चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल झेंडा आणि इश्किया पाहिला..

झेंडा आवडला.. वेगळी कथा, अवधूत गुप्ते चा पहिला प्रयत्न खूपच चांगला आहे, कार्यकर्त्यांची घुसमट मस्त दाखवली आहे.. राज ठाकरेच्या भूमिकेतला राजेश शृंगारपुरे चे काम आवडले.. उगिच फालतू लव स्टोरीज, इमोशनल अत्याचार वैगेरे दाखवला नाही हे खुप चांगले आहे..
तरी कथा कुठेतरी अर्धवट वाटली.. एकसंध वाटला नाही.. पण एकदा पहाच.

इश्किया ठीक-ठाक वाटला.. विद्या बालन चे काम आवडले... फार काही आवडला नाही.
कुणी रण पाहिलाय का ?

इष्किया...

मस्त सिनेमा...
झकास कामं... जवळपास सगळ्याच विभागात...
कथेचा वेग थोडा कमी आहे... पण मजा येते...
दिग्दर्शकाचा पहिलाच सिनेमा असल्यानी एक रॉनेस आहे... आणि तोच मजा आणतो...

माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे...
एकदा नक्की पहाण्यासारखा...

'इष्किया' फारच सही सिनेमा आहे. गुंडगिरी-अपहरणाच्या प्लॉटच्या पार्श्वभुमीवर 'इष्क' वर केलेले 'जरा हटके' भाष्य. फक्त दीड-पावणेदोन तासांचा असल्यामुळे जास्त त्रास होत नाही. बर्‍याच गोष्टी विचित्र वाटतात. पण नंतर त्यांच्याशीच आपण समरसून जातो, त्यामुळे बघायला मजा येते. नासिर आणि अर्शदचे काम तर सहीच, पण वेगळ्याच रोलमध्ये विद्या बालनने कमाल केली आहे. 'दिल तो बच्चा है, थोडा कच्चा है' हे गाणे प्रचंड आवडले.
त.टी.- लहान मुलांना नेऊ नये.

>>
दिल तो बच्चा है, थोडा कच्चा है' हे गाणे प्रचंड आवडले.
त.टी.- लहान मुलांना नेऊ नये.

लहान मुलांचे गाणे आणि लहान मुलांना नेऊ नये??? बात कुछ हजम नही हुई Wink

'थ्री ईडीयट्स' शेवटी एकदाचा बघितला... एक नंबरचा गल्लाभरू सिनेमा आहे... गझनी हून कमी साउथ इंडिअन पण सगळी तीच लक्षणं आहेत! तोच इमोशनल अत्याचार! सगळा सिनेमा predictable आहे. casting आणि publicity मुळे चालला.
मलातर 'थ्री ईडीयट्स' म्हणजे अमीरचे ते दोन मित्र आणि प्रेक्षक असे तीन वाटतय... सिनेमा बघुन पटतं अमिर तरी 'ईडीयट्' नाहीचं.
पटकथेवर जरा मेहेनत घेतली असती तर थोडा चांगला झाला असता.

------------ ज्यांनी सिनेमा बघितला नाही आणि बघणार आहेत (कशाला?) त्यांनी वाचू नये ------------
हिरो (अमीर) ला देव करून टाकलाय...
... एकतर तो २४x7 टवाळक्या करुनही पहिला येतो
... मग दोन्ही मित्रांच्या जीवनाला योग्य दिशा देतो (मला वाटलं इथेच सिनेमा संपला असता तर चाललं असतं!)
... एवढ पुरेस नाही म्हणून बाळं डिलीव्हर करतो, ती पण साधी सरळ डिलीव्हरी नाही... इन्व्हर्टर त्याचाच... व्ह्याकुम पंप त्याचाच (त्याला तयार व्ह्याकुम गेज मिळतं पण तयार व्ह्याकुम पंप मिळत नाही!)
... एवढ पुरेस नाही म्हणून तो बाळाला जागं करतो
... एवढ पुरेस नाही म्हणून ४०० पेटंट घेऊन लदाख मध्ये शाळा काढतो...
अधेमधे स्वप्नात गाण्यात नाचतो पण (नीट लक्षात नाही.. गाणी पळवल्यामुळे) फक्त कमी आहे ती शेवटी भीषण हाणामारी करायची!

बरेच जोक शिळे आहेत, जसं astronomer चे पेन आणि पेन्सिल, नाव माहित नाही म्हणून गाठ्यात पेपर सरकवून देणे (हे बघा), induction मोटार चालू कशी होते...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(गझनी, 'थ्री ईडीयट्स' सारखे गल्लाभरु सिनेमे करुनही अमिर स्वतःला इतरांपेक्षा वेगळा का समजतो कळत नाही)

<गानी : सावधान आणी विठठला आवडली>
झेंडा मधल विठ्ठ्ला गाण मेश्रामने म्हटल आहे. (सारेगमप चा स्पर्धक) खरोखर छान झाल आहे.

ह्या विकेंड ला इश्किया पहायचा आहे.

(गझनी, 'थ्री ईडीयट्स' सारखे गल्लाभरु सिनेमे करुनही अमिर स्वतःला इतरांपेक्षा वेगळा का समजतो कळत नाही)

ह्म्म्म्म्म्म...... मलाही कळत नाही, पण माझ्यामते तो सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत घेतो आणि ती मेहनत तो योग्य त्या ठिकाणीच घेतो. नाहीतर तशी मेहनत सलमान ने 'वीर' वरही घेतली असणार, अगदी पटकथेपासुन. पण परिणाम काय???

पण तरीही मी आमिरची पंखी नाहीय.

(गझनी, 'थ्री ईडीयट्स' सारखे गल्लाभरु सिनेमे करुनही अमिर स्वतःला इतरांपेक्षा वेगळा का समजतो कळत नाही) >>>>>

अगदी सहमत , एखादा "तारे" सोडला तर त्याच्या गाजलेल्या चित्रपटामध्येही काही फारस नविन नव्हत ( लगान ( हा भारतियाच्या क्रिकेटवेडाचा सर्वात मोठा पुरावा ), राजा हि. वगैरे) ...

पण खानावळीत ( एसारके , सल्लू आणी आमिर ... गेला बाजार "पद्मश्री " सैफु) मधे त्यातल्या त्यात बरा म्हणून कदाचित ....

सॅम, केदार तुमच्याशी १००% असहमत.
मला आणि आईला क्रिकेट आवडत नसूनही लगान आवडला.
>>>(गझनी, 'थ्री ईडीयट्स' सारखे गल्लाभरु सिनेमे करुनही अमिर स्वतःला इतरांपेक्षा वेगळा का समजतो कळत नाही)<<<
तुम्ही अर्थ १९४७ हा चित्रपट पाहिला आहे का? सरफरोश, जो जीता वही सिकंदर हे गल्लाभरू सिनेमे होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

मी पण पाहिला हरिश्चंद्राची फॅक्टरी . छानच आहे.
त्यात एक संवाद आहे फाळके दादर ला रहायला जातात तेंव्हा एक आजी म्हणतात दादर ला बरेच जंगल आहे, खूप कमी वस्ती आहे तिथे Happy ते एकून मजा वाटली.

कित्येक दिवसांचा पहायचा राहिलेला 'द पर्सूट ऑफ हॅपिनेस' पाहिला. सिनेमा आवडला. विल स्मिथने मस्त काम केले आहे. त्याच्या मुलानेही चांगले केले आहे काम.

आधी मला माहित नव्हते की ती एक सत्यकथा आहे (अर्थात सिनेमात काही प्रसंग बदलण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे)
नंतर कळल्यावर खरंच भारी वाटले.

काल हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिला. छान आहे. पण सिनेमामधे सगळ कस मस्त सुरळीत होताना दाखवलय. जे काही स्ट्रगल आहे ते पण विनोदी अंगाने दाखवलय. खरच इतक्या सोप्या पद्धतीने झालेल का सगळ?
बघताना त्यामुळे खूपच हलका फुलका सिनेमा वाटला. त्या काळची मुंबई पाहुन मस्त वाटल. सगळ्यांच्या भूमिकाही उत्कृष्ट वठल्यात. नटरंग मधली गण्याची बायको झालली नटीच इथे फाळक्यांची बायको दाखवलीये. पण इथे मात्र नवर्याला कशातही सपोर्ट करणारी. Happy

आरं बाबानो त्यो तीन येड्यांचा शिनिमा बगु का नगं , कोण म्हणतय बगा कोण म्हणतय बगु नगा . तुमच्यासारक्या शेरातल्या शान्या माणसातच मेळ न्हाय तर आमच्या सारख्या गावाकडच्या मानसानी काय कराव ?

हूड, तुम्हाला गार लागलं का विंचू चावला? Proud

स्ट्रायकर बघितला की नाही कुणी? परिक्षणे तर एकदम चांगली आहेत सगळ्या वर्तमानपत्रात आणि संकेतस्थळांवर..

स्ट्रायकर>>>> बरा आहे... थोडा स्लो वाटतो आणि विस्कळीत..... पण यु टुब वर आला ते छान वाटले... ५$ .... सगळ्यांनी कित्ता गिर वायला हरकत नाही...

युट्युब वर ५ डॉलर देउन फक्त अमेरिकेत आहे.. बाकी जगभर फुकट.. भारतात मात्र केवळ चित्रपटगृहातच बघायला मिळणार आहे आत्तातरी..
पण ही कल्पना छान आहे..

इश्किया बघितला आणि बघितल्यावर इश्किया शब्दाचा अर्थ कळाला. तर इश्किया म्हणजे इश्क की जोडीयां. चित्रपटात दीडच जोडी असल्याने त्याचे इश्किया केले असावे Wink

अर्शद वारसीचे काम मस्त आहे एकदम. सिनेमा बघावा तर त्याच्यासाठी आणि नासिरने दिल तो बच्चा है गाण्यात दिलेल्या एक्सप्रेशन्ससाठी. विद्या बालनचे पण काम चांगले झालेय. पण तिची बॉडी लँग्वेज मधुनच एकदम सिटी गर्लसारखी होते Sad ते तंबोर्‍यावरचे गाणे का धुसडलेय बळच ? त्यापेक्षा तिने गुणगुणत म्हंटलेली गाणी ठेवली असती पूर्णवेळ तर जास्त छान वाटले असते.

*** स्पॉयलर ***
तिचा नवरा एव्हढा पोचलेला पण विद्या बालन मेली नाही हे त्याला कसे कळत नाही ?
*** स्पॉयलर ***

गझनी, 'थ्री ईडीयट्स' सारखे गल्लाभरु सिनेमे करुनही अमिर स्वतःला इतरांपेक्षा वेगळा का समजतो कळत नाही
>> अगदी अगदी.. दोनशे टक्के अनुमोदन.
मला आमिर खान मनापासून आवडतो (आवडायचा? ) पण गजिनी, थ्री इडियट, राजा हिंदूस्थानी - निव्वळ चिडचिड!

हरिश्चंद्राची फॅक्टरी आवडला! नर्मविनोदाची डूब आहे सतत.
वर अमृतानं म्हटल्याप्रमाणे, स्ट्रगलही हसत खेळत जाणवतो!
Hats off to दादासाहेब फाळके!

विद्या बालन जी काय पूर्ण वेळ 'भाभी' दिसत रहाते.... आणि तथाकथित विधवा 'भाभी' बनून यूपी मधल्या खेड्यात हिंडते... तिच्या चालचलन बद्दल आख्ख्या गावात कोणी काही म्हणत नाही.. गंमतच्चेय..
मधे हिंदुस्तान टाइम्स च्या काफे मधे सविताभाभी पुराण आलं होतं त्याचीच आठवण झाली.

यूपी मधलं खेडं असून कायमच पश्चिम महाराष्ट्रातल्यासारखंच दिसतं... माणसांचं टेक्श्चर, चेहरे, घरं, शेतं, झाडंमाडं, माती... सगळं काही अगदी पन्हाळ्याच्या पायथ्याशी किंवा सातार्‍यात असल्यासारखं..

सिंडे ते ठिके पण
.... स्पॉयलर.....
हे दोन येडे तिथे रहायला आलेत, काहीतरी शिजतंय यातलं काही कुलश्रेष्ठ पर्यंत पोचत नाही.. पण पपलू मुश्ताक जिजाजी मात्र यांना पोचल्याच्या काही तासात शोधतो... गंमतच..
.... स्पॉयलर.....

रॉकेट सिंग बघितला. अतिशय आवडला. बिझिनेस सुरु करायची काही तत्व थोड्या फिल्मी पद्धतीन करुनही ती तत्व प्रॅक्टीकल आहेत आणि खरी खुरी आहेत. त्यामुळ जास्त आवडला.
रणबीरन नेहमी प्रमाण उत्तम काम केलय. जरुर बघा. मला राहुन राहुन आपल्या "मराठी उद्योजक बाफ" ची आठवण येत होती हा चित्रपट बघताना. Happy

सगळं काही अगदी पन्हाळ्याच्या पायथ्याशी किंवा सातार्‍यात असल्यासारखं..
>>> 'इश्किया'चं बरंचसं शुटिंग वाई,पाचगणी भागात झालंय. Happy

मला मारुति त्याची बेम्बी आणि बोट ही कथा आठवली >>> म्हण्जी शिनिमा बघण्यासाटी बेम्बीत बोट घालाव लागतया का ? पावण मला काय सुदीक कळल न्हाय जरा इस्क्टुन सांगा की ? जावद्या त्याच्यापरिस हरिसचंदराची फॅक्ट्रीच बगावी म्हणतो.

>>> 'इश्किया'चं बरंचसं शुटिंग वाई,पाचगणी भागात झालंय.<<
तेच तर ना... हॉटेल विसावा असं लिहिलेल्या स्कूटरवर यू पी चा नंबर घालूनही ती कळतेच महाराष्ट्रातली आहे ते.. Happy
यूपी मधे जाऊन का नाही शूट करता येत यांना किंवा गेला बाजार यूपी मधलं गाव कसं दिसतं याचा थोडासातरी रिसर्च करून मग त्याला जवळच्या लोकेशन्स निवडायला काय जातं यांचं? इतका काही बजेट मधे नाही फरक पडत. तसंही शेमारूने पैसे घातलेत तेव्हा यूपी मधे जाऊन शूट करण्याइतकं बजेट नाही हे अशक्य आहे.

Pages