न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुख्य पाहुणे - आरती व कांदापोहे यांना कुणि विचारले आहे का, की त्यांना काय पाहिजे?
मी आपला खिचडी, गुळाची पोळी वगैरे म्हणतो, पण त्यांना जर काही खास अमेरिकन पदार्थ हवे असतील तर?

लाजू नका, कांदापोहे, आरती. अमेरिकेत आग्रहाची पद्धत नाही. वाट पहाल आग्रहाची, तर चक्क उपाशी जाल घरी!! मग भारतात जाउन निंदा करत बसाल, 'अमेरिकन लोक म्हणजे ना, काSही मॅनर्स नाहीत!' मग बाकीच्या भारतीयांना बरं वाटेल. भारतीयांचा आवडता उद्योग आहे तो!

काय सायो? अगदीच शो ना हो! पार्लेकर काकू असुन तू असं कसं म्हणू शकतेस? ती एकटी येऊ नाही शकत का? सिंड्रेला कुठाय? Proud

भाई,
खरंच कॅरिओकेची सोय करणार आहात का? मी आणतो सीडी.

पराग, सिंड्रेलाकडे रहायला वगैरे गेलं की तिला चान्स मिळतो निवांत आवरायला.. आणि मग पाहुण्यांवर ढकलून मोकळं होते ती. म्हणून मी तिच्याकडे रहायला जातच नाही आजकाल.. Proud

सिंड्रेलाकडे रहायला वगैरे गेलं की तिला चान्स मिळतो निवांत आवरायला >>>> ते कसं ?

तू दोनदा राहून गेलास तरी तिसर्‍यांदा आल्यावर शॉवर कसा चालतो विचारत होतास ह्यातच काय ते आले. तुझी चोरी पकडली जावू नये म्हणून येत नाहीस सांग की Proud

आयला, आता लॅपटॉप पण आणि वायरलेस कार्ड पण घेऊन या. लिरिक्स चा लोचा होणार नाहीतर.

कॅरीओकीची व्यवस्था म्हणजे - माईक, स्पिकर, सिडी प्लेयर वगैरे. लिरिक्स प्रिन्ट करुन आणा.
कोणाकडे कॅरीओकी सिस्टीम असेल तर आणा. Happy

माझ्याकडे आहे कॅरिओकी सिस्टीम. पण हे कसं चालतं, इथे वायर कोणती जाते असले फुटकळ प्रश्न मला विचारणार नसाल तरच घेऊन येईन. Happy

मी नाही म्हणणार. तराना वर लिरिक्स मिळू शकतील आपल्याला. कुणालातरी लॅपटॉप आणावा लागेल त्याकरता.

लालु येत नाही आहे. अ‍ॅपेटायझर्स, ड्रिन्क्स कमी केल तर चालेल. Happy

शिस्तीत सगळे हजर व्हा रे! आज पर्यंत बाराचं गटग असल्या फुटकळ कारणांमुळे रद्द झालेलं नाहीये! रेकार्ड खराब व्हायला नको. Happy

Pages