निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रांनो, टिपी करायला वेळ मिळाला की इथे जा -
ashbabyfoto.wordpress.com

इथे की कण्हेर टाकलीय का आता आठवत नाही. गुलाबी कण्हेरीचे भरभरुन फोटू आहेत माझ्याकडे Happy

जागु, फांदी जगते पण तिचे खोड मोठे होत नाही.
दिनेश, कुडाची फुले देवचाफ्यासारखी दिसताहेत.

दिनेशदा काल आणल मी ते गाठीच पान तोडून. माझा कॅमेरा सध्या जवळ नाही म्हणुन मोबाईलने फोटो काढलेत. जर तुम्हाला अजुन चांगले म्हणजे कॅमेर्‍याने फोटो हवे असतील तर १-२ दिवसांनी देईन चालेल का ? की ह्याने तुमचे काम होईल ?

हे आहे उंबराचे गाठी आलेले पान. ह्या गाठी आधी हिरव्या असतात मग गुलाबी होत जातात. काल मला हिरव्या गाठी पण दिसल्या.
umbar.JPG

घाबरत घाबरतच मी ह्यातील एक गाठ फोडली. मला वाटल किड वगैरे असेल की काय ? पण फोडल्यावर त्यात फक्त गर होता. म्हणजे एखाद्या फळासारखीच ही गाठ वाटली मला. फोटो क्लियर नाही आलाय मोबाइलमध्ये.
umbar1.JPG

जागू, धन्य. तुझं निरिक्षण फारचं छान आहे. ह्या गाठी कितिदा पाहिल्यात पण कधी फोडून बघाव्याशा वाटल्या नाहीत. तितके कुतुहल नव्हतेचं कधी.

जागू, आता लिहितोच एक दोन दिवसात ! कॅमेराचे फोटो मिळाले कि मग अ‍ॅड करु.

साधना, कोकणात भरपूर असतात हि फूले. पण आकाराने देवचाफ्यापेक्षा फारच छोटी. एक सेमी व्यासाचीच असतात. गोळा करायला घेतली, त्र एक दोन झाडापासूनच ओंजळभर मिळतात.

योगेश, कांद्याच्या कळ्यांची याआधीची पण एक अवस्था असते. या सगळ्या कळ्या एका हिरव्या आवरणात असतात. ते दांडे बाजारात विकायला येतात. हे दांडे आतून पोकळ असतात. पण पातीपेक्षा किंचीत वेगळ्या चवीचे असतात. या दांड्यांची पिठ पेरुन किंवा सुका जवळा घालून करतात भाजी. जागूला माहीत असेल हा प्रकार.
नाशिक भागात नळीची भाजी म्हणून एक रानभाजी असते, ती पण अशीच असते.

बी हे निरिक्षण मला दिनेशदांनी करायला सांगितल होत.
दिनेशदा लवकरच टाकेन कॅमेर्‍याचा फोटो.

जन्मजात आणि जातिवंत आळशी अशी मी. तुम्हा सगळ्यांचा उदंड उत्साह आणि हे सुरेख सुरेख फोटो बघून मी पण माझ्या घरच्या झाडांचे फोटो टाकते.

हा माझ्या बाल्कनीतला नेचा :

055a.jpg

ही पिवळी लाल्-ठिपकेवाली कर्दळ :

058a.jpg

ही लाल कर्दळ :

059a.jpg

हे लाल कर्दळीचं फळ :

060a.jpg

ही माझी दोन रंगाची फुलं देणारी बोगनवेल :

061a.jpg

मामी ती लाल पिवळी कर्दळ लहानपणी आमच्या घरी होती. कुणाकडे सत्यनारायणाची पुजा असली की आमच्याकडून घेउन जायचे.

माझगावला एक छोटीशी छानशी टेकडी आहे. मध्यंतरी तिथे गेले असताना, हे झाड दिसले. कसले आहे?

071a.jpg072a.jpg073a.jpg

मामी, त्या ज्वरापेक्षा हा ज्वर चांगलाच. ते झाड आहे, ते तसे कॉमन आहे पण त्याला आपल्याकडे फूले येणे मात्र खुपच अनकॉमन आहे.
माझगावची म्हणजे स्टेशनला लागून आहे ती का ? मी कधीच गेलो नाही. मला वाटतं त्या टेकडीवरुन, हवा छान असेल तर कर्नाळ्याचा सुळका पण दिसतो.

मामी फोटो मस्तच, आणि तुझी मुलगी सुद्धा अगदि गोड आहे. (मामी आयडी घेतल्यामुळे उगीचच "अहो म्हणावे असे वाटायचे. :))

>>>> माझगावची म्हणजे स्टेशनला लागून आहे ती का ? मी कधीच गेलो नाही. >>>>> हो दिनेशदा, फारच छान आहे ती टेकडी. आता रीनोव्हेशनच्या नावाखाली तीच तीच फुलझाडं लावताहेत. पण जुनी झाडं ही आहेत. एक पुरातन शंकराचं देऊळही आहे.

>>>>> मला वाटतं त्या टेकडीवरुन, हवा छान असेल तर कर्नाळ्याचा सुळका पण दिसतो. >>> दिसत असणार. कारण हवा छान असेल तर माझ्या घरातूनही जवळजवळ पाच्-सहा पर्वतरांगा दिसतात. त्यात (बहुधा) कर्नाळाही आला, जागुचं उरणही आलं आणि घारापुरीही आलं. Happy

प्रज्ञा१२३, धन्यवाद. पण मला असच अगं म्हण. मुलीच्या वयावरून माझ्या वयाचा अंदाज बांधशील तर फसशील. Happy

मला नेहमी वाटतं, शंकराच्या देवळाजवळ बेलाचे झाड अवश्य असावे. मुंबईत आहेत तशी झाडे बेलाची म्हणा.

जागू, आता मला कॅमेराने काढलेले फोटो हवेत. उंबराच्या झाडाचे, पानांचे, फळाचे.. लेख झाला पण लिहून.

एक सुंदरसे बेलाचे झाड जुहुच्या हरे राम हरे कृष्ण मंदिराच्या आवारात आहे.

अविनाश बिनीवाल्यांचे, लोकसत्तामधले न्याहारी सदर वाचले का ? त्यामधे बंगालमधे न्याहारीसाठी बेलफळ खातात असे लिहिले होते. तेवढे मोठे बेलफळ आपल्याकडे दिसत नाही. बेलफळ, गूळ आणि चिंच याचे सरबत पण मस्त लागते. घाटकोपर किंवा ठाण्याला तसे झाड बघितल्यासारखे वाटतेय.

हो वाचतेय मी ते सदर. आपल्याकडे त्याचा केवळ मुरांबा करतात एवढेच माहित आहे.

ब्रेकिंग न्युज Proud
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार असे कळते कि, साधनाने दिलेल्या एडेनियमच्या झाडाला (दोन महिन्याच्या आतच) कळ्या येत असल्याचा अस्मादिकांना दाट संशय आहे. Happy गुलाबीसर कोंब कळ्या/पान येत आहेत, पण त्या कळ्या आहेत कि पानं याबाबत अस्मादिक संभ्रमावस्थेत आहे. Happy त्यामुळे त्यावर कडक नजर ठेवून आहोत. जर हि माहिती खरी असेल तर लवकरच याबाबत सचित्र माहिती प्रसिद्ध केली जाईल. :फिदी:.
ये थी खबरे आजतक!!!. फिर मिलते है ब्रेक के बाद Proud

अरे यार.. ग्रेट... बघ कसे गुणी झाड आहे ते... गेल्या गेल्या बहार उडवुन देतेय.,. कळ्याच असणार. सध्या मोसम आहे...

मामीच्या फोटोतले झाड खुप ठिकाणी पाहिलेय.. बिचारे अगदी दुर्लक्षित असते, कोणी पहात नाही त्याला,. म्हणुन बहुतेक फुलांचा बहर आणलाय त्याने, निदान त्या निमित्ताने तरी कोणी पाहिल (आणि ही युक्ती यशस्वी पण झाली. मामीनी पाहिले की...)

मुलीच्या वयावरून माझ्या वयाचा अंदाज बांधशील तर फसशील
यावरुन काय समजायचे??? मामीला मामा बालपणातच (अर्थात बचपनकी मोहब्बत) मिळाला की मामा शोधत राहिला मामीला आणि मामी सापडलीच नाही बराच काळ?????? Light 1

दिनेशदा माझ्या आईकडे शंकराच छोट मंदीर आहे. त्याच्या समोरच बेलाच झाड आहे. त्याला पावसाळ्यात फळ लागतात. ती फळे पिकल्यावर नुसतीही खातात. शिवाय त्याचा मुरंबा बनवतात. बेलाच्या पानांचा काढा माझी आई मधुमेहावर उपचार म्हणुन घेते मधुन मधुन. आईकडे गेले की झाडाचा फोटो काढुन आणेन. माझ्याघरी पण मी लावलय पण खुपच छोट आहे झाड मागच्या वर्षीच लावलय.

मला मदत हवी आहे. मझ्या टोम्य्टोच्या झाडाल फुलं येतात खुप पण फळ येतं नाही. गेल्या वर्षी १ आला. ह्या वर्षी एकही नाही Sad

अरे कुणी पुण्यात आलात तर वेताळ टेकडीलापण भेट द्या. बरेच जैव वैविध्य पहायला मिळेल. लवकरच तिथे टेस्ट ट्रॅक होणार असल्याच्या वदंता आहेत.

मामी मस्तच आहेत फोटो. ती पिवळी कर्दळ मी पाहिली होती. लाल आजच पहातेय. तुमच्या फोटोत. ती पांढरी आणि गुलाबी बोगनवेल मी कालच पाहीली.
फुलांनी भरलेली दगडी टोपली, आणि ती छोटी दोन्ही सुंदर.

माझगाव स्टेशन हार्बर लाईन वर आहे. सॅन्डहर्स्ट रोड स्टेशनच्या आधी.

काय जागू तू पण. त्या दगडीत मस्त पाणी भरुन छान कमळं लावायची आणि झकास गोल्डफिश सोडायचे त्यात. (तू खायचे मासे सोडलीस तरी तूला माफ)

Pages