निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<<त्याची काटेरी फळं काढून आम्ही एकमेकांच्या कपड्यांना चिकटवायचो. लांबून मारली की चिकटायची. केसात अडकली तर वाटच.>>>>>>ह्या लहानपणीच्या खोड्या सर्वांच्या किती सारख्याच असतात ना?

मला आता समुद्रकिनारी जाऊन त्या झुरळाच्या झाडांचा शोध घ्यावा लागेल. शोध लागला की फोटो टाकतेच.

दिनेशदा धन्यवाद. १०००व्या पोस्टला आपण फटाके उडवुया (गम्मत)

ह्या लहानपणीच्या खोड्या सर्वांच्या किती सारख्याच असतात ना?
खरच ग. कित्ती लांब राहुन पण खेळण्याची साधन सारखीच असतात ना ?

दिनेशदा कवठी चाफा पोचला. म्हणजे मिळाला. धन्स.
पण मी म्हणतेय तो चाफा हा नाही. कदाचित माझा नावात काही गोंधळ होत असेल. तो नागचाफयासाराखाच असतो. फक्त तुमच्या फ़ोटोतल्यापेक्षा त्याला पाकळ्या जास्त असतात. आता नीट आठवत नाही. आज रात्री वडिलांना विचारते. ते नक्की काय ते बरोबर सांगतील.
जागू, बालपणीचा काळ सुखाचा.

मला आता समुद्रकिनारी जाऊन त्या झुरळाच्या झाडांचा शोध घ्यावा लागेल >> उगाच त्रास घेऊ नका जागुजी मी उद्या टाकते. फोटो आमच्याकडे आहेत.

शोभा, वरी नक्को. बहुतेक चाफ्यांचे फोटो आहेत माझ्याकडे. आणि बाबांनी दुसरेच नाव सांगितले तरी शोधून देऊ.

मी नागचाफा पहिलांदाच पाहीला. ह्याचे झाड असते का ? मला त्याची पान कण्हेरीसारखी वाटली.

मामी, दिनेशदा आमच्याकडे याच्या दोन जाती असतात ही जात आकाराने छोटी असते सध्यातरी मला एकच भेटली दुसरी मी शोधून टाकते. हेच झुरळ की काय ते नक्की सांगा.
< ="https://picasaweb.google.com/lh/photo/GR7pJ9l5V2z7T1OrzkPOaw?feat=embedwebsite">

< ="https://picasaweb.google.com/lh/photo/fkazN8FamBE1AwdeEouWpQ?feat=embedwebsite">

< ="https://picasaweb.google.com/lh/photo/s1U6Ba844AQTrCR8M2rAMw?feat=embedwebsite">

पाकळी लांडगा असाच, पण यातल्या पाच भागापैकी एकाच भागाएवढा असतो.
जागू, या नागचाफ्याची पाने कण्हेरीपेक्षा रुंद आणि लांबीला कमी असतात. पण झाडाचा पर्णसंभार दाट असतो.

rsz_rsz_brounia.jpgराणिच्या बागेत सोन सावर फुलली आहे.ते सोनेरी रूप बघून डोळे निवले. ब्राऊनिया देखील भरून आलाय.
१७ ते २१ पर्यन्त प्रदर्शन भरणार आहे त्या वेळी हि दोन झाडे पहावयास विसरू नका.
rsz_rsz_son_savar1.jpg

अरे वा प्रदर्शन आहे ! मस्त. विजय मस्त दिसताहेत सोनसावर आणि ब्राउनिया.
मला रस्त्याच्या कडेला दिसतात ही झुरळ सध्या हिरवी आहेत. जमल्यास फोटो काढते.

विजय, धन्यवाद. मला बाकिची फूले पण दाखवा रे. वाट बघतोय.
मी आताच ललित मधे प्रोटिए या अनोख्या फूलाबद्दल लिहिले आहे. तिकडे पण नजर टाका जरा.

नवी मुंबईत बेलापुरला २०/२/२०११ ला (रविवार) विविध वृक्षांची ओळख करून देण्यात येणार आहे.
संपर्कः राहुल कोलेकर 9594953425.

अरे वा २० तारखेला मी नमुतच येणार आहे लग्न अटेंड करण्यासाठी माधव त्यांचा नक्की कुठे आहे हा कार्यक्रम ?

आमच्या आंब्याच्या झाडाला मोहोर आणि छान कोवळी पालवी फुटली आहे. ही पालवी पाहून मला ब्राऊनियाच्या झाडाचीच आठवण येते.
mango.JPGmango1.JPG

एक पाकळी,
मी लहानपणी या झुरळासारखेच पण (गोलाकार नाही) थोडे लांबट,टोकाला आकडे असल्यासारखे अशी पाहिल्याच आठवतं !
Happy

जागु,
ही लालसर कोवळी पाने तर हाताला अगदी मऊ लागतात,या पानांचा वासदेखील काय भन्नाट असतो ना !
पुर्वी ग्रामीण भागात होणार्‍या लग्नाच्या प्रत्येक मांडवात आंब्याच्या डहाळ्या (लगडलेल्या आंब्यासकटदेखील) या सर्रास बांधल्या जायच्या !
Happy

मी लहानपणी या झुरळासारखेच पण (गोलाकार नाही) थोडे लांबट,टोकाला आकडे असल्यासारखे अशी पाहिल्याच आठवतं ! >>>>>>> तेच गोखरु बहुतेक. कारण गोखरुच थोड लांबट असतं.

अनिल म्हणतोय तेच लांडगा / झुरळ. त्याचा आकार झुरळासारखाच असतो. गोखरु साधारण चौकोनी असते.

जागू झाडांच्या पालवीच्या पण किती छटा असतात्.दर वेळेस वेगळेपणा जाणवतो.लहान मूल मोठ होताना जी हूरहूर असते तीच हूरहूर झाड मोठी होताना असते.झाडाच प्रत्येक रूप मनाला भुरळ घालत्.रविवार कधी येतो याची सारखी वाट पहात असतो.आम्ब्याच्या पालवीच हे एक ऊदाहरण.
rsz_1image(106).jpg

विजय मस्त पालवी. ती खाली चवळीची रोप आहेत का ?

अनिल आमच्याकडे अजुन मंगलकार्यात हे डहाळे लागतातच. आणि खरच ह्या पानांचा वास मलाही आवडतो.

उद्या मुंबईत कुणाला वेळ आहे का ? माझ्याघरी नलिनी आणि तिचा कुकु आलेला आहे. उद्या रात्री ते परत जाणार आहेत. कुणाला वेळ असेल तर तिला उद्या मुंबईत फिरायचे आहे.

न राहवुन मी काल कुटुंबसहीत समुद्रकिनार्‍यावर गेले आणि झुरळाचे फोटो काढले. हे फोटो काढताना मी जागेवार १० मिनीटे उभी होते. कारण वार्‍यामुळे झाड हालत होते. ते झुरळ नुसते उड्या मारत होते.
jhural.JPGjhural1.JPG

Pages