निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाच्या गप्पांवरील माझ्याकडे जतन असलेल्या गप्पा.

जागू, छान उपक्रम.
मागे एका 'पर्सनल डेव्हलपमेंट' च्या सेशन मध्ये त्या ट्रेनर ने एक निराळ्याच
तर्‍हेचा इंट्रोडक्शन राऊंड घेतला होता. अशा राऊंड मध्ये जनरली प्रत्येक जण आपले
पूर्ण नाव, एज्यूकेशन, काय काम करतोय ते सांगतो. त्या ऐवजी त्या ट्रेनर ने तुम्ही
निसर्गातल्या कोणत्या घटकाबरोबर स्वतःला रीलेट करू शकता ते सांगायला सांगितले. इथे
प्रत्येक जण विचारात पडला. वर सांगितलेली माहिती आपल्या अगदी तोंडावर असते. पण
निसर्गाचा विचार करू लागल्यावर प्रत्येक जण एक एक मस्त कल्पना घेऊन पुढे आला. कुणी
म्हणाले की 'मी पाण्यासारखा आहे. पाणी जसं वाटेतल्या अडथळ्यांना पार करत उसळ्या
मारत जातं. कधी झरा, कदी नदी, कधी समुद्र अशी वेगवेगळी रुपं घेतं, तसा माझा स्वभाव
आहे."
कुणी म्हणालं, "मी आभाळासारखा आहे. मला विशाल गोष्टींच अप्रूप वाटतं."
खूप मजा आली होती तेव्हा आपापला स्वभाव निसर्गातल्या अगणित घटकांबरोबर ताडून
बघायला.

- निंबुडा
प्रतिसाद साधना | 26 November, 2010 - 17:07
वाव सन्शाइन.. मस्तच गं...
आणि जागु तु हा धागाही अगदी मस्त उघडलायंस.... पण आपले काय विचार शेअर करायचे...
प्रश्न पडलाय..माझ्या विचारांची रांगोळी तर सगळीकडे सांडत असते.. आता ती गोळा करुन
इथे सांडवु काय????

प्रतिसाद जागू | 26 November, 2010 - 17:11
सनशाईन मस्तच ग.
साधना अग माझ्याडोळ्यासमोर तु होतीसच हा धागा काढताना. तुलाही खुप आवड आहे.
दिनेशदांकडूनही चांगली माहीती मिळेल.
संपादन प्रतिसाद शैलजा | 26 November, 2010 - 17:18
>>माझ्या विचारांची रांगोळी तर सगळीकडे सांडत असते.. आता ती गोळा करुन इथे सांडवु
>>काय???>>>>
>>
जागू, छान आहे धागा, वाचत राहणार.
प्रतिसाद दिनेशदा | 26 November, 2010 - 17:19
सनशाईन, मस्तच विचार.
साधना आणि जागू, मी आधी तूमचे विचार वाचणार आहे !!
प्रतिसाद साधना | 26 November, 2010 - 17:28
तसे मला निसर्गातले सगळेच घटक आवडतात. रस्त्यावरुन जाताना, ऑफिसात लंचअवरमध्ये
फिरताना, भाजी-मासे मार्केटात भटकताना, प्रवास करताना माझे लक्ष कायम निसर्गाकडेच
लागलेले असते. आणि आपल्या बाजुला बहरलेल्या निसर्गाकडे दुर्लक्ष करुन कायम आपल्याच
तंद्रीत राहणा-या, आपल्या प्रश्नांच्या दु:खात गर्क असलेल्या लोकांचे मला जाम वाईट
वाटते.

माझ्या ऑफिसातल्या एका प्रौढ बाईने एकदा 'माझ्या नव्या घरासमोरच्या झाडाला मोहर
आला, त्यामुळे मी त्याला आंबा समजले. कारण मोहर फक्त आंब्यालाच येतो. मग त्याला
जांभळे लागली तेव्हा ते जांभळाचे झाड आहे हे कळले' असे उद्गार काढले होते तेव्हा
मला प्रचंड धक्का बसला होता. आयुष्यात आणि मुंबईत इतके पावसाळे काढलेल्या माणसाला
आंबा आणि जांभुळ यातला फरक कळू नये इतके तो डोळे झाकुन रस्त्यावरुन चालतो??????
आयुष्यातले किती आनंद अशा माणसांनी गमावलेत.

पुर्ण फुलुन आनंदाने हसणारे, पुर्ण पानगळती करुन नविन कपड्यांची वाट पाहात अधीर
होऊन बसलेले आणि नवीन पालवी फुटली की सुर्यप्रकाशात चमचमणारी पाने घेऊन मनातल्या
मनात खुदुखुदू हसत डोलणारे वृक्ष ज्याने कधी पाहिलेच नाही त्याला डोळे असुन काय
उपयोग???
मी आकाशदर्शन करायला गेले होते हे ऐकुन माझ्या एका मैत्रिणीने 'आकाशात काय असते
पाहण्यासारखे, मी तर फक्त करवा चौथला आकाशाकडे पाहते' असे उद्गार काढलेले. आता काय
सांगणार आकाशाकडे पाहण्यासारखे काय असते ते.. आकाशाकडे सकाळी, दुपारी, संध्याकाळी,
रात्री सगळ्या वेळी सगळ्या ऋतुत पाहण्यासारखे भरपुर असते. आकाशाचा आकाशी निळा रंगही
एकसारखा कधी नसतो. प्रत्येक ऋतुत तो निळा रंगही वेगवेगळा दिसतो. आकाशातले ढग आणि
समुद्रातल्या लाटा बघत मी अख्खा दिवस घालवु शकते आणि तोही अगदी मजेत...

मला खुप जण सांगतात की माझे वय माझ्या चेह-यावर दिसत नाही म्हणुन. मला खुपदा वाटते
की निसर्गावर माझे विशेष प्रेम असल्याने मीही त्याच्यासारखी कायम हिरवीगार राहणार
आहे बहुतेक

प्रतिसाद दिनेशदा | 26 November, 2010 - 17:34
शहरात राहणार्‍यांचे निसर्गाकडे दुर्लक्ष होते त्याची कल्पना करता येईल, मला.
माझ्याच अनुभवावरुन.
माझे सर्व बालपण मुंबैत गेले. मे महिन्यात गावी जाणे व्हायचे पण त्या काळात तिथेही
रखरखाट असायचा.
देशाच्या बाहेर पडल्यावर मात्र मला निसर्ग खर्‍या अर्थाने जाणवू लागला.
आधी बघितला तो ओमान. डोंगराचे वाळवंट पण त्यात किती सौंदर्य !! डोंगराचे आकार रंग,
वाळूच्या हलत्या टेकड्या, त्यातून वाहणार्‍या नितळ पाण्यांच्या नद्या. त्याच्या
काठाने फोफावलेली खजूराची झाडे. आणि त्या वाळवंटात फूलवलेल्या बागा, गुलाब, बकूळ,
प्राजक्त, मोगरा...
मग आफ्रिकेतले हिरवेगार तरी रांगडे सौंदर्य, मग युरपमधला जोपासलेला निसर्ग,
सिंगापूरमधला घडवलेला निसर्ग, न्यू झीलंडमधला अनोखा निसर्ग.... बघतच राहिलो.
मग गोव्यातले प्रदिर्घ वास्तव्य. त्या काळात गिरिराज बरोबर बाईकवरुन केलेली भटकंती.
आणि या सगळ्यात मला मुंबई नव्याने कळू लागली. अनेक दुर्मिळ झाडे, इथे या नगरीतच
आहेत, याचे शोध लागले, त्याबद्दल भरभरुन लिहिले.
हि नजर देण्याचे श्रेय अर्थातच डॉ डहाणूकर, प्रा घाणेकर, श्री नंदन कलबाग, श्रीकांत
इंगळहाळीकर आदी महान लेखकांना..
प्रतिसाद जागू | 26 November, 2010 - 18:13
साधना दिनेशदा खुप सुंदर.
माझ्या निसर्गप्रेमाबद्दल बोलायच तर माझे वडील अजुन सांगतात. हिला कुठे फिरायला
नेल, पिक्चरला नेल की सगळ बाजुला सोडून झाडांची पान फुल बघत बसायची. तिच सवय अजुनही
आहे. अगदी रोज ऑफिसमध्ये येत असले तरी रोज नविन झाडांच्या शोधात असते. मला
कृषीविद्यापिठात जायच होत पण ती सोय आमच्याकडे नसल्याने माझे स्वप्न अपुर्ण राहील.
पण त्याची मला खंत नाही.

शालेय जिवनापासुन कुणाकडेही नविन झाड, रोपट दिसल की त्याची फांदी आणयची आणि
आपल्याकडे लावायची तसेच कोणि आपल्याकडे मागितली की ती नेउन द्यायचीहा आवडता उपक्रम
होता.

लग्न झाले तेंव्हा सासरी नविन जागा घेतली होती. ती ओसाडच होती. त्यात ७०% झाड मिच
लावली. भाज्याही लावल्या अजुन लावते पण आता तेवढा वेळ मिळत नाही श्रावणी
झाल्यापासुन. मी काही झाडांच करत असले की श्रावणीही माझ्याबरोबर येते लुडबुड
करायला. मी फुल काढायला गेले की ती स्वतःसाठी मागते आणि तिच्या मामीला नेउन देते.

मला घरातही झाड ठेवण्याची आवड आहे. आईकडे असताना नेहमी मी घरात कुंड्या ठेवायचे पण
सासरी वरीष्ठांच ऐकाव लागत. त्यांच्या मते घरात जास्त डास येतील म्हणून ते ठेउन देत
नाहीत. मग मी बाहेरच कुंड्या ठेवते.

साधना मलाही आकाश बघायला खुप आवडत. माझ्या मिस्टरांनाही खुप आवडत. त्यांना
समुद्राच्या लाटाही बघायला खुप आवडत. त्यांच स्वप्न आहे की समुद्रकिनारी एखाद छोटस
घर बांधायच आणि सुट्टीत जाउन तिथे राहायच. पण हल्ली जागा मिळण खुप कठीण झालय.
निसर्गातील पक्षीही बघायला मला आवडतात. नदीत पाण्यात पाय भिजवण्याने अत्यानंद होतो.
माहेरी मळे होते तेंव्हा मी स्वतः पाटाचे पाणी घालायचे. त्याच पाटात होड्याही
सोडल्या आहेत. अजुनही त्या पाटाच्या पाण्याचे स्पर्श जाणवतात. बालपणी शेतीची लावणी
करताना शेताच्या पाण्यातही खुप खेळले.
लिहीण्यासारख खुप आहे पण आता निघण्याची वेळ झाली. परत आल्यावर गप्पा मारु.

अनिल७६ | 1 December, 2010 - 15:38
मस्त धागा ..आणि धन्यवाद !
लहानपणी लाजाळुच्या झाडाबरोबर मजा यायची,रंगपंचमीला शिवरीच्या झाडापासुन गडद हिरवा रंग तयार व्हायचा, दगडी पाल्याचा उपयोग (जखमेवर) भरपुर केला.
साधना,दिनेशदा तुमचे विचार्/अनुभव मात्र खासच !

प्रतिसादनिंबुडा | 30 November, 2010 - 19:13
हे पान फक्त ग्रुप सभासदांसाठीच आहे. हे सगळ्यांसाठी कर. >>>>
साधना मी अ‍ॅडमिनना कळवले आहे. पण अजुन त्यांनी काही केले नाही. मी परत कळवते.>>>

अगं जागु, आपलं आपल्याला करता येतं की. संपादन मध्ये जाऊन फक्त ग्रूप सदस्यांसाठी च्या चेक बॉक्स चा चेक काढून टाक. म्हणजे पब्लिक होईल.

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 13:20
पब्लिक केल आहे निंबुडा.

दिनेशदा लवकरच टाका माहिती.

संपादनप्रतिसादबित्तुबंगा | 4 December, 2010 - 13:27
मस्त धागा!

प्रतिसादथंड | 4 December, 2010 - 13:50
खुप छान धागा!

मला पाण्याच प्रचंड आकर्षण आहे! अगदी खुप

प्रतिसादअभि_नव | 4 December, 2010 - 13:56
छान घागा
मला वेळ मिळेल तसे मिही शेअर करीन
तोपर्यंत तुमचे सगळ्यांचे अनुभव वाचायला आवडतील

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 14:08
थंड तुझ्या आयडीतुनच कळत ते. पण अनुभव टाक ना.

संपादनप्रतिसादथंड | 4 December, 2010 - 14:17
जागु अथांग पसरलेल्या समुद्र कडे पाहिल कि वाट्त ह्या निसर्गापुढे आपण किती लहान आहोत , अगदि नगण्या !

दुर वर पसरलेल्या भात शेतीत ल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पहिल्यात? मस्तच

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 14:27
थंड शेतीत माझे बालपण गेलेय. शेती झाली की भाज्यांचे मळे चालु व्हायचे. मग मळ्यामधे जाउनच तिथली ताजी टोमॅटो मिठ लाउन खाण्यात जो आनंद आहे ना तो घरी कापुन खाण्यात नाही. नवअलकोलही तसेच खायचे मी आणि तेही कोवळे.

संपादनप्रतिसादसाधना | 4 December, 2010 - 15:13
मघाशी पक्षांबद्दल बोलताना एक पक्षी आठवला. स्वर्गिय नर्तक असे मराठीत नाव असलेला हा पक्षी.
फोटो साधारण ह्याच्यासारखा असतो.

http://en.wikipedia.org/wiki/File:Asian_Paradise_Flycatcher-_Male_at_Him...

म्हणजे हाच तो पक्षी पण प्रांताप्रांतागणिक त्याचा रंग बदलतो बहुतेक. इथल्या फोटोत काळसर दिसतोय. मी ताडोबाला नर पक्षी पाहिलेला तो अगदी पुर्ण पांढराशुभ्र, हिमासारखा (डोके काळे असावे, नीटसे आठवत नाही) आणि लांबसडक मधे विभागलेली शेपुट. उडताना त्या परांद्यासारख्या शेपटाची दोन्ही टोके वा-यावर खालीवर होतात. जणु दोन पांढ-या लाटा धावताहेत त्या पक्ष्यामागे..... काय सुंदर दृश्य दिसते ते. त्यामानाने त्याची मादी इतकी सुंदर नाही. तिला शेपुट वगैरे आहे पण रंग मातकट लाल. त्यामुळे चटकन दिसत नाही. आणि त्या पांढ-या नरापुढे ती अगदीच फिकी दिसते.

प्रतिसादसाधना | 4 December, 2010 - 17:29
निलगिरीच्या ट्रेकसाठी कोइम्बतुरला उतरुन उटीला जाणारी एस्टी पकडली. उटी वर उंचावर. मध्ये भलामोठा घाट लागला. मी आणि लेक खिडकीतुन दिसेल तितके निसर्गदर्शन करत होतो. घाट लागताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. आजवर आंबोलीचा आणि इतर दोन्-चार घाट पाहिलेले पण एकाही घाटात फळझाडे पाहिली नव्हती. जंगले झाडांनी भरलेली पाहिली पण माणसाने खाण्यायोग्य फळ काही दिसले नव्हते. इथे पुर्ण जंगल फणसाच्या झाडांनी भरलेले. एस्टी मध्येमध्ये थांबत होती तिथे स्थानिक लोक गरे विकत होते. इतके लांब, जाड आणि गोड गरे पहिल्यांदाच पाहिले. तसे मी नेहमी हायजिनच्या नावाने बोंबाबोंब करत असते पण असे काही खायला मिळाले की हायजिनला गुंडाळुन फेकते माळ्यावर
गरे खात खात चाललो होतो वरवर एवढ्यात एका झाडाच्या फांदीवरुन दोन बाण बाजुच्या फांदीवर गेल्यासारखे दिसले. घाटातला रस्ता गोलगोल फिरत होता त्यामुळे गाडी अगदी स्लो मोशनमध्ये चाललेली. नीट निरखुन पाहिले तर एक काळाढुस्स पण चमकदार अंगाचा पक्षी उडतोय आणि त्याच्या मागे बाण फिरताहेत नशिबाने सोबत सलिम अलींचे पक्षांवरचे पुस्तक होते. लगेच उघडुन त्यात पक्षी शोधला. इंडियन ड्रोंगो असे भयाण इंग्रजी नाव असलेला तो पक्षी म्हणजे मराठीत कोतवाल... घाट संपेपर्यंत मग त्या सुंदर पक्षाला मग जंगलात शोधत राहिलो.

http://nerdybirders.com/html/birds/rackettaileddrongo.html

येताना याच घाटात आकाशात इंद्रधनुष्य दिसले. त्याचे एक टोक अगदी जवळ वाटले म्हणुन शोध घेतला तर अगदी लांब असलेल्या एका घरात त्याचा उगम झालेला दिसला. आम्ही आनंदाने ते दृश्य बसमधल्या इतरांनाही दाखवले. आजवर पाहिलेल्या सगळ्या इंद्रधनुष्याची दोन्ही टोके आकाशातच कायम पाहिलेली. हाय रे दैवा, सोबत कॅमेरा नव्हता...

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 17:40
साधना कोतवाला विशयी ऐकलय पण पाहीला नव्हता. आता दिसला की ओळखता येईल.

आमच्याकडे एक शेवग्याच्या झाडावर मोठा पक्षी येतो. त्याचे फोटोही माझ्या दिरांच्या कॅमेर्‍यात आहेत. मी टिपायला जाते तेंव्हा ते पक्षी उडालेले असतात. साधारण तपकीरी आणि चोच लांब ते पक्षी आले की कावळ्यांची भरपुर कावकाव चालु होते. त्याचे नाव आता आठवत नाही. कोकणात आठळतात हे पक्षी अस कुठेतरी वाचलय. सोमवारी फोटो टाकते.

संपादनप्रतिसादजयु | 4 December, 2010 - 18:00
माझ्या माहेरि घराभोवती झाडे आहेत. तिथे खुप पक्षी पाहिलेत. पांढराशुभ्र स्वर्गिय नर्तक ,हॉर्नबिल्,घुबड हेसुधा दिसले होते. मी तर टिटवीची पिल्लेहि तिच्यासोबत फिरताना पाहिलेत्.तेव्हा घराभोवती फार वर्द्ळ नव्हती. सुर्यपक्षी,पाणकोंबडा, मुनिया,पारवे,सुगरण,बुलबुल यांची घरटी नेहमी झाडांवर असायची.

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 18:05
जयु धन्स मला तु नाव आठवुन दिलस.
आमच्या झाडावर येतात ते हॉर्नबिल. त्याला एक मराठी नाव पण आहे.

संपादनप्रतिसादजयु | 4 December, 2010 - 18:14
जागू बहुतेक धनेश म्हणतात.

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 18:18
जयु धनेश असेल पण अजुन काहीतरी एकदा लोकसत्ता मध्ये वाचल होत.

संपादनप्रतिसादप्रसादपंत | 4 December, 2010 - 18:19
मला २ झाडां विशयी माहीती हवी आहे ...
१] अफु
२] गांजा

माझ्या माहीती प्रमाणे अफु खसखशीच्या झाडापासुन बनवतात..
अन गांजा भांगेच्या झाडा पासुन ?

ही झाडे कोणाला नकळत घरच्या अंगणात लावता येतील काय ?

प्रतिसादजागू | 4 December, 2010 - 18:21
जयु मी आत्ता गुगल मध्ये सर्च केल. त्यात हॉर्नबिल वेगळेच आहेत. साधारण असाच पक्षी आहे पण तपकिरी रंगाचा. मी फोटोच टाकेन परवा जाउदे.

संपादनप्रतिसादजयु | 4 December, 2010 - 18:45 नवीन
हो,गुगलवरचे रंगीत आहेत.पण आपल्याकडे बहुतेक राखाडीच दिसतात.

प्रतिसादजयु | 4 December, 2010 - 18:51 नवीन
हो,गुगलवरचे रंगीत आहेत.पण आपल्याकडे बहुतेक राखाडीच दिसतात.

प्रतिसादडॉ.कैलास गायकवाड | 4 December, 2010 - 19:28 नवीन

ह्या हॉर्नबिल सदृश्य पक्षी मी बर्‍याचदा आमच्या कडे पाहिलाय.... करावे येथील ग्रीन झोन आणि पारसिक हील वर..... अगदी असाच नाही पण रंग जरा डल असलेला पक्षी. आम्ही त्याला ताशा म्हणतो,कारण तो जेव्हा ओरडतो,तेव्हा टण-टण असा आवाज येतो.

प्रतिसादसाधना | 4 December, 2010 - 19:33 नवीन
मीही हॉर्नबिल पाहिले आहेत, सगळॅ राखाडी. फक्त फोटोत रंगित दिसतात.
डोक्टर वरचा फोटो तुम्ही काढलाय काय??? बेलापुरच्या पारसिक हिलवर जाऊन शोधते आता याला.

प्रतिसादडॉ.कैलास गायकवाड | 4 December, 2010 - 19:35 नवीन
नाही नाही..... हा जालावरचा फोटो आहे... मी पाहिलेला याच्याशी साधर्म्य दाखवणारा होता.... फक्त रंग इतके ठळक नव्हते. पारसिक हिलवर मी ५/६ तरी पाहिलेयत.

प्रतिसादसाधना | 4 December, 2010 - 19:35 नवीन
जागु तु हे वाहते पान केलेय्स माहिती वाहुन जाणार....

नविन गप्पांचे पान उघडले की ते वाहते होते. गप्पा मारायच्यात पण त्या वाहायला नको असतिल तर लेखनाचा धागा उघडायला हवा. आता तु लेखनाचा धागा उघडुन इथले तिथे नेऊन चिकटवु शकतेस.

प्रतिसादसाधना | 4 December, 2010 - 19:36 नवीन
बिचारा पक्षी... काय ते चोचिवर अगडबंब अजुन एक शिंग

प्रतिसाददिनेशदा | 5 December, 2010 - 02:59 नवीन
साधना त्या लांब शेपटीच्या पक्षाला अप्सरा असा पण शब्द आहे. कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी विजेचा तारांवर बसलेला दिसतो. त्याची शेपटी उलट्या वाय सारखी असते. तो खूप जिगरबाज पक्षी असतो, आणी त्याच्यापेक्षा मोठ्या पक्षालाही हुसकून लावू शकतो. त्याचे घरटे ज्या झाडावर असेल, त्याच्या सोबतीने बाकीचे छोटे पक्षी सुरक्षित राहतात (म्हणून तो कोतवाल)
हॉर्नबील ला धनेश असाच शब्द आहे. त्याच्या बोजड चोचीचा त्याला त्रास होत नाही. डोक्यावरच्या भागाचा, त्याला दिशा शोधण्यासाठी उपयोग होतो, असे वाचले होते. मालवणला खूप दिसतात ते.
त्याची जीवननिष्ठा खरेच वाखाणण्यासारखी असते, एका ढोलीत तो घरटे करतो. मादी आत जाते आणि मग त्या ढोलीचे तोंड चिखलाने बंद केले जाते, निव्वळ चोच बाहेर येईल एवढीच फट ठेवतात, आत अडचण होऊ नये म्हणून मादी आपली पिसे काढून टाकते. मग पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आणि पिल्लाना अन्न आणून द्यायचे काम एकट्या नराचे असते, त्यात पण त्या सर्वांना चौफेर आहार मिळेल असे तो बघतो. आहारात कोवळी पाने, उंबराची फळे, वटांगळे, छोटे सरडे असे सगळेच असते. पिल्ले मोठी झाली कि मादी ढोलीचे तोंड उघडून बाहेर येते ( या सर्वाचे सुंदर चित्रण ब्यूटीफूल पीपल या चित्रपटात आहे )
या पक्षाला भिवया असतात (असा तो एकमेव) असे वाचले होते. सिंगापूरला तो हाताळला पण होता मी.
या मोठ्या चोचीचा वापर तो कौशल्याने करतो पूर्वी कर्नाळ्याला होता तो पिंजर्‍यात, बाहेरून टाकलेला दाणा वा कुरमूरा पण तो अलगद पकडायचा.

प्रतिसादअनिल७६ | 5 December, 2010 - 14:38 नवीन
दिनेशदा,
वाह ! सुंदर !
तुमचा अभ्यास्,निरीक्षण ..लाजवाब !

मग पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आणि पिल्लाना अन्न आणून द्यायचे काम एकट्या नराचे असते, त्यात पण त्या सर्वांना चौफेर आहार मिळेल असे तो बघतो
पक्षी,प्राणी देखील असा धर्म पाळतात पण माणुस नावाच्या प्राण्याचा काही भरवसा नाही !

प्रतिसादसाधना | 5 December, 2010 - 15:52 नवीन
कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी विजेचा तारांवर बसलेला दिसतो. त्याची शेपटी उलट्या वाय सारखी असते.

येस्स्स. हे उलट्या वायवाले कोतवाल मुंबईत भरपुर आहेत. जागु तुलाही दिसतील. चिमणीपेक्षा थोडा मोठा, पण कबुतरापेक्षा लहान असा हा पक्षी आहे. त्याच्याबद्दल वाचलेय की त्याला इतर पक्ष्यांचे आवाजही काढता येतात. ही सगळी करामत वापरुन तो लहान पक्ष्यांचे रक्षण करतो आणि म्हणुन माणसाने त्याला कोतवाल नाव दिले. अर्थात माणसातल्या कोतवालाने आता ही कामगिरी सोडलीय. रक्षण करण्याचे सोडुन तो भक्षण करण्याच्या मागे लागलाय

अनिल, माणसाला देवाने स्पेशल यासाठीच तर बनवलेय... आता देव आहे की नाही माहित नाही, पण ज्याने कोणी हा अफाट, गुढ त्याचवेळी अतिशय योजकता वापरुन, अगदी लहानातल्या लहान भागाचाही उपयोग करुन घेणारा निसर्ग बनवलाय त्या निसर्गाला शक्य तितके लवकर, शक्य तितका बिनडोकपणा वापरुन कसे संपवायचे याच्याच मागे मानव लागलाय... बहुतेक देवाला (किंवा जो कोणी असेल त्याला) त्याने बनवलेल्या निसर्गाचा कंटाळा आला की तो मानवाची निर्मिती करतो. मानव लगेच निसर्गाच्या मागे हात धुवून लागतो आणि निसर्गाला संपवतो. त्याला संपवता संपवता तोही स्वतः संपतो. मग देव परत नविन निसर्ग बनवायला मोकळा. मग आळस झटकुन लागायचे कामाला परत.

प्रतिसादस्वाती | 5 December, 2010 - 18:58 नवीन
साधना तू दिलेल्या लिंक मधला "स्वर्गिय नर्तक" कसला सही आहे. !!

खरंच साधना, अगदी माझ्या मनातलं लिहिलस. डायनासोर्स नंतर पाटी परत एकदा पुसायची वेळ लवकरच येणार आहे असे वाटतेय.

अनिल, तो ब्युटीफूल पीपल सिनेमा इतका सुंदर आहे, कि त्या पिल्ले बाहेर आल्यानंतर, ती त्याच्याकडे न बघता उडून जातात त्यावेळी बाबा धनेशाच्या "चेहर्‍यावरची" उदासी पण टिपलीय.

जॅग्स, धन्यवाद गं, वाहुन गेलेले पण जपुन ठेवल्याबद्दल.

स्वाती - ह्याला उडताना बघ कधीतरी. भान हरपुन पाहात बसशील... खरेच स्वर्गातुन अवतरलाय असे वाटते... हा पक्षी कोकणातही आढळतो.

दिनेश, माझा तो चित्रपट पाहायचा राहुनच गेला. मैत्रिणिच्या घरी सगळे जमलेलो, तिला कुठेतरी त्याची विसिडी सापडलेली तो पाहायला... सुरू केल्यावर पाहतो तो दुसराच चित्रपट सुरू झाला Sad युट्युबवर शोधते मिळतो का ते..

साधना अग मला कल्पना आली होती की मी हे गप्पांचे पान केलेय आणि आता पाने उडून जातील म्हणुन मी वरच सगळ सेव करुन ठेवल होत. पण मी अ‍ॅडमिनना कळवल होत हा धागा परमनंट पानांसाठी करण्याबाबत पण त्यांचा अजुन रिप्लाय आला नाही म्हणुन आता नविनच धागा काढला.
तुम्ही सगळेच खुप छान माहीती टाकत आहात इथे. निसर्गविषयक ज्ञानात खरच खुप चांगली भर पडतेय.

आज दिनेशदा यांनी साधनाला सांगितल्याप्रमाणे मी देखील 'ब्यूटीफूल पीपल' सर्च कराव म्हणुन गुगल्वर गेलो आणि तिथे ही अक्षरे पेस्ट केली तर एकमेव संदर्भ मिळाला ...
तो असा ...
दिनेशदा | 27 June, 2010 - 13:35
सगळेजण वर्ल्ड कप बघताहेत.
मी काल बर्‍याच वर्षानी परत ब्यूटीफूल पीपल बघितला. आता काहि दृष्ये ग्राफिकली अ‍ॅड केली आहेत (उदा माकडाचा हात वारुळात अडकतो ते ) पण बाकि सगळा सिनेमा आजही तसाच हसवतो. मादक फळे खाल्यामूळे सगळेच प्राणी झिंगतात तो प्रसंग तर मस्तच जमलाय.

Lol
आता इंग्रजीत शोधतो ...
Happy

हाच पक्षी कोतवाल ना ?
या वर दोन लेख वाचायला मिळाले ...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=845...

पिलांसाठी आईला अंधारकोठडी! बाबांना परिश्रम
http://epaper.esakal.com/eSakal/20091002/5155955613504297273.htm

यात लिहिलं आहे की जगभरात आता फक्त चारशेच्या आसपास धनेश आहेत .
फक्त ४०० पक्षी की जाती ?
पक्षी असेल तर खुप भयानक परिस्थिती आहे ..
Happy

धन्स अनिल.

Indian_Grey_Hornbill1.jpg

अनिल पक्षी नसणार, प्रजाति असणार. कारण कोकणात, दिसतात बरेच.
(पण मी तो फोटोतल्या करड्या रंगाचा नाही बघितला अजून, कोकणात पिवळ्या लाल चोचीचेच दिसतात जास्त.) एवढ्या मोठ्या चोचीनेही तो बारिकशी वस्तू पकडतो, ते बघायला मजा येते.
हा पक्षी डोक्यावरुन उडतो त्यावेळि त्याच्या आकारामूळे विमानाचा भास होतो.

हा पारिंगा आहे.
paringa.JPGparinga2.JPG

पारिंग्याच मोठ झाड असत. पारिंग्याच्या खोडाला आणि फांद्यांना काटे असतात. ह्यांना लाल गर्द रंगाची फुले येतात. फुले गेली की शेंगा येतात ह्या शेंगांमधुन मोठ्या बिया निघतात. शेंगा साधारण आपट्याच्या शेंगाएवढ्या असतात.

लहानपणी आमच्या घरात जखमेवरती कुठलही औषध किंवा मलम नव्हत. पारिंग्याची झाडे कुंपणाला होती. जरा जरी जखम झाली तरी कोणतरी धावत जाउन पारिंग्याची पाने काढून आणायचे आणि आजी ती पाने हातावर चोळून तिचा रस जखमेवर टाकायची. लगेच रक्त बंद व्हायच आणि अजुन दोन तिन वेळा जखमेवर टाकल की जखमही लगेच भरायची.

लहानपणी पारिंग्याच्या बियांशी खेळण्याचाही आम्हाला छंद होता. छंद कसला मस्ती म्हणा. ही बी दगडाला किंवा दोन बिया एकमेकांना घासायच्या आणि दुसर्‍याला चटका द्यायचा. खरोखर गरम चटका बसतो.

हा पारिंगा एके काळी आमच्या घरात वरदान होता. एकदा माझा आत्ये भाउ झाडावरुन पडला आणि त्याच तोंड उघड असल्याने त्याच्या जिभेवर सळी लागली. भळा भळा रक्त वाहू लागल. मग आजिने धावत जाउन पारिंग्याची पाने काढून त्याचा रस त्याच्या जिभेवर लावला. त्याने रक्त थांबले. पण आजीने लगेच त्याला दवाखान्यात नेउन धनुर्वाताचे इंजेक्शनही दिले.

वा मस्त धागा आहे! माहिती पण एकदम छान!
ब्यूटीफूल पीपल खरंच अमेझिंग आहे. ह्या वर्षी भारतवारीत ती एक खरेदी केली मुलीसाठी. तिला पण जाम आवडला.

दिनेश, मी काल रात्री ब्यूटीफूल पीपल पाऊण पाहिला. अजुन थोडा शिल्लक आहे. पण खरेच अमेझिंग आहे. तरसापासुन आपल्या पिलांना सुखरुप पळता यावे म्हणुन नाटक करणारे बदक, हरणपिल्लाशेजारी गुपचुप बसुन आधार शोधणारे आईपासुन दुरावलेले आफ्रिकन डुक्कर... कोण म्हणेल यांना काही समजत नाही म्हणुन?

जागु तु लिहिलेले झाड म्हणजे काटेसावर तर नाही ना असा विचार मनात आला, काटेसावरीला मोठे गर्द गुलाबी फुल येते पण अशी पाने नसतात. त्याची पाने एका केंद्रापासुन गोल सुरू होतात.

आम्ही पारींगाला पगेंरा म्हणतो. त्याच्या फुलातला रस पितात कावळे आणि हे सगळं भारी विनोदि दिसत.

हो साधना, आणि शहामृगही सही दाखवलंय! माणसांना वाटतं आपण अगदी सहज गंडवु शकतो प्राणी/पक्षांना. पण केवढी समज असते त्यांना!

पारिंगा म्हणजे पंगेरा? ज्याला पळसासारखीच दिसणारी फुले येतात तो??? ह्म्म पाने आहेत त्यासारखीच...

हो तो शहामृग विसरलेच. माणसे कशी फसवतात त्याला तरी तो फसत नाही.
आणि ते येडं मिरमांजर , दुस-याचे पाहुन अंडी फोडण्याचा प्रयत्न करणारं.. त्याला पाहुन जाम हसायला येत होत. आणि तो सगळे दात पडलेला सापही पाहुन जाम हसले मी.. Happy

जागू तो पांगारा. यात लालभडक, केशरी आणि दुर्मिळ पांढरा असे रंग असतात. यात रानपांगारा अशी किंचीत वेगळी जात असते. बीयांचा खेळ आम्ही पण खेळायचो.
पळसाची फूले वेगळी, भडक केशरी रंगांची पण दोनच पाकळ्यांची. साधारण होळीच्या आधी तो फूलतो. झाडाखाली गळलेला पाकळ्या गोळा करुन पाण्यात कुस्करल्या कि मस्त केशरी रंग तयार होतो. होळीसाठी उत्तम आणि सुरक्षित देखील.

दिनेशदा मी पळसाबद्दल खुप ऐकलय पण अजुन पाहीला नाही. कदाचीत ते झाड पाहीलही असेल पण तेच म्हणून माहीत नाही. जर फोटो असेल तर प्लिज दाखवा.

साधना सावर वेगळी ग. तिची पानेही थोडी वेगळीच असतात. आणि त्याचे फुल गोलाकार असते आणि पाकळ्या रुंद असतात. पण पारिंग्याच्या फुलांच्या पाकळ्या निमुळत्या असतात.

लहानपणी पारिंग्याच्या बियांशी खेळण्याचाही आम्हाला छंद होता. छंद कसला मस्ती म्हणा. ही बी दगडाला किंवा दोन बिया एकमेकांना घासायच्या आणि दुसर्‍याला चटका द्यायचा. खरोखर गरम चटका बसतो. >> त्या बियांचे झाड म्हणजे पांगारा हे माहीत नव्हत.. मस्त धागा.. त्या पांगार्‍याचे फोटो नाहीत का कुणाकडे ?

रॉक्स अजुन त्या झाडांना शेंगा आल्या नसतील. बहुतेक त्या उन्हाळ्यापर्यंत सुकतात. मिळाल्यावर टाकतेच फोटो.

जागू पळस नक्कीच बघितला असणार. मार्च एप्रिल मधे सगळे झाड केशरी रंगाचे होते. कोकणात आणि देशावरही तो आहेच. बहिणाबाईंची एक कविता आहे. झाडावर चोची विसरून पोपट कुठे गेले ? असा काहिसा अर्थ आहे. खरे तर पळसाची रुपं प्रत्येक ऋतूमधे वेगवेगळी असतात. आणि त्यांच्या कवितेत त्याचाही ऊल्लेख आहे.
पळसाला पाने तीनच ही म्हण आहेच. पूर्वी त्याची पाने फुलपुडीसाठी वापरत असत. त्याला एकच बी असलेली शेंग असते. त्यातली बी औषधी असते. मला नीट आठवर असेल तर संस्कृत मधे याचे नाव किम्शूक असे आहे. (किम शूक ? राघू तर नव्हे ? )

पांगार्‍याला, इंदिरा संता नी सूर्योपासक असा शब्द वापरला आहे. ऐन वैशाखात तो लालभडक फूलांनी बहरतो. त्याच्या पाकळ्या (खरे तर फूलागणीक एकच पाकळी ) सूर्याच्या दिशेने असते. कदाचित त्यांना बीच्या अंगातली आग पण सूचवायची असेल.
माझ्या जून्या रंगीबेरंगी पानांवर दोन्ही झाडांबद्दल सविस्तर लेख होते.

Pages