हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

"बळी" वाचली आत्ताच!

सबंध 'लवासा' प्रकल्प डोळ्यांसमोर उभा राहिला..अन् तिथे बघितलेला निसर्गाचा ऱ्हास सुद्धा!

एक पत्रकार म्हणून मागच्या वर्षी तिथे स्टोरी करायला गेले होते..तेव्हा जे जे बघितलं, ते बघून चीड आली..सगळ्याच सिस्टीम ची..

एका अख्या खोऱ्याचा ऱ्हास..माहिती प्रत्येकाला असतं..पण सगळ्यांच्याच तोंडाला कुलुपं घातलेली असतात..

आणि नसतील, तर गरम वितळत्या लाखेनी ति बोलणारी तोंडही सीलबंद केली जातात!

Pages