

क्रिशन कुमार बरा...
अ‍ॅक्टिंग आपला प्रांत नाही हे वेळीच ओळखलं त्यानी...
लोकांचा फार जास्ती वेळा छळ केला नाही...

किशन कुमारच श्रेष्ठ, बापाचे पैसे फार वाया घालवले नाहीत आणी तो गेल्यावर त्यांची कंपनीही चांगली चालवतोय.

उदय चोप्राला मोहब्बते मधे रेल्वेतून जाताना पॅसेंजर कोच मधे न बसवता मालाच्या वॅगन मधे बसवणे याचा अर्थ मला आत्ता कळाला Happy

The Band's Visit नावाचा इस्रायली सिनेमा पाह्यला. अरेबिक, इंग्रजी आणि इस्रायल मधे बोलतात ती भाषा (हिब्रूच का?) अश्या तीन भाषांमधे सिनेमा आहे.
इजिप्तमधून एक बॅण्ड इस्रायलमधे येतो कार्यक्रम करण्यासाठी त्याची गोष्ट आहे.
सुरूवातीलाच 'अमुक वर्षांपूर्वी इजिप्तहून एक बॅण्ड परफॉर्म करण्यासाठी आला होता त्याची ही गोष्ट आहे. हे फार कुणाला आठवत असेल असं नाही. आणि ते तेवढं महत्वाचंही नाही.' असं नॅरेशन आहे. तिथूनच फिल्मच्या साधेपणाला सुरूवात होते.
खूप मस्त फिल्म. छोटीशी आणि साधी सोपी गोष्ट, सगळ्या व्यक्तिरेखा आपापले कंगोरे, खोल्या घेऊन आलेल्या, कुठलीही व्यक्तिरेखा आणि प्रसंग २D, सपाट वाटत नाही. साधेपणाने, सहज अभिनय म्हणजे काय याचा वस्तुपाठ म्हणून होतकरू नटांनी अभ्यासायला हरकत नाही.
मिळाला तर जरूर बघा.

आयबीएन लाईव्ह वर राजीव मसंद च्या रिव्ह्यू नुसार बकवास आहे....>>>
अँकी तुझ्या रिव्ह्यूऐवजी 'मसंद की पसंद'? छे,छे, अरेरे,काय हे,इ.इ... Wink

पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये 'एक कप च्या' आणि 'विहिर' हे दोन सिनेमे पाहिले. दोन्ही आवडले. विहिरबद्द्ल सविस्तर लिहिन आता.

धन्यवाद Happy उद्या आमच्या कन्येचे मन वळवुन तिला ३ इडियट दाखवते चान्स च्या जागी.....

आजच शिक्स्नाच्या आइचा--- बघितला.चान्गला आहे. खुपसा शिवाजि राजे भोसले सारखाच आहे

अँकी तुझ्या रिव्ह्यूऐवजी 'मसंद की पसंद'? छे,छे, अरेरे,काय हे,इ.इ...
>>
मी प्यार इम्पॉसिबल नंतर अजून एक धक्का पचवायची हिम्मत गोळा करतोय... त्यामुळे पाहिला नाही अजून (ऑनलाईन अ‍ॅव्हेलेबल असूनही...)

चान्स पे डान्स

शाहिद कपूरला नाचताना दाखवायचं या एकाच प्रेरणेनी काढलेला सिनेमा...
आख्या सिनेमात फक्त याच मुद्द्यावर फोकस राहिलाय...
कथा कधी रंगीला तर कधी लक बाय चान्स च्या वळणानी जाते, पण फोकस तो नसल्यानी नीट डेव्हलपच केली नाहीये... तसंच अदनान सामी नी दिलेलं संगीतही फारच सुमार आहे... एकूणच सिनेमा जेनेलियाच्या स्कूटी सारखा कधीच वेग पकडत नाही... क्लायमॅक्स मधे स्कूटी स्पीड घेते, पण सिनेमा संथ तो संथच... सिनेमातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेशी रिलेट होता येत नाही इतकं दिग्दर्शन गंडलंय...
शाहीद चा नाचंच पहायचा असेल तर त्याच्या जुन्या गाण्यांचे व्हिडिओ पहा... इथे त्या बाबतीतही नवीन किंवा वेगळं काहीच पहायला मिळत नाही...
एका सीन मधे शाहिद काचेच्या फळ्यावर नखांनी आवाज काढतो... सिनेमा संपल्यावर बहुतेक प्रेक्षकांची अवस्था अशीच होईल...
बाकी अभिनयाच्या बाबतीत जेनेलिया आणि शाहिद पाट्या टाकण्याचं काम चोख करतात...

माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा
थेटर ला जाऊन चान्स घेण्यापेक्षा घरी एम टीव्ही बघत डान्स करा... जास्ती एन्जॉय कराल...

काल 'रॉकेट सिंग' पाहिला .... आवडला. वेगळा विषय .... आजच्या जगाशी निगडीत.
रणबीर सुरूवातीला 'अजब प्रेम....' सारखाच अभिनय करताना वाटला... पण नंतरचा सिरिअस रोल छानच निभावलाय. सुनिल पुरी, नितिन, कोएना, मिश्रा आणि तो आयटि प्रोफेशनल या व्यक्तिरेखा मनात घर करतात. मध्ये मध्ये बर्याचदा मनात 'हे असे शक्य आहे का?' हा प्रश्न येऊ शकतो, तरीही आपण स्वतःहून त्याला बाजूला सारून उत्सुकतेने पुर्ढचा चित्रपट पाहतो. Happy

फक्त ती नवी हिरवीण अभिनयात खुपच कच्ची.... लाडिक लाडिक बोलणं तर चीड आणतं.

सुनिल पुरी, नितिन, कोएना, मिश्रा आणि तो आयटि प्रोफेशनल या व्यक्तिरेखा मनात घर करतात
<<< अमिता,
रॉकेट सिंग मधली ती रिसेप्शनिस्ट कोयना मित्रा नसून 'गौहर खान' आहे :).

रात गई बात गई

एका रात्री पार्टीत भेटतात ३ कपल्स, १ तरुणी आणि १ जुना मित्र...
आणि दुसर्‍या दिवशी दोन कपल्स ऑलमोस्ट घटस्फोटाच्या पातळीवर येतात...
काय घडलं पार्टी मधे आणि त्याचा कुणाच्या आयुष्यावर कासा परिणाम झाला ते सिनेमात सौरभ शुक्ला दाखवतो...
हलका फुलका थोडासा अ‍ॅडल्ट विनोदाच्या अंगानी जाणारा, थोडासा सस्पेन्स निर्माण करणारा हा सिनेमा कलाकारांनी पण बघणेबल बनवलाय... रजत कपूर, विनय पाठक, दिलिप ताहिल आणि नेहा धुपिया ची कामं चांगली झाली आहेत...
खूप महान अथवा मनोरंजनाचा धमाका करणारा वगैरे सिनेमा नाही... पण फारशा अपेक्षा न ठेवता घरी एकटे असताना केबल वर किंवा प्लेन / व्होल्वो मधे वगैरे एन्जॉय करता येईल...

माझ्याकडून ५ पैकी २ तारे...

'आम्ही असू लाडके', हा चित्रपट पाहिला.. पिक्चर आवडला. हा तसा जुना पिक्चर आहे,, थोडाफार 'तारे जमीन पर ' स्टाईल आहे..हा त्याच्याही आधीचा असावा बहूतेक... कोल्हापुरातल्या चेतना विकास मंदीर चे शूटिंग आहे.
सुबोध भावे आणि त्यातल्या मतीमंद मुलांचे काम मस्त झालेय.

Up In The Air बघीतला. जॉर्ज क्लुनीचे काम नेहमीप्रमाणेच जबरदस्त. त्याच्या चाहत्यांनी नक्की बघावा असा.

>>रॉकेट सिंग मधली ती रिसेप्शनिस्ट कोयना मित्रा नसून 'गौहर खान' आह>><<

दिपांजली, तिचे चित्रपटातील नाव कोएना आहे. वर उल्लेख केलेली सुनिल पुरी, नितिन, कोएना आणि मिश्रा ही पात्रांचि नावे आहेत. Happy

मी आजच १३बी पाहिला सही आहे एकदम.. सिरियल बघणा-यांसाठी सही धक्का आहे .
माधवन चे काम छान झाले आहे. माझ्याकडून ५ पैकी ३ १/२ तारे

१३ बी मी पण पाहिलेला मागे.. त्या सिरीयलच गाण कानात वाजत अजुन पण Happy पहिला हाफ आवडला.. दुसरा हाफ म्हणजे भूत सिरीयल मधे जातात इ. जरा अ. आणि अ, आहे. पण ओव्हरऑल घाबरवणारा आहे.

Leap Year एक रोमँटीक कॉमेडी. अ‍ॅमी अ‍ॅड्म्स तिचा बॉयफ्रेंड (अ‍ॅडम) प्रपोज करेल ह्या आशेवर दिवस काढत असते , शेवटी कंटाळुन आयरीश प्रथेला अनुसरुन ती २९ फेब्रुवारीला तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज करायला डब्लिनला पोहचते , पण रस्त्यात तिला अनेक संकटाना सामोर जावं लागत त्यात तिला मॅथ्यु मदत करतो . ह्या सगळ्याप्रकारात ते दोघे नकळत प्रेमात पडतात . शेवटी अ‍ॅमी , अ‍ॅडम ला सोडुन मॅथ्युकडे येते . बरेचशे प्रसंग बॉलीवुड मुवीशी रिलेट करण्यासारखे आहेत .
खुप मस्त मुवी आहे , नक्की बघा.

क्विक गन मुरुगन, नावाच्या सिनेमाबद्दल कुणी लिहिले होते का ? मी कुठेतरी वाचले होते म्हणून भारतवारीत ओरिजीनल सीडी घेऊन आलो.

सिनेमा तामिळ मधून डब झालाय. पण एकंदर धमाल. मुरुगन, मँगो, राईस प्लेट, गनपावडर नावाची पात्रे. मॅकडोसा हे प्रकरण. सगळेच मस्त. डॉ राजेंद्रप्रसाद, रंभा, नासिर असे कलाकार आहेत. कुठेही बघायला मिळाला तर संधी सोडू नका.

स्पाय नेक्स डोअर पाहिला.. लहान मुलांचा आहे हे आधी माहित नव्हतं.. लहान मुलांचा म्हणून चांगला आहे..

ओये लक्की पाहिला.. नाही आवडला... Sad

नटरंग पाहिला - पण सलग पाहता नाही आला.. त्यामुळे माझी इन्व्होलमेंट तितकी झाली नाही मुव्हीत.
हिरोईनचे उच्चार गावाकडचे नाही वाटत ओव्हरऑल..
अतुलसारख्या ताकदीच्या कलाकाराला आणखीन चांगल्या प्रकारे वापरता आलं असतं असं वाटलं.. म्हणजे त्याची तगमग तेवढी नाही दाखवलेली असं वाटलं.. भावनांपेक्षा प्रसंग ओरिएन्टेड वाटली मुव्ही.. पण वेगळा प्रयत्न म्हणून आवडला.. पुन्हा पूर्ण - सलग बघण्याचा प्रयत्न करणारे!

Pages