चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे झाले लिन्क दिलीत. इथे अ सर्टिफिकेट दिले आहे त्यामुळे थेट्रात जाउन नाही बघता येणार.

एकदाचा काल अजब प्रेम बघितला..टाईमपास आहे..रणबीर मस्त्...कत्रीना सुन्दर दिसते बार्बी डॉल सारखी...पण अक्टिन्ग??? किती दिवस तीच हिन्ग्रजी सहन करायच????

'अजब प्रेम कि' आणि 'वेक अप सिद' माहून मला रणबीर कपुर चांगला वाटायला लागलाय, सावरीया भन्सालीचा मधला बावळट बायकी हिरो नाही वाटत अता Proud
अर्थात वडिलां सारखा खतरनाक किस्म का हँडसम नाही पण 'कुछ तो बात है', अ‍ॅक्टिंग एकदम सहज करतो, जबरी पोटेनशियल आहे, पण आजकालाच्या सगळ्या आघाडीच्या अ‍ॅक्ट्रेसेस पेक्षा खूप लहान दिसतो :).

खतरनाक किस्म का हँडसम
>>
कॉपिराईट- लव्ह आज कल... Wink

'अजब प्रेम की " मी पण कालच पाहिला, धमाल आहे.. (ऑल द बेस्ट आणि ब्लु नंतर पाहीला म्हणुन जास्तीच भावला).. मस्त मनोरंजन करणारा विनोदी आणि हलका फुलका सिनेमा म्हणता येइल असा.... रणबीर कपुर मध्ये जाणवण्याईतपत बदल आहे... मलाही पुढ्च्या दारावरचा मुलगा म्हणता येइल एवढा चांगला वाटु लागला आहे तो... कत्रिना बद्दल माझा मत चांगलं आहे..पण चेहर्यावरचे भाव हालतचं नाहीत हो...अगदी मला ती भारतभुषण वाटु लागते ती कधी कधी... Proud पण ती गाण्यामधे खुपचं भावते... मला आवडते हे मात्र खरं... फॉलो मी गाण्यातला रणबीरचा नाच न विसरण्यासारखा (त्या लग्नाच्या पार्टीमधला).. Proud ..नक्की पाहण्यासारखा नक्कीच आहे "अजब प्रेम की"...

काल द प्रपोजल पाहीला... ठिक वाटला... अगदी हिंदी सिनेमा सारखी कथा आणि सुमार अभिनय... काही भट्टी जमली नाहीये... जे सैन्ड्रा बुलक चे पंखे आहेत ते कदाचित पाहु शकतील..

काही दिवसांपुर्वी "प्रिंसेस डायरीज" पाहीला, वॉल्ट डिस्नेच्या अनेक सुंदर सिनेम्यां मधील अजुन एक मस्त सिनेमा..सर्वानी आवर्जुन पहावाच असा..

दे दना दन

बकवास सिनेमा,
आधी किमान ५ वेळा ऐकलेले अत्यंत पाचकळ विनोद, अक्षय कुमार आणि इतर "नेहमीच्या अयशस्वी" कलाकारांनी "नेहमीच्याच अयशस्वी" शैलीत घातलेला सावळा गोंधळ...
प्रियदर्शनच्या सिनेमांची पातळी खाली जात जात पार रसातळाला गेलीये...
एका हॉटेलमधे घडणार्‍या गोंधळांच्यावर गेल्याच महिन्यात 'डू नॉट डिस्टर्ब' आला होता, आता हा आलाय...
उगाचंच ढीगभर पात्रं {काय योग्य शब्द आहे हा...}, त्यांच्या मिस्टेकन आयडेंटिटीज आणि मिसकन्सेप्शन्स... प्रियन अजून कितिवेळा दाखवणारे हेच...
विरासत, हेराफेरी, हंगामा सोडा... गेलाबाजार हलचल आणि भूलभुलैय्या सारखे सिनेमे देणारा तो हाच प्रियन का? असा प्रश्न पडावा इतका वाईट सिनेमा आहे...

हा सिनेमा पहाण्यापेक्षा अडीच तास जर खिडकीत उभं राहून रस्त्यावरचा ट्रॅफिक पाहिलात तरी काहितरी नवीन दिसण्याची आणि मनोरंजन होण्याची शक्यता आहे...
त्यातून जर चुकूनमाकून कुणी पाहिलातंच तर नंतर बोलू नका की सांगितलं नव्हतं...

जर का कुणाला आवडलाच तर कृपया मानसोपचारतज्ज्ञाची भेट घ्या, सामाजिक हितासाठी ते गरजेचं आहे...

माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा (पैसा पैसा गाण्यासाठी)

मी आज अजब प्रेम की गजब कहानी पाहिला. तो लहान मुलान्चा पिक्चर आहे असेच वाट्ते. मारामारी पण कॉमिक. सगळे कॉमिक सारखे २ डी व साधे सोपे आहे. कत्रिनाला सहन करणे दिवसेंदिवस अशक्य होत आहे.
तिने फक्त दिसावे. तो रनबीर च्या गावाचा सेट अगदी बाळ बोध आहे. उपेन पटेल श्वापद अगदी अगदी.
सलमान रनबीर कतरिनाचा मोठा भाउ दिसतो. एक गाणे मस्त आहे पण त्यातील डेप्थ त्या जोडप्याला भावेलच असे नाही. बाकी आयनोक्ष मधे ऐटीत रिक्लायनिन्ग सीट्स वर बसुन पाहिला त्याचे नाविन्य होते ( मग घरी वेगळे काय करतो? )

बाकी मी आता अक्षय चे सिनेमे नाही बघायचे असे ठरविले आहे.

दे दना दन.... बकवास सिनेमा,
अंक्या फारच सौम्य शब्द वापरलास रे....
एकदम फडतूस..चिंधी..भिक्कार.. Sad

जर का कुणाला आवडलाच तर कृपया मानसोपचारतज्ज्ञाची भेट घ्या, >> मी तर म्हणेन डायरेक्ट अ‍ॅडमिट्च व्हा Proud

२०१२ - जगप्रसिध्द जगबुडीच्या तथाकथित भाकितावर आधारीत असणारा ’रोनाल्ड एमरीच’ दिग्दर्शित ’२०१२’ हा चित्रपट अस्सल हॉलिवूड मसाला आहे.

चित्रपट अतिशय सर्वसाधारण आहे. पठकथा अतिशय ठिसुळ आहे. कॉम्प्युटर ग्राफ़िक्स वगळता कशातही विशेष दम नहिये. काही द्रुश्ये मात्र अप्रतीम जमली आहेत. भारतीय शास्त्रज्ञ असलेला कलाकाराची हिन्दी ऐकुन हसू येते...

टायटॅनिक, द डे आफ़्टर टुमारो वगैरे पाहिले असतील तर यात वेगळे काही सापडणार नाही.

दे दणा दण पाहिलेल्यांनाच अ‍ॅडमिट व्हायची गरज आहे, नाही का? Happy

माझी मैत्रीण काल रात्री पाहून आल्यावर इतक्या शिव्या घातल्या की सकाळी तिला मी चहा दिला तेव्हा शांत झाली. Happy

दे दणा दण पाहिलेल्यांनाच अ‍ॅडमिट व्हायची गरज आहे, नाही का? >>> Lol
आणि तो ही पुर्ण पाहायचा म्हणजे कमालचं आहे . Proud

ती स्वतःलाच छळून घ्यायची वृत्ती असते त्याला काय म्हणतात... ते तसं झालंय का अंक्याचं? (खूप दिवे अंक्या घेईलच पण लावेल कुठे बरं... ) Wink

जर का कुणाला आवडलाच तर कृपया मानसोपचारतज्ज्ञाची भेट घ्या, >> मी तर म्हणेन डायरेक्ट अ‍ॅडमिट्च व्हा
>>
Lol

दे दना दन.. ठीके. फार अपेक्षा न ठेवता कतरीनाकडे पाहत सहन करावा. Happy
काही दृश्ये 'टायमिंग' मुळे हसवितात. शेवट तर खास प्रियदर्शन 'टच'. गाणी ठीक ठीक.

'सुखान्त' पाहिलाय का कोणी?
परीक्षणात खुप तारीफ केलीय सिनेमाची.

ते मरुद्या. तुम्ही घरातुन उठुन थेटरात जाताच कशाला भद्रलोक? सकाळी कामाला जाताना टीवी वर शेड्युल पाहावे. घरी आल्यावर बीन बॅग वर आरामात पसरावे. चहा चिवडा घ्यावे व आवडीचा सिनेमा घरीच बघावा.
मैत्रीण किन्वा आइ पॉपकॉर्न पण बनवुन देइल. स्टार मुवीज वर तुम्ही आउट्सोर्सड नावाचा सिनेमा पाहिला आहे का ? लै भारी. जॉश हॅमिल्ट्नचे दर्शन म्हण्जे पूर्ण दिवसाचा त्रास एका सेकंदात विसरायला होते. स्वच्छ
नीट नेटका छान. ( मला अक्षी असाच जावाइ हवा आहे. ) त्याला अचानक अमेरिकेतुन भारतात पाठ्वतात. कॉल सेंटर चालवायला. ते पुर्ण भारतीय लोकांनी भरलेले असते. व भारतीय ऑफिस सारखेच चालते. त्याला कल्चर शॉक इतका बसतो की काय सान्गु. अगदी उन्हात बर्फाचा गोळा खाल्ल्यावर पोट खराब होणे. काली माते च्या चित्राची भीती वाटणे भरपुर प्रोब्लेम्स असुन म्यानेजरचे नो प्रोब्लेम म्हणणे. भारतीय इन्ग्रजी. त्यात त्याचा मोबाइल चोरी होतो.

वैतागुन तो एक दिवस चीज बर्गर च्या शोधात मुम्बै ला येतो त्याला एक सीनीअर माणुस म्हणतो don't resist India. Let it happen to you. मग होळी च्या दिवशी त्याचे व भारताचे जमते. तो कॉल सेंटर
मध्ये आवश्यक सुधारणा करतो व टार्गेट अचिव होते. त्यात त्याचे आयेशा धारकर शी पण जमते.

यात परदेशी लोकांना भारता बद्दल न आवड्णारे बरेच से इशुज नॉन कन्फ्रंटेशनल वे ने दाखविले आहेत.
आपल्याला आपल्याच कल्चर मधील विसंगती दिसतात. व हसु येते. तो भारतीय लोकांच्या बोलण्याची नक्कल करतो ते सीन मस्त आहे. नॉट टु मिस. त्याचा पुरो म्हणुन म्यानेजर असतो ते एकदिवस बसलेले असतात व हा म्हणतो आम्ही अमेरिकन इतकी दगदग कशासाठी करतो घरावरील कर्ज व फ्लॅट स्क्रीन टीवी साठी? पुरो लगेच विचारतो कुठला फॉर्मेट? जॉश ला ह्सु येते. त्याचा एक गरीब इलेकट्रीशिअन
मित्र त्याला घरी बोलावतो जेवायला. - एक उकड्लेले अंडे भात भाजी व एक घावन. ते घावन उलटायला
झारा असतो तो वोक्स वागेन चे चिन्ह् वापरुन बनविला अस्तो. ते चिन्ह त्या घावनावर उमट्ते. भारताचे
ग्लोबलायजेशन झाले आहे ते यातुन सुन्दर ध्वनित होते. शेवटी त्यान्चे ऑफिस पाण्यात डुबलेले असताना
सगळे संगणक छपरावर शिफ्ट करतात व हाच मित्र खांबावरुन अवैध जोड्णी करुन चालू करून देतो.
ते सुरु होतात तेन्वाचा एका मागुन एक आवाज येतो तो क्षण जरुर अनुभवा. काटा येतो अंगावर.

आपले इथले इन्फ्रास्ट्रक्चर, आपल्या ग्लोबल महत्त्वाकांक्षा, सर्वसमान करणारे तंत्रज्ञान, आपली मनोव्रुत्ती
यावर सुरेख कमेन्ट आहे. शेवटी त्यानच्या नोकर्‍या जातात. व सगळे चायनाला शिफ्ट होते. पुरो नवी नोकरी नवी बायको सकट चीन ला जातात व जॉश अमेरिकेत परततो. तो व आयेशा मैत्री कायम ठेवतात पण त्यान्चे लग्न होत नाही. अतिशय intelligently and smartly made movie. What I feel strange is the outside directors make these perfectly Indian movies like even slum dog mill.
and our so called celebrated directors like karan johar and yash raj banner go abroad in search of a story. Even stupid akshya kumar type films - Garam Masala etc are set in some foreign country when there is no need.

अ‍ॅटेनबरोंचा गान्धी हे याचे ज्वलन्त उदाहरण आहे. मला आशा आहे कुणीतरी परदेशी महात्मा एके दिवशी शिवाजी महाराजानाही न्याय देईल. आपल्या डायरेक्तरांची ती हिम्मत नाही..
अगदी बेनेगलानीही सुभाषबाबूंचे भजेच केले.

आपल्या डायरेक्तरांची ती हिम्मत नाही..<<
भारतीय दिग्दर्शकांना असं write off करणं पटलं नाही.

अगदी बेनेगलानीही सुभाषबाबूंचे भजेच केले.<<
खूप अनुमोदन

रीजनल भाषांतुन खुपच सरस काम होते व त्यात संस्क्रुतीची जाणीवही नीट ठेवलेली असते. पण बिग बजेट बॉलिवूड बुलशिट सिनेमाची स्टोरी परदेशात कशाला? कभि अलविदा ना कहना लुधियानात सेट केला असता तरी चालले असते. सेम हे बेबी वगैरे सिनेमांच्या बाबतीत. इतर मूल्यांकडे दुर्लक्ष व परदेशात सेटिन्ग. ते लुव्र
आयफेल टावर समोर आपले सलमान, लारा अभिषेक नाचताना अतिशय वीअर्ड दिसतात. आउट ऑफ प्लेस.

अश्विनीमामी, आऊट सोर्सड बद्दल भरपूर अनुमोदन!! खरंच खूप छान पिक्चर आहे.

कभि अलविदा ना कहना लुधियानात सेट केला असता तरी चालले असते. सेम हे बेबी वगैरे सिनेमांच्या बाबतीत. इतर मूल्यांकडे दुर्लक्ष व परदेशात सेटिन्ग.>>> हे पिक्चर फक्त आणि फक्त एन आर आय लोकाना तार्गेट आडियन्स ठेवून बनवलेले असतात. म्हणूनच सर्वसामान्य भारतीय भोजपुरी पिक्चरकडे वळलाय.

हूडा, बेनेगलांबद्दल एक हजार मोदक.

मामी आउटसोर्स पाहिलाय. मला आवडला. Happy
आता मला किल बिल दोन्ही भाग परत एकदा बघुन अजुन काहि कळतय का ते बघायच आहे.
फक्त प्रचंड हिंसाचार बघावा लागतो.

झकासराव किलबिलात कळायचे हाय काय? येका बाईस्नी चारजने मिळुन मारत्याती आनी तिनं येउन त्या समद्यास्नी मारती एकदम शिंपल! आता त्यात इटालियन, जपानी, वेस्टर्न, कूंगफू अशा अनेक चित्रपट शैलींना ट्रिब्यूट दिला आहे, बॅकग्राऊंड म्युझिक तुफान आहे, काही प्रसंगांचे टेकींग अद्वितिय आहे इ.इ. पण तसलं फार कलात्मक,गंभीर मनावर घ्यायची गरज नाही.
या शुक्रवारी पिक्सवर 'स्नॅच' पाहीला अफलातून आहे दुसरा शब्दच नाही,पाहिला नसाल तर जरुर पहाच. ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने जाणारा सिनेमा, कल्ट क्लासिक आहे

दे दना दन वर कॉमेंट्स चे आलेले दना दन फटकार वाचुन लई मजा आली की Proud चला ह्या शीणेमाने शीणेमा न पाहिलेल्यांनाच हासवील Happy

अप्रेकीगक पाहिला. आवडला. हलकाफुलका,जास्त विचार करायला न लावणारा सिनेमा. रणबीरचा स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे हे परत जाणवले. काही पंचेस मस्त. गाणी छान. नेहमीच्याच कथेचे वेगळे टेकिंग आवडून गेले.
उपेन पटेल बुलडॉग झालाय. Happy

रेडिओ पाहिला , हलका फुलका वाटला , डोक्याला जास्त ताप नाही . हिम्मेस आवड्त्या प्राण्यात मोडत नाही पण सिनेमा मस्त वाटला . Happy

Pages