निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> बीट्टीचे फूल ग्रामोफोनच्या कर्ण्यासारखे असते तर कण्हेरीचे फूल पसरट असते. <<
धन्स माधव.

>> आता या कूळात कोण कोण आहे माहित आहे, पेरू, जांभळे आणि लवंगा. >>

माझ्या सासरी (विदर्भात) पेरूला जाम म्हणतात.

मला वाटते रोझ अ‍ॅपल म्हनजे आपले नेहमीचे जाम नव्हेत. आपले नेहमीचे जाम पांढर्‍या आणि गुलाबी रंगात येतात. रोझ अ‍ॅपल हिरव्या आणि गुलबट पांढरा किंवा हिरवा असतो. पण झाड आपल्या नेहमीच्या जामच्या फ्यॅमिलीतले आहे.
रोझ अ‍ॅपल खाताना अगदी गावठी गुलाबासारखा वास येतो. मला खुप आवडते.
लहानपणी माझ्या मामाकडे कोणाच्यातरी एकाच्याच वाडीत हे एकच झाड होते. त्या माणसाने कधी आयुष्यात त्याचे फळ चाखले नसेल :-). आम्ही मुलं फळ पुर्ण तयार पण ह्यायची वाट न बघता खात असु. अक्षरशः छोटुसा तुकडा वाटेला यायचा. त्याच माणसाकडे गोड्याचिंचेचे आणी खोबरं आंब्याचे पण झाडं होते. त्यामुळे तिथे आमचा बराच राबता असयचा.

आ़क्ख रोझ अ‍ॅपल मी बँगलोरला खाल्ले.:-). हायपरसिटी सुपरमार्केटमध्येपण एकदा मिळाले.
रोझ अ‍ॅपल १
rose apple_1.jpg
लाल जाम
redjaam_1.jpg
पांढरे जाम
whitejam.jpg

लाल व पांढरे जाम माझ्या मामाकडे होते
फोटो नेट वरुन

दिनेशदा व्वा जवाब नहि.
माझ्या शेतावर पांढरी आणि गूलाबी दोन्ही कणेर आहेत्.तसेच बिट्टीच झाड देखील आहे. बिट्टी ३ वर्षाचि झाली पण फूलत नाही . कोण जाणे का.
आम्ही देखील लहानपणि बिट्टी ने आणि सागर गोट्यानी खेळायचो. त्यामूळे बिट्टीचा रूसवा कधी जातोय असे झाले आहे. बिट्टी विशारी आहे हे माहित नव्हते.

बिट्टीलाच गोविंदवृक्ष पण म्हणतात. गोविंदाच्या पूजेसाठी एकतरी फूल झाडावर असतेच.

आदिती, पहिल्या फोटोतले फळ (तो पण जामच) शांतादूर्गेच्या देवळाबाहेर विकायला असते.
कण्हेर आणि बिट्टि एका कूळातली, तरी त्यात अनेक रंग असतात. कणेरीत लाल ते पांढरा या रेंजमधले बरेच रंग तर बिट्टी मधे पांढरा, पिवळा आणि केशरी रंग असतात.
बिट्टीची फूले गळून पडतात तर कण्हेरीची सुकली तरी झाडावरच राहतात.

सावली, अगदी छोटी जागा घेतली तर नेहमीच्या वापरातल्या भाज्या लावण्यासाठी व शोभेची फूलझाडे लावण्यासाठी उपयोग करता येईल. सावली हवी असेल तर वेलीचा मांडव घालावा, पण मोठे वाढेल असे झाड घराजवळ नको. एकतर त्याच्या सावलीमूळे बाकीची झाडे तग धरु शकत नाहीत, शिवाय इमारतीला धोका असतो.

पेबच्या भटकंतीत काही रानफुले दिसली. त्यांची नावे माहित असतील तर सांगा (हि रिक्षा नाहीये :-))

http://www.maayboli.com/node/23672

"पेबच्या वाटेत फुललेला निसर्ग" यातील पहिले आणि तिसरे प्रचि अनुक्रमे "पळस" आणि "करवंदाच्या" फुलाचे आहेत. दुसरे, चौथे आणि पाचवे माहित नाही.
यातील पाचवे फूल हे एका घरासमोर होते नाव विचारल्यावर "सफेद अबोली" असे सांगितले, पण मला नाही वाटत हि अबोली असेल. साधारण अशाच प्रकारची फुले माहिमच्या निसर्ग उद्यानात दिसली. पानांचा आकार "पानफुटी"च्या पानासारखाच होता किंवा पानफुटीचीच हि फुले असावी. जाणकारांनी प्रकाश टाकावा. Happy

अरे व्वा मी खुप उशिर केला. सगळ्या निसर्गप्रेमिंना १०००+ च्या हिरव्यागार शुभेच्छा.
डॉ. फटाक्यांचा आवाज आला.
असुदे आम्ही पण लहानपणी बिट्टीतली मध चोखायचो. बिट्टी चे बी विषारी असते ते माहीत आहे.

जागू, दिनेशदा, साधना, जिप्सी, अनिल, प्रज्ञा, विजय, मामी, आणि सर्व 'निसर्गाच्या गप्पांचे' सभासद हार्दिक अभिनंदन. !!!
डॉक्टर धन्यवाद!!! फटाक्यांसाठी.
अदिती, काल रात्रीच मला या पांढरया जामची आठवण झाली होती. आमच्याकडे याच झाड होत. रात्री कांडेचोर (रान मांजराची एक जात.) येवून सर्व जाम खाऊन जायचे.

रोझ अ‍ॅपलला आम्ही गुलाबजाम म्हणायचो. माझ्यासाठी जाम म्हणजे ते पांढरे आणि लाल. Happy

विजय मला सुपरमार्केट्मध्ये रोझ अ‍ॅपल मिळाले.

मामाकडच्या लाल जामला जरा गुलाबी रंगाची फळं यायची.
हम्म फोटो बदलायला हवा. Happy .

शोभा आमच्याइथे वाघळे खायची. अशी थोडीशी खाल्लेली फळ शोधुन आम्ही मुद्दामुन खायचो (अर्थात "तो" खाल्लेला भाग काढुन). खुप गोड असायची.

शोभा, या कांडेचोराबद्दल मी खूप ऐकलय. (पाहिला नाही कधी) तो फणस पण खातो म्हणे.
मुंबईत पण पांढर्‍या जामची झाडे आहेत. एक हिंदू कॉलनीत, ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयाच्या जवळ आहे (होतं)
गुलाबी जामचे झाड, वसई कोर्टाच्या जवळ आहे.
योगेश, तो कोरफडीचाच एक प्रकार आहे.

माझ्याकडे दोन झाडे आहेत जामाची. आता एका झाडाला कळ्या लागल्या आहेत. सोमवारी फोटो टाकते.
एक साधे पांढरे जाम आहेत. आणि एक जाम आहेत नाकासारखे लांब. आईकडे जाम आहेत त्याच्या तोंडाच्या भागाला गुलाबी रंग येतो.

दिनेशदा, आम्ही दररोज रात्री त्यांना पाहायचो. ते रंगाने काळे, मांजरासाराखेच पण त्याच्या पेक्षा आकाराने मोठे असते. आणि डोळे तर इतके लाल असतात कि, ब्याटरीचे झोतच वाटतात. आपलेच डोळे दिपतात. फार भीती वाटायची त्यांची. अर्थात तेव्हा आम्ही खूप लहान होतो.

अच्छा तो प्राणी, शोभा आमच्याकडे त्याला बावटा म्हणतात. हा बावटा कोंबड्याही पळवुन नेतो.

जागू, तुझ १००० वेळा अभिनंदन.
अग, आमच्याकडे कोंबड्याच नव्हत्या त्यामुळे हे माहितच नव्हत.

हा बीबी आता यौवनात आलाय बहुतेक.. धडाक्याने धावत सुटलाय Happy

मी आंबोलीला जामचे झाड लावलेय. जाम आल्यावर कळवेनच..

पंकजच्या घरी नाशिकलाही पेरुंना जाम म्हणतात. मी त्याला आपले जाम दाखवले तर त्याला ते काय आहे तेही कळेना. त्याने जाम पाहिलेही नव्हते. मी जाम देतेय म्हटल्यावर पेरू देणार असा त्याचा गैरसमज झाला Happy

माझ्याकडे असलेले गुलाब एक बाई रोज चोरुन न्यायची. तिला मी गुलाब तोडताना पकडले.ती काय काम करते म्हणुन विचारले तर तिने मी शाळेत शिक्षिका आहे म्हणून सांगितले .म्हण्जे ही शाळेत मुलांना काय शिकवण देत असेल?

>> पंकजच्या घरी नाशिकलाही पेरुंना जाम म्हणतात. मी त्याला आपले जाम दाखवले तर त्याला ते काय आहे तेही कळेना. त्याने जाम पाहिलेही नव्हते. मी जाम देतेय म्हटल्यावर पेरू देणार असा त्याचा गैरसमज झाला <<

माझ्या यजमानांनाही जाम हे फळ पाहून आश्चर्य वाटलं होतं.

मी मागे लिहिले होते तरी परत. मराठीत चाफा शब्द जसा अनेक फूलांसाठी वापरतात तसाच मला वाटतं, इंग्लिशमधे अ‍ॅपल.

रोझ अ‍ॅपल (गुलाबी जाम ) वुड अ‍ॅपल (कवठ) स्टार अ‍ॅपल (सुवर्णपत्राचे फळ) कष्टर्ड अ‍ॅपल (सिताफळ आणि तत्सम फळे ) पाईनअ‍ॅपल (अननस, खरे तर अननस हाच शब्द अनेक विदेशी भाषांत रुढ आहे ) आणखी एक असते क्रॅब अ‍ॅपल. ते फळ आंबट असते. सलादमधे वापरतात.

अच्छा तो प्राणी, शोभा आमच्याकडे त्याला बावटा म्हणतात. हा बावटा कोंबड्याही पळवुन नेतो.

आमच्या कडे याला बाऊल म्हणतात.

अच्छा तो प्राणी, शोभा आमच्याकडे त्याला बावटा म्हणतात. हा बावटा कोंबड्याही पळवुन नेतो.
आमच्या कडे याला बाऊल म्हणतात.

ऑ$$$विजय वरची पोस्ट मी टाकली होती तुमच्या नावावर कशी आली ?

आपल्याकडे काही झाडांच्या बाबतीत, देश आणि कोकण अशी ठळक विभागणी आहे.
उदा, कडूनिंब, शिरिष, नेपती वगैरे. पुणे नाशिक भागात मुबलक असणारे कवठ कोकणात अजिबात नाही. त्या लोकांना कवठ म्हणजे अंडेच वाटते. नेवासा आणि नरसोबाची वाडी, इथे पण भरपूर आहेत याची झाडे.

उतारा तुम्ही काढा आता दिनेश.. हा निसर्ग आपले गुढ रुप दाखवु लागलाय...

रच्याकने, त्यावरुन आठवले. लहानपणी माझी आजी रवीवारी दृष्ट काढण्याचा उद्योग करे. परातीत पाणी घ्यायचे, एक रिकामा तांब्या चुलीवर तापत ठेवायला. मग मोहरी, मिठ व.व. सगळे उतरुन चुलीत टाकायचे आणि तो तापलेला तांब्या परातीत उपडा टाकायला. पाणी सरसर तांब्या उलटे जायचे (की त्याचे बाष्प व्हायचे देव जाणे, पण परातीतले पाणी कमी व्हायचे हे नक्की). मग हे कमी झालेले पाणि बघुन बघ कशी दृष्ट निघाली. कित्ती लागलेली माहित्ताय?? हे उद्गार काढायचे. ते पाणी सरसर तांब्यात जाणे हा र्पकार आम्ही भयचकीत होऊन पाहायचो. खरेच दॄष्ट लागलेली याची खात्री पटायची. Happy त्यामागचे विज्ञान समजायला खुप काळ जावा लागला.

साधना, मी बदलले ते पोस्ट.
त्या तांब्यातला ऑक्सीजन कमी झाल्याने, त्याची जागा घेण्यासाठी पाणी तांब्यात शिरते. ते साधारण आकारमानाच्या २० टक्के, कारण तेवढा ऑक्सीजन असतो, हवेत. (अर्थात हे मलाही शाळेत प्रयोग दाखवल्यानंतरच कळले.)

अमी बावटाही म्हणतात.
पण साधना मग माझी मुळ पोस्ट त्या बाउलने खाऊन टाकली की काय ?
आमच्याकडेही हा दृष्टीचा प्रकार आहे.

आमच्याइथे एक व्यक्ती आहे. तो स्वतःच्या हाताला कावीळ झालेल्या माणसाकडून चुना लावुन घेतो. त्याच्या हाताला चुना लावायचा आणि एकाने चुना लावताना पाणी टाकायचे जर पाणी पिवळे आले तर कावीळ असते आणि नॉरमर कावीळ असेल तर तिन दिवसांत उतरते. जर जास्त झाली असेल तर जास्त दिवस लागतात. दिवसनदिवस पाणी फिक्कट होत जाते. पाणी पांढरे पडले की काविळ उतरली समजतात. मी प्रत्यक्ष पाहीले आहे. माझ्या सासर्‍यांवर जोड उपचार म्हणून केला होता. ह्यामागे काय आहे ते कळल नाही. त्या काविळ उतरवणार्‍या माणसाचे हात चुन्याने खराब झाले आहेत. तो माणूस कुणि दिले तरच पैसे घेतो. कुणाजवळ मागत नाही. पण कोणीही बोलवले तरी धावत जातो.

जास्वंदीची दोन रोपे मी लावली होती पण एक तर सुकूनच गेले आणि दुसर्‍याची वाढच होत नाही. जास्वंदीला खुप उन्हे असावी लागतात का? कारण आमच्या कडे दुपारनंतर २-३ तास उन येते.

Pages