चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाइम्स ऑफ इंडिया मधे हा सिनेमा अन शाहरुख चा अभिनय फॉरेस्ट गम्प - टोम हॅन्क्स पेक्षाही भारी असल्याचे जाहिर केले आहे Lol

पुढेमागे मी एखादा चित्रपट काढला तर प्रसिद्धीसाठी उगाच पैसा घालण्यापेक्षा मझ्या चित्रपटाविरुद्ध आंदोलन करायची सुपारी एखद्या संघटनेला देइन.>>>> पुढारी सौजन्य.....

13334234.jpg

" तो बात पक्की " सही सिनेमा आहे , आवड्या !
तब्बु , शर्मन जोशी अन इतर सगळ्यांनी मस्त काम केलयं .

अरे रिलिज झाला का हा मुव्ही? प्रोमोज दाखवत होते काही दिवसापुर्वी टिव्हिवर. नक्की पहायचा आहे हा. Happy

टाइम्स ऑफ इंडिया मधे हा सिनेमा अन शाहरुख चा अभिनय फॉरेस्ट गम्प - टोम हॅन्क्स पेक्षाही भारी असल्याचे जाहिर केले आहे>>>>> Angry biggest joke of the day....टॉम हॅन्क्सच्या एका केसाचीही सर शाहरुखला नाहीये.

पण कुणी खानाबद्दल रिव्यू नाही लिहिलेत का ? की अजून लोकांनी पाहिलाच नाहिये ? लिहा रे कसा आहे. टाइम्स वगैरे वर विश्वास नाही. ते लोक तोंड फाटेस्तोवर स्तुती करताय्त!!

पण कुणी खानाबद्दल रिव्यू नाही लिहिलेत का ? >>> "...नेम इज खान " निव्वळ फालतु सिनेमा. एकदम बकवास. खान म्हणजे अतिरेकी नाही हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे . नुवार्क ठेसनावर घडलेला प्रसंग तिखटमीठ लावुन घुसडल्यासारखा दिसतो.

मला एक फंडा शंका आहे. ९/११ नंतर इत्क्या वर्शांनी अत्ताच्या प्रेसिडेंटला सांगून काय उपयोग? मी तर ते किळसवाणे प्रसिद्धी तंत्र पाहून एन्डीटीवी काढून टाकले. फेवरिट्स मधून.

एका रिव्यू मधे असे वाचले की त्यापेक्षा त्याचा प्रवास बाळ ठाकरेंना भेटण्यासाठी दाखवला असता तर बरोबर झाले असते Happy

खान म्हणजे अतिरेकी नाही हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे

जे धडधडीत सगळ्यांना डोळ्यांनी दिसतेय ते खोटे आहे असे हा बाबा डोळ्यात पाणी भरुन अमेरिकेच्या प्रेसिडेंटला सांगणार ????????????!!!!!!!!!!!! करण जोहरकडे स्टो-या लिहिणा-या लोकांचा दुष्काळ पडलाय काय? मायबोलीवर ये म्हणावं, भरपुर कथा आणि लेखक मिळतील.....

करण जोहरकडे स्टो-या लिहिणा-या लोकांचा दुष्काळ पडलाय काय? मायबोलीवर ये म्हणावं, भरपुर कथा आणि लेखक मिळतील.....>>> Lol
साधना त्याला चांगल्या स्टोर्‍या नको आहेत त्याला हवी आहे खान आरती , खान पुराण , खान महात्म्य . आमचे मायबोलीकर काय चांगल्या ष्टोर्‍या देणार, वर बघा , खान साहेबांवर माबोकरांनी किती टीका केलीय ती . Proud

माय नेम ईज खान अजिबात बघु नका.अतिशय बकवास सिनेमा.सगळ्यांचा अभिनय अतिशय वाईट्.कुठुन कुठे जातो हा सिनेमा.शाहरुख तर बघवत नाहि.(काहि सिनमध्ये त्याची गुलाबी लिपस्टिक पण दिसते.:)).काजोल बघायलातरी बरी पण ऐकायला कर्कश.
शेवटचे हरिकेनचे सिन म्हणजे तर निव्वळ अ.अ.
महाराष्ट्रात राडा झाला नसता तर पहिल्याच दिवशी झोपला असता हा सिनेमा.कदाचित कुतुहलामुळे काहि लोकतरी पहायला गेले असावेत.

सगळं माहित असून कधी कधी पायावर धोंडा मारून घेतलाच जातो! काल मैत्रिणी होत्या म्हणून त्यांच्या अग्रहाला बळी पडून 'खान' पाहून आले! Uhoh अजिबात आवडला नाही.
खानाला मसीहा दाखवायचा अट्टाहास हास्यास्पद वाटला. शाहरुख ने प्रयत्न चांगला केलाय ऑटिस्टिक व्यक्ती साकारयचा. पण टॉम हॅन्क्स आणि फॉरेस्ट गम्प शी तुलना ? प्लीsssssssज !! Angry
हरिकेन सीन ला सगळे प्रेक्षक हसत होते. मला तर ओबामाचा डमी बघून पण जाम हसू आले!! तेवढीच करमणूक. बाकी प्रेक्षकाला मूर्ख समजणे हा जोहरी अ‍ॅटिट्युड आहेच .
नन्तर वेळ झाला की डीटेल्स लिहिन अजून.

मानेइखा>>> बघा जरूर बघा! पण फूकट! जर मैत्रिणी शारूकच्या पंख्या असतील अन् तुम्हाला जावच लागलं तर जा! सुटका नसते कधीकधी अश्या जाचातून त्याला कोण काय करणार? मी आताशा सिनेगृहात कसं झोपावं याच एक वेगळं तंत्र विकसित केलं आहे Proud

मला एक फंडा शंका आहे. ९/११ नंतर इत्क्या वर्शांनी अत्ताच्या प्रेसिडेंटला सांगून काय उपयोग?>>> अहो मामी असं काय करता हो?? त्याच्याकडे पैसा नसेल प्रॉड्यूस करायला किंवा शारूक / काजोलकडे डेट्स Wink

रिंगा रिंगा पाहिला.. आवडला... पण नावाचा आणि पिक्चरचा संबंध नाही कळला.. Happy ( माय नेम इज जामोप्या.. तोपण मीच आहे.. Happy )

रिंगा रिंगा

रिंगा रिंगा रोझेस... म्हणुन लहान मुलांनी हात धरुन रिंगण करुन म्हणायचे एक बालगीत इंग्रजी माध्यमात शिकवते जाते, त्याचा काही संबंध, म्हणजे कोणालातरी रिंगणात धरलेय्/धरायचेय वगैरे असे काही जुळतेय का ते पहा.... Happy

मी आजच परिक्षण वाचले, ठिक ठिक म्हणुन लिहिलेय, अगदीच वाईट नाहीय, पण मी तरी थेटरापेक्षा सिडीवरच पाहिन....

माय नेम इज खान हा अत्यंत रटाळ अन भयानक बोअर आणि तद्दन फालतू आणि तितकाच बकवास पिक्चर आहे.

पहिला भाग त्यातल्या त्यात बरा झाला आहे, पण नंतर मात्र जे पुराण लावल्या जातं ते पाहून आपण ही "माय नेम इज केदार अ‍ॅन्ड आय विल किल करण / शाहरुख" असे म्हणायला लागू. कॅटरिनाचा जॉर्जिया मध्ये दाखवून नंतर जुन्या हिंदी पिक्चर मध्ये जसे पाण्यातून जात जात मदत दिली जाते, शाहरुख ग्रेट काम करे पर्यंत बाकी जनता कशी मदत करत नाही, हे पाहून तर त्यांनी अमेरिकेचा सोमालिया केला आहे हे वाटत राहते. शिवाय ९/११ नंतर एकदम २००८ कसे येते अन निवडनुका कश्या होतात हे कळत नाही. Happy मध्येच अफगाण वॉर अन इराक वॉर पण येऊन जातात. गंमत आहे सगळी ! प्रेक्षकांची चागलींच घेतली आहे ह्या पिक्चर मध्ये.

टू सम अतिशय बकवास!!

आमच्या कडे तर जेव्हा तो ओबामाशी हात मिळवतो लोकांच्या प्रचंड टाळ्या. मला तर इतके एम्बारसिंग वाटले की आपण इंडियातल्या १.५० रु.च्या सेक्शन मध्ये तर बसलो नाही ना आसे वाटले. Happy
एकदम बेकार.

हायला, ही जमात अजुन आहे पृथ्वीतलावर?????????????????? >>>>>> हो साधना, आमच्या इथली मुलगी परवाच म्हणत होती, मला शाहरूख खूप आवडतो, पण मला या पिक्चरमध्ये त्याला असं (ऑटिस्टिक) बघवतंच नाहीये. बिच्चारीचा हार्टब्रेक झाल्यासारखाच वाटत होता. कीव आली मला तिच्या चॉईसची.

कुछ कुछ होता है याचा अ‍ॅनिमेटेड अवतार 'कुची कुची होता है' या नावाने येतोय. खरच करण जोहर आणि नव्या कल्पना यांचा ३६ चा आकडा आहे.

what a waste of money!!!!!!!!!!1111

अ‍ॅनिमेटेड अवतार
>>
कुत्ता व्हर्जन आहे ते...

माणसांच्या ऐवजी कुत्री असणार आहेत...
तसंच शाहरुख आणि सलमानचं फाटल्यामुळे सलमान ऐवजी संजय दत्त प्लेबॅक देणार आहे...

क्लिक पाहिला , श्रेयसच काम चांगल झालयं , हॉरर बनवण्याचा प्रयत्न केलाय पण हॉरर वाटत नाही . गाणी मात्र श्रवणीय आहेत . विशेषतः आमीन सुमा आमीन ऐकायला मस्त वाटत .

हायला, ही जमात अजुन आहे पृथ्वीतलावर????????>> होय अजूनतरी Happy [पण त्यांच्यामुळंच तर मला फुकटात खा - प्यायला मिळतं त्या बदल्यात शारूकच गुणगान ऐकावं लागतं पण दॅट्स ओके नॉट अ बॅड डील Proud ]

काश माझ्या मैत्रिणींना सल्मान आणि आमीर आवडत असता तर... Proud

Pages