चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला, नाही डीव्हीडी आणून. मला पूर्ण चित्रपट नेट वर (किंवा कॉम्प्युटर वर) बघायला एवढं आवडत नाही. सवय नाही झाली अजून.

Happy

" झक मारली बायको केली " पाहिला Proud
भरत जाधव , भाग्यश्री , निलम शिर्के आहेत . भाग्यश्रीला "मैने प्यार किया" नंतर पहिल्यांदाच पाहिली , अजुनही चार्म टिकवुन आहे Proud
कथानक थोडं वेगळ्या वळणाला न्यायचा प्रयत्न केला आहे. चित्रपट बरा वाटला .

मार्केट गेल्यावर माराठीत काम करण्याची नूतन पासूनची परंपरा भागुबाईने चालू ठेवली म्हणायची. मध्यनरी तिला एका भोजपुरी चित्रपटात पाहिली होती...

मी पण अवतार बघितला. कथा नेहमीचीच म्हणजे आपण आणि परग्रहवासी. फरक एवढाच कि यात आपण वाईट आणि ते चांगले आहेत. अश्या सिनेमात नेहमी असतात तसे निळे काळे रंग नसून, जांभळे गुलाबी रंग आहेत.
मूळ कल्पना वनस्पतिंबद्दल आहे पण ती यापेक्षा चांगली सादर आली असती.
हिंसाचार, मशीनगन, विमाने, स्फोटके टाळता आली असती.
मला या लोकांचे नवल वाटते कि यांची कल्पनाशक्ती इतकी तोकडी कशी पडते. परग्रहावर जीवन असलेच तर ते प्राणी
मानवासारखेच का असतील. (इथे तर घोडे, कुत्रे, लांडगे, गेंडे, सगळेच आहेत ) आणि ते बीभत्सच का असतील ?
फक्त सुखद रंगसंगतीच बघायची असेल तर डिस्ने चे अनेक सिनेमे आहेत.
आणि आता या स्पेशल इफेक्ट्स चे कवतिक देखील राहिलेले नाही.

दिनेश कुठे आहेस तू? मागच्या आठवड्यात रत्नागिरीला जाताना मलकापूरहून गेलो आणि आलो. तुझ्या मामांच्या शेताची आठवण आली. सोबतच्या कुटुम्बियानाही सान्गितले. ते दिनेशला ऐकून ओळखतात..

कोणत्याच स्पेशल इफेक्टचे कौतुक राहिले नाही. कॉम्प्युटर ग्राफिक्समुळे हे सर्व खोटे आहे असे मनाला सारखे वाटत राहते. अगदी '२०१२' पहाताना तर अन्तर्मन ओरडून सांगत होते हे सर्व बनावट आहे. त्या पार्शवभूमीवर मॅक न्नाज गोल्ड मधले दरीतले भूकम्प मेकॅनिकल पद्धतीने किती तरी अप्रतिम दाखवले होते.
आम्हाला तर कॉलेज पर्यन्त चित्रपटातली मारामारी खरी वाटे.माझा मुलगा लहान असताना कोयला चित्रपटाच्या प्रोमो मध्ये टीव्ही वर पेट घेतलेला शाहरुख खान पळताना दाखवायचे. चिरंजीवांनी सांगितले. 'हे सगळे खोटे असते , पण डिस्कव्हरी चॅनेलवरचे सगळे खरे असते' ऐकून धन्य झालो...

Happy

माणसे जीवनाचे महान तत्त्वज्ञान साहित्यातून शोधतात. चित्रपटांतून नाही.
>>
हे विधान नक्कीच धक्कादायक आहे. त्या आधीचे प्रयोगचे पोस्ट हे त्यांचे वैयक्तिक मत आणि आवड आहे. आमच्याही असहमत होण्याचा त्याना पूर्ण अधिकारही आहे. त्यानुसार त्यानी त्यांचे मत पुरेशा स्पष्टीकरणासह समर्थितही केले आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण चित्रपटातून जीवनाचे महान तत्वज्ञान माणसे शोधत नाहीत हे मात्र मान्य होण्यासारखे नाही. चित्रपट हे एक माध्यम आहे.जशा इतर माध्यमातून कलाकार अभिव्यक्त होतो तसाच चित्रपटातूनही. आणि त्यातून माणसे सावरली आहेत, अंतर्मुख झाली आहेत, काहींच्या आयुष्याला नव्या दिशाही मिळाल्या आहेत. काहीनी बोधही घेतला आहे. ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे तत्वज्ञान मांडले आहे. काहीना जमले काहीना नाही. तो तो त्यांच्या माध्यमावरील असलेल्या पकडीचा भाग होता. माध्यमाची ताकत तर तेवढीच असते..

<माणसे जीवनाचे महान तत्त्वज्ञान साहित्यातून शोधतात. चित्रपटांतून नाही. .>

असहमत.

माणसे जीवनाचे महान तत्त्वज्ञान साहित्यातून शोधतात. चित्रपटांतून नाही.

अजिबात सहमत नाही. पुस्तक हे जसे तत्वज्ञानाचे माध्यम होऊ शकते, तसेच चित्रपट हेही होऊ शकते. पुस्तकांपेक्षा चित्रपटाचा इतिहास फार तरुण आहे, त्यामुळे इतिहास वाचला तर सगळ्या महान व्यक्ती पुस्तकाचेच नाव घेताना दिसतात. भविष्यात असेच राहील, असे नाही.

Happy

"अवतार" अजुन पाहिला नाही पण जरूर पहाणार; फक्त स्पेशल इफेक्ट्स आणि जेम्स कॅमरुन साठी. Happy माझ्या मते "साय्-फाय" सीनेमा त्यातील क्रिएटीवीटी साठी बघायचे असतात, जरी त्यातील कथासार आणि एकंदर चित्रीकरण रीएलिटीशी विसंगत असले तरी. सगळेच "साय्-फाय" सीनेमे चांगले असतात असेही नाही परंतु जेम्स कॅमरुन सारख्या दिग्दर्शकाकडुन नाक्किच खुप अपेक्षा आहेत.

जीवनाला प्रेरणा वेगैरे माहीती नाही पण हॉलीवूडने स्पेशल इफेक्ट्सद्वारा नवीन शोधांकरता विषय जरूर दिलेला आहे. उदा: सेलफोन, कंसेप्ट कार्स, क्लोन्स, ड्रोन्स ई....

त्या पार्शवभूमीवर मॅक न्नाज गोल्ड मधले दरीतले भूकम्प मेकॅनिकल पद्धतीने किती तरी अप्रतिम दाखवले होते.>> अन्नुम्मोद्दन. माझ्याकडे डीवीडीच आहे. कै मस्त पिच्चर आहे नै. मला लहान पणी वाड्यातील मोठ्यामुलांबरोबर मेरी बिस्कीटे व वाटर ब्याग घेऊन पाटिवले होते हा सिनेमा बघायला. नटराज थीएटर मध्ये. अजूनही मी त्याच अगोबाइ! नजरेने तो सिनेमा बघते. तो म्याप, तो म्याकेन्ना, तो ओमर शरीफ- त्याचे शेवटी प्यारीसला जाण्याचे स्वप्न. तो शेवटास खांबावर प्रकाश पडून होणारा चकचकाट. तो टकल्या व
ती रेड इंडीयन गरम स्त्री( त्यांच्यातली पद्माखन्नाच जनू.) किती ती घोडेस्वारी. काय ते सोने. वावा. काय आठ्वण काढ्ली राव. आता परत बघिट्लाच पाहिजे.
------------------------------------------------------------------------
माणसे जीवनाचे तत्त्वज्ञान साहित्यातून शोधतात, चित्रपटांतून नव्हे' >> राव भारतात सिनेमाचा प्रचंड प्रभाव आहे व लोक अशिक्षित असल्याने जास्त प्रभावित होतात. एन्टीआरला लोक श्रीरामाचा अवतार समजत. रजनीकांताचा चिरंजीवीचा सिनेमा बघून लोक लै प्रभावित होतात. खुद्द आपण घ्या. जेम्स बॉन्ड
चा सिनेमा बघून बाहीर पड्ताना व गाडी काढ्ताना एक क्षण तरी ते बॉन्ड जेम्स बॉन्ड फीलिन्ग येते की नाही. माझ्या कैं नवर्‍यावर सिनेमाचा अतिशय प्रभाव होता. आराधना, अमर प्रेम ते आनंद यात त्याचे सर्व जीवन व जीवन विषय्क तत्त्वज्ञान सामावलेले होते. जेम्स बॉन्ड चा अतोनात प्रभाव होता. पुल व वपु यापेक्षा काही साहित्य अस्ते असे सांगितले तरीही रागवत असे. म्हण्जे अशीही माणसे असतात.

इथे सिनेमात दाखवल्याप्रमाणे मुलींना सतविणारे खूप वीर दिसतात. फिल्मी विचार व जीवन पद्धती अंगीकारणे सोपे जाते.

काही सुन्दर सिनेमे व त्यातील क्षण जरूर जगण्याची प्रेरणा देतात. व विचारांची नवी दिशा देतात.

मला व्यक्तिश: एस वेन्च्युरा पेट डीटेक्टिव हा माझा राखी-ब्रदर वाट्तो. लहानपनी दुसर्‍या घरात दत्तक म्हणून राहताना मला तो ओमेन मधील मुलगाच माझा भाउ व मित्र वाट्त असे. कारण जन्मतारीख एक.
हिन्दी व इन्ग्रजी सिनेमे यान्चा आपल्या जीवनावर नक्कीच प्रभाव असतो. सबकॉन्शसली तरी.

वाद नाही माहीती म्हणून लिहीले आहे. प्रयोग वैतागू नको बरे.

Happy

प्रयोग, मी कॅमेरून कडून खुप अपेक्षा ठेवल्या होत्या. त्याने टायटॅनिक मधे ती प्रेमकथा अतिशय सुंदरपणे गुंफली होती. ती म्हातारी अजूनही जिवंत असेल असे वाटत राहिले. त्या मानाने मला अवतार फिका वाटला.
टायटॅनिकचे सर्व स्पेशल एफेक्ट्स असे घेतले होते ते पुढे अनेकवेळा टिव्हीवर दाखवले होते. ग्लॅडिएटर चे पण तसेच. (त्यातली शस्त्रे स्पंजाची होती ).

आजवरच्या बहुतेक चित्रपटात, परग्रहावरचे जीवन मानवी रुपाचे विकृत रुप म्हणून दाखवले होते. मला हे पटत नाहि. त्या जीवाना एक डोके, दोन हात, दोन पाय असतील हे कशावरुन ? ते पाण्यावरच जगत असतील हे का खरे मानायचे ? ते अमोनिया वर पण जगू शकतात !!! त्यांच्यातही आई , बाबा, भाऊ हि नाती असतील हे कशावरुन ? ते सॅलामांडर प्रमाणे, केवळ एकच लिंग असणारे असू शकतील.
रंसंगती उत्तम आहे हे मी लिहिलेच आहे, पण हाय स्कूल म्यु़झिकल मधे ती यापेक्षा सुंदर आहे.

अवतार मधला मूळ विचार अतिशय सुंदर आहे. (दे किल्ड देअर ओन मदर, हे वाक्य मला फार आवडले )
पण तो विचार दाखवण्यासाठी आणि पटवण्यासाठी एवढा हिसांचार मला अनावश्यक वाटला.
निसर्गाची लेकरे आणि प्रगती हा संघर्ष अनेकवेळा सिनेमातून, जास्त प्रभावी रित्या मांडण्यात आला होता.
इथे मला दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती तोकडी पडली असे ठामपणे वाटते.
तत्वज्ञानाचे म्हणाल, तर माझे स्वतःचे, माझ्यापुरते एक तत्वज्ञान आहे. त्यासाठी ना मला पुस्तके लागतात ना चित्रपट ( ना बाबा ना महाराज !!! ना श्रोते ना अनुयायी !!! )

रॉबिन अगदी थोड्या दिवसांकरता मुंबईत होतो. आता परवा कोरियाला जातोय !!! परत दोन दिवसांसाठी मुंबईत येईन, परत आफ्रिकेत !!!

दिनेशदा,
टायटॅनिक आणि अवतार या अगदी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यातही वेगळ्या कृती आहेत. मी काही माहिती देतो अर्थात तुमचे मत बदलावे, अशी मात्र अपेक्षा त्यातून नाही. तुमच्या दृष्टीकोनाचा आदरच. Happy
जेम्स कॅमेरून १९९४ पासून अवतार या संकल्पनेवर काम करत होता. टायटॅनिक प्रदर्शित झाल्यावर लगेच अवतारचे चित्रीकरण सुरू करण्याचा विचार होता, पण १९९९ मध्ये टायटॅनिक आल्यावर जेम्सच्या लक्षात आले, की अवतार साकारण्यासाठी आवश्यक ते प्रगत तंत्रज्ञान (अ‍ॅनिमेशन) त्यावेळी विकसित झाले नाही म्हणून हा बाबा पुढची ७ वर्षे त्यासाठी मेहनत करत राहिला. २००६ मध्ये कॉम्प्युटर जनरेटेड अ‍ॅनिमेशनचे (सीजीए) तंत्र पूर्ण विकसित झाल्यावर त्याने कामाला सुरवात केली. हा चित्रपट ६० टक्के अ‍ॅनिमेशन आणि ४० टक्के वास्तव चित्रण आहे. निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी जेम्सने १४ महिने घेतले. त्रिमित चित्र आणि व्यक्तीरेखाभवतीच्या पार्श्वभूमीला खोली (डेप्थ) मिळवून देण्यासाठी त्याने प्रथमच व्हर्चुअल कॅमेरा तंत्राचा वापर केला. आपण काय प्रयोग करतोय हे त्याने स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जॉर्ज लुकास यांनाही सेटवर बोलवून दाखवले. या चित्रपटासाठी त्याने निर्मिती व विपणन मिळून २५०० कोटी रुपये खर्च केला आहे. हा जगातील आजवरचा सर्वाधिक खर्चिक चित्रपट आहे. तुम्ही खरोखर या चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचे वाचन करा. नक्कीच स्तिमित व्हाल.
आता तुम्ही म्हणताय त्या इतर मुद्यांबाबत. परग्रहवासी आणि आपण एवढाच मर्यादित विचार यात नाही. कथा जरी साधी आणि जुनीच कल्पना असली तरी त्यात मानवी स्वार्थी वसाहतवाद आणि जैवविविधता जपणारे मानवसदृश्य परग्रहवासी यांच्या संस्कृतीचा संघर्ष रेखाटला आहे. इथे कथासूत्र महत्त्वाचे नसून त्यातून दिलेला 'जगा आणि जगू द्या' हा चिरंतन संदेश महत्त्वाचा आहे. परग्रहवासी कसे दाखवावेत, हे जेम्सचे कल्पना स्वातंत्र्य आहे. स्टार वॉर्स, ईटी बघताना आपण कधी आव्हान दिले होते? अखेर ती एक विज्ञान काल्पनिका (साय्-फी) आहे.
जेम्सची कल्पनाशक्ती तोकडी पडली, असे मुळीच नाही. तेच वाक्य तो आपल्यावर फेकू शकेल. जाऊदे. धागे उसवावे तितके थोडेच. जाताजाता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दोनच दिवसांत त्याने १० कोटी डॉलर्सचा गल्ला जमवलाय. समीक्षकांनी 'सर्वोत्कृष्ट चित्रपट, टवटवीत कल्पना आणि अस्सल विचार' म्हणून पसंती दिली आहे. आता आपण शांतपणे इतरांच्या प्रतिक्रिया आणि पुढे काय घडतंय ते अनुभवूया. इतकेच म्हणेन की जेम्सने चित्रपट निर्मितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे एक नवे दालन उघडलंय. Happy

दिनेशदा,
आणखी एक आठवले म्हणून सांगतो.
जेम्स, स्टीव्हन किंवा जॉर्ज यांच्यासारखे लोक पटकथेतील तपशीलांत त्रूटी सोडत नाहीत. तुम्हाला पडलेले प्रश्न (परग्रहांवरचे जीव पाण्यावरच जगत असतील का, अमोनियावर का नाही?) 'अवतार' मध्ये आधीच उत्तरित आहेत. ना'वी हे मानवसदृश्य जमातीचे लोक ज्या पँडोरा या ग्रहावर राहतायत त्या वातावरणात मानवाला श्वास घेणेही शक्य नाही म्हणून पृथ्वीवरच्या संशोधकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी या ना'वींची शरीरे जैविक अभियांत्रिकी वापरून तयार केली आहेत. चित्रपटातील नायक व इतर मानवी व्यक्तीरेखा निद्रिस्त होऊन स्वप्नावस्थेत या ना'वी शरीरांशी स्वतःला जोडून घेतात आणि मगच त्या ग्रहावर प्रवेश करू शकतात. ही नाळ तोडली, की ते पुन्हा मानवी रूपात येतात. ना'वी शरीरात जाणे हाच तो अवतार.
जेम्सला ही 'अवतार' ही संकल्पना हिंदू पुराणातून मिळाली आहे. देव मानवी रूपात अवतार घेतो याचाच विस्तारित आविष्कार चित्रपटात मुख्यसूत्र आहे. बाकी गोष्टी त्याभोवती फिरतात. म्हणून त्याचे नावही 'अवतार' हेच कायम ठेवले आहे.

अवतार पाहिला. फार फार छान वटला मला. कल्पनाशक्तिला आणि क्रियेटिव्हीटी ला दाद दिलिच पाहिजे. भव्यदिव्य. तरंगणारे डोंगर, चमणारि झाड, हात लावल्यावर मिटणारि फुल..... सगळच अप्रतिम सूंदर.
शेवटची फाइट तर केवळ अप्रतिमच. रविवार एकदम मस्त गेला. अवतार एकदा तरि पहाच. जमला तर 3D पहा. याचि मजा केवळ मोठ्या पडद्यावरच आहे.

’रॉकेट सिंग’ मस्त आहे.
’अवतार’ आईमॅक्स ३डीचं तिकीट मिळत नाही राव... Sad

अवतार (मुलांच्या भाषेत अ‍ॅवटार) पाहीला; पैसे वसूल. ओरिजिनल श्टोरीलाईन, उत्क्रुष्ट दिग्दर्शन आणि आउट्स्टँडिंग प्रेझेंटेशन या सगळ्यांच्या सुरेख मिलाफामुळे अडिच तास कसे गेले ते कळतच नाही. साय्-फाय सिनेमाच यश फिक्शन आणि रीएलीटीमधील रेषा धुसर करणे हा असतो; आणि अ‍ॅवटारने ती कमाल केली आहे. Hats off to James Cameron.

As a blockbuster action epic it has everything, for everyone regardless of age or gender. I can imagine some folks on the right not particularly enjoying the message of this film, but that's not for me to decide. Decide for yourself, it's a film I plan on seeing again and would bet you will too. Experience it on IMAX 3D if you can; that's a different ballgame altogether.

हा चित्रपट खूप मोठा (३ तास?) आहे असे वाचले. एवढा वेळ आयमॅक्स किंवा ३-डी मधे पाहण्याचा अनुभव आहे का कोणाचा?

आम्ही स्नोमुळे अडकलो नाहीतर वीकएन्डला पाहिलाच असता. आम्ही ३-D आयमॅक्सचा पहाणार आहोत.
'अप' पाहिला होता पण तो दीड तासाचा. पण ३-डी मुळे काही त्रास वगैरे वाटला नाही.

नुकताच गलगले निघाले नावाचा चित्रपट झी वर पाहिला. "अग बाई अरेच्चा" च्या दिग्दर्शकाने हा चित्रपट काढला असेल यावर विश्वास ठेवायला शंका यावी इतका भिकार वाटला. यातील गलगले हे पात्र सही रे सही या "सुपर डुपर हिट" नाटकातील एका पात्रावर आधारीत आहे असे वाचले होते. त्याचे स्वतःशीच बडबडणे काही वेळानंतर त्रासदायक वाटायला लागले होते.

अ‍ॅवटार हिंदी मधे आहे आयबोलिवर. म्हणजे संवाद सगळे हिंदी मधे. आत ३डी मधे बघायचा.

फारेंड
मी आता पर्यंत आलेले बहुतेक सगळे 3D अ‍ॅनिमेशनपट बघीतले आहेत IMAX किंवा साध्या थिएटर मध्ये. (डोळ्यांना) काहीही त्रास होत नाही. बघायला मजा नक्की येते.

धन्यवाद लोकहो. म्हणजे सुट्टीत बघता येइल आता. या आधी मी आयमॅक्स वर साधारण ४५ मिनीटांचेच चित्रपट बघितले होते. आणि ३-डी चा अनुभव एक छोटा चेतन सोडला तर येथील थीम पार्क्स मधे बघितलेले १५-२० मिनीटांचेच चित्रपट एवढाच आहे Happy त्यामुळे पूर्ण चित्रपट बघायला कसा वाटेल कल्पना नव्हती.

Pages