Submitted by शायर हटेला on 13 July, 2011 - 01:06
तरहीची ओळ आवडली.
परंतु मी तुझी नजर ही रदीफ घेवुन गझल केली आहे.
==============================================
टाळतोय आजवर तुझी नजर
खोल खोल आतवर तुझी नजर
घेतले मिटून नैन तू जरी
झोपली न रातभर तुझी नजर
शोधण्यास वीतभर मनातले
दौडतेय हातभर तुझी नजर
फूल दुश्मनास अन फिरे मला
ठोकरीत दरबदर तुझी नजर
हिंस्त्र तू न, का तरीहि भासते?
शायरास जानवर तुझी नजर
-शायर हटेला
गुलमोहर:
शेअर करा
हं! अशी रदीफ घेतली की फुलवता
हं!
अशी रदीफ घेतली की फुलवता येत नाही गझल, असे एक मत मांडावेसे वाटले. नैन, दुष्मन वगैरेही जरा कमी आवडले.
कृपया तरहीच्या जमीनीत आणखी एक रचना करावीत अशी नम्र विनंती!
(चुभुदेघे)
मतल्यात आजवर, आतवर असे काफिये
मतल्यात आजवर, आतवर असे काफिये घेतल्यावर रातभर, हातभर इ इ कसे चालतील???
होय, तेही खरेच!
होय, तेही खरेच!
बेफिकिर सहमत
बेफिकिर सहमत आहे.
आनंदयात्री,वॅलिड पॉइंट. दुरुस्त करतो.
शायर, मझा आला नाही
शायर,
मझा आला नाही
शायर वरील सर्वांशीच सहमत...
शायर
वरील सर्वांशीच सहमत...
फिरुनी प्रयत्न करावात ही विनंती
झोपली न रातभर हा शेर आवडला.
झोपली न रातभर
हा शेर आवडला.