हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

बी, अंक आत्ताच तर आलाय. वेळ मिळेल तसातसा लोक वाचतील आणि देतील प्रतिक्रिया. आणि वर प्रतिक्रियाही दिल्याच आहेत बर्‍याच जणांनी. बाकीच्यांचं जाऊ दे, तुझं तू लिही बघू. Happy

अतिशय सुंदर , वैविध्यतेने नटलेला , परिपुर्ण असा दिवाळी अंक आहे . सवडिने सविस्तर प्रतिक्रिया देईन . धन्यवाद .

दिवाळी अंक छानच आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन.

श्रावण मोडक, रैना आणि टण्याच्या कथा आवडल्या.

'बळी'पेक्षाही लवासाचे वास्तव फार भयावह आहे असे वाटते.

'रंग उमलत्या मनाचे' मधल्या सर्वच मुलाखती अतिशय इन्स्पायरिंग! श्री अजित जोशी- हॅट्स ऑफ!
मोहित टाकळकर, तेजस मोडक, डॉ. अनिकेत सुळे- ह्यांची विचार करायची पद्धत आवडली.
यशोदा वाकणकर ह्यांच्या कार्याबद्द्ल थोडीफार माहिती होती आणि त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच होईल.
वीणा जामकर- बुद्धिमान अभिनेत्री वाटतात. त्यांना शुभेच्छा.
तेजस्विनीचे कष्ट वाचून डोळ्यात पाणी आलं खरंच. अनेकानेक शुभेच्छा तिलाही.

ऋयामने ओळख करून दिलेली 'सोनी कुडी' दिप्ती खूपच आवडली.

ह्या सर्व लोकांमध्ये एक नो-नॉन्सेन्स आणि नो-प्रिटेन्स सेन्स आहे, जो प्रचंडच आवडला. सगळ्यांना थम्ब्ज अप!!

मन्जूडीने करून दिलेली रिदमिक जिम्नॅस्टिक्सची ओळख मस्त! नवीन आणि अतिशय कौशल्यपूर्ण प्रकार आहे. वर्षाताईंनाही मनःपूर्वक शुभेच्छा!

ह्या मुलाखती/ व्यक्तीपरिचयांना दिवाळी अंकात स्थान दिल्याबद्दल धन्यवाद संमं.

कथाशिल्प:
बळी, कॅटवॉक, अनिकेत;अश्वत्थ, कृष्णविवर जाम आवडले. सर्व लेख विचार करायला लावणारे आणि वास्तववादी.

शब्दलिपी:
रंगवूनी आसमंत, गंगेच्या काठी, मी, तीनशे किलोचे धूड आणि एक सप्ताहांत आवडले.

विचारगर्भातून:
प्रकाशवाटा खुप खुप आवडले.

आस्वाद:
लांडगा आला रे आला ? आवडले.
चांगदेव चतुष्टय: ह्या एक बाबाचा व्यासंग दांडगा आहे. मी आजपर्यंत कुठल्या कादंबरीच्या एव्हड्या खोलात नव्हतो शिरलो. जबरदस्त...

आविष्कार:
केल्याने देशाटन (जलरंग) : पाटिल, जबराट, अप्रतिम, झक्कास, लय भारी...
स्पंदन: क्लास... मस्तच...
निसर्गशिल्प: योग्या नेहमीप्रमाणेच भन्नाट, सुसाट. च्यामारी ह्या बाबाला आता विशेषणे कमी पडायला लागली.
व्यक्तिचित्रे पण मस्त.

एकुणच अंक खुप आवडला. Happy
संयोजकांचे अभिनंदन आणि मनापासुन धन्यवाद...

तळटिपः धुंद रवि पुन्हा लोळवेल अशी अपेक्षा होती ती पुर्ण झाली नाही. Sad

सावलीची कथा गोड आणि अंजलीची रेखाटनं सुपर गोड आहेत.

टण्याची कथा आवडली. त्याची स्वतःची, इतर कुठला/कुणाचा प्रभाव नसलेली वाटली. रैनाची कथा आवडली. साधे कथाबीज आहे पण तिने मस्त फुलवले आहे. पेशव्याच्या कथेबद्दल गिरीला अनुमोदन.

साजिर्‍या, कथा आवडली पण तरी येस यु कॅन डू बेटर.

बागवासरी अतिशय सुंदर उतरला आहे. ती सगळी बाग हुबेहुब उभी रहाते डोळ्यांसमोर. वाचताना, वाचून झाल्यावर सुद्धा खूप शांत शीतल वाटत रहाते.

मेंदी भारीच. कसुती टाका जमेल असं वाटतय. करुन बघायला हवा. रांगोळी सुलेखनं जबरी.

अरभाटाचा लेख अजून एकदा आणि दर आठवड्यातून एकदा वाचावा असा आहे.

मला ते उभं आडवं नेव्हिगेशन आवडलं. त्या त्या संकल्पनेवर क्लिक केलं की तिथे दिलेलं साहित्य कथा आहे की ललित की अजून काही ह्याचा अंदाज येत नाही. डाव्या बाजूस असलेल्या नेव्हिगेशन मेनु मुळे तो प्रश्न उरत नाही.

मुखपृष्ठ फारसं आवडलं नाही.मुखपृष्ठ फोटो म्हणून आवडला! पण मला तो फोटो दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणून नाही आवडला. अंकातिल लिखाण चांगले आहे. पण दिवाळि अंक आहे असे कुठेहि बघुन वाटत नाहि.

दिवाळी अंकाशी संबधित सर्वांचे अभिनंदन.मजकुर उत्तम आहे.
दिवाळी अंक म्हणले की कविता , व्यंगचित्रे , विनोदी लेखन असलेच पाहिजे अशी एक मानसिक धारणा होउन गेली आहे. ते या अंकात नसल्याने थोडे चुकल्यासारखे वाटले खरे.
विशेषतः दाद , धुंद रवी यांचे दर्जेदार विनोदी लिखाण वाचायला मिळेल अशी अपेक्शा होती.

दिवाळी संवाद आणि अनंत अमुची ध्येयासक्ती आवडले. रांगोळि सुलेखन आणि मेंदी चे video मस्तच. बाकि अंक नुसताच चाळलाय.

एकदा अंकाचा दुवा वापरुन दीवाळी अंकावर गेले की परत मायबोलिच्या मुख्य पानावर (home page) यायला link हवी होति असे वाटले. सध्या फक्त अभिप्राय वरुनच मायबोलि वर परत येता येते.

हळू हळू वाचता वाचता प्रतिक्रिया देणारय....
मिथक - पेशवा, सुंदर. अशी उलगडत गेलीये.... कथा अख्खीच्या अख्खी आत रुजतेय.

सरणार कधी - चांगली जमलीये. कथेचा नेहमीसारखा शेवट झाला असता असं मला वाटत नाही. पण नीरज आणि सारिका ह्यांच्यामधल्या अनुत्तरित प्रश्नांनी अधिक अपुरी वाटली.

बळी - सुरेख विषय. पण नक्की काहीतरी सांगता सांगताच गोष्टं संपतेय. फ़्लो छान आहे. काही वेगळं सांगण्याआधीच संपल्यासारखी.... मलाच वाटतेय का काय?

वटवृक्ष आणि गवत - ते शेवटचं वाक्यं भारी

कॅटवॉक - जरा अवाक... पोचली पण पोचली नाही अशी. पद्धत आवडलीच.... आणि डायरीत असूनही मस्तं फ़्लो आहे. साजिरा, जियो.

अनिकेत, अश्वत्थ - रैना, केवळ अप्रतिम. ते लाटांची आदतसे मजबूर लपलप... सारखे अनेक अनुभव... मी प्रत्येकवेळा थबकले.

सुगंधी (अश्विनीमामी) - लाजवाब... माहितीपूर्णं लेख. मामी सुगंधी क्षेत्रात कार्यरत आहेत हे माहीत नव्हतं.
माझ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या एकीकडे "गिली मिट्टी"ह्या गंधाचं अत्तर होतं... मला फक्तं वेड लागायचं बाकी होतं. ती "बेस नोट" किती काळ गुंजत राहिली त्याला गणित नाही....

एका छान अंकाबद्दल सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन Happy
स्वरूपाबद्दल - साधेपणा हे एक आगळे वैशिष्ट्य. दोन प्रकारच्या सूची देण्याची कल्पना उत्तम वाटली, त्यामुळे पाहिजे त्या साहित्यापर्यंत पोहोचणे सुकर झाले आहे. मुखपृष्ठ हे छायाचित्र म्हणून अतिशय छान आहेच, शिवाय अंकाचे मुखपृष्ठ म्हणूनसुद्धा आवडले. त्याचा आणि अंकातील संकल्पनांचा संबंध लावण्याचा प्रयत्न करावासा वाटला नाही.
तो आवाज! फारच सही!
आता फक्त चाळला आहे. साहित्य वाचून झाल्यावर मग परत प्रतिसाद देतोच Happy

संपादक मंडळ आभार. Happy
दिवाळीच्या सुट्टीनंतर घरी परतल्याबरोबर आधी अंक चाळला उस्तुकतेने. उभं -आडवं नेव्हिगेशन आवडलं.
आत्तापर्यंत घाईघाईने आधाश्यासारखा चाळलाय अंक, तरीही आत्तापर्यंत चाळलेल्यातले प्रकाशवाटा, रैनाची कथा, सोनी कुडी, अरभाटचा लेख आवडलं. (अरभाटचा लेख कालपासून दोनदा वाचून झालाय. परत परत वाचणार हे नक्की.) अजून अंक पूर्ण चाळूनही झाला नाहीये. जसाजसा वाचेन तसतशी प्रतिक्रिया लिहित जाईन. Happy

सागरपरिक्रमा , वेगळ्या वाटेवरची एक 'तालबद्ध' वाटचाल आणि 'मिलिंद'रंग आताच वाचले. छान जमल्यात मुलाखती / लेख.

लांडगा पाहिला रे पाहिला!

मऊमाऊचा लेख (व त्यातील खुमासदार वर्णन) वाचुन पुस्तक वाचायची साहजीकच ईच्छा झाली होती. जेट एजचा मार्ग अवसरुन चित्रपट पाहुन समाधान मानले. तसा चांगला आहे, पण पुस्तकात व चित्रपटात, खास करुन शेवटच्या भागात भरपुर तफावत असल्याचे लक्षात येते Sad तरीही पहाण्यासारखा आहे, पण पुस्तकच वाचलेले जास्त योग्य होईल असे राहुन राहुन वाटणार.

http://aschig-moviereviews.blogspot.com/2010/11/never-cry-wolf-1983-710....

संपादक मंडाळाचे आभार. अंक सुरेख झालाय. मुखपृष्ठ विशेष आवडलं. आता पर्यंत वाचलेल्या मध्ये...
अरभाटचा लेख आवडला. जरा वेगळा "पर्सपेक्टीव" म्हणून वाचायला मजा आली. टण्याची कृष्णविवर आवडली. पात्राची घुसमट अत्यंत प्रभावीपणे मांडलीये. पेशवाची मिथक आवडली, लिहीण्याची शैली छान आहे.
मामींचा "विश्व सुगंधाचे" वाचायला मजा आली. ह्या विषयावर आधी काहीच वाचण्यात आलं नव्हतं, सगळीच माहिती नवीन. चंदन मोगर्‍यांची छायचित्रे मस्त!!! पक्का भटक्या चा राजगडावरचा लेख आणि छायाचित्रे आवडली. योगेशची अंकातल्या पेक्षा आणखिन मस्त छायाचित्रे आधी बघितलेली आहेत पण ही सुद्धा आवडली.
धनश्री पेंडसेंची चित्रमालिका आवडली, एकदम वेगळाच अनुभव आहे ती चित्र म्हणजे. दोरीवर कपडे टांगलेलं (स्कुटरवर पिवळं कवर टाकलय वाटतं), दाराच्या आत ओट्यावर (?) सायकल असलेलं आणि गणपती मंदिराची चित्रे विशेष आवडली.
मंजिरी सोमणांचा मिलींद मुळीकांवरचा लेख आवडला. त्यांची चित्रे फारच भन्नाट आहेत! जाता जाता मिलींद मुळीकांच्या "शिष्यवृत्ती मिळालेली असूनसुद्धा मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश घेण्याचा निर्णय का घेतलात?" ह्या प्रश्नाला त्यांचे उत्तर वाचताना टण्याच्या "कृष्णविवर" मधल्या नीलेशची निव्वळ "पोलर ऑपोजिट्स" म्हणून आठवण आली. आपल्याला नेमकं काय चांगलं जमतं, काय आवडतं आणि आर्थिक स्थैर्य (सुबत्ता नाही) येण्या करता नेमकं काय लागतं ह्याचं गणित डोक्यात नीट मांडता येत की नाही ह्यावरुनच कदाचित एखाद्याचा मिलींद मुळीक होतो की नीलेश हे ठरत असावं. नीलेश ला गणित नेमकं नीट मांडता का येत नाही हा एक पुर्णपणे वेगळा विषय आहे.
संवेद ह्यांचा पिकासो वरचा लेख आवडला पण आणखिन वाचायला नक्की आवडलं असतं. ब्लॅक, ब्लू आणि इतर पिरीयड्स बद्दल माहिती आवडली.
अजून बरच वाचायचय.

सेमो म्हणे वाचला, बरंचस समजलं नाही...तरीपण पूर्ण वाचला, पुन्हा वाचेन अजून थोडंफार कळेल. नवीन गोष्टीशी ओळख करुन दिलीस नीरजा त्याबद्दल धन्यवाद.

रांगोळी सुलेखन अफाट आहे, मागच्या एका दिवाळीअंकात नखचित्रंपण यांचीच होती बहुतेक..तीपण मस्त होती.

पांचाळेंची भेट, ग्रेस, आवडलं ग्रेसबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच.

कथाशिल्पामधे, मिथकचा फ्लो भन्नाट आहे अधाश्यासारखं झालं वाचताना , कॅट्वॉक- साजिरा स्टाईल जबरा आहे, डायरीची आठवण अपरिहार्य , अनिकेत-अश्वत्थ आणि कृष्णविवर वाचल्या आवडल्या.
थेंबाचा प्रवास एकदम क्युट त्यातल्या सगळ्या चित्रांना टाळ्या.
विश्वसुंगधाचे वाचला आवडला...नवीन काहीतरी समजलं
अजून वाचतेय..

मामींचा लेख आवडला. माहिती उत्तम आहेच पण मामींच्या खास शैलीने कंटाळवाणी होत नाही. ह्या क्षेत्रात त्यांना बरीच माहिती आहे असे कळते.

वाइनची कूळकथा लेखात पण बरीच नवी माहिती कळाली. तरी चवी-चवींतला फरक, ठरावीक वाईन्सना अत्युत्तम म्हणून का नावाजायचे हे सर्व एखाद्या दर्दी वाईन शौकीनाने लिहिले असते तर जास्त परिणामकारक झाले असते असे वाटले. हे म्हणजे किनार्‍यावर बसून समुद्रात बुडी मारायला शिकवल्यासारखे वाटले.

बळी वाचताना बोकीलांच्या कथांची आठवण येत रहाते.

चंदन, तुसी ग्रेट हो ! भारताचे असेच रंग आमच्यासमोर आणत जा.

चिनूक्स, तू डायरे़क्ट पुस्तक काढू शकतोस आता.उत्तम लेख, त्याहीपेक्षा फारसे प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्यांचे मोठेपण तुला दिसते आणि ते तू उत्तम उलगडून दाखवतोस !

दिपांजली, अगं कसली भन्नाट आयडीया आहे ही? ह्या सीलर साठी जन्मभर फिरत होते! कुठे मिळेल ते? त्याबद्द्ल अजून सविस्तर सांगू शकशील का?

मिलिंद मुळीकांचे मोठेपण त्यांच्या चित्रांतून अधिकच उदात्त होते ! जलरंगातील त्यांचे काम फार भारी आहे. एकेक चित्र हे epic आहे.

बाकी अभिप्राय इतर लेख वाचल्यावर.

मिथक कथा आवडली. मस्त लिहिली आहे.
बळीसुद्धा आवडली. पण जरा अजून फुलवायला हवी होती.
ह्यावेळचा कथाविभाग मस्त आहे. सगळ्या कथा छान आहेत.

बागवासरी, सोनी कुडी आणि विश्व सुगंधाचे आवडले. मामी, विश्व सुगंधाचे ची सुरुवात फार मस्त केली आहे तुम्ही. Happy
गंगेच्या काठीसुद्धा आवडला.

चिनूक्सचे 'अनंत आमुची ध्येयासक्ती' हे सदर उत्कृष्ट आहे. प्रस्तावनाही छान लिहिली आहे आणि सगळ्यांची मनोगतंही मस्त आहेत. जोशी, तेजस्विनी सावंत, सुळे ह्यांचे मनोगत विशेष आवडले.

कथाविश्व वाचून झालं. सगळ्यात जास्त आवडलेली कथा म्हणजे साजिर्‍याची 'कॅटवॉक'... पण वाचताना 'आज दिनांक'चा प्रभाव जाणवत होता. डायरी फॉर्ममध्ये लिहिलेली गोष्ट, इंजिनियरींग पार्श्वभूमी ह्यामुळेही असेल कदाचित, पण सारखं 'आज दिनांक'चा पुढचा भाग वाचतोय की काय असं वाटत होतं.

ललीची 'सरणार कधी' पण अप्रतिम... ते 'कधी'च्या पुढचं न लिहिलेलं प्रश्नचिन्ह कथा वाचतना पिच्छा सोडत नाही.

रैना आणि टण्याच्या कथांमध्ये लेखकाचं नाव वाचलं नसतं तरी ही कथा कोणाची आहे हे लगेच ओळखता येईल अशी त्यांची शैली त्या त्या कथांमध्ये जाणवत होती. दोघांच्याही कथा छानच..

'मिथक' आणि 'बळी' ह्याही कथा आवडल्या.

'सात पर्‍यांची कहाणी', 'वटवृक्ष आणि गवत' आणि 'थेंबाचा प्रवास' ह्या बालकथा ठीकठाक.

कथा विभागातली नीलूची चित्रं अप्रतिम... १०० पैकी १०० मार्क.

बालकथांवरची चित्रंही आवडली.

सरणार कधी प्रचंड आवडली अगदी प्रश्नचिन्ह मनात तसच ठेवून संपली तरिही की म्हणूनच जास्त आवडली
कॅटवॉक, मिथक, कृष्णविवर देखील आवडल्या
रैनाची कथा देखील आवडली, मांडणी, फ्लो जबरदस्त पण अजून वाचायला आवडली असती
बळीचा विषय आवडला

बालकथांवरची चित्रंही आवडली.

अर्भाटचा लेख, चिनुक्सने लिहिलेलं सागर परिक्रमा इ. सुरेख, मामींचा लेखदेखील आवडला.

बाकी वाचेन तसं लिहिनच

आत्तापर्यंत वरवर चाळला अंक. अतिशय छान. आरामात आस्वाद घेत वाचणार. बरेच दिवस पुरेल. Happy सर्व संबंधितांना अगदी मनापासून धन्यवाद.

'विश्व सुगंधाचे' वरून Perfume: The Story of a Murderer आठवला. अश्विनीमामी, त्या तेराव्या 'नोट'ची रहस्यमय आठवण करून दिल्याबद्दल आभार.

श्यामली, कविता सुरेख. आवडली.
मिनोती, कसुतीचा व्हीडीओ मस्त जमलाय! हे करुन बघावसं वाटतय, कितपत जमेल ते मात्र माहित नाही! Proud
डीजे, तुस्सी ग्रेट हो!
मुळीकांची मुलाखत मस्त जमली आहे. चित्रं तर सुरेखच...

अजून वाचतेय अंक....

टण्याची कृष्णविवर, साजिर्‍याची कॅटवॉक, आणि ऋयामाची सोनी कुडी वाचून झाली......... एकदम मस्त जमलेली भट्टी! दिपांजली ची मेंदी पण सुंदर!
बाकीचा अंक अजून वाचतेय... पुढच्या दिवाळी अंकापर्यंत नक्की वाचून होईल..

मिनोती, उत्तम काम ! पुण्यामुंबईत भरतकामाचे आणि कलेचे चांगले साहित्य मिळणारी दुकाने कुठली? कृपया माहिती देऊ शकाल का? पार्ले किंवा चेम्बूर मधली असतील तर जास्त चांगली.मला या माहितीची नितांत गरज आहे.

Pages