चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्वापद.. Lol

मी पण पाहिला न्युयॉर्क. भयानक मठ्ठ आहे तो निनिमु. पडद्यावर आला की तरातरा उठून थेटरातनं चालू लागावे असं वाटायचं.

उपेन पटेलला श्वापद म्हटल्याबद्दल निषेध!! तो दगड आहे दगड, बोलतो काय चालतो काय आणि दिसतो काय... लंडनवरून आलाय हेच त्याचं भांडवल. बाकी काही नाही. *त्याचे लफडे कुणाबरोबर चालू आहे सध्या?? (किम शर्मा अध्याय संपला. अजून कुणीतरी सोडलं त्याला)..

लंडनवरून आलाय हेच त्याचं भांडवल
>>
या भांडवलावर बॉलिवुड मधे एंट्री मिळणार असेल तर मी पण येतो...
कितीही वाईट अ‍ॅक्टिंग केलं तरी उपेन पटेल, तुस्शार कपूर वगैरेंपेक्षा नक्की चांगलं करीन... Wink

या भांडवलावर बॉलिवुड मधे एंट्री मिळणार असेल तर मी पण येतो...
>>> त्यासाठी तुला पिक्चर मधे पैसा पण ओतावा लागेल. Happy साहिल खान, उपेन पटेल असेच हिरो बनतात का????

साहिल खान, उपेन पटेल असेच हिरो बनतात का????>>>>>>>>
तु तो देशद्रोहीवाला केआरके विसरलीस काय?? Happy

या भांडवलावर बॉलिवुड मधे एंट्री मिळणार असेल तर मी पण येतो...
कितीही वाईट अ‍ॅक्टिंग केलं तरी उपेन पटेल, तुस्शार कपूर वगैरेंपेक्षा नक्की चांगलं करीन...>> यस्स आणि आम्ही माबोकर तुझा पिक्चर बघून बघुन हिट करू.

'लंडन ड्रिम्स' नामक सायको प्रकार पहाण्याचा प्रयत्न केला ... प्रत्येक गोष्टिचा अतीरेकच .... त्या अर्जुनच (अ. दे.) स्वःताला चाबुक मारण... कारण काय तर एक मुलीमुळे त्याच संगीतावर (म्युजीक वर )दुर्लक्ष होत म्हणुन Uhoh .... हे अगदि सायको वाटल ..... सलमानच ऊधारीच्या पश्यांनि अ. दे. ला फोन करण, त्याला भारतात बोलावण सायको गोष्टिंचा कळस अगदि.... अर्धवट पहण्याच्या लायकिचा पण नाही हा चित्रपट Happy

पहायला गेले लंडन ड्रिम्स
वापरावि लागली डोके दुखीची क्रीम Proud

"२०१२" एकदम जबरदस्त आहे - मुख्यतः स्पेशल इफेक्ट्स. बाकी कथा, नाट्य, अभिनय वगैरे फार काही भारी नाही पण सगळे विध्वंसाचे सीन्स फार खतरनाक आहेत. कदाचित स्पीलबर्ग वगैरे सारख्यांनी आणखी स्मार्ट कथा व संवाद आणले असते, त्यामानाने यातील बरेच सरधोपट आहेत. एवढ्या मोठ्या संकटामधे एखाद्या कुटुंबाची कथा दाखवून इतर हजारो लोक आजूबाजूला मरत असताना (येथे तर काही अब्ज बहुधा) हे हीरो लोक वाचावे असे आपल्याला वाटावे असे वातावरण सर्वच नीट करतात असे नाही - माझ्या दृष्टीने टायटॅनिक आणि जुरासिक पार्क हे त्यात सर्वोत्कृष्ठ होते - येथे ही ते नीट जमले असे वाटत नाही. तसेच भूकंपापासून ते इतर स्फोट हे लोक पळताना नेहमी यांच्या मागे ५-१० फूट कसे हा ही प्रश्न पडतो. पण चित्रपट आपल्याला जास्त विचार करू देत नाही Happy काही काही सीन्स खूप छान घेतलेत.

आणि ह्या वर्षीच्या 'बकवास सिनेमा नं १' पुरस्कामाचा मानकरी आहे .....'ऑल द बेस्ट'
>> हवे तितके मोदक महागुरु Happy , फालतु मुव्ही एकदम..
अप्रेकिगक.. ही तसाच बंडल पिक्चर..

आणि ह्या वर्षीच्या 'बकवास सिनेमा नं १' पुरस्कामाचा मानकरी आहे .....'ऑल द बेस्ट'
<< का रे महागुरु ?:).

रुप्स ला दुजोरा. आज हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिला. उत्तम आहे. अजुनही अश्या बायोग्राफ्या दडलेल्या असु शकतात. आर्टीस्टीक डोळेवाल्यांनी शोधाव्यात. परेश मोकाशी यांचा पुढचा सिनेमा बहुदा ईंडीयन जोन्स असेल. Happy

आणि ह्या वर्षीच्या 'बकवास सिनेमा नं १' पुरस्कामाचा मानकरी आहे .....'ऑल द बेस्ट'
>>>> नाही हं. 'मै और मिसेस खन्ना' नाही बघितलात वाटतं. Happy

ह्म्म... एकदा तो २६ जुलै च अनुभव प्रत्यक्ष घेतल्यावर पुन्हा पिक्चर कोण बघणार?

कुर्बान...

अनपेक्षितपणे चांगला धक्का...
प्रोमोज वगैरे पाहून वाटलं होतं की हा दुसरा न्यूयॉर्क किंवा फना असणार... पण बघायला लागलो आणि लक्षात आलं की हा बराच वेगळा आहे... पहिल्या अर्ध्या तासानंतर प्रेमकहाणी संपते आणि अ‍ॅक्शन-थ्रिलर सुरू होतो... सिनेमाचा वेग इतका छान राखलाय की कधीच पकड ढिली होत नाही... क्लायमॅक्स पण खूप मस्त घेतला आहे... दिग्दर्शक रेन्सल डिसिल्वा आणि सहाय्यक (कॅमेरा, बॅकग्राऊंड म्यूझिक, संवाद) यांनी आपली कामं टॉप क्लास केली आहेत...
कलाकारांमधे पूर्वार्धात सैफ-करीना आणि उत्तरार्धात विवेकला जास्ती वाव आहे आणि त्यांची कामं अफलातून झाली आहेत... ओम पुरी आणि किरण खेर पण तितकीच मोलाची साथ देतात...
सिनेमा कुठेही दहशतवादाचं उदात्तीकरण करत नाही तसंच कुठली एक बाजू ही घेत नाही... दोन्ही बाजूंवर सारख्याच प्रकारे भाष्य करतो... उदाहरणासाठी विवेक चा अमेरिकन क्लासरूम मधला सीन आणि सबवे मधला सैफ बरोबरचा सीन देता येईल...

एकूणात काय तर रेन्सिल डिसिल्वा आलाय... याच्याकडून भविष्यात नक्की अपेक्षा बाळगता येतील...
करण जोहर च्या प्रॉडक्शन हाऊसनी दिलेला हा धक्का जरूर अनुभवा...

माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे...
आणि रेन्सिल डिसिल्वा ला आगे बढो...

तुम मिले ४० मिनिटात बंद करून टाकला. शक्यतोवर मी ऑनलाईन सिनेमे कितीही बकवास असले तरी पूर्ण बघतो, यातच सारं काही आलं

४० मिनिटात बंद करून टाकला
>>
४० मिनिटं सहन केलात यातच सगळं आलं... Wink

अँकी, कुर्बान iBoly वर बघितलास का ? मला सापडत नाहीये. स्पेलिंग काही वेगळे आहे का ?

हायला कधी नव्हे ते लेटेश्ट रिलीज बघायला घेतला तर सापडतच नैये Sad

मी २०१२ पाहिला... बकवास वाटला मला सिनेमा. फारएन्ड्च्या वरच्या सगळया पोस्टला अनुमोदन. फक्त हे एक वाक्य सोडून..

<<"२०१२" एकदम जबरदस्त आहे - मुख्यतः स्पेशल इफेक्ट्स>>

फारएन्डा, स्पेशल इफेक्टससुध्दा काहीकाहीच चांगले आहेत की रे. सगळेच चांगले नाहीत. काहीकाही ठिकाणी तर कळते हे खोटे आहे असे... तसेच सबंध पिक्चरभर उगीचच अगदी रॅन्डमली मोठमोठ्या बिल्डिंगा कोसळत राहतात. स्टोरीतर अतिभंगार आहे. काही काही सीन्सपुढे तर हिंदी सिनेमेही चाट पडतील.. उदा: कुत्र्याचा सीन. खरंच, स्पीलबर्गसारखे लोक हवे होते सिनेमा काढणारे..

मी पण ऑल द बेस्ट पाहिला. ठीक वाटला. एकदा पहायला हरकत नाही. संजूबाबा खरंच भाव खाऊन जातो सिनेमात. काही काही विनोद फार भारी करतो संजूबाबा.. Happy

कुर्बान ठीक वाटला , सेम दहशतवादी , जिहादची स्टोरी , फक्त ठिकाण बदललयं , दरवेळेस सारखं काश्मिर , मुंबई , दिल्लीमध्ये न घडता ह्यावेळेस न्युयार्कमध्ये घडताना दिसतं.

Pages