निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी या पांगार्‍याच्या झाडाच्या बिया काढुन त्या जमिनीवर घासुन त्याचे चटके द्यायचो Happy
त्याला चटक्याच्या बियाच म्हणायचो. Happy
रच्याकने, याच पांगार्‍याच्या झाडाच्या फांद्या/खोड काहि दिवस पाण्यात भिजवून ठेवतात आणि त्यापासुन सुंदर सुंदर खेळण्या बनवतात. याचे लाकुड अतिशय हलके आणि तासायला सोपे असते. सावंतवाडीची खेळणी हि पांगार्‍याच्याच झाडाची बनलेली असतात.

योगेश हा चटक्यांचा खेळ मजेशीर होता. आम्ही पण खुप खेळायचो. आधिच्या पानांवर त्याबद्दल लिहीले आहे. पारिंग्याच आणि शेवग्याच लाकूड सारखच असत जवळ जवळ आतमध्ये पोकळ. परिंग्याच्या झाडाचे साल, लाकुड मी आयुर्वेदिक औषधात वापरलेले पाहीले आहे.

सावली, संक्रांतीच्या सुमारास ओली हळद मुंबईच्या बाजारात येते (अनिल नीट सांगू शकेल, त्याच्याकडे पण आताच आलीय असे त्याने लिहिले होते.) म्हणजे पावसाळ्यात ती लावायला पाहिजे. पण जास्त दिवस ठेवली तर कोंब जिवंत राहणार नाहीत.
सांगली, वाई भागात ती जास्त होते. ओल्या हळदीपासून हळकुंडे करायची प्रोसेस खूप खास असते. जमिनीखाली मोठ्या खड्ड्यात ती काही महिने ठेवावी लागते. खास त्या भागातील हवामानामूळे हळदीला तो रंग येतो.

योगेश बांबूचा फूलोरा हे एक मोठे प्रकरण आहे. यात मग तांदळासारखे धान्य निर्माण होते. (त्याची खीर वगैरे करतात. ) त्यामूळे उंदराची प्रजा अतोनात वाढते आणि मग दुष्काळ पडतो, असा समज आहे. आपल्याकडे फारसा दिसत नाही हा फूलोरा.

शैलजा,
द्राक्षाच्या वेलीची एक परिपक्व काडी (कलम, तिरका कापलेली) ३-४ डोळे असलेली चालते, याची वेल ही खुप वर्षे टिकते,खोडही मोठं होतं, याची मुळे खुप पसरतात,(पहिल्या वर्षी, साधारण २-३ फुट तरी ) त्यामुळे याची वेल जमीनीवर लावलेलीच बरी पण सुरुवातीच एक वर्ष कुंडीत चालु शकेल.
शक्यतो मार्च ते जुन हा काळ हा नविन बागांच्या लावणीचा असतो ...(याचे फोटो टाकु शकत नसल्याने माफी असावी )
Happy

दिनेशदा,
हळदीच्या पिकाला कधी-कधी पाणी देणे,ती उन्हात वाळवणे,पॉलीशींगसाठी मदत करणे या पलीकडे जास्त माहिती नाही
तुमचं निसर्गाबद्दलच ज्ञान तर.. जंहा मैने अभी अभी ऐडमिशन लिया है,आप उस स्कुल के हेड मास्टर हो !
Happy

लहानपणी या पांगार्‍याच्या झाडाच्या बिया काढुन त्या जमिनीवर घासुन त्याचे चटके द्यायचो >>>> जिप्सी, खरच फार मजा यायची. पांगारयाच्या बियांशी खेळताना त्याची फुले कधीच पाहिली नव्हती. तेव्हा मी फारच लहान होते. पण आस्चिगमुळे पहायला मिळाली.
जागू, डवचाणेचा फोटो पाहून झाड आठवल. पण नाव काही आठवत नाही. आम्हीहि लहानपणी ती फळे फोडण्याचे उद्योग खूप वेळा केलेत. तसेच लाजाळूच्या रोपट्याला पण छोटी छोटी फळे येतात, व ती पण फोडताना छान आवाज येतो.
दिनेशदा, मला कवठीचाफ्याची फार आठवण येतेय. खूप वर्षात पहाता आला नाही. कृपया इथे फोटो द्याल का?

शोभा नक्की, अजून ५/६ तासांनी टाकेन. सध्या मी घरुन माझे सगळे कलेक्शन घेऊन आलोय, म्हणून बहुतेक फोटो मिळतील माझ्या संग्रहात.

धन्यवाद दिनेशदा. आमच्या शाळेत जायच्या वाटेवर कवठीचाफा होता. माझे वडील शिक्षक. ते आणि मी बरोबरच शाळेत जायचो. तेव्हा ते झाडावर चढून भरपूर फुले काढायचे. खूप मज्जा होती कोकणात.
धन्स जागू,(इन आड्वंस)वाट पहातेय. जागू, खूप दिवसात माझ्या मेलल उत्तर नाही दिलस? रागावलीस का काय?

शोभा अस काही नाही ग. उद्या तुझा मेल सर्च करते. अग खुप गडबडीत आहे मी सध्या. म्हणुन रेसिपिजही टाकत नाही. उद्या पण गडबडच आहे. परवा बघते.

मला कवठीचाफ्याची फार आठवण येतेय. खूप वर्षात पहाता आला नाही. कृपया इथे फोटो द्याल का?
>>>>>शोभा, मी या लिंकवर टाकलाय बघ कवठी चाफ्याचा फोटो Happy
http://www.maayboli.com/node/22356

प्रचि १६ बघ Happy

जिप्सी, शोभा
कवठीचाफा प्रथमच बघायला मिळाला !
धन्यवाद !
Happy

दिनेशदा,
तुमच्या कडच्या निसर्गसंग्रहावरुन इकडे भारतात भविष्यात आम्हाला एक मोट्ठ प्रदर्शन भरवता येईल !
Happy

दा, धन्यवाद या फोटोसाठी.
शोभा यांना झाडावरच्या कवठी चाफ्याचा फोटो पाहिजे होता. त्यानिमित्ताने आम्हालाही पाहता आला. Happy

कोणाला ते 'झुरळा'चे झाड माहिताय का? त्याची काटेरी फळं काढून आम्ही एकमेकांच्या कपड्यांना चिकटवायचो. लांबून मारली की चिकटायची. केसात अडकली तर वाटच.
तशाच गुंजा. त्या छोट्या गुंजाचा वेल माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ होता. मी नेहमी झालेल्या गुंजा काढून बाटली भरून ठेवायचे. आताही कुठेतरी ट्रीपला गेल्यावर मिळाल्या त्या मुलीकरता घरी घेऊन आलेय. या छोट्या गुंजा अर्ध्याहून जरा अधिक लाल, उरलेल्या काळ्या आणि त्यावर एक पांढरा ठिपका अशा असतात. (फोटो टाकेन नंतर). तर दुसर्‍या मोठ्या फक्त लाल असणार्‍या गुंजा. याचं मोठं झाड असतं. या फ्लाईंग सॉसर सारख्या आकारात असतात. या गुंजांचं झाड शिवाजीपार्कच्या एका लेनमध्ये आहे.

गुंजेची वेल आम्ही घरी लावली होती. छान दिसते. पण चिमण्यांना फार आवडते आणि त्या सगळा पाला खाऊन टाकतात.

मामी त्यांना झुरळ म्हणत होता का ? आम्ही लांडगा म्हणायचो. गायीच्या शेपटात पण अडकतात. मालाडला उत्कर्ष मंदिर शाळेच्या परिसरात होती ती झाडे.
गुंजाची झाडे, शिवाजी पार्कच्या मागे, महापौर निवासाच्या बसस्टॉपजवळ, बाबूलनाथ देवळाच्या पायथ्याशी, आणि त्या वर जाणार्‍या पायर्‍यांच्या आजूबाजूला आहेत. या झाडावरच्या गुंजांची फूले पिवळी असतात व तूर्‍यात येतात पण वेलीवरच्या गुंजाची फूले गुलबट जांभळी असतात व सुंदर दिसतात. (इथे जागूने फोटो टाकला होता बहुतेक.)

मामी, दिनेशदा हा बघा तो गुंजेचा धागा.
http://www.maayboli.com/node/21436

मामी ते झुरळ म्हणताय ते एरंड्याची फळेच ना ? ती कुठेही चिकटतात. तश्याच आघाड्याच्याही बिया कपड्याला चिकटतात.

मामी, दिनेशदा त्यांना झुरळ, लांडगा म्हणतात हे आता कळाले पण गाई - वासरे चरुन आल्यावर त्यांच्या अंगावर चिकटलेली असायची. मग तीच काढून आम्ही भावंडे एकमेकांच्या अंगावर फेकायचो चुकून जर केसात गेले तर पार वाट लागायची.

जागू ते एरंड नाही. त्याचे काटे तीक्ष्ण असतात. छोटेच झाड असते त्याचे.
त्या बिया काय किंवा आघाड्याच्या बिया काय , आपला प्रसार करण्यासाठी प्राण्यांना वापरुन घेतात.

त्या चिकटणार्‍या बिया आमच्या समुद्रकिनारी भरपुर असायच्या. आम्ही वाळूत खेळून घरी गेलो की त्या कपड्यातुन काढण्याचा उद्योग करावा लागायचा.

ह्या आहेत आमच्या इथल्या प्रसिद्ध मेदळ नावाच्या वालाच्या जातीतील शेंगा. वालापेक्षा आकाराने दुप्पट, टपोरा दाणा, कडेला जांभळा रंग आणि एक विशिष्ट स्वाद ह्या मेदळाच्या दाण्यांना असतो. ह्याचा वेल बराच फोफावतो आणि तितक्याच शेंगाही लागतात. नुसत्या उकडून खायला ह्या जास्त चांगल्या लागतात. तसेच ह्या दाण्यांची भाजीही रुचकर लागते.

अशी जांभळ्या रंगाची फुले येतात ह्या वेलीवर.
medal.JPG

ह्या आहेत शेंगा
medal1.JPG

हा आहे वेल.
medal4.JPG

साधना, गोखरु वेगळे (गो क्षूर) त्याचा वेल (खरा तर वेल नसतो तो) जमिनीवर गोलाकार पसरतो. या झुरळाचे झाड असते. गोखरु पायात टोचला तर, मस्तकात कळ जाते. पण हे झुरळ तेवढा अपाय करत नाही. गोखरु (गोक्षुरादी गुग्गुळ) किडनी स्टोनवर औषधी आहे.

Pages