निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा एक चांगली बातमी. सोन सावरीच झाड मी किती महीने शोधत होतो.सोन सावर शोधता शोधता मला या गटगा चा पत्ता लागला. या झाडच रोप मला पूण्याला सापडल आहे. आता ते लवकरच माझ्या शेतावर येईल.

विजय, मी कधी यायचं शेतावर ?

काळ्या कुड्याची फूले सुंदर असतात पण आकाराने लहान आणि संख्येनेही कमी असतात. पांढर्‍या कुड्याची भरपूर लागतात.

पिवळा / पांढरा / गुलाबी आणि या सगळ्या रंगाची सरमिसळ असे अनेक झाडांच्या बाबतीत आढळते. सावर, गुलबक्षी, बोगनवेल.. अल्पाईन गुलाबात पण हेच तीन मूळ रंग. निळा आणि काळा हे दोन रंग फूलात फार कमी दिसतात. म्हणजे वर्णपटातील पहिल्या काही रंगांचीच हि दुनिया. पुढचा हिरवा रंग पानांसाठी राखीव..

असुदे, पोस्ट बघून आनंद झाला. मला वाटलं कि आमच्यावर राग धरलाय !
पहिलं लाजाळूचे असू शकेल पण रंग फिक्कट आहे. दुसरं टिकोमा. हा कण्हेरीचाच एक प्रकार आहे.

राग ? कशाबद्दल आणि तो ? मी वाचनाव्यतिरिक्त काही कॉन्ट्रिब्यूट करु शकत नाही याचीच खंत होती.

लहानपणी बिट्टीच्या फूलांच्या देठातला मध प्यायचो. ती फुलं अशीच दिसायची पण त्यांच कण्हेरीच्या झाडाची जास्त साधर्म्य होतं. ही फुलं तशीच आहेत पण झाड मात्र वेगळ आहे. कण्हेरीची फुलंही बिट्टीच्या फुलांपेक्षा वेगळी दिसायची

समई,साधना..
एखादी कुंडी किंवा फळच फेकुन मारायचं ,मग बघा कुणी फिरकणार नाही ..!

मी वाचनाव्यतिरिक्त काही कॉन्ट्रिब्यूट करु शकत नाही याचीच खंत होती.
असु दे,
आम्ही पण या बाबतीत तुमच्या बरोबरच आहे
Happy

पहिलं लाजळूचं तरी नाही वाटत. लाजाळूचं जरा गुलाबी असतं ना.
ते डँडेलिअन म्हणतात ते आहे बहुतेक. त्याला जोरात फुंकर मारली तर त्याची पिसं उडतात.

हिरव्या बटाटया बद्दल माहित नव्हतं. आता बाळबटाटे आले आणि ते हिरवे असेल तर खाणार नाही ( पण का खात नाहीत?)
शेंगदाणे नक्की लावुन बघते Happy

मामी आणि प्रज्ञाला अनुमोदन. सर्व निसर्ग प्रेमी एकमेकांशी निसर्ग प्रेमानेच बान्धले गेले आहेत.म्हणजे---- ते माझे सोयरे सज्जन सांगाती,नित्य आठविती निसर्गाते..........असच जणू! आपण अगदि प्रेमानी झाडे लावायची आणि त्यांची फुले दुसरेच कोणी तरी नेतय किवा कुंडीच पळवतय हे फारच वाईट आहे.लोकांना अजिबात शिस्त नाहीये आणि माणुसकीही नाही. मला तुमचा group आणि चर्चा खूपच आवडली.

१०००+....... हे.....सेलेब्रेशन

जागू,नवी पाकृ टाका बघू. Happy

firecrackers.jpg.

diwali-firecrackers-light-fireworks-spin.jpegdiwali-firecrackers-light-fireworks-spin.jpeg

वा ! सगळ्यांचेच अभिनंदन.

असुदे, बिट्टी / कण्हेरी विषारी असते. शक्यतो प्रयोग नकोच. बकर्‍या तर अजिबात तोंड लावणार नाहीत या पानाना.

सावली, बटाटा, रताळी असे कंद ज्यावेळी नवीन रोप तयार करतात त्यावेळी, त्यात थोडासा साईनाईडचा अंश तयार होतो. बाकिच्या प्राण्यांनी ते खाऊ नयेत म्हणून निसर्गाची योजना आहे ही. तसा बांबूच्या कोबातही साइनाईड असते.
एरवीही वापरताना, बटाट्याचा हिरवट भाग, आवर्जून काढून टाकावा.
आणि ते डँडेलिऑन पण नाही. त्याचा प्रत्येक भाग हा वरून फूलासारखा पसरट असतो आणि खाली त्याला छोटासा दांडा असतो. त्याच्या बियांचा प्रसार तसा होतो. त्याचा एक सुंदर फोटो मायबोलीवर होता.

दिनेशदा, प्रयोग नाही. बिट्टीची फळं विषारी हे तर बजावलेलच होतं आम्हाला. बिट्टीची फुलं तोदायची आणि तोडल्यातोडल्या फुलाच्या देठातला मध प्यायचा. हज्जारदा केलय हे. थेंबभरच असतो पण असतोच.

ठाण्यातल्या जुन्या घरी जातो या विकांताला जमल्यास आणि फोटो टाकतोच तिथल्या झाडांचे. केळ लगडलीये, पळस फुलला असेल. साग आहे की नाही ते बघतो. काहितरी झालं होतं त्याला. मधुमालती, तगर, अनंत, शेवगा काय काय डवरलय ते पकडतो क्यामेरात.

तोपर्यंत गेल्या शनवारी पकडलेले टाकतोय. गोड मानून घ्या. Happy

दिनेशदा
या टिकोमाचे २ प्रकार असतात का.माझ्या कडे टिकोमा ची २ झाडे आहेत. एकाला वर दाखविल्या प्रमाणे गूच्छात फूल येतात्.झाड सरळ वाढ्ते. एक सरळ न जाता जमिनीतून नविन फाटे उगवतात्.थोड्या थोड्या दिवसानी मला ते छाटून टाकावे लागतात्.याच प्रकारातील आणखी एक झाड आहे. त्याच्या फान्द्या देखील वर न जाता खालीच पसरतात. मी त्याना आता बाजूने दोरीने बांधून परत वर जांभळाच्या झाडाला बांधून ठेवले आहे. या झाडाला पीवळ मोठ फूल येत.

रच्याकने, ह्या धाग्यामुळे आपण सर्वचजण एकमेकांना एका अनामिक आणि अद्रुश्य धाग्याने बांधले गेलो आहोत नाहि का?

>>> धागा नाय ग प्रज्ञा, वेलींनी. >>>>>>

अगदी बरोबर. धागा म्हटले की त्यात शुष्कपणा येतो, पण वेल म्हटली की परत निसर्गाच्या जवळ जातो.:)

१०००+............ पोस्टबद्द्ल सर्व निसर्गप्रेमींचे मनःपुर्वक अभिनंदन!!!!!!!!!! (माझ्यासहित Happy )

एक पांढरट रंगाचे फळ मिळते त्याला आम्ही 'जाम' म्हणतो. ते चवीला थोडे तुरट असते आणि त्याचे झाड आवळ्यासारखे असते, त्याला राय आवळा म्हणतात का? त्याला इंग्रजीत काय म्हणतात?

अमि तो जामच. त्याचाच एक लालसर छटा असलेला प्रकार मिळतो त्याला इंग्लिशमधे, रोझ अ‍ॅपल म्हणतात. त्याचे फूल पण छान असते.
त्यालाच तहानलाडू पण म्हणतात.
आता या कूळात कोण कोण आहे माहित आहे, पेरू, जांभळे आणि लवंगा. पानांचा तीव्र वास, फूलात पाकळ्यापेंक्षा पु़ंकेसराचे प्रमाण जास्त--- या त्या कूळाच्या खासियती !

असुदे, बिट्ट्या म्हणजे हिरवी फळं येतात आणि त्यात चॉकलेटी रंगाची लांबट त्रिकोणी बी असते तेच ना ? केरळमधे ती फळे आत्महत्या करण्यासाठी वापरतात.
पळस फुलला असेल तर त्याच्या पाकळ्या पाण्यात कुस्करुन, रंग होतो कि नाही ते बघून, इथे लिहिणार का. मला हे कळल्यानंतर, पळसाची भेटच झालेली नाही.

विजय, ते पिवळं फूल खाली पडलं तरी उमलेलच राहतं हो ना ? त्याचे नाव आठवले कि सांगतो.
पण डॉ. डहाणुकरांचे शब्द उसने घ्यायचे तर

टिकोमाची फूले कशी तर शि़ंकाळ्यातले लोणी चोरण्यासाठी बाळगोपाळांनी केलेली उतरंड. गुच्छात कशी दाटीवाटीने घुसलेली असतात.

आणि ते पिवळे फूल म्हणजे, लहान बाळाने प्रसादासाठी पसरलेला हातच जणू, हातातल्या लालसर रेषाही दाखवणारा..

धन्स दिनेशदा. पेरू, जांभळे म्हणजे फळात तुरटपणा असणे हे कॉमन फिचर आहे या कुळाचे. लवंगेचे फळ चाखले नाही अजून.

<<बिट्ट्या म्हणजे हिरवी फळं येतात आणि त्यात चॉकलेटी रंगाची लांबट त्रिकोणी बी असते तेच ना ? केरळमधे ती फळे आत्महत्या करण्यासाठी वापरतात.
>>

बापरे, आम्ही लहानपणी त्या बिया खेळायला वापरायचो. आयुष्यातले मला सर्वात पहिले आवडलेले फूल म्हणजे पिवळं बिट्टीचं फुल. पुढे केव्हातरी कळलं की त्याला कण्हेर म्हणतात.

अमि, बिट्टी आणि कण्हेर वेगवेगळी आहेत.

बीट्टीचे फूल ग्रामोफोनच्या कर्ण्यासारखे असते तर कण्हेरीचे फूल पसरट असते. कण्हेरीत पिवळा रंग बहुतेक नसतो (गुलाबी, पांढरा, लाल हे सहसा असतात)

धन्यवाद दिनेशदा. बटाट्या बद्दल माहितच नव्हतं. आता नेहेमी खाताना काळजी घेईनच. मी फक्त कोंबच काढून टाकायचे आधी.
बिट्टी विषारी आहे हे माहीत होतं पण अगदी इतकी कि आत्महत्या करायला वापरता येईल म्हणजे बापरे. कशाला ते झाड मगं? सगळी मुलं खेळायला वापरतातच !

विजय आणि ज्यांचे कोणाचे फार्म हाऊस / मळा आहे त्यांना एक विचारायचे आहे. अगदीच बाळबोध प्रश्न आहे पण तरी...
जर थोडीशी जागा असेल तर काय लागवड केलेली चांगली? फळं की भाज्या वगरे? दोन्ही ला साधारण किती वेळ / पैसा वगरे द्यावा लागतो?
अशा छोट्या जागेतल्या लागवडीत खर्च वजा करुन काही उत्पन्न यायची अपेक्षा ठेवायची कि नुसती हौस भागवुन घ्यायची?
जागा आत्ता नाहीये पण कधी घ्यायची झाली तर म्हणुन विचारत आहे.

Pages