गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

डॉ. कैलास गायकवाड ह्यांनी आजपर्यंत नेटाने चालविलेल्या तरही उपक्रमाबद्दल सर्वजण जाणतातच. त्यांच्या मायबोली त्यागण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने, तरही सारखा चांगला उपक्रम बंद पडू नये ह्या उद्देशाने श्री. भूषण कटककर (बेफिकीर) ह्यांच्या आवाहनास होकार देऊन मी ह्यापुढे हा उपक्रम पुढे सुरू राहील ह्या दृष्टीने दर आठवड्याला तरही ओळ देत राहीन.

हे सुरू असताना कैलासराव आपणां सर्वांच्या विनंतीस मान देऊन परत आलेच तर ते पुन्हा ही जबाबदारी खांद्यावर घेतील ही अपेक्षा.

डॉ. कैलास ह्यांचे ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद!!

खाली ह्या आठवड्यासाठी ओळ देत आहे, प्रचंड सहभाग अपेक्षित आहे.
=========================================================================
ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

अभिनंदन कणखरराव!

कैलास परत आले तर उत्तम होईलच! पण हा धागाही उपयुक्त आहेच, तोही आपण पुढे नेत आहात हे उत्तमच!

-'बेफिकीर'!

कैलासजी या धाग्यावर परतेपर्यंत मी सुद्धा या धाग्यावर न येण्याचा आणि "तरही" वर गझल लिहिण्याचा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेत आहे.

पुढील आठवड्यात जर कैलासजींनी
ओळ दिली तर
मी माझे संपूर्ण कसब/कौशल्य पणाला लावून
एक जबरद्स्त आणि ऐतिहासिक ठरू शकेल अशी
गझल लिहून दाखविण्याचे अभिवचन देत आहे.

प्राजु,

तसे पाहिले तर चालू नयेत परंतु आपणांस वापरावयाचे असल्यास तसा उल्लेख करून वापरावेत.

मुटेजी

Lol

कणखर, डॉक परत येतील, ही आशा होती, म्हणून बेफिकीरजींनी इतके घाईघाईत असे सुचवायला नको होते, असे वाटले होते आधी.... पण आता ती आशा मावळली आहे. विशाल म्हणतो तसं, Show must go on.......... आणि तुमच्यासारखे गझलेतले दर्दी आणि ज्ञानी असतांना शो नुसतात चालू राहणार नाही तर बहारदार होत राहील, याची खात्री आहे. Happy
ही जबाबदारी स्वीकारल्याबद्द्ल आभार आणि अभिनंदन Happy

कैलास व कणखर यांच्या वतीने मी 'माणसे व्यर्थ मी जतन केली' या जमीनीवर गझल रचणार्‍यांचे आभार मानतो. आता कणखर हे त्यांच्या कंपनीच्या कामात व्यग्र झालेले आहेत व २० मे पर्यंत त्यांना वेळ नाही. म्हणून या पुढची ओळ मी देत आहे. इच्छुकांनी आपली गझल रचून प्रकाशित करावी ही विनंती!

यावेळेस सोपी ओळ देत आहे ज्यामुळे अधिक वाव मिळावा असे वाटते.

विसरणेही तुझ्या लक्षात नाही

वृत्त - मृगाक्षी

मात्रा - १९

लगावली - लगागागा लगागागा लगागा

काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी

अलामत - आ

रदीफ - 'नाही'

किमान शेर - मतला धरून पाच

मुदत - १८ मे पर्यंत प्रकाशित करावी अशी अपेक्षा, नंतर केल्यास स्वागत आहेच, पण तोवर दुसरी ओळही येईल!

धन्यवाद व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

नमस्कार गझलकारांनो,

'विसरणेही तुझ्या लक्षात नाही' या मिसर्‍यावर आनंदयात्रींची सुंदर गझल आली व त्याला विशाल कुलकर्णी व शायर हटेला यांची साथ मिळाली. मीही माझी गझल त्यात सहभागी केली. तिघांचे आभार!

या आठवड्याचा तरही मिसरा!

'केलास मनावरती तू वार कळेनासा'

वृत्त - साशंक

लगावली - गागा लल गागागा - गागा लल गागागा

काफिया - वार, आधार, बाजार, व्यवहार, निर्धार इत्यादी

अलामत - आ

रदीफ - कळेनासा

शेर - मतला धरून किमान पाच

सर्वांना शुभेच्छा व सहभागाचे आमंत्रण!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

केलास मनावरती तू वार कळेनासा

या तरही मिसर्‍यावर फक्त छाया देसाई व माझी अशा दोनच गझला आल्यावरून एकंदर तरही गझल उपक्रम थांबवला तरी हरकत नाही हे लक्षात येत आहे. Happy तरीही, 'तुम्हे याद हो के न याद हो' (हे माझे लेखन) चालू असेपर्यंत निदान मी स्वतः तरी हा धागा पुढे नेणारच आहे. Happy

छाया देसाई यांच्या सुंदर गझलेबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार!

या आठवड्याचा तरही मिसरा:

अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे

वृत्त - सती जलौघवेगा

लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा

मात्रा - २४

काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी

अलामत - अं

रदीफ - 'आहे'

शेर - मतला धरून किमान पाच

शुभेच्छा व धन्यवाद!

-'बेफिकीर'!

चला आता मी तरही देतो .
.
.
.
आला पाउस गेला पाउस

वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

तळटीप : तरही सुचकाने तरही लिहायचीच असते अशी काही सक्ती नायीये ना ? Wink

वेळ न दवडा झेला पाउस
आला पाउस, गेला पाउस

खिडकी उघडी होती ना ती?
दिसला का नटलेला पाउस?

साधा भोळा सज्जन होता
आज बिघडला मेला पाउस

डोळे मिटले, श्वास बहरले
देहाशी झटलेला पाउस

कंटाळा करतो पडण्याचा
डोक्यावर चढलेला पाउस

वेळ न दवडा झेला पाउस
आला पाउस, गेला पाउस

खिडकी उघडी होती ना ती?
दिसला का नटलेला पाउस?

साधा भोळा सज्जन होता
आज बिघडला मेला पाउस

डोळे मिटले, श्वास बहरले
देहाशी झटलेला पाउस

कंटाळा करतो पडण्याचा
डोक्यावर चढलेला पाउस>>

सुपर्ब! शीघ्रोत्तम कवी हणमंत शिंदे यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!

-'बेफिकीर'!

वेळ न दवडा झेला पाउस
आला पाउस, गेला पाउस

खिडकी उघडी होती ना ती?
दिसला का नटलेला पाउस?

साधा भोळा सज्जन होता
आज बिघडला मेला पाउस

डोळे मिटले, श्वास बहरले
देहाशी झटलेला पाउस

कंटाळा करतो पडण्याचा
डोक्यावर चढलेला पाउस>>

सुपर्ब! शीघ्रोत्तम कवी हणमंत शिंदे यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!

-'बेफिकीर'!

वेळ न दवडा झेला पाउस
आला पाउस, गेला पाउस

खिडकी उघडी होती ना ती?
दिसला का नटलेला पाउस?

साधा भोळा सज्जन होता
आज बिघडला मेला पाउस

डोळे मिटले, श्वास बहरले
देहाशी झटलेला पाउस

कंटाळा करतो पडण्याचा
डोक्यावर चढलेला पाउस>>

सुपर्ब! शीघ्रोत्तम कवी हणमंत शिंदे यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!

-'बेफिकीर'!

शुष्क मनी भिजलेला पाउस
आला पाउस गेला पाउस

ना कसलेही नाते गोते
सख्खा ना सौतेला पाउस

यावे कुणा न पाणी डोळा
म्हणॉनिया झटलेला पाउस

पूर कुठे अन कुठे अवर्षण
जिवावरी उठेलेला पाउस

गजल लिहू की लिहू कविता?
शायर म्हणे हटेला पाउस

--शायर हटेला--

शुष्क मनी भिजलेला पाउस
आला पाउस गेला पाउस

ना कसलेही नाते गोते
सख्खा ना सौतेला पाउस

यावे कुणा न पाणी डोळा
म्हणॉनिया झटलेला पाउस

पूर कुठे अन कुठे अवर्षण
जिवावरी उठेलेला पाउस

गजल लिहू की लिहू कविता?
शायर म्हणे हटेला पाउस>>

मस्तच!

(काय झालंय काय, प्रसादरावांनी तरही दिली आणि काफिया रदीफही सांगितली नाही, पण गझलांचा पाऊस पडू लागला. ) Happy

प्रसादरावांनी तरही दिली आणि काफिया रदीफही सांगितली नाही, पण गझलांचा पाऊस पडू लागला. >>> नाव लिहायला सांगितल की आपलं जे असेल ते नाव लिहून टाकावं. कुणाचं लिहू कसं लिहू म्हणून कशाला विचारत बसायचं. चला बेफी, येउद्या या तरहीवर एक भन्नाट गझल.

चला, लिहायला घेतो मग, आता दोन जवळचे मित्र आग्रह करतायत आणि एक जवळचा मित्र तरही मिसरा देतोय म्हंटल्यावर प्रयत्न करायलाच हवा.

Pages