निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोलकात्याजवळ पण एक मोठा वटवृक्ष असल्याचे वाचले होते. कुठल्यातरी हिंदी गाण्याचे शूंटींग त्या झाडाच्या परिसरात झाले होते (बहुतेक फिरोझ खान होता.)
दिपा मेहता च्या वॉटर मधे पण असेच एक झाड आहे. पण ते केरळमधले असावे.

माधव, त्या फूलांचे नाव मलाही माहीत नाही. (कदाचित ललिता ला माहित असेल !!) यात दोन रंग दिसले एक पांढरट गुलाबी आणि दुसरा हा. आता त्या क्षेत्रातले तज्ञ जवळ जवळ नवनिर्मिती करु शकतात, असे आजकालची फूले बघून वाटते.

त्या गाण्यात सावरीची बोंडे फूटून उडणारा कापूस मस्त टिपलाय
ते गाणे मी पाहिलेय. कोणीतरी दोरी बांधुन झाड हलवतेय असे मला नेहमी वाटते.
मला वाटते तुमच्या रंगीबेरंगीवर तुम्ही वाघूळफुलांविषयी लिहिलेय. मला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते.

दिनेशदा, साधना त्या कापसाबरोबर मी लहानपणी खुप खेळले आहे. सावरीच्या शेंगा असतात त्या शेंगा सुकुन खाली पडतात आणि फुटतात मग त्यातला कापुस बसुन राहतो काही काळ आणि त्यातील केसांचे पुंजके हवेत इकडे तिकडे पसरतात. तेही कापसाच्याच रंगाचे असल्याने त्याला म्हातारीचे केस म्हणतात. ते पुंजसे फुग्यासारखे उडते. आम्ही त्याला फुकर मारुन उडवत खेळायचो. सावरीच्या कापसामध्ये बिया असतात त्या बिया आम्ही खायचो. अजुनही ती चव जिभेवर आहे. मला तर आपल्या वातिंच्या कापसाऐवजी काटेसावरीचा कापुस खुप आवडायचा आधी. हाताला अगदी मऊ लागायचा शिवाय एकदम स्वच्छ असायचा. फोटो मिळाला तर टाकेनच. पण आता बरीच झाडे गेली आहेत. त्या सावरीच्या कापसाच्या आम्ही खेळ म्हणून छोट्या उश्या, बाहुल्या वगैरे करायचो.

काटेसावरीच्या झाडाची फांदी हावलुबाई म्हणून होळीला लावण्याची अजुनही प्रथा आहे.

हो साधना मी लिहिले होते त्या फूलांबद्दल.
सावरीचा कापूस पाण्यात भिजत / कूजत नाही म्हणून लाईफ जॅकेट मधे वापरतात.
आपल्या साध्या कापसाच्या बिया (सरकी) पण खातात. त्याचे सत्व काढून खीर करतात. त्याचे तेल पण निघते.
हे कापसाचे तंतू म्हणजे बियांचे पंखच असतात. त्यामूळे त्या दूरवर उडत जाऊ शकतात.

हे झुडूप आहे निगडीचे. ह्याला वनई असेही म्हणतात. पाय मुरगळला, हात पाय दुखत असले, सुज आली असेल तर ह्या निगडीचा पाला तव्यावर गरम करुन त्याचा शेक देतात व बांधुन ठेवतात. भाजताना एक विशिष्ट प्रकारचा वास ह्या पाल्याला सुटतो.
vanai1.JPG

ह्या निगडीचीही काही वैशिष्ट्ये आहेत. निगडीची पाने साधारण पांढरट असतात. जेंव्हा नुकत्याच जन्मलेल्या बाळाची पाचवी केली जाते तेंव्हा त्या बाळाला ह्या निगडीच्या पाल्यावर झोपवुन त्याच्या वर पाणि शिंपडून काही विधी केला जातो. आमच्याकडची सुईण सांगते की जर बाळंतीणीला जास्त वात असेल तर निगडी ची पाने गरम पाण्यात टाकुन त्या पाण्याने अंघोळ केलेली फायदेशिर ठरते.
Vanai.JPG

पुर्व कल्पनांनुसार असे म्हटले जाते की जर मुली किंवा सवाशणी जर निगडी जवळून जात असतील तर त्यांनी निगडीचे पान तोडून डोक्यात भरायचे नाहीतर निगडी रागावुन शाप देते. म्हणून मी लहानपणी पाहीले आहे गावातील बायका निगडीजवळून जाताना त्याची पाने तोडून आपल्या डोक्यात माळायच्या.
ह्या निगडीला निळ्या रंगांच्या सुक्ष्म फुलांचा तुरा येतो.
vanai2.JPG

वात विकारावर निगडी गुणकारी आहेच. पण डोक्यात पाने माळायचा संकेत खरेच चांगला आहे, एकतर या पानांना सुगंध असतो, शिवाय अशाने झाडाची ओळखही राहते.

मला शेवंती, गुलबक्षी, बुचाच्या फुलांची वेणी करता येते, पण माझ्या घराजवळ ही फुलचं सहज सापडत नाहीत. Sad Sad Sad मात्र वसईला घरी गेले की हौस पुरवुन घेते.

जागु,
मी गावाकडे याला निर्गुडी असही ऐकलयं...
लहानपणी शेताच्या बांधावर खुप झुडुपवजा झाडे होती, धनगर त्याचा पाला तोडुन मेंढरांना नेहमी खायला घालायची ,ती आवडीने खात होती !
Happy

अखी छान झालेयत ग पान. मी कालच माझ्या काकांना ही वेल आणायला सांगितली आहे त्यांच्या घरुन.

निगडी (वनई) च्या पानांचा धूर केल्यास डास हमखास पळून जातात..... विशेषतः गुरांच्या गोठ्यात असा धूर फार उपयुक्त ठरतो. Happy

अनिल... ते खायचेच पान आहे. फक्त तुम्ही दोघे वेगवेगळ्या नावाने हाक मारताय त्याला Happy
निगडीला कोकणातही निर्गुंडी म्हणतात. इथे बेलापुरलाही भरपुर आहे निर्गुंडी.

काटेसावरीच्या कापसाला एक चमक असते, जी आपल्या साध्या कापसाला नसते. माझ्या कॉलनीत साध्या कापसाचेही एक झुडुप होते. मी सुरवातीचे दोनचार वर्षे त्याला फुलताना पाहिले होते. कदाचित त्याच्या बिया खाली पडुन दरवर्षी नविन रोप तयार होत असेल. पावसाळा संपला की म्युनिसिपाल्टीला झाडे छाटायचा मुड येतो, रस्त्याच्या कडेला उगवलेली रोपे उपटण्यासाठी खास माणसे नेमतात. या सगळ्या भानगडीत गेले बिचारे ते कापसाचे रोप. सावरीने मात्र स्वत्:च्या अंगावर काटे फुलवुन स्वतःला असल्या गाढवांपासुन जपलेय. Happy

स्निग्धा, पुढच्या वेळेस हौस पुरवताना विडिओ करुन इथे टाक. काही वर्षांनी अशा वेण्या घालायचे हेही कोणाला माहित नसणार.

आम्हीसुद्ध लहानपणी सावरीचा कापूस, पांगार्‍याच्या बिया ह्याच्याबरोबर खुप खेळायचो. परत एकदा लहानपणीच्या सुखद आठ्वणीत फिरवून आणल्याबद्द्ल आभार.

काटेसावरीचा फोटो असेल तर टाकणार का?

निगडी ची पानं इथे बघितल्यावर आठवलं.
काही दिवसांपुर्वी मी विचारलेलं -
नाईची पानं आणि निर्गुंडीची पानं म्हणजे काय आणि कशी दिसतात?
यांना बोली भाषेत काही वेगळे शब्द आहेत का?

दुकानात यांची पुड , चुर्ण असं काही मिळतं का?
त्यापैकी निर्गुंडी मिळाली. आता "नाई" म्हणजे काय?

आणि माक्याच्या पानांचा फोटो आहे का कुणाकडे?

स्निग्धा मलाही शेवंतीची वेणी, बुचाच्या फुलांची सिंगल, चटईची वेणी, तसेच ज्याची देठे गुलबक्षीच्या देठाएवढी असतील अश्या फुलांच्या वेण्या येतात. गुंफलेला गजरा, हार आणि कदंबाही येतो. आता मला कंठी शिकायची आहे.
बकुळीच्या फुलांसाठी ताडाच्या पातीचा बारीक धागा किंवा अमरवेलही घ्यायचे आधी ओवायला.
सुरंगीचा गजरा सुईनेच करावा लागतो.

सावली ही आहे माक्याची लिंक
http://www.maayboli.com/node/20592

साधना माझ्याकडे दोन झाडे आहे कापसाची. आता कापुसही आला आहे.

अनिल ती खायच्या पानांची वेल एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंध्याला किंवा भिंतीला चिकटून वर वाढली की चिकटलेल्या वेलीची पाने आकाराने मोठी होतात. वेलीची मुळे झाडाच्या बुंध्याला किंवा भिंतीला चिकटतात आणि त्या जागेतील पानांना जास्त पोषण मिळते. मनीप्लांटचेही तसेच होते.

पण हि पाने जरा तिखट लागतात

दिनेश, माझ्या दोन्ही शेजा-यांकडे ही वेल आहे. माझ्याकडेही होती (माझ्याकडुन त्यांनी नेली) पण एवढी पसरायला लागली की रिनोवेशन करताना शेवटी काढुन टाकली. त्यात तिच्या मुळांना भिंतींचा आधार घ्यायला आवडते (आयव्ही सारखे). आणि मग वेल काढली की भिंतीवर नक्षी उमटते Sad

खायच्या पानात पण प्रकार आहे ना भरपुर? अनिल म्हणतोय ती पानमळ्यातली पाने रंगाने फिकट, रुंदीला थोडी कमी पण लांबट असतात. बाहेर पानवाल्याकडे जास्त करुन तीच पाने मिळतात. गावी गेले की मी तीच पाने खाते. पण माझ्याकडे वर फोटो आहे ती होती. ती हार्टशेपसारखी गोल असतात आणि जून झाल्यावर हिरवट काळसर अशी होतात.

(मला आयव्ही खुप आवडते. गावी बेडरुमच्या भिंतीवर बाहेरुन आयव्ही चढवायचा बेत आहे Happy थंड हवेत छान होईल असे मला वाटते, वनस्पतीतज्ज्ञांचे काय मत आहे यावर ? Happy )

हिची पाने कोवळी असताना तिखट असतात. मी एकदा कोवळे म्हणजे चांगले असा विचार करुन एक पान नुसतेच खाल्लेले आणि तोंड चांगलेच भाजुन निघालेले आतुन Proud पण जून झालेली पाने चांगली लागतात.

मीही आता शेजा-याकडुन थोडा वेल आणुन लावते माझ्याकडे.

काटेसावरीचा फोटो असेल तर टाकणार का?

आज टाकते रात्री. पण सध्या तिच्यात बघण्यासारखे काही नाहीय.,..... थोडीफार पाने आहेत जी आज-उद्या कधीही गळतील अशी अवस्था आहे. अजुन थोड्या दिवसांनी कुठेतरी एक पान आणि त्याआड दडलेला कळा दिसेल आणि लगेच चार-पाच दिवसांत झाड कळ्यांनी भरेल. मग फुले... डार्क गुलाबी फुलांनी झाड डवरेल आणि खाली सडा पडायला लागेल.

(भन्नाट कल्पना आली डोक्यात. आजपासुन रोज फोटो घेते झाडाचा. माझ्या आजुबाजुला भरपुर आहेत. आणि कसकसे बदल होत जातात ते पाहते.)

साधना नक्की कर. फोटो अ डे प्रोजेक्ट PAD म्हणतात त्याला Happy
मला बघायचय कारण ठाण्याला घरासमोर खुप झाडं होती त्यांना पांढरट पिवळसर फुलं यायची आणि उन्हाळ्यात बोंड येऊन ती फुटुन कापुस उडायचा सगळीकडे. ती काटेसावर होती की दुसर काही ते माहिती करुन घ्यायचय.

धन्यवाद जागू.

आता नाईच्या पानांची वाट बघतेय.

सावली पांढरट पिवळसर फुल कापसाच्या झाडाला येतात. ती झुडपे होती की अगदी मोठी झाडे ? सावरीचे झाड मोठ असत तर कापसाच झुडूप असत.

जागू खुप मोठ्ठी झाडं होती. आता फारशी राहीली नाहीयेत. ती मला काटेसावरच वाटायची पण इथे सगळ्यांनी गुलाबी लाल फुलं असं लिहिल्यावर मला कळत नाहीये ती झाडं कुठली ते.
कापसाचं झुडुप माहीतेय, बघितलं आहे.

बकुळीच्या फुलांसाठी ताडाच्या पातीचा बारीक धागा किंवा अमरवेलही घ्यायचे आधी ओवायला

कोकणात नारळाच्या पानाचा अगदी बारिक असा लांब दोरा काढतात. आणि त्याच्यात ओवतात. (असले काहीतरी लिहायला लागले की धावत वाडीला जावेसे वाटते Sad )

नारळाच्या पानाचे असे बारिक दोरे करुन त्याच्यातच इतर फुलांचेही वळेसार बनवतात... नारळाला कल्पवृक्ष असे उगाच म्हणत नाहीत. त्याचा एकही भाग वाया जात नाही. झाड वठल्यावर त्याचे ते प्रचंड मुळ आतुन पोखरुन त्याचा मोठा रांजण बनवुन आत वर्षभरासाठीच्या मिठातल्या कै-या ठेवलेल्याही मी पाहिल्यात.

सावली त्या झाडाला अंगभर (खोडापासुन फांदीपर्यंत) अगदी घनदाट काटे होते का??? असे असेल तर मग ते काटेसावरच. थोडी वेगळी जात असेल कदाचित. अशा कित्येक जाती आपण नष्ट केल्यात आता Sad

अजुन एक झाड आहे, मेक्सिकन सिल्वर कॉटन असे काहीतरी नाव आहे. (माझ्याकडे नाव लिहिलेले आहे, घरी जाऊन पाहुन सांगते) याचे वैशिष्ट्य म्हणजे झाड अगदी २० फुट आकाशात गेले तरी बुंधा मात्र हिरवाकंचच राहतो. बुंधा फारसा जाड नसतो, साधारण फुटभर व्यास असतो (काटेसावरीपेक्षा थोडा कमी). झाड अगदी सरळसोट वाढते. या झाडाला हिरवट पिवळसर पांढरी फुले येतात आणि मग कापसाची मोठ्ठी बोंडे येतात. नव्या मुबईत कुठेही पाहिले नाही पण मुंबईत खुप आहेत ही झाडे.

साधना, नागवेलीची म्हणजे खाऊच्या पानांची कोवळी असतानाची चव तिखटच असते. माझ्या काकूकडे मघई पानांची वेल होती. रिनोव्हेशनमध्ये गेली बिचारी! Sad पण त्याच्या पानांचा तिखटपणा जायला काकू त्या पानांना काही तास एखाद्या तसराळ्यात पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवायची. (पानाच्या ठेल्यावर बादलीत बुडवलेली असतात बघ ही पाने!) मग त्यांचा तिखटपणा जरा कमी व्हायचा. बादवे ह्या खाऊच्या ताज्या पानांची भजीही अप्रतिम लागतात. एकदा ट्राय करूनच बघ! Happy तसेच गुळवेलीच्या पानांचीही भजी करून मस्त लागतात.

सावली म्हणतेय ते पांढरट पिवळ्या फूलांचे सावरीचे झाड दुर्मिळ आहे. असेल अजून तर बघायला पाहिजे.
पण बुंधा ताठ व हिरवा हे वर्णन सप्तपर्णीचे आहे. याच्या परागकणांमूळे दमेकर्‍यांना त्रास होतो. यालाच स्लेट ट्री म्हणतात कारण पाटीची चौकट याच्या लाकडाची केलेली असते तसेच याला सैतानाचे झाडही म्हणतात.
खाउच्या पानात सारण भरुन (हिरवे मटार ) त्याचे समोसे करुनही तळतात.

मघईच्या पानांना तिखटपणा जवळपास नसतो ना? म्हणजे मी जेंव्हा नुसते खाऊन बघितले होते (एकदाच) तेंव्हा मला तरी जाणवला नव्हता. कलकत्ता पान बरेच तिखट लागते.

सुरंगीचा गजरा सुईनेच करावा लागतो. >> जागू गोव्याच्या देवळांत ही फुले केळीच्या सोपात ओवतात. देवीला सूत वापरून केलेले हार चालत नाहीत. ते केळीचे सोप सुईत ओवले जात नाहीत पण तिथल्या बायका इतक्या पटापट त्यांचे हार / गजरे बनवतात की थक्क व्हायला होते. आमच्या देवीच्या देवळात आम्ही गेलो की तिथली बाई आई, काकूकरता करता कोरांटीचा गजरा घेउन येते. फुलापेक्षा त्याची गुंफणच सुंदर दिसते. Happy

माधव, त्या पानांचा तिखटपणा मला तरी जाणवायचा. कलकत्ता पाने तर अजूनच तिखट.... तोंड पोळतं जाम नुस्तं खायला गेलात तर! वर अखीने दिलेल्या फोटोसारखा खाऊच्या पानांचा वेल आमच्याकडेही होता, पण टिकला नाही.

Pages