न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणिन एक कपल गेम>>> मग तुम्ही नी तुमचे 'अहो'च खेळू शकाल. आम्ही एकेकटे येणारे कसे खेळणार? Wink Proud

आणायचीच तर जरा व्हरायटी आणा मिक्स मॅच करा.

काहीहि करा, पण भरली वांगी, खिचडी, नि गुळाची पोळी असू दे.
सयो, तुम्ही मला नेणार ना? पन्ना, तुम्हाला तुमच्या घरून मी घेऊन जाऊ शकेन, सायोकडे.
फक्त तुमच्याकडे कसे यायचे हे सांगा.

कपल गेम>>>>>> Lol ताई, इथे सगळ्यांचे कपलं वैतागले आहेत मायबोलीला त्यामुळे आम्ही कपलं घरीच ठेऊन येतो. तुम्ही खेळा आम्ही बघू, टाळ्या वगैरे पण वाजवू. Proud

मला तुम्ही उचलणार का सिंडी? मेल आयडी कळवा
माझ्या मते वैद्यबुवा जास्त ताकदवान आहेत व त्यांना लांब लांब अंतरे पळायची सवय पण आहे.
तरी शेवटी तुमचे वजन किती यावर अवलंबून आहे. कदाचित वैद्यबुवांना सुद्धा जमणार नाही.

मग तुम्हीच त्यांना उचला. ते रस्ता दाखवतील, तसे तुम्ही पळा. लंगडे नि आंधळे लोक जे करू शकतात, ते तुम्हा दोघांना अशक्य नाही.

Light 1

विभासं >>> Lol
झक्की, हो,हो, तुम्ही माझ्याबरोबर येणार.
स्वाती, तू पण माझ्या गाडीत असणार का? कन्फर्म कर.

बुवांना वजन पेलवतय म्हणत आहेत. परत जाताना सिंडीला वेटलिफ्टींगचा चान्स द्यावा की नाही हा निर्णय तिला बघुन मग घेईन. Wink

सँटी सिंडीच्या घरी आदल्या दिवशी रहायला जाणार नसेल तर सिंडी पोचेल वेळेवर... Proud

भाई.. वरच्या ग्रुप्सच्या यादीत आमचा अनुल्लेख केल्याबद्दल तुमचा निषेध !

अहो, आमच्या घराजवळ किंगफिशर बीअर मिळत नाही! करोना, नि वैद्यबुवांसाठी गिनेस घेऊन येतो.

लाल नि पांढर्‍या वाइनमधे काय आणू? मला फक्त कॅबर्ने सॉव्हिनॉन नि शार्डोने माहित आहेत. इतर कुठल्या वाईनी (दारवा?) हव्या असतील तर नावे सांगा.

पग्या 'येतो' अस नुसत म्हंटल असतस तरी यादीत नाव टाकल असत. Happy

सगळ्यानी आपापली कॅरीओकी गाणी घेवुन या. माईक स्पीकर चा बंदोबस्त केला जाईल हो sssssss

Pages