चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेव्हा यूपी मधे जाऊन शूट करण्याइतकं बजेट नाही हे अशक्य आहे.>>> हे न करण्याचं कारण एकच,तिथली लॉ-ऑर्डरची परिस्थिती,हे शूटींग चालू असताना दुसर्‍याच प्रकारचे 'शूट' व्हायची,अपहरणाची आणि साध्या सोयीसुविधाही न मिळण्याची निर्मात्यांना खात्री असते. गेल्या रविवारच्या इंडिअन एक्सप्रेसमधे याच मुद्द्यावर 'गोरखपूर,महाराष्ट्र' हा लेख आला होता. अगदी भोजपूरी सिनेमेही नाशिक-इगतपुरी जवळ चित्रित करतात.

मग हे कोणीतरी त्या लालु वगैरे कंपनीला सांगा ओरडुन.,.. बिहारी/युपी जंता तर धावतेच इकडे, आता तिकडचे पिकचरही इकडे शुट करतात...

त्यात काय वाईट आहे उलट इथल्या लोकाना थोडे फार रोजगार, खाण्यापिण्याचा व्यवसाय उपलब्ध होतो. चित्रपटवाल्यांचाही दावा नसावा आम्ही फारच वास्तववादी पिकचर काढतोय. नाहीतरी प्रादेशिकतेच्या दृष्टीने ९९ टक्के चित्रपट 'उपरे'ही नाही भुन्डे असतात. त्यात कदाचित सर्वसमावेशकतेसाठी मुद्दाम कुठलाच प्रदेश क्लेम केलेला नसतो. एखाध्या टक्क्यात प्रादेशिक थीम असेल अथवा अगदी विशिष्ट वातावरण हवे असेल तर बाब वेगळी. उलट पक्शी एखादा गल्लभरू मारधाड पिकचर अगदी आसामी सांस्कृतिक वातावरणात केला तर तो विनाकारण 'परका' वाटत राहील. हो. हल्ली कॉमन थीम असणार्‍या चित्रपटाचेही पन्जाबीकरण झाले आहे ते बहुधा पन्जाबी एन आर आय डोळ्यासमोर ठेवून बहुधा...

आज इश्किया पाहिला.
निव्वळ अफलातून. दिग्दर्शन, पटकथा, अभिनय सर्व मस्त. >>
चिनूक्स, ट्यु , धन्यवाद ... हेच शोधत शोधत इथे आले होते. Happy
आता बघणारच.

मलापण इश्किया फार आवडला. सगळ्यांचि काम फारच छानच झालि आहेत.
-----
कपल्स रिट्रिट पाहिला. ठिक आहे चित्रपट.
-----

हुड,
जर दावा नसेल तर मग प्रत्येक गाडीचा नंबर अगदी ठरवून यूपीचा करण्याची तरी काय गरज आहे?

आणि तिथे लॉ-ऑर्डरचा प्रश्न असला तरी चित्र बघून निदान थोडी मिळतीजुळती लोकेशन्स शोधण्याइतकं डोकं वापरायला काय हरकत आहे?
मलातरी ते खटकलं.

खटकण्यासारखं आहेच ते यात दुमत नाही.तू मागे लिहिल्याप्रमाणे(एका नेपथ्य काराच्या स्टोरी प्रमाणे) हाडाच्या कलावन्ताला चुकीचे बारकावे देखील बोचणे साहजिक आहे. कारण 'नजर' तयार झालेली असते. पण काही लोकांच्या बाबतीत मेन्दूतली काही बटणे तरी ऑफ करणे आवश्यक असते नाही का? आता चित्रपटाच्या गाण्याबाबत लिप मूवमेन्ट हा प्रकारच गायब झाला आहे. पूर्वी नूतन सारख्या गायकीची जान असणार्‍या अभिनेत्रींच्या गळ्याच्या नसादेखील फुगलेल्या दिसायच्या गाण्याच्या प्रसंगात. जाऊ दे. झालं...

जाऊ दे. झालं...<<
याला पर्याय नाही...
चांगलं कास्टींग असूनही कथा आणि अभिनेते खिळवू शकले नाहीत म्हणून मग हे सगळंच खटकत गेलं असो...

लेख फारच गमतीशीर वाटला मला.
सगळा अ‍ॅप्रोच राज ठाकरेचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे ठरवण्याकडे, फुकटचे भाबडे इमोशनल अ‍ॅन्गल्स लावण्याकडे आहे या लेखाचा.

मुद्दा एवढाच आहे की उत्तर प्रदेशातला ग्रामीण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातला ग्रामीण भाग यात व्हिज्युअली खूप फरक आहे रंग, पोत, वनस्पती, मातीचा प्रकार, घरांची पद्धत सगळंच... तर कथा जिथली आहे तिथल्याप्रमाणेच सगळं दिसलं तर परिणामकारकता वाढते.

वाईच्या माणसाला गोरखपूरचा दाखवल्याने वाईच्या माणसाला वाईट वाटते की नाही हा मुद्दाच यायचा संबंध नाही इथे.

पण केवळ सोयीचं असल्याने ही एवढी मोठी तडजोड केली जाते. प्रेक्षक एवढा थोडंच विचार करतात? कोण एवढं बघतंय? चल जाता है! असं म्हणत प्रेक्षकाचा निर्बुद्धपणा गृहीत धरला जातो आणि गंमत म्हणजे प्रेक्षकालाही प्रॉब्लेम नसतोच.

नी पट्लं. या द्रुष्टिकोनातून फ्लिन्ट्स्टोन्स व फ्लि. इन रॉक वेगास सिनेमे आवड्तात. अटेन्शन टू डिटेल जबरदस्त आहे. आपल्या कडे स्क्रिप्ट चा पत्ता नाही तर बाकी रिसर्च कसला डोंबल करणार हिन्दी वाले.

हल्ली कॉमन थीम असणार्‍या चित्रपटाचेही पन्जाबीकरण झाले आहे ते बहुधा पन्जाबी एन आर आय डोळ्यासमोर ठेवून बहुधा...>> अगदी अगदी. माझा नवरा करवा चौथ ला कड्बा चाउत म्हणत असे. Happy
ते चाळणीतून नवरा बघणे, लेह म्हण्णे, हाय ओ रब्बा करणे, पैरी पौना खास त्या पब्लिक साठीच असते. लै
वैताग येतो ते बघताना.

माय नेम इज खान चे प्रमोशन बघुन कान किट्ले डोळेविट्ले. करण जोहर ला माझा शाप आहे.

माय नेम....... ते प्रोमोज पाहुनच इतका वैताग तर फुल दोन अडीज तास काय होईल माणसाचे??? मामी, मलाही घ्या लिस्टम्ध्ये, माझाही शाप....

माझा पण शाप.. कध्धीचा दिलाय पण अजून काही म्हणजे काही होत नाही मेल्याचं....

होणार होणार.... कृष्णाला पण शिशुपालाचे १०० अपराध होईपर्यंत वाट पाहावी लागली.....

आणि माय नेम....... च्या निमित्ताने अजुन भरपुर लोक यादीत सामिल झालेत...

नीरजा, तुझी इश्कियामधल्या पार्श्वभुमीबद्दलची मते अगदी पटली. असे काहीतरी चुकीचे बघत असताना तुला जेवताना घासाघासागणिक खडे आल्यासारखे वाटले असेल.... Happy

मीही इश्किया पाहिला. मला तसा आवडला पण थोडा विस्कळीत वाटला. काही काही गोष्टी आपल्याला समजुन घ्याव्या लागतात मुद्दाम, दिग्दर्शकाने सरळ सोडुन दिल्यात...

मला अनेक सीन्स वेगळे वेगळे आवडले पण ते सोडता खूप ठिकाणी 'अरे काय?का?' असं होत होतं. Happy
विद्याधर वर्माचं काम केलेल्या नटाचं नाव काय? तो मस्त आहे. सुरूवातीचे सीन्स आणि सापडल्यानंतरचा सीन मस्त केलाय पण शेवटच्या सीन मधे माती खाल्लीये त्याने.

तुला जेवताना घासाघासागणिक खडे आल्यासारखे वाटले असेल.... << असं खूप सार्‍या सिनेमांच्यात होतं गं.. क्या करे.. Happy

माझा पण शाप.. कध्धीचा दिलाय पण अजून काही म्हणजे काही होत नाही मेल्याचं....

>>>
का.शा.गु.म. ना.! Proud Proud Proud

माझा पण शाप.. कध्धीचा दिलाय पण अजून काही म्हणजे काही होत नाही मेल्याचं.... Happy

नीरजाने म्हणल्याप्रमाणे लहान लहान गोष्टींनी किती फरक पडतो. 'उत्सव' (तोच रेखाचा) मध्ये एक गाणे आहे - 'मेरे मन बाजे' त्यात सगळ्या माणसांना पिवळ्या रंगाचे कपडे दिले आहेत costume designer ने - अर्थात हे मला चंदेरी मधला लेख वाचल्यावर जाणवले होते. असे का केले? तर ते गाणे वसंत ऋतुच्या काळातले आहे (गाण्याची चाल पण त्यानुसारच बांधली आहे लक्ष्मी-प्यारेंनी) आणि त्या काळात पिवळ्या रंगाचे साम्राज्य असते निसर्गावर. त्याकरता म्हणूनच त्यांनी तो रंग निवडला. इतका विचार करणारे कलाकार असतात तेंव्हाच उत्कृष्ठ कलाकृती घडते. नाहीतर आहेतच आपले खानचाचा - सब घोडे बारा टके वाले!

उत्सव संपूर्ण व्हिज्युअल डिझाइनच्या बाबतीत मास्टरपीस आहे. हॅटस ऑफ टू जयू आणि नचिकेत पटवर्धन. म्हणून तर रेखा ही रेखा न दिसता वसंतसेना दिसते.. तिच्या कपड्यांना ग्लॅमर आहे पण ते रेखाचं/ बॉलिवूड अभिनेत्रीचं नाही तर वसंतसेनेचं...
तोच मौर्यपूर्व काळ असलेली अशोका मात्र तद्दन बाजारू आणि भुक्कड दिसते.

चल जाता है! असं म्हणत प्रेक्षकाचा निर्बुद्धपणा गृहीत धरला जातो >>> अगदी अगदी. थोडं बाफच्या विषयाशी विसंगत आहे,पण लिहिते.
'शौर्य' बर्‍याचजणांनी बघितला असेल. त्यात जावेद जाफरीचे जे घर दाखवले आहे, ते बघून आम्ही थक्क झालो. अशी घरं मिळतात मेजर्सना? आम्हांला तर नाही मिळालं कधी? अशी मोठी घरं असतात पण ती वरच्या पदावरील ऑफिसर्सना मिळतात. पण तीही एवढी well furnished नसतात.
दुसरी गोष्ट, जावेद जाफरी आपल्या प्रेयसीबरोबर त्या घरात राहताना दाखवलाय. रात्री ते एकत्र झोपताना दाखवलेत. आणि मज्जा म्हणजे कोणीच काहीही हरकत घेताना दाखवले नाहीये. Uhoh आर्मीत जर असं काही घडलं तर त्या ऑफिसरचे काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
मिनिशा सरळ मनाला येईल तेव्हा आर्मी कॅम्पसमध्ये शिरते, चौकशी करते, तेही श्रीनगर कॅण्ट मध्ये? जिथे प्रत्यक्ष ऑफिसरलाही आपली पुर्ण ओळख पटवून मगच आत प्रवेश मिळतो, तिथे? हद्द आहे.

मग जे प्रत्यक्षात कधीच घडत नाही, ते चुकीचे प्रसंग का दाखवायचे?
हे एक उदाहरण झाले, पण असे बरेचदा होते. जेव्हा असे काहीतरी मुर्खासारखे दाखवले जाते, तेव्हा खूप राग येतो.

परंतू शौर्य मधील के के मेनन च्या अभिनयासाठी एकवेळ हा चित्रपट पहायलाच हवा. खास करून शेवटच्या कोर्ट रूम मधील सीन साठी.

काल तूनळी वर ५ रुपये देऊन स्ट्राइकर बघितला. एकदा बघायला ठीक आहे. सिद्धार्थ ने कॅरमचा खेळ सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात येते. मध्यंतरापर्यंत ठीक आहे पण शेवट एकदम पटकन केलाय.

प्रेक्षकालाही प्रॉब्लेम नसतोच. >>>> मला एक कळत नाही इथे सामान्य प्रेक्षकाला दोष का दिला जातोय ? व्हिजुअल डिझाईन हा माझ्या* अभ्यासाचा विषय नाही की व्यवसायाचा भाग नाही. मी वाईला गेलेलो नाही आणि गोरखपुरला पण नाही वास्तवीक माझं खेडेगावात इतकं वास्तव्यच नाही की नुसतं चित्रपटात (ते ही पात्र, कथा, संवाद, संगीत ह्याच्या पलिकडे) पाहून मला समजेल की ते उत्तर प्रदेशातलं आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं की आणखीन कुठलं. तुम्हाला ह्या गोष्टी खटकल्या कारण तुम्ही त्या दृष्टीने चित्रपट माध्यमाकडे पाहू शकता कारण तुमचा तेव्हडा अभ्यास आहे आणि तो तुमचा व्यवसाय आहे.
प्राची, तुम्ही दिलेलं एक उदाहरण तुम्हाला खूप पटलं कारण तुमचा त्या क्षेत्राशी जवळून संबंध आलेला आहे. मला माहितच नाही की मेजरला कसं घर मिळतं तर मी त्याच्यावर आक्षेप कसा काय घेणार?

मी आयटी मधे काम करतो त्यामुळे एखादं application बघून म्हणतो ह्यात हे हे design issues आहेत.. म्हणून मला ते आवडत नाही पण तुम्हाला एक सामान्य user म्हणून ते आवडू शकतं कारण तुम्हाला त्याच्यात design issues आहेत हे कळणार नाही.. कळायचा प्रश्न नाही.. शेवटी एक अनुभव म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत असतील तर तुम्हाला त्यातले design issues कसे दिसत नाही असं मी म्हणू नये.

Perfection ची अपेक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून जर चित्रपटातल्या गोष्टी इतक्या बारकाईने बघण्याची आणि समजून घेण्याची माझी कुवत नसेल आणि मुख्य म्हणजे कथा, अभिनय, संगीत, कलाकार आणि एक संपूर्ण अनुभव ह्या पलिकडे इतक्या तपशीलात शिरण्याची मला गरज वाटत नसेल तर त्यावर तुमचा आक्षेप असणं चूकीचं आहे असं मला वाटतं. मागे एकदा क्लासेस आणि मासेस ह्यावर चर्चा झाली होती. तसा हा चित्रपट आमच्यासारख्या मासेस साठी आहे असं समज.. Happy

* - इथे "मी" हे प्रातिनिधीक आहे.

उत्सव खरेच मास्टरपीस आहे. त्यात रेखाचे दागिने वा वा. खूप शोधून मला कट्क मध्ये ती कानामागे लावते तसे फूल असते तशी अंगठी मिळाली आहे. त्यांनी वेजिटेबल डाइज वापरले होते कपड्यांसाठी. ब्राह्मणीचे कपडे, रेखेचे कपडे सर्वच बघण्यासारखे. त्याचे संगीतही अप्रतीम आहे. आता वीकेंड्ला परत बघणार. प्रेमदिवसा निमित्त.

शौर्यबाबत अनुमोदन. तसेच लक्ष्य मध्ये पण खूप त्रुटी आहेत. अगदी साधे, सीनीअर ऑफिसरच ड्रायवर च्या शेजारी बसतो. प्रविणपा, शौर्यमध्ये सुरुवातीला राहुल बोस एका जंप बद्दल बोलत असतो व ग्रॅविटी डिफाय केली असे म्हणतो. लगेच एक आंटी ग्रॅविटी, मुझे मालूम है मैने ग्रिहशोभिका मे पढा था इससे स्किन खराब होती है इसलिये हमे पनीर क्रीम खाना चाहिये वगैरे चालू करते व राहुल चा चेहरा पड्तो. अतिशय मस्त विनोद आहे तो. केके चा अभिनय मस्त आहे. तो म्हणतो ना अपनी चाय खतम करके जाना तो पूर्ण संवाद छान आहे. शेवट्चा पण. अगदी काटा येतो. मी १५- २० वेळा पाहिला आहे. ( राहुल बोस यू नो Happy ) मिनिशा ही स्त्री फक्त बघणे बल असून तिचे बोलणे सहन होत नाही, सापासारखे फुत्कार टाकत बोलते.

एक लास्ट नोटः दीवार मध्ये अमिताभ आइ व भाउ देवळात जातात ते परत येइपरेन्त बाहेर थांबलेला असतो मग तो कामाला जाणार असतो. त्याच्या हातात एक चपटा स्टील चा ड्बा आहे लंच चा हे फार अक्युरेट आहे. आजच्या बॅग बास्केट ट्परवेअर टिफिन्सक्राउड्ला ते समजणार नाही. पण एके काळी असेच ड्बे लोक नेत असत. परवा मला तसला ड्बा भेट्ला तर मी आनंदाने आणला व घरी शेअर करायचा प्रयत्न केला ( आइ वेडी आहे असे लूक आजकाल जास्त मिळतात मला!) मी तो कपाटात ठेवला आहे. गाण्यांच्या वही बरूबर.

मामी, त्या शॉट नंतर तो व शशी कपूर वेगवेगळ्या रस्त्याने कामावर निघून जातात तो ही मस्त आहे ना?

मला एक कळत नाही इथे सामान्य प्रेक्षकाला दोष का दिला जातोय ?<<
प्रेक्षकाला दोष द्यायचा नाहीये. प्रेक्षकाची व्हिज्युअल सेन्सिबिलिटी किंवा चित्रपटासंदर्भाने चांगल्या दर्जाबद्दलचं एक्स्पोजर हे मर्यादीत ठेवण्यासाठी निर्मातेच जबाबदार आहेत. कारण ते त्यांच्यासाठी सोयीचं आहे.

>>व्हिजुअल डिझाईन हा माझ्या* अभ्यासाचा विषय नाही की व्यवसायाचा भाग नाही.
मला माहितच नाही की मेजरला कसं घर मिळतं तर मी त्याच्यावर आक्षेप कसा काय घेणार?<<
तुम्ही आक्षेप घेतला पाहीजे किंवा नाकारलं पाहीजे ही अपेक्षा नाहीचेय माझी. दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना 'चलता है!' प्रकारचं गृहीत धरणं याबद्दल आक्षेप आहे.

>>शेवटी एक अनुभव म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत असतील तर तुम्हाला त्यातले design issues कसे दिसत नाही असं मी म्हणू नये.<<
सॉफ्टवेअरमधले डिझाइन इश्यूज आणि इथले डिझाइन इश्यूज ह्यांची तुलना नाही होऊ शकत. चित्रपटातले डिझाइन इश्यूज हे अनुभवावर परिणाम करणारे असतात. पण अनुभवाची उच्च तीव्रता (इन्टेन्सिटी) आपण अनुभवलीच नसेल तर आपल्याला कसं कळेल की अनुभवाच्या पातळीवर अमुक एक कलाकृती कमी पडते?
मेजरला जसं घर मिळतं तसं दिसण्याने, उत्तर प्रदेशातली कथा दिसतानाही उत्तर प्रदेशातलीच दिसल्याने निश्चितच परिणामकारकता वाढते. अनुभवाची पातळी वाढते.
ती परिणामकारकता आपल्याला माहीत नसते किंवा हिंदी सिनेमा आहे तो तेवढाच असा प्रेक्षकांचा दृष्टीकोन असतो. ते मला पटत नाही. माझा पूर्ण आक्षेप निर्माते दिग्दर्शकांच्या ह्या सरकवणे वृत्तीला आहे.

>>मागे एकदा क्लासेस आणि मासेस ह्यावर चर्चा झाली होती. तसा हा चित्रपट आमच्यासारख्या मासेस साठी आहे असं समज.. <<
तेव्हाही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की हे क्लासेससाठी, मासेससाठी असं काही नसतं. चित्रपट प्रामाणिकपणे, काटेकोरपणे केलेला असतो किंवा नसतो. प्रामाणिकपणे केलेली कलाकृती मासेस ना नको असते, दर्जा नको असतो असं अजिबात नाही. आणि मासेसला आवडलेली कलाकृती ही कलाविष्कार नसतेच किंवा तिला दर्जा असूच शकत नाही असंही काही नाही.

परत एकदा माझ्या एका प्रोफेसरचं महत्वाचं वाक्य.. Audience can not read it, but they can feel it.
या फील इट साठी करणार्‍याने काम करणं गरजेचं असतं.

वा नीधप, अश्विनीमामी! सुंदर लिहिलत.

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मलाही खेड्याचा महाराष्ट्रिय लूक आहे हे लक्षात आलं ( फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने ते खटकलं असं लिहित नाही). वर पग्या किंवा प्राची म्हणताहेत तसं खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत. त्यांना दोष देण्यात अर्थ नसतो.
पण नीधप म्हणतेय तेही खूप महत्वाचं आहे. 'चित्रपट का आवडला' हे इथे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

जसं वर लिहिल्याप्रमाणे उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) टिपला गेला की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते. लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे. मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

दुर्दैवाने अश्या सगळ्या चांगल्या प्रयत्नांना क्लासेस साठीचं लेबल लावून आपला गोंधळ हव्वा तसा घालण्यासाठी निर्माते/ दिग्दर्शक तयार असतातच.

नीधप मी चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स) असा वेगळा धागा उघडला आहे. वरचा बराचसा भाग तिथे टाकला आहे कॉपी पेस्ट करुन. खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे. या अनुषंगाने पुढची चर्चा तिथे झाली तर चांगलं होईल असं वाटतं.

Pages