चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ इडीयट्स पाहीला, सो-सो आहे, काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण बर्याच जागी पटकथा ढेपाळते.
बाकी आमीर मस्त... बोमन इराणी च्या करेक्टर ला कॉमेडीयनचं स्वरुप असल्यामुळे थोडी ओवर ऍक्टींग झाली आहे... (माझे मत)

anky, Oscar मस्तच आहे. पण "धोबीपछाड " जास्त मस्त आहे. ते म्हणतात ना, " प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट " का काय ते, त्या टाईप.

३ इडियट्स. - मला हे पुस्तक आवडले होते फाय पाँईट समवन जेव्हा वाचले तेव्हा. त्याला बरीच कारणे कारण रँगींगचे किस्से आत्याभावाकडून एकलेले IIT चे तो तिथे होता तेव्हा. तो बराच मोठा होता माझ्यापेक्षा तेव्हा लहानपणी मला ते किस्से एकून मला एकदम तो हिरो वाटायचा.

मूवी देखील आवडला टाईमपास वाटला. आता हिंदी चित्रपटात अ व अ थोडेफार असणारच. पण बर्‍यापैकी बरेच मुद्दे हाताळले एकंदर शिक्षण पद्ध्तीचे. ह्याच्यापेक्षा कितीतरी बत्तर मूवी आहेत व ते गाजलेत. एक आठवडा झाला तरी थियटर गच्च भरलेले. आम्हाला वाटलेले उशिरा पहातोय, त्यात थंडी आहे म्हणून गर्दी नसेल पण लोकं पहिल्या रो मध्ये पण बसलेली.

दहा वर्षापुर्वी engineering and medicine वर बर्‍याच जणांचा तरी ह्यावरच जोर असायचा/होता. आता माहीत नाही काय आहे भारतात सीन.

३ इडियट्स- चांगला आहे..आमिरसाठीच पाहिला..
मुन्नाभाई स्टाईल वाटला...
काही डायलॉग आवडले..त्यापैकी.. मै तो आपको ये पढा रहा हू के पढाते कैसे है.. Happy

एकंदर पैसा वसुल..

चेतन भगत आणि विधू विनोद चोप्राचा वाद वाचला. चित्रपटही पाहीला. पुस्तक वाचले नाही ते छानच झाले. न वाचण्याचे खरेब आणि प्रामाणिक कारण म्हणजे एकतर ते इंग्लिशमधे छापलेय, दुसरे म्हणजे असे काही पुस्तक बाजारात आहे ही गंधवार्तादेखील नव्हती... तर सांगायचा मुद्दा म्हणजे अज्ञानात सुख असते !
राजकुमार हिरानीची शैली आता ठरून गेलेली आहे. अगदी सुरूवातीला भन्नाट असा सीन सादर करून प्रेक्षकांच्या डोक्याचा ताबा घ्यायचा आणि मग त्याने ठरवायचे या डोक्यात काय काय घालायचे ! पहिल्या पाच मिनिटांतच दिग्दर्शकाचा आणि प्रेक्षकांचा असा अलिखित करार झालेला असतो.
मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाची छाप जाणवतेच आणि का असू नये ? दिग्दर्शकाला कम्फर्टेबल वाटेल अशा साच्यात त्याचे सादरीकरण झाल्याशिवाय भट्टी जमणे शक्य नाही आणि कळविण्यास आनंद वाटतो कि इथे भट्टी अत्यंत सुंदर जमलेली आहे..
चित्रपट या माध्यमावरची हिरानीची पकड जबरदस्त आहे.
त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही नायकाकडे फंडू आयडियाज आहे, सिस्टीमला दिलेले आव्हान आहे ..पण बोम्मन इराणीऐवजी दुस-या कुणाला संधी द्यायला हवी होती असे वाटते. त्यामुळेच मुन्नाभाई एमबीबीएस आठवत राहतो. राजू रस्तोगीला नोकरी मिलू नये म्हणून स्वतः पेपर सेट करणे हा प्रकार मुन्नाभाईचा रिमेक वाटला

३ इडियट्स-- आमिर खान आवड्तो पण आचरट वाट्ला मला तो सिनेमा..
कामं छान आहेत. मध्यवर्ति कल्पना पण छान होती पण हाताळणी फारच भड्क आहे . आणि त्यामुळे एकुण पण फारच लाउड वाट्ला ..

काल, इफ ओन्ली, नावाचा एक सिनेमा बघितला. आधी नाव वाचल्याचे आठवत नाही, कलाकारही ओळखीचे नव्हते. सिनेमा २००४ चा आहे.
पण कथा जबरदस्त आणि पटकथा खूपच प्रभावी. एक प्रेमातले जोडपे. ती एक वादक. एका दिवशी विचित्र घटना घडत जातात. त्या दोघांच्यात थोडा वाद होतो. ती रात्री ११ वाजता, एकटीच टॅक्सीने निघून जाते. त्याच्या डोळ्यासमोरच तिला अपघात होतो. हॉस्पिटलमधे ती मरते.
तिच्या आठवणी काढत असतानाच, त्याच्या शेजारी त्याला ती दिसते. तो भूत बघितल्यासारखा घाबरतो. मग त्याच्या लक्षात येते कि ते स्वप्न होते. पण दुर्दैवाने घटना तश्याच घडत जातात. तिला आनंदी ठेवण्याच्या तो अटोकाट प्रयत्न करतो. पण तीच रात्रीची ११ ची वेळ, तिच टॅक्सी, तसाच अपघात पण !!!
मिळाला तर अवश्य बघा. यूट्यूबवर गाणी आहेत.

नो एंन्ट्रि मध्ये शेवटि सगळे एकमेकांना लटकतात. काहितरिच.

दे दणा दण मध्ये पण. काय तो शेवट. एका बिल्डिंगवरच्या टाकित एवढ पाणि असत??

इफ ओन्ली बाजारातही अव्हेलेबल आहे.

तसाच थोडाफार पी.एस. आय लव्हयू आहे. पुस्तकावरून पिक्चर काढलाय आणी तो सह्ही आहे.

प्लीज नोट: पुस्तक इंग्रजीत आहे Proud

हो. पुस्तकावरूनच तर सिनेमा निघालाय ना.

मी आधी सिनेमा पाहिला ज्याम आवडला मग पुस्तक विकत घेतलं. मग काय परत एकदा सिनेमा पाहिला Proud आता सिनेमा उपलब्ध झाला की विकतच घेईन म्हणतो.

पी. एस. हिलरी ज्याम गोड दिसते Happy

इफ ओन्ली >>यावरून एक भुक्कड हिंदी मूव्ही आलेला..
इफ ओन्ली बघायची इच्छा आहे..
कदाचित आधीच चर्चा झाली असेल - पण श्वशांक रिडम्प्शन, डेव्हिल वीअर्स प्रादा नुकतेच पाहिले - आवडले..
कॅच मी इफ यू कॅन बघताना नवरा म्हणत होता 'अती दाखवतायत. तुला हिंदी पिक्चर मध्ये असं दाखवलेलं नाही चालत, ईंग्लिश कसं चालतं - इत्यादी'
आणि नंतर विकी केल्यावर कळलं की हा सत्यकथेवर आधारित आहे!
@सायकोट - अगदी अगदी - फार भडक वाटला मलाही ३ इडियटस.. आणि आणखीन कुणाचा असता तर मी विचारही नसता केला त्यावर. पण आमिरनं पण मसालापट करावेत! वाईट वाटलं जरा..
प्रचंड पकला आमच्या आख्ख्या ग्रुप ला...

अलिकडे लोकप्रभा मधे जून्या इंग्रजी सिनेमाबद्दल छान लिहून येते. भारतात राहणार्‍याना ते मिळवून बघणे शक्य आहे.

दुल्हा मिल गया

या ना त्या कारणानी रखडंत गेली चार वर्ष हा सिनेमा बनत होता, पण एकूणातच हा सिनेमा वीसेक वर्ष उशिरानी आलाय... लेट ८० मधे आला असता तर सुपरहिट झाला असता... पण आजच्या टाइमफ्रेम मधे फारच घेसा पिटा आणि त्यामुळेच अतिशय प्रेडिक्टेबल असा हा सिनेमा...
बघताना एकूणच रखडल्याचे साइड इफेक्ट्स जाणवतात...
दिग्दर्शन, बहुसंख्य पात्रांचा अभिनय(?), पटकथा-संवाद, सर्वच बाबींमधे एक प्रकारचा पाट्या टाकणे अ‍ॅटिट्यूड दिसतो...
पण या सगळ्यात दोनच गोष्टी हा सिनेमा तारून नेतात... सुश्मिता सेन चा परफॉर्मन्स आणि शाहरुख खान चा चार्म... सुश चा रोल हा जणुकाही तिच्या रिअल लाईफ कॅरॅक्टरचाच आहे... त्यामुळे तिनी व्यवस्थीत निभाऊन नेलाय... एसआरके चा एक्स्टेंडेड गेस्ट अ‍ॅपिअरन्स आहे आणि त्यात तो पूर्णपणे भाव खाऊन जातो... बर्‍याच दिवसानी ललित नी (जतिन ललित पैकी) शाहरुख साठी अनुप कुमार चा आवाज वापरून बनवलेलं दिलरुबाओंके जलवे गाणं एकदम ढिन्च्यॅक झालंय... इतर गाणी लक्षात पण रहात नाहीत...

कधी टीव्हीवर किंवा प्लेन मधे दिसला तर एन्जॉय करा... तिकिट काढून बघायचा विचारही मनात आणू नका...
माझ्याकडून ५ पैकी १.५ तारे

>>>>>>शाहरुख साठी अनुप कुमार चा आवाज वापरून बनवलेलं दिलरुबाओंके जलवे गाणं एकदम ढिन्च्यॅक झालंय
अरे अमितकुमार रे Happy

प्यार इम्पॉसिबल

गीक मीट्स गॉर्जियस थीम ची मोस्ट ऑब्वियस गोष्ट जी ४-५ सिनेमांचा अनुभव असलेला कुणीही सहज प्रेडिक्ट करू शकेल...
उदय चोप्रा- लेखक {याला लिहिता येतं ???}, अभिनय {हे येत नाही हे वारंवार सिद्ध झालंय}
जुगल हंसराज- दिग्दर्शन {अ‍ॅक्टिंगबरोबर हेही याला जमत नाही हे हा सिनेमा सिद्ध करतो}
प्रियांका चोप्रा / डीनो मोरया- अभिनय {चोप्रा लोकांनी पैसा मोजला की जाऊन पाट्या टाकायच्या हे यांचं काम}
अशी सर्व विभागात बोंब असल्यानी एंड प्रॉडक्ट बकवास निघालं यात काय नाविन्य...

बापाकडे पैसा आहे म्हणून उदय चोप्रा ला अशा किती संधी मिळणार आणि लोकांना किती मनस्ताप सहन करावा लागणार आहे कोण जाणे...

तेंव्हा तिकीट काढून चोप्रांचा सिनेमा पहाण्याआधी जरा परत विचार करा... तुम्ही इंडायरेक्टली उदय चोप्राचा पुढचा सिनेमा फायनान्स करत असाल...

माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा
हा सिनेमा खरंच इंपॉसिबल आहे...

बापाकडे पैसा आहे म्हणून उदय चोप्रा ला अशा किती संधी मिळणार>> पैसा संपेपर्यंत Proud तू बघतोसच का असे फाल्तू पिक्चर?
माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा अरे मायनस मध्ये तारे दे मी५ देईन :०

तू बघतोसच का असे फाल्तू पिक्चर?
>>
व्यसन...

मायनस मध्ये तारे दे
>>
नको... स्केल मधे राहिलेलं बरं असतं...
नाहीतर वरचे खूप वर, खालचे खूप खाली रहातात...
आणि उगाच स्केल वाढवण्यातही पॉइंट नाही...

ओह बरे झाले मी $१० वाचवले व झोप घेतली लव इम्पॉसइबल बघण्याएवजी. मी तिकिट घ्यायलाही गेले मैत्रीणीबरोबर, खिडकिवर बसलेल्या स्पॅनिश बाईला विचारले हॉउस्फुल आहे का? तिने चेहर्‍याची रेष न हलवता म्हणाली 5 people are there. how many tickets.. म्हणत हात काढला बाहेर. मी म्हटले.. थांब आलेच. मैत्रीण ..अरे क्या हुवा.. चल जाते है. Happy

लोकसत्ता मध्ये भन्नाट परिक्षण आलंय प्यार आजकल चं.
म्हणे, उदय चोप्रा हसतो, रडतो, गातो, नाचतो. पण तो जे काही करतो त्याचा प्रेक्षकांना फक्त त्रासच होतो Wink

उदय चोप्राने काय सर्जरी केलीय चेहर्‍याची? पहिल्यासारखा तो 'घोडाचेहरा' वाटत नाही. Happy
त्याच्या चेहर्‍याचा आकार पाहून आम्ही त्याला घोडा म्हणायचो. Proud

उदय चोप्रा: तुषार कपूर नंतरचा एकदम दुर्दैवी नट, बापाचा हात( व पैसा) पाठिमागे असूनसुद्धा. (अभिषेक जरा सावरलाय)..

सैल म्हणून मराठी चित्रपट पाहिला.
मोहन जोशी आणि रीमा लागू.
जास्त नाटकासारखा आहे (म्हणजे चित्रपट माध्यमाचे सगळे फिचर्स वापरले नाहियेत)
पण आवडला मला. रिअ‍ॅलिस्टिक आहे.

प्यार आजकल
>>
प्यार इंपॉसिबल आहे ते...

लव्ह आज कल गेल्या वर्षीचा सैफ-दीपिका असलेला इम्तियाझ अलीचा सुपरहिट...

मागच्या काही दिवसांत पाहिलेले:
१. Hangover - अगदी हसून लोळवत नाही, पण बर्‍यापैकी कॉमेडी आहे. Men's comedy प्रकारातील आहे तेव्हा त्याच अपेक्षेने बघा.
२. 500 Days of Summer - आधी अगम्य वाटला पण शेवट छान आहे. विनोदी-बिनोदी नाही. रोमँटिक ड्रामा कॅटेगरी म्हणता येइल कदाचित. शेवट मात्र चांगला आहे. एक गाणे आहे ते बघताना तर करण जोहरचा चित्रपट असून आपण शाहरूख्/शाहिद्/सैफ कोणाला तरी बघत आहोत असे वाटते.
३. Maiden Heist - बरा आहे. त्या तिघांची कामे खूप मस्त आहेत.
४. The Goods, live hard sell hard - ठीक ठीक आहे. एक दोन शॉट चांगले आहेत.

बाकी In the Loop बद्दल स्वतंत्र लिहीलेच आहे. तसेच Food, Inc बद्दल ही लिहीतो जमले तर. तो ही जरूर बघा.

Pages