Submitted by Girish Kulkarni on 20 July, 2011 - 09:33
***********************
***********************
खोल खोल आतवर तुझी नजर
तेच डांव, थेट घांव जन्मभर...
का उगा शहानिशा तुला हवी
मी न बोललो कुणास आजवर...
भेटतात ते असे पुन्हा पुन्हा
भेटते नवी बनुन जुनी कसर..
होत-करत जाहिरात छानशी
दु:ख्ख वागते असेच वेडसर
नजर काय शेवटी अटळ व्यथा...
खोलवर कधी..कधी कधी धुसर...
***********************
***********************
गुलमोहर:
शेअर करा
भेटतात ते असे पुन्हा
भेटतात ते असे पुन्हा पुन्हा
भेटते नवी बनुन जुनी कसर.. >> छान पण कसर 'भेटणे' वापरता येईल का असा प्रश्न पडला...
बाकीचे शेर अजून गोटीबंद करायला हवेत असे वाटले... प्र्त्येकात मस्त अर्थ दडला आहे पण खोलवर पोचत नाहीये वाचकाच्या
धुसर आणि फितुर हे धूसर आणि फितूर असतात त्यामुळे वॄत्त गंडेल...
चू.भू.दे.घे.
प्रयत्नासाठी अभिनंदन!!! बाकी
प्रयत्नासाठी अभिनंदन!!!
बाकी जाणकार सांगतीलच.
का उगा शहानिशा तुला हवी मी न
का उगा शहानिशा तुला हवी
मी न बोललो कुणास आजवर..>>> छानच!
कसर, वेडसर, धुसर आवडलेत.
कसर, वेडसर, धुसर
आवडलेत.
मिलींद-शाम-बेफिकीर अन
मिलींद-शाम-बेफिकीर अन मुटेसाहेब : मनःपुर्वक आभार...
मिलींद : खोलवर बर्याच गोष्टी पोहोचत नाहीयत आयुष्यात.. हे तर शेर आहेत... लढाई चालू आहे..
"कसर भेटणे"बद्दल : एक्सप्रेशन आहे...काहींना चालेल..काहींना नाही अन काहींना प्रश्नही पडेल
खोल खोल आतवर तुझी नजर तेच
खोल खोल आतवर तुझी नजर
तेच डांव, थेट घांव जन्मभर...
का उगा शहानिशा तुला हवी
मी न बोललो कुणास आजवर...
आवडले...:-)
भेटतात ते असे पुन्हा
भेटतात ते असे पुन्हा पुन्हा
भेटते नवी बनुन जुनी कसर.... व्वा!! क्या बात है!!
छान गझल.
नजर काय शेवटी अटळ
नजर काय शेवटी अटळ व्यथा...
खोलवर कधी..कधी कधी धुसर
समजले. छान
कसर,वेडसर, धुसर्.......छान.
कसर,वेडसर, धुसर्.......छान.
आवडले.