निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

जागू हे एरंड नाही का ? ते जे लांडगे असतात ते गायी गुरे यांच्या शेपट्या, कुत्र्यांचे अंग कान, सगळीकडे चिकटतात. तसे काटे फार टोकदार नसतात.
समुद्रावरुन आठवलं, तूमच्याकडे सूरुच्या झाडांना पण फूले आली असतील आता. ती खूप लहान असतात, आपल्याला नेहमी ती फळेच दिसतात.
आणि केवडा ? तो असेल तर या दिवसात तो फूलायला लागेल. फूलला तर कोणी तो झाडावर ठेवत नाहीत. त्यामूळे झाडावरचा त्याचा फोटो अगदी दुर्मिळ. गणपतीपूळ्याचा प्रदक्षिणेचा डोंगर आहे तिथल्या विहिरीजवळ केवड्याचे बन आहे. तिथल्या झाडांची फूले तोडायची बंदी असल्याने, तिथे दिसू शकतो तो.

दिनेशदा अगदी, आमच्या समुद्रकिनारी सुरुचे बन आहे तसच केवड्याच पण आहे. पण मला अजुनपर्यंत केवड्याचे फुल झाडावर दिसले नाही. बाजारात विकायला दिसते. झाले की लगेच काढुन नेतात.

दिनेशदा मिच संभ्रमात पडलेय हे एरंडच आहे ना ?

जागू, मस्तच आलाय आंब्याला मोहोर. आणि पालवि पण छानच.(लालसर आणि निळ्सर पण)

दिनेशदा, मी वडिलांना विचारले. त्यानी नागचाफाच नाव सांगितल. पण याला ५/६ पाकळ्या असतात का? कारण त्या फुलाला गोलाकार पाकळ्या होत्या, आणि मध्ये गोल आकाराचे पिवळे पूंकेसर होते.(पूंकेसरच म्हणतात ना?)

दा मला तर ही पाने एडयाची वाटतात. आमच्याकडे लहान मुलांच्या डोक्यावर आणि पोटावर ही पाने गरम करुन त्यावर तेल चोळून ठेवतात.

शोभा अग तु देवचाफ्याबद्दल बोलत आहेस का ? त्या झाडाखाली नाग बसतात म्हणून त्याला नागचाफा म्हणत असतील.
nagchapha1.jpg

हल्लीच मागे मी तोरणा ते राजगड ट्रेकला गेलो होतो तेव्हा हे दिसलेले झाड.. एकही पान शिल्लक नव्हते.. फक्त या फळांनीच झाड भरून गेले होते.. कुठले असावे बरे ?

- - - - - -

मला वाटतं शोभाचे बाबा कैलाशपतिचे फूल सुचवत आहेत. त्याचा मधला भाग नागफणीसारखा असतो. शिवाय त्याखाली छोटिशी पिंड पण असते. त्याचे बरेच फोटो आहेत ईथे.

पण दिनेशदा कैलाशपतीच फुल लाल-गुलाबी असत ना ? शोभा म्हणतेय की त्याच्या पाकळ्या पांढर्‍या आणि मधले पुंकेसर पिवळे असते.

मी जे पाहिलयं ते झुरळासारखच (आतल्या बाजुला वळलेले २ आकडे) दिसत होतं,पण ही लहानपणी सर्रास पहायला मिळणारी झाडं आता (आम्हाला थोडफार त्यांच्याबद्दल कळायला लागल्यावर) मात्र कुठे गायब होतात कुणास ठाऊक ?
Angry

जागू ती चवळीच.शोभाला खाली जोडलेल फूल तर नाही ना सान्गायचे. या फूलाला नागकेशर म्हणतात.देशी व्रूक्श मधे महाजन सर याला नागचाफा म्हण्तात.
rsz_nagchafa.jpg

विजय मी झाड दाखवले होते ना याचे. त्यावेळी फूले नव्हती त्याला.
यो वेगळाच प्रकार रे. उंडीची फळे अशी असतात पण ती इतक्या घोसाने नाही लागत. शिवाय खाण्याजोगी नसावीत, नाहीतर झाडावर इतकी टिकतीच ना ? फूलांवरुन शोधता आले असते.

विजय मी झाड दाखवले होते ना याचे. त्यावेळी फूले नव्हती त्याला. >> अरेरे.. फूल असते तर बघायला प्रत्यक्षात बघायला मिळाले असते..

विजय.. धन्यवाद माहितीबद्दल

शिवाय खाण्याजोगी नसावीत, नाहीतर झाडावर इतकी टिकतीच ना ? >> हम्म.. बरोबरच असणार तुमचे.. घोसच्या घोस लागलेले पाहून आम्हीदेखील क्षणभर चकीतच झालो... तोरणाला गावातून जाताना हे झाड वाटेत अगदी सुरवातीलाच लागले होते.. बघू.. पुन्हा पावसात जायचा विचार आहे.. तेव्हा पानांचे फोटो मिळतील..

एवढे फुलांचे प्रकार पाहून, मीच विसरले माझे फूल. आता दादांनाच (वडीलाना) दाखवते हे फूल, आणि नक्की काय ते तुम्हाला सांगते.
दिनेशदा, जिप्सी, जागू, विजय, सर्वांना मनापासून धन्यवाद. माझ्यासाठी सगळ्यांनी खूपच फुले पाठवलीत. क्षमस्व. तुम्हाला फार त्रास दिला.

माझ्यासाठी सगळ्यांनी खूपच फुले पाठवलीत
तरी बरं,काल मी फुल पाठवता-पाठवता राहिलो, नाहीतर माझं एक फुल आणखी वाढलं असतं !
Happy

हा धागा चालू केल्याबद्दल जागूला शतःश धन्यवाद. जागू,साधना,दिनेशदा आणी अनेक निसर्गप्रेमी मंडळींमुळे अनेक झाडांची ओळख होत आहे.त्यांच्याबद्दल शास्त्रीय माहिती मिळत आहे .पण ह्याला आम्हाला आलेल्या वाईट अनुभवांची काळी तीट लावत आहे.मला व माझ्या साबाला(त्यांना जास्तच्)झाडांची आवड आहे .घरात व आमच्या बर्फाच्या फॅक्ट्रीत जागा भरपूर .पण घरातल्या आंगणातल्या मातीत वाळवी भरपूर म्हणून फूलझाडे कुंड्यात लावली.आंबा,पेरू,आवळा इत्यादि जमिनीत लावली.पण गुलाबाला फुले आली की रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍या बायका,मुली सरळ गेट उघडून आत येऊन फुले तोडतात्.रागावले तर दात दाखवुन हसत आम्हाला फुलांची फार आवड आहे हे वर ऐकवतात्.चायनीज लेमनचे झाड ज्याला ३०,४० फळे लागायची ,ते झाड आम्ही गावाला गेलो असताना कोणीतरी चोरुन नेले.ह्या बाबत माझ्या अमेरीकेतल्या नातीची गोष्ट मला आठवते. तीन वर्षांपूर्वी आम्ही दोघे व माझे दीर्,जाऊ अमेरिकेला माझ्या मुलीकडे गेलो होतो. तेंव्हा माझी नात तीन वर्षाची होती. ती प्ले स्कूल मधुन येण्या आधी माझ्या दिराने तिला देण्यासाठी बागेतले गुलाबाचे फूल तोडले, व ती आल्यावर लगेच तिला दिले.तिने ते फूल त्याला परत दिले व तू हे फूल का तोडले म्हणून रडायला लागली व ते परत झाडाला लावुन दे म्हणून मागे लागली म्हणजे तिथे किती लहाणपणापासून ह्या गोष्टी शिकवतात,व आपल्याकडे मोठी माणसे सुद्धा किती बेफिकिर असतात्.पेरु,आंबातर झाडाला लागल्यावरच मुलांचे लक्ष त्यावर. उंच भिंतिवर एकावर एक चढून भिंतिला लावलेल्या काचा विटांनी फोडून फळे मोठी व्हायच्या आतच लंपास्.शेवटी अंगणात असलेले सामान चोरीला जाईल म्हणून मी पेरुचे झाडच तोडून टाकले. हे कमी होते म्हणून आता २,३ वर्षांपासुन १०,१५ माकडांची टोळी येते.ती तर नवीन पाने,कळ्या,फुले, मोहोर सगळेच फस्त करते. हे सगळे जाळिच्या दाराआडून अगतिकपणे पहात रहाणे एवढेच माझ्या हातात असते. फॅक्ट्रितल्या बगिच्याचा आम्हाला केव्हढा अभिमान .कितीतरी गुलाबाच्या व्हरायटि,सिझनल फुले ह्यांनी बगिच्या बहरला असायचा. पण आता तिथेही माकडांची वक्रद्रूष्टी वळली आहे. त्यामुळे आता फक्त क्रोटोन्सच्या व्हरायटी लावायचे ठरवत आहोत. अशी आमची कहाणी. पण ह्या धाग्यामुळे मला कितीतरी नवीन झाडांची माहिती होत आहे.व तुमच्या सारख्या निसर्गप्रेमी मंडळींची ओळखही होत आहे

समई Sad
आपल्या हातांनी लावलेल्या झाडांची नासधुस पाहाताना किती यातना होतात ना... Sad

साधनाताई, अगदि खरं आहे तुमचं म्हणणं!
रच्याकने, ह्या धाग्यामुळे आपण सर्वचजण एकमेकांना एका अनामिक आणि अद्रुश्य धाग्याने बांधले गेलो आहोत नाहि का? Happy

समई, या बाबतीत मला गोव्याची आठवण येते. तिथे प्रत्येक घराभोवती काही फूलझाडे असतातच, फळझाडेही असतात. पण अगदी लहान मूलही ते फूल वा फळ तोडत नाही. तिथे देवाला पण भरपुर्‍ फूले वाहतात, पण झाडावरही ठेवतात. अशी शिस्त पुण्यामुंबईत नाही हे मात्र खरं.
परदेशातही अशी रित नाही. आफ्रिकेतील बायका काही फूले डोक्यात माळत नाहीत, त्यामूळे तोडण्याचा प्रश्न नाही. न्यू झीलंडमधेही तसे दिसले नाही. आणि खास म्हणजे गोवा आणि या परदेशातही फार मोठी कुंपणे पण नसतात.

नमस्कार्,मलापण निसर्गाची आवड आहे.तुमच्या गप्पा मला मस्त वाटल्या.वाटले की आपणही share करावे तुमच्या बरोबर.पान नं ३ वरचा फोटो बहुधा बारतोंडीचा असावा.पानांचा आकार पाहून आणि वर्णना वरून असे वाटतेय.त्याची फुले पांढरी आहेत का?

निसर्गप्रेमींनो, मुंबईत HSBC Mumbai Bird Race या २७ फेब्रुवारीला आहे. यात जवळ्जवळ २७ टीम्स असती. जास्तीत जास्त पक्षी बघून नोंदवणार्‍या टीमला विजेता घोषित केले जाईल. अधिक माहितीसाठी आजचा (गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी) टाइम्स ऑफ इंडिया (पान नं. ११) पहा. किंवा
http://birdrace.dhaatu.com/home/mumbai या ठिकाणी भेट द्या.

माझ्याकडे आता मेथी यायला लागलीये. शिवाय आळू, टोमॅटो, तूर, कारली, मिरच्या, पुदिना इतकी झाडं लावलीयेत.

रच्याकने, ह्या धाग्यामुळे आपण सर्वचजण एकमेकांना एका अनामिक आणि अद्रुश्य धाग्याने बांधले गेलो आहोत नाहि का?

>>> धागा नाय ग प्रज्ञा, वेलींनी. Happy

समई, दिनेशदा खर आहे. इथेही कोणीच झाडाला आलेल्या फुलांना /फळांना हात लावत नाहीत. घरासमोर ठेवलेल्या कुंड्या वगरे बिना कुंपणाचे व्यवस्थित आहे तसे रहातात.

मला एक सल्ला द्या. मी सहज बटाट्याला कोंब आले म्हणुन कुंडीत लावले चार दिवसापुर्वी. आता लगेच पानं वर यायला लागलीत. बटाट्याच रोप किती मोठं होतं? आणि किती माती लागते? मी अगदी छोट्या कुंडीत मुली बरोबर एक गंमत म्हणुन लावलीत.

अशी शिस्त पुण्यामुंबईत नाही हे मात्र खरं.

इथे सक्काळी उठुन मॉर्निंगवॉकला जाण्यामागची प्रेरणा परतताना लोकांच्या बागेतली फुले चोरुन तोडणे ही असते. फुले चोरायची नसतील तर कोणी उठुन बाहेरही पडणार नाही. मी ब-याच लोकांना हा उद्योग करताना पाहिलेय Proud

माझ्या कुंडीतले गुलाब तर सोडाच पण गुलाबासकट कुंड्याही लोकांनी पळवल्या आहेत.... दोनचारदा हा अनुभव घेतल्यावर खाली कुंड्या ठेवायचे बंद केले.

इथे सक्काळी उठुन मॉर्निंगवॉकला जाण्यामागची प्रेरणा परतताना लोकांच्या बागेतली फुले चोरुन तोडणे ही असते. फुले चोरायची नसतील तर कोणी उठुन बाहेरही पडणार नाही. >>:हाहा:

गुलाबासकट कुंड्याही लोकांनी पळवल्या आहेत>> काय माणसं आहेत. श्या!!

Pages