चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नॅच लै भारी शिणुमा आहे... किल बिल फकस्त हाणामारीसाठी आणि बिल साठी बघायचा Happy द मॅन व्हू कॉपीड नावाचा एक ब्राझिलिअन पिक्चर सिनेमा बघितला.. मस्त होता.. आणि थँक्यु फॉर स्मोकिंग पण मस्त आहे..

काल टीव्हीवर होता म्हणून अ‍ॅपोकॅलिप्टो बघितला. मायन कल्चरबद्दल डीटेलमध्ये बघायला मिळेल असे वाटले होते. पण हिंसेचा ओव्हरडोस आहे. आणि ज्या शॉट्स मध्ये मायन पिरॅमिड्स इ. दाखवलेले आहे त्या शॉट्स मध्ये इतकी हिंसा आहे की पिरॅमिड्स कडे लक्ष जातच नाही.

आता कुठलातरी हलकाफुलका आणि विनोदी शिणुमा बघायला लागेल......

रेडियो...

अ‍ॅज एक्सपेक्टेड बकाल सिनेमा...
तीनही मुख्य पात्रांचा भंजाळलेला, अभिनयशून्य वावर... अत्यंत संथ वेगानी सरकणारं कथानक... सो कॉल्ड मॉडर्न रिलेशनशिप्स चं कनफ्यूज्ड कथासूत्र... आणि काडीचीही रंजकता आणण्यास पूर्णपणे असमर्थ ठरलेला दिग्दर्शक...

त्यातल्या त्यात हिमेश चा इंप्रूव्ह्ड लूक आणि बदललेला आवाज या त्यातल्या त्यात सुसह्य बाबी...

आजीबात पाहिला नाहीत तरी चालेल...

माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा... (अगदीच शून्य नको म्हणून)

त.टी.- स्वतःला टॉर्चर करून घेण्यात आनंद मिळतो ती डिसऑर्डर मला झाली आहे असं नी म्हणते... आताशा मला हे पटायला लागलंय... Wink

अजब प्रेम की गजब कहानी पाहीला. कॅतरीनाचे संवाद खटकतात, पण रणबिर भाव खाऊन जातो. एक हलकाफुलका मजेशीर चित्रपट. गाणी तर छानच आहेत.

विकांतात अप नावाचा सिनेमा पाहीला.. खुपच सुंदर.. लहानमुलांसोबत मोठ्यांनीही आवर्जुन पहावा असा... कथा अफलातुन आणि कुठेही प्रेडिक्टेबल होत नाही.. खुपच मस्त...

मित्रांनी खूप तारिफ केली म्हणून अप ची ब्लू रे डि वी डी विकत घेतली, मला अजिबात आवडला नाही. अ‍ॅनिमेशन चांगलं आहे आणि ब्लु रे ची क्लॅरिटी सुद्धा आउट्स्टँडिंग, पण ९६ मिनिटे मला तरी डोक्याला ताप वाटला. बहुतेक अ‍ॅनिमेशन पट च्या लायकीचा मी नाही Happy
ट्रॉय सुद्धा ब्लू रे डि वी डी वर पाहिला. मस्त मजा आली. ३ तासाचा चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा येत नाही. हिंसाचार आवडत नसेल तर मध्ये मध्ये डोळे बंद करून घ्या, पण चित्रपट चुकवू नका. (जुना चित्रपट आहे, पाहिलाही असेल सर्वांनी. लहान मुलांसमवेत बघण्याची चूक करू नये).

'अप' खरं म्हणजे खुपच सुंदर आहे. आजी-आजोबांची सुरुवातीला जी लवस्टोरी दाखवतात ती बघुन डोळ्यात पाणी येतं.

विकांतात 'द ब्लेअर विच प्रॉजेक्ट' पाहिला. कुणी पाहिला नसेल तर जरुर पहा. अत्यंत ओरिजिनल,एकदम वेगळा हॉररपट. तीन कॉलेज विद्यार्थी चेटकीणीच्या दंतकथेचा अभ्यास करायला जंगलात शिरतात आणि एकएक करत कायमचे गायब होतात एवढीच कथा आहे पण त्याची मांडणी अफलातून आहे
अशा सिनेमात पार्श्वसंगिताचे महत्व प्रचंड असते, कधिकधी तर त्याचा अतिरेक होऊन सिनेमा हास्यास्पद होतो. या सिनेमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे पार्श्वसंगिताचा पूर्ण अभाव आणि तरीही आपल्याला वाटणार्‍या भितीत काही कमतरता येत नाही. जंगलात नैसर्गिकरित्या येणारे आवाज, पात्रांच्या चालण्याचा,हालचालींचा आवाज एवढाच साऊंड इफेक्ट आहे.
दुसरा भारी प्रकार म्हणजे सर्व सिनेमा डॉक्युमेंटरी स्टाईलने हँडहेल्ड कॅमेर्‍याच्या मदतीने आपल्याला दिसतो.हा कॅमेराही कुणा चौथ्या व्यक्तीच्या हातात नसून सतत तीन पात्रांपैकी एकाकडे असतो,त्यामुळे 'कुणीतरी बघतेय' हा जो भयनिर्मितिचा नेहमीचा फंडा आहे तो ही इथे नाही.
'भय बॉबच्या स्फोटात नसून त्याच्या प्रतिक्षेत आहे' हा हिचकॉकचा विचार सार्थ करणारा सिनेमा.

नमस्कार लोक्स.........
"पा" पाहिला..........
अप्रतिम....... एका छोट्या मुलाची(ज्याचं शारिरिक वय त्याच्या मानसिक वयापेक्षा ३-४ पटीनं जास्त लवकर वाढतं..... प्रोजेरिया नावाच्या आजारामुळं.......) गोष्ट आहे ही....
त्याचं भावविश्व अमिताभनी खूप सुंदर साकारलयं........ Once again hats off to him!!!!!!!!
विद्या, अभिषेक दोघांचाही अभिनय आवडला.......
पण सर्वात जास्त भावला तो अमिताभ.......... त्यानं साकारलेला AURO......
छान आहे मूव्ही...... पहावी अशी......

रॉकेट सिंग : सेल्स्मन ऑफ द इयर

एक छानसा इमानदार चित्रपट...
एका अतिसामान्य शैक्षणिक पात्रता असलेल्या आदर्शवादी तरुणाची कहाणी...
जयदीप सहानी ची झटाक पटकथा आणि शिमित अमीन चं फटाक दिग्दर्शन हे याचे मेन प्लस पॉईंट आहे... यशराजचा सिनेमा असूनही सिनेमा कुठेही फारसा चकाचक नाही... सिनेमात गाणीही नाहीत...
रणाबीर कपूर आणि त्याच्या सहकार्‍यांच्या टीम नी (यात गौहर खान सुद्धा आहे) खूप छान काम केलंय...
रोजच्या जगातली, आपल्या आजूबाजूला वावरणारी पात्रं आपल्याला यात दिसतात... कुणीही उगाच जास्ती लार्जर दॅन लाईफ वगैरे नाहीये...
अर्थात चकदे आणि याची तुलना करण्यात काहीच अर्थ नाही... चकदे हा शिमित अमीन चा मास्टरपीस होता, पण रॉकेट सिंग पण वर्थ आहे... सुरवातीला थोडा संथ वाटला तरी नंतर पकड घेतो...
रणबीर चं काम सिनेमागणिक झकास होतंय...

वीकेंडला बाकी प्लॅन्स नसतील तर नक्की पहा...

माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे...

रणबीर चं काम सिनेमागणिक झकास होतंय...
>>>> अनुमोदन. माझी लेक तर फॅन आहे त्याची. त्याच्यासाठी बघेन रॉकेटसिंग.

काल मला "Fruits and Nuts"नामक २००९ चा चित्रपट (नाव हि एकल नव्हत) नेट वर सापडला (का?????????????)... हा अती भयंकर प्रकार बघायला लोक थेटरात गेले तर गेले पण तीथे शीणेमाच रे...ग करुन तो नेट वर टाकुन त्यांनी कळ्ळ्स केलाय... हा पाचकळ शीणेमा थेटरा मंदी आलाच कसा Angry ... शीणेमाच्या डिस्टिब्युटर्सला आणि थेटर वाल्यांना मेडिकल चेकअप ला तरी पाठवाव वा जनते पुढे हा भयाण त्रास आणल्या बद्दल शीक्षा तरी करावी!!!

ह्या नावाचा चित्रपट आहे अस ही स्मरणात ठेवु नका, कुणाचा बदला घ्यायचा असेल तरी त्याला हा प्रकार दाखवु नका...ये सजा दुश्मन को भी न मीले !!!!

"पा"हिला..........
अप्रतिम.......
छान आहे मूव्ही...... पहावी अशी......
>>>>>>>>>>>>>>
सहमत ...
कालच "सपरिवार" बघितला AURO - अतिशय आवडला ... ५ पैकी ४

अवांतर
=====
अभिषेक पुढे राजकारणात येणार दिसतंय उदा. आयडिया चे विज्ञापन, गुरु, सरकार १ आणि २, पा ... (पाउले पाळ्ण्यात दिसायला लागले... )

रॉकेटसिंग पाहिला. मस्त हलकाफुलका वाटला. रणबिर आता एकदम ऋषीकेशदांच्या चित्रपटातील हिरो वाटायला लागलाय हळू हळू. चांगले काम केलेय. हा अगदी सिंपल साधा मूवी वाटतो. चकाचक नाही काही नाही. सगळ्यांची कामे छान आहेत.
गिरि मस्त वाटला.

डीस्नीचा प्रिंसेस अँड द फ्रॉग बघीतला. आवडला. ह्या सिनेमाचे अ‍ॅनिमेशन हातांनी चित्रे काढून केलय त्यामुळे डीस्नीच्या जुन्या अल्लादिन, जंगल बुक सिनेमाची आठवण येते मधुन मधुन अ‍ॅनिमेशन बघतांना. बर्‍याच दिवसांनी इतकी गाणी असलेला अ‍ॅनिमेशन सिनेमा बघीतला.
ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले याचे पडसाद इथे पण उमटलेले दिसतात, पहिल्यांदाच डीस्नीने कृष्णवर्णीय राजकुमारी पडद्यावर आणली आहे, तसच सिनेमाची कथा जुन्या राजा राणीच्या काळात न घडता अगदी अलीकडच्या काळात घडलेली दाखवलेली आहे त्यामुळे कथेची नायिका पण नुसती राजमहालात रहाणारी राजकुमारी न दाखवता स्वतःचे स्वप्न पुरे करायला धडपडणारी एक तरूण मुलगी दाखवली आहे.

रॉकेटसिंग पाहिला. मस्त हलकाफुलका वाटला. रणबिर आता एकदम ऋषीकेशदांच्या चित्रपटातील हिरो वाटायला लागलाय हळू हळू.
<< एकदम सहमत !
पार्ले बीबी वर मी पण लिहिलं होत् कि अमोल पालेकर मुव्हिज मस्त करेल रणबीर.
चांगल रोल सिलेक्शन आहे त्याचं, थोडं अभय देओल टाईप .

लव्ह आज कल मधे ऋषि कपुर चा फ्लॅश बॅक दाखवलाय तिथे खरं तर सरदाराचा रोल रणबीरलाच द्यायला हवा होता , सैफ नी मस्त च केलाय पण रणबीर जास्त शोभला असता , मजा आली असती. :).
आणि ओम शान्ति ओम मधला पुनर्जन्म झालेला सुपर्स्टार ओम कपुर चा रोल शाहिद कपुर ला द्यायला हवा होता :).

sas तुझ्याशी सहमत...
मी पण Fruit & Nut बघितला, म्हणजे फक्त अर्धा ....अतिशय बकवास चित्रपट. सायरस , बोमन हि नावे बघून मला वाटले कि चांगला असेल....पण...

मी ऑल दि बेस्ट बघितला. मला तरी आवडला. त्यातले काही जोक्स भन्नाट आहेत एकदम.
उदा. "तुम्हारे पिताजी क्या फोटोग्राफर थे क्या? हमेशा निगेटिव्ह बोलते हो? " Lol
अजब प्रेम कि गजब कहानी आणि वेक अप सिद दोन्ही चित्रपट मस्तच आहेत. रणु ची मी फॅन आहेच आता तर फॅन क्लब पण जॉईन केला. Proud
रॉकेटसिंग बघणारच आता लवकरच. Happy

ईंद्रधनु
मी पण Fruit & Nut बघितला, म्हणजे फक्त अर्धा!!!!! >>> तुमच्या पेशंसला मानाव लागेल मी १० मी. त बंद केला Happy ... टोटल बकवास...

रणू........

Proud रणबीर म्हणजे रणू... ?

मग शाहरुखला काय म्हणता? शाहू...... ??? Proud

काल सकाळी काम लवकर संपले म्हणून उरलेल्या डोश्याच्या पिठाचे आप्पे व उरलेली स्पॅगेटीचा उपमा बनवून टीवीसमोर बसले. तर काय. वूडी अ‍ॅलन दिगदर्शित स्कूप नावाचा धमाल सिनेमा लागला होता. त्यात उत्तम बोनस म्हणून ह्यु जॅक्मन! तो इन्ग्रजी लॉर्ड चा मुलगा असतो व हिर्विण त्याच्यावरील खुनाच्या संशयाची चाचपणी करत असते. ती वूडी ला बाबा बनविते व आपण श्रिमंत अमेरिकन आहोत अशी थाप मारते.
वूडी जादुचे प्रयोग करणारा असतो. सगळे डायलॉग त्याने स्वतः लिहीले असल्याने फारच भारी आहेत.
ह्ह्पुवा. त्यात ह्यु साहेब अक्षी सुन्दर दिसतात. सूट, जीन्स व साध्या कपड्यातही. पूर्ण स्टोरी विकीवर आहे
पण सिनेमाचे स्क्रिप्ट इत्के विनोदी आहे की काय सान्गू. झी स्टुडीओ ला लागतो. जरूर बघा.

वूडी अ‍ॅलनचा हा फार गाजलेला सिनेमा नाही पण तरीही मजेशीर आहे.

लिहायचे कारण म्हण्जे, चविष्ट ब्रेकफास्ट, धमाल डाय्लॉग व उत्तम दर्शन कोणी डिस्टर्ब न करता हा एक
ममी कांचन योगच आहे. त्यामुळे मी कामाची इमेल करायला विसरले.

कधी नव्हे ते मी सिनेमा नवा असताना आणि ह्या धाग्यावर त्याच चित्रपटाची चर्चा सुरु असताना बघितलाय- रॉकेटसिंग. टीपी आहे. एकदा तरी नक्की बघावा.

रच्याकने, मला रणबीरचे त्या तीन हिरोइनी असलेल्या चित्रपटातले काम पण आवडले होते. पहिलाच चित्रपट होता ना त्याचा ? पण इथे लोकांनी लैच नावं ठेवली होती म्हणुन घाबरुन गप्प बसले. कोण बरं ते ? Proud

मी आत्ता जुना म्हणजे जुना जुना (नूतन, अमिताभ चा) 'सौदागर' हा चित्रपट पाहिला... नूतन , अमिताभ चा फक्कड अभीनय, वेगळी कथा असलेला शांत चित्रपट... Happy

अवतार..... कस्ला अवतार काढलाय म्हनुन स्सांगु...... अs गा sss गा sss गा.... फक्त ३ D होता म्हणुन शेवटपर्यंत बसलो... पण मध्येच काही प्रॉब्लेम झाल्यामुळे पाऊस पत्र मिळाल. अजुन एक सिनेमा पहायचं. Happy २D च बघणार असेल तर पैसे वाचवा... परत कधिच हिंदी पिक्चरला नावं ठेवणार नाही... अवतार शप्पथ.... इय्वा...

वेक अप सिड जबरी आवडला. मस्त आहे एकदम. रणबीर कपूर चा मी पूर्ण चित्रपट पहिल्यांदाच पाहिला. तो आणि कोंकणा दोघांचे काम छान आहे. बाकी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा दाखवण्याची पद्धत मस्त आहे.

दोन तीन वर्षांपूर्वी कदाचित या रोल मधे झायेद खान किंवा शाहीद कपूर असले असते Happy

Pages