हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

अरे वा. Happy
आता वाचायला घेते.

संपादक मंडळाचे आभार Happy
आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

अंक छानच दिसतो आहे. संपादकांचे आभार !
वाचून परत एकदा प्रतिक्रीया देईनच.

अरे व्वा पोस्टर तर मस्त वाटतयं !
संपादक मंडळाचे आभार !
समस्त मायबोलीकरांना दिपावलीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !

अरे, कोण गातय रे? किती सुंदर आवाज आहे.... नितळ. चारूकेशी का? जियो!
दिवाळी अंक जन्माच्या वेणा साहिलेल्या सगळ्या सगळ्यांचे खूप आभार.... त्यांना आणि सगळ्या मायबोलीकरांना मनापासू शुभेच्छा!

अंक नुसताच चाळलाय.. डिजेचा मेंदीचा बॉक्स, सचिनचा लेख, रांगोळीचं सुलेखन (कसला अफाट प्रकार आहे हा!!! ) नजरेखालून घातलं. पूर्ण अंक सावकाश, चवीचवीने वाचेन.

अंकाचं पोस्टर आणि आतिल सजावट मस्तच! वेगवेगळ्या रंग संगतीचा वापरही छान Happy एकूणातच देखणा झालाय अंक Happy

संपादक मंडळाचे, सल्लागार आणि सगळे मदतनीस, लेखक, कलाकार सगळ्यांचेच अभिनंदन !

समस्त मायबोलीपरीवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

वरवर पाहिला अंक. छान दिसतो आहे. संपादक मंडळ आणि यात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन!

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!

अंक सुरेखच दिसतोय. विशेषतः ते वरचे headers Wink Proud
आत्ता नुसता चाळला, उद्या निवांत फराळ खाताना वाचेन. पण एकंदरीत देखणा झाला आहे अंक.
मंडळाचं अभिनंदन Happy

कला आणि जाणिवा वाचायला घेतले आहे. देवाचा ग्रेसच्या कवितांवरचा लेख, अरभाटाचा 'रिलेट' होण्याबद्दलचा लेख, मिलिंद मुळीक ह्यांच्यावरचा लेख - फारच सुरेख आहेत सर्व. वेगवेगळ्या क्षेत्रातील ही माबोवरची सामान्य (सामान्य अश्या अर्थी की साहित्य/कला वगैरे क्षेत्रात कुणाचे फार मोठे नाव आहे अथवा व्यवसायाचे क्षेत्र आहे असे नाही म्हणुन) माणसे इतके सुरेख विवेचन/समिक्षा करत आहेत त्याबद्दल सर्वांचे खास आभार/कौतुक.

हाsssss आला दिवाळी अंक Happy
मुखपृष्ठ एकदम खासम खास... आवडले.
सजावट उत्तम!! बाकी अंक चाळणे चालूय.
संपादक मंडळी, लेखक, कवी आणि अंक पूर्ण करण्यास हातभार लावणार्‍या सर्वांचेच मनापासून अभिनंदन!!! आणि दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा Happy

अंक नुसता चाळला. सावलीच्या थेंबाच्या प्रवासावर अंजलीची चित्रं खूप आवडली. दरवर्षीपेक्षा या वर्षीचा अंक छान रंगीबेरंगी आहे.
आता सावकाशीने वाचेन.

वाचायला सुरुवात केलीय.
अंक छानच दिसतोय.
अश्चिग चा "नैसर्गिक भरार्‍या" पुन्हा वाचण्यासारखा आणि छान.
ऋयाम चा "सोनी कुडी" आश्चर्यात टाकणारा,
स्मिताके "सात पर्‍यांची कहाणी" फारच गोड Happy
रैनाची "अनिकेत;अश्वत्थ" मस्त.
श्रीनिवास माटे यांची स्थापत्यकले विषयी छान माहीती.
योगेश, चंदन फोटो आवडले. रांगोळी सुलेखन छान.

बाकीचं अजुन वाचायच आहे.

एक सुचना केलेली चालेल का? जमल्यास लेखकांच्या नावांना त्यांच्या प्रोफाईलची लिंक द्याल का? म्हणजे पर्सनल प्रतिक्रिया देणं अगदी सोपं होईल.

अंकाची मांडणी अतिशय उत्तम अशी केली आहे.
संपूर्ण वाचन करायला अजून बराच वेळ जाईल, तोवर सर्वांना ||शुभ दिपावली|| Happy

अश्विनीमामींचा "सुगंधी लेख" वाचला. मस्तच लिहलाय आणि एका वेगळ्याच क्षेत्राची महिती मिळाली. अंक पण मस्त दिसतोय.

छान.
मुखपृष्ठ आवडलं. विषयांची अक्षनिहाय केलेली संमिश्र मांडणी चांगलीच. नेव्हिगेशन सोपं करणारी.
अंक वाचतो आहे. शीतल आमटे यांचा लेख मनापासूनची दाद घेऊन गेला. मिलिंद मु­ळीक! चित्रांना­ दाद देतच ले­­ख वाचला.
बाकी निवांत वाचेन आणि लिहीन.

अंक अगदी छान झाला आहे. सर्व कलाकार, संपादक मंडळ यांचे अभिनंदन आणि दिवस रात्र खपून अंक सादर केल्याबद्दल धन्यवाद.

देऽऽऽखणा अंक! Happy कल्पक आणि सुरेख मुखपृष्ठ. संपादकीयासोबतचा तो आवाज किती चैतन्यमय आहे!
अजून संपादकीयच वाचलेय. बाकी वाचतो आहे अजून. सुंदर अंकासाठी अभिनंदन आणि धन्यवाद संपादक. Happy

अंक मस्त आहे. सगळे वरवर चाळले. पण सावलीचे दोन्ही लेख आणि ऋयामचा लेख येवढे वाचले. मस्त झालेय.

सावली लिखाण मस्त झालेय ... स्पेशली ऑटम. या देशात आल्यावर मला ऑटमची मजा कळली. सुरुवातीला राहिलेल्या घराच्या रस्त्यावर दुतर्फा असलेले गिन्कोचे वृक्ष पाहुन मला नक्की काय वाटले होते ते तू शब्दात मस्त पकडले आहेस Happy

दिवाळी अंकात वाचलेले व आवडलेले लेख :
१) मिनोती - कसूती
२) सावली दोन्ही
३) ऋयाम
४) राजगड प्रदक्षिणा- पक्क्या भटक्या
५) पेशवा - मिथक
६) शंतनू - लेह-लडाखमधील ढगफुटी
७) अश्विनीमामी - विश्व सुगंधाचे
८) चंदन फोटोग्राफी
९) योगेश२४ फोटोग्राफी
१०) डीजे- मेंदीचा लेख

विश्व सुगंधाचे या लेखात अश्विनीमामींची थोडी ओळख दिली असती तर जास्त आवडलं असतं.

सुंदर दिवाळी अंकाकरीता संपादक मंडळींचे मनापासुन आभार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

अंक नेहमीप्रमाणेच छान झालाय Happy वरवर चाळलायं सध्या Happy
मुख्यपृष्ठ अतिशय कल्पक.

आत्ता नुसता चाळला, निवांत फराळ खाताना वाचेन.>>>>माझाही हाच बेत Happy

|| दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ||

अंक चाळलाय फक्त..
चंदन नि योग्याची फोटोग्राफी, पक्क्याची राजगड प्रदक्षिणा ... इतकेच वाचले नि आवडले.. Happy
बाकी हळूहळू Happy

पण अंकाची मांडणी मस्तच !!!! मुख्यपृष्ठ तर छानच.. !!

संपादक मंडळ.. आभारी आहे तुमचा.. Happy
नि पेशल थँक्स.. या मंडळींना..

"मुखपृष्ठ आणि सुलेखन
विवेक रानडे (www.vivekranade.com)

अंक सजावट साहाय्य
अंजली

रेखाटने
नीलू, अंजली, अश्विनीमामी, मनाकु१९३०, हिम्सकूल, धनश्री"

खूपच बघेबल केलाय तुम्ही !

Pages