चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल
मी तो उर्मिला मातोंडकरचा एक सिनेमा 3D आला होता ..जादूगार, चेटकीण असे काय काय होते त्यात तो पण बघीतलाय.

मी तो उर्मिला मातोंडकरचा एक सिनेमा 3D आला होता ..जादूगार, चेटकीण असे काय काय होते त्यात तो पण बघीतलाय.
>>
छोटा चेतन चं मॉडर्न व्हर्जन होतं ते...
अ‍ॅडेड सीन्स वालं...

नंतर छोटा जादूगर नावाचाही एक 3D सिनेमा आला होता...
ज्यात एस. पी. बालासुब्रम्हण्यम् नी काम केलं होतं...

Happy

एक प्रश्न IMAX 3D मध्ये बघितलेल्यांना... तुम्हाला पण तो ३D चा चष्मा लावावा लागला का?..आणि नसेल तर ते थिएटर डोम शेप आहे काय?
I think all IMAX theaters are not dome shaped as we have one in Vadala Mumbai. The experience of IMAX Dome was amazing for the earlier movies I saw. Happy

मंडळी, थोडं विषयांतर करतेय. क्षमस्व.
Tom and Jerry चा एक एपिसोड होता. त्यात एक रांगणारं मूल स्वतःच्याच नादात कुठेही म्हणजे अक्षरशः कुठेही रांगत जातं आणि tom and jerry प्रत्येक वेळी शर्थीनं त्याला वाचवतात. कुणाला ह्या एपिसोडचं टायटल/ नाव माहित आहे का? असल्यास प्लीज प्लीज सांगा.

आज ड्ब्ल्यु बी चॅनेलवर जॅक निकोल्सन व डाएन कीट्न यांची उत्तम कामे असलेला समथिन्ग्ज गॉट्टा गिव. नावाचा सुन्दर चित्रपट पाहिला. दोघे ही प्रौढ व एकटे. तिच्या तिशीतील मुलीचा हा मित्र असतो. त्याला हार्ट अटॅक आल्यावर तिच्या घरी काही दिवस राहावे लागते. तिला पहिले ते जड जाते पण काही दिवसांनी दोघांच्यात एक हळू वार नाते फुलते. पूर्ण कथा विकीपीडियावर आहे. महत्त्वाच्या गोष्टी म्हण्जे स्क्रिप्ट व
ट्रीट्मेन्ट अतिशय चान्गली आहे. तिची व्यक्तिरेखा एक कणखर पण आतुन हळवी अशी आहे. डाएन हिला
या रोल साठी गोल्डन ग्लोब अवार्ड व ऑस्कर नॉमिनेशन मिळाले आहे. अगदी आपल्या एखाद्या मैत्रीणीच्या
आयुष्यात घड्लेली घट्ना बघत आहोत असे वाट्ते. ज्याक बद्दल काय लिहीणार. नेहमीच उत्तम प्रतीचे काम
करणारा लीजंडरी चार्मर. दोघांच्यातील इंटर अ‍ॅक्षन अतिशय मार्मिकतेने रंगवली आहे. चित्रपट कुठे ही भड्क नाही. अगदी रंग पट देखील करडा, निळा, पांढरा. त्यांचे कपडे सूचकतेने निवड्लेले. ( नीधप ची आठ्वण येणे अपरिहार्य आहे ...) मागे सुन्दर इन्ग्रजी व फ्रेन्च गाणी आहेत. तुम्ही भारतात असाल किन्वा परदेशात स्नोस्टॉर्म मध्ये अड्कलेले असाल तर हा चित्रपट जरूर पाहा. आपल्या जोडीदाराबरोबर बघता आला तर सोनेच.

--------------------
ज्याक व हेलेना हंट चा अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स पाहिला आहे का? तो ही जबरदस्त आहे. फिर कभी!

जॅक निकल्सन (आणि मॉर्गन फ्रीमन) चा "द बकेट लीस्ट" मुळीच चुकवू नका... दोन दिग्गजांच्या अभिनयातुन साकारलेली हलकी-फुलकी कॉमेडी. आणि हो यात जीवनाचा संदेश का काय म्हणतात तो ही आहे... Happy

राज तो परवा इथे लागला होता. ज्याक व मायकेल केन यांचे बोलणे ऐकणे अति आनंददायक. अति म्रुदू व उत्तम इन्ग्लिश उच्चार.

मामी वो किस्सा फिर कभी असे म्हणायला पाहिजे होते तुम्ही....>> ऐ हटिये. ( हे कशात आहे सांगा बरे)

जॅक निकल्सन, जीन हॅकमन, पॉल न्युमन, क्लिंट ईस्टवूड... हे सगळे दादा लोक...

क्लिंट ईस्टवूडचा ग्रॅन टोरिनो बघा जमल्यास, माइल्ड व्हायलंस आहे but the movie is worth your time.

माझ्या मुलाला Language Arts च्या प्रोजेक्ट साठी हा विषय दिला होता...

मामी, मी पण स्कूप पाहिला झकास आहे, वूडी अ‍ॅलनचे पंचेस नेहमीप्रमाणेच जबरी!
अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स साठी जॅक निकोल्सनला बहुदा ऑस्कर मिळाले होते.
माझा अजून एक फेवरीट म्हणजे -क्रिमसन टाईड, जीन हॅकमन आणि डेंझेल वॉशिंग्टनची तुफान जुगलबंदी,आण्विक जगातील युद्ध लष्करी खाक्याच्या लोकांच्या हातात गेल्यास काय होऊ शकते याचा गंभीरपणे विचार करायला लावणारा सिनेमा,पाणबुडीचे क्लस्टरोफोबिक वातावरण आणि वेगवान कथानक,मस्ट वॉच.

परेश रावल्,बोमन इरानी, ओम पुरी,नसिरुद्दीन शहाचा "महारथी" पाहिला. जबरदस्त आहे.
एक मिनिटही जागेवरून हालू देत नाही..शेवटपर्यंत suspense कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे दिग्दर्शक!! मूळ नाटक असल्याने ब-याचदा नाटकाचे plots ठळक लक्षात येतात पण खरेच worh watching!!

3 Idiots पाहिला , रिव्ह्यु लिहिणं म्हणजे आमीरला अभिनय शिकवणं झालं , Simply great Movie. कॉलेजचे दिवस आठवले .

आत्ताच थ्री ईडियटस बघून आले.. प्रचंड बकवास (माझ्या मते)
रॉकेट सिंग आणि अवतार दोन्हिही छान!
अवतार माझ्या मते मस्ट वॉच इन थिएटर!

रॉकेटसिंग बघितला.... एकदम हलका फुलका, छान टाइमपास. रणबीर कपुरच्या कामाचा दर्जा चांगला होत चाललाय.

Alvin and Chipmunks 2 बघीतला, पहिल्या भागापेक्षा जास्त छान वाटला. पहिला भाग फारसा न आवडल्यामुळे दुसराही तसाच निघेल अशी अपेक्षा ठेवून गेले होते, त्यामानाने दुसरा भाग सुखद धक्का होता.

Sherlock Holmes - एकदम जबरदस्त, बघायलाच हवा. तसेही मला Guy Ritchie चे सगळे सिनेमे आवडतात. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. Robert Downey Jr. ने Sherlock Holmes चे काम एकदम सही केलय. त्याच्या मित्राचे, डॉ वॅटसनचे काम ज्युड लॉने छान केलय. या सिनेमाचा background score खूप लक्षवेधक आहे,
सिनेमा बघून आल्यावर कितीतरी वेळ डोक्यात ते संगीत वाजत रहाते.

कालच अवतार 3D बघितला. निराशा झाली.

मला बाकी त्या टेक्निकल गोष्टींबद्दल फारसे ज्ञान नाही. हा सगळ्यात खर्चिक सिनेमा आहे वगैरे माहितीये. पण जो 3D इफेक्ट अपेक्षित होता, त्यात सपशेल निराशा. त्यापेक्षा आपल्याकडे पूर्वी आलेल्या छोटा चेतनचे इफेक्ट मस्त होते.

<<अवतार मधला मूळ विचार अतिशय सुंदर आहे. (दे किल्ड देअर ओन मदर, हे वाक्य मला फार आवडले ) पण तो विचार दाखवण्यासाठी आणि पटवण्यासाठी एवढा हिसांचार मला अनावश्यक वाटला.>>

<<कल्पनाशक्तिला आणि क्रियेटिव्हीटी ला दाद दिलिच पाहिजे. भव्यदिव्य. तरंगणारे डोंगर, चमणारि झाड, हात लावल्यावर मिटणारि फुल..... सगळच अप्रतिम सूंदर.>>

पूर्ण सहमत.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत.

Inglourious Basterds पाहिला . ब्रॅड पिट पेक्षा मेलनी लॉरेंट चा रोल मस्त झालाय. वर्ल्ड वॉर २ शी संबधीत नाझींनी केलेला अत्याचार व त्याचा फ्रेंच ज्युईश सिनेमागृहाची मालकीण मेलनी व अमेरिकन ज्युईश सोल्जर्स ब्रॅड पिट व इतरानी Neations Pride सिनेमाच्या प्रिमिअरच्या वेळेस घेतलेल्या बदल्याची कहानी आहे. ह्यात हिटलर व तमाम नाझी ऑफीसर्स , तसेच मेलनी मारले जातात . हे सोल्जर्स ज्या नाझी सैनिकांना मारतात त्यांचे डोक्यावरचे केस चमडी सहीत कापुन टाकतात अन ज्यांना जिवंत सोडतात त्यांच्या कपाळावर " स्वतिक " काढतात .
अतिशय अमानुष प्रसंग दाखवलेत , ज्यांच हृदय कमजोर आहे त्यांनी चुकुनही हा सिनेमा पाहु नये .

सिल्व्हेस्टर स्टेलॉनचा 'ऑस्कर' पहातोय...

एक डाव धोबीपछाड सीन टू सीन कॉपी आहे...

सिल्व्हेस्टर स्टेलॉनचा 'ऑस्कर' पहातोय...

एक डाव धोबीपछाड सीन टू सीन कॉपी आहे...

>>> त्याआधी हिंदी वाल्यांनी कॉपी मारलाय त्यावरुन नक्कि नाव आता आठवत नाही(मिथुन होता वाटत त्यात).मराठी वाल्यांनी हिंदीवरुन उचलाय की डायरेक ते माहित नाही.

डॉन मुथ्थुस्वामी....

डायरेक उचल्ला असावा...
मुथ्थुस्वामी फारच वाईट आहे...
धोबीपछाड बराच बरा झालाय...

सिल्व्हेस्टर स्टेलॉनचा 'ऑस्कर' पहातोय >> तो भारी आहे मूव्ही.. स्टॅलोन, वॅन डॅम आणि अर्नॉल्ड हे त्रिमूर्ती माझे फेवरेट आहेत..
अर्नॉल्ड चा लास्ट अ‍ॅक्शन हिरो पाहिला काल... मस्त टाइमपास आहे मूव्ही..

मुथ्थुस्वामी चांगला वाटला होता. ( टीव्हीवर फुकट पाहिला म्हणून की काय माहीत नाही.)

Up in the Air - आवडला! जॉर्ज क्लुनी बद्दल काय बोलणार! बस नाम ही काफी है! Happy

Pages