हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

दिवाळी अंक सुंदर दिसतो आहे! कल्पक आणि सुरेख मुखपृष्ठ. आत्ता फक्त चाळला आहे, नंतर वाचून सविस्तर लिहिनच. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा!
संपादक मंडळ व सर्व टीमला धन्यवाद.

मायबोली करांच्या वैविध्यपुर्ण लेखणीतुन साकारलेला हा खजिना आहे. अरुंधतीने ७-८ वर्षांपुर्वीच्या गंगास्नानाचे वर्णन केले आहे. वाचताना अस वाटत होत की आपणच डुबकी घेत आहोत थंडगार गंगेच्या पात्रात. ही कथा एका भाविकाची आहे अस वाटत असतानाच अरुंधतीने ती समाज सेवीका असल्याचा परीचय एका भागातुन दिला.

या खजिन्याची सैर करायला आणि निरीक्षणाला वेळ द्यावा लागेल. अनेक दालनातुन मी नुसताच फिरुन आलोय. आता वेळ द्यायचाय निरिक्षणाला.

खरच, किती गुणी कलाकारांचा सहवास २०१० मध्ये लाभतोय.

करड्या पार्श्वभूमीवर निळी अक्षरे नीट दिसत नाहीत (मूख्य पानावर) तो रंग बदलता येईल का ?
तसेच हा अंक मायबोली परिवाराबाहेर पण वाचला जाईल, त्यामूळे लेखकांची खरी नावे (अर्थातच त्यांच्या परवानगीने ) देता येतील का ? मायबोली आयडी कंसात देता येईल.
कूष्णमेघ यांच्या लेखावर मी च्या जागी त्यांचे नाव देता येईल का ?
एका लेखिकेच्या नावात, पूर्णविराम पडलाय. (तनूजा रहाणे)
डॉ. शीतल आमटे, हे नाव देवनागरीत हवेय. इंग्रजीत पण ते नीट टाईप झालेले नाही.
वेगळ्या वाटेवरची एक तालबद्ध वाटचाल, या शीर्षकाला लेखिकेचे नाव जोडले गेलेय.
ग्रंथस्नेह हि अक्षरे अजून मोठी हवीत. स्पष्ट दिसत नाहीत.
या सुधारणा करता आल्या / करण्यासारख्या असल्या तर छान. मग मी हि प्रतिक्रिया डिलीट करेन.

सुंदर देखणा दिसतोय अंक. सगळी नावं, लेखांची शिर्षकं बघून वाचायची फारच उत्सुकता वाटतेय. अभिनंदन संपादक मंडळी !!!

देखणा अंक Happy वरवर चाळलाय. वाचून परत प्रतिक्रिया देईन.
खरंच कौतुक वाटतं, एवढं विविधतेने माबोकर लिहितायत Happy

आत्ताच 'कृष्णविवर' वाचली. टण्या, भारीय गोष्ट. पण शेवट प्रेडिक्ट करता आला. आणि असं वाटलं, तो प्रेडिक्टेबल नसता, तर गोष्ट भारीपैकी भारी झाली असती. आत्ता आहे त्यापेक्षाही.
बाकी अंक नेहमीप्रमाणे दे-ख-णा आणि भरगच्च. हळूहळू वाचतेय.

कधीपासून वाट बघत होतो अंकाची... Happy आत्ता उठून कामावर आलो.. आता वाचायला घेतो.. आज काम गेले खड्यात... Wink

व्वा! मस्त दिसतोय अंक.... अजून वाचायचा आहे.... पण प्रथम दर्शनी अतिशय सुरेख दिसत आहे. आता निवांत वाचते! Happy सर्व दिवाळी अंक टीमचे व त्यासाठी योगदान देणार्‍या मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक! Happy

अंक मस्त. साधेपणा आवडला. विषयानुसार आणि लेखनप्रकारानुसारही केलेली वर्गवारी लेखन सापडायला सोपी पडते.
कथाविभाग मस्त आहे. एकदम चुनचुनके!!
बाकीचा अंक वाचत जाईन तसे तसे इकडे प्रतिक्रिया टाकेन.
(dont worry! यावर्षी एकेक लिखाण घेऊन डिसेक्ट करायचा मूड नाहीये!) Proud

रैना, तुझी कथा वाचली. _^_

ते शब्द जोडून वापरायचं तंत्र थोर आहे. मला प्रचंड आवडलं ते. समर्पक आहे.

अजून अजून अजूनअजूनअजूनाजुन लिही!

सुंदर देखणा अंक.. वरवर चाळला .. मेजवानी वाटतेय अगदी. Happy

सुरवातीलाच "प्रकाशवाटा" वाचलं.. याक्षणी आनखी काही वाचु नये असं वाटतंय आता.एक-एक फोटो, त्यात टिपलेले भाव बोलण्याच्या पलीकडंच.. कुठल्या मुशीतुन बनलेत ही आमटे परिवारातली माणसे देवालाच ठाउक!

एक एक करून वाचतोय... केदार यांचा 'सचिन'वरचा लेख खूपच अभ्यासपूर्ण... Happy

चंदन आणि योगेश यांचे फोटो जबरी.. तर अजयची कलाकारी पण अप्रतिम... Happy

संपादक मंडळ आणि सगळ्या समित्यांवरच्या मंडळींचे अभिनंदन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy
अंक नेहमीप्रमाणे सुंदरच दिसतोय चाळून झालाय आणि कला आणि जाणिवांपासून सुरवात केलीये..अरभाटाचा लेख अ फा ट आहे. अक्षरशः या माणसाला दंडवत घालावा अस मनात आलं. या लेखाच वाचन आता परतपरत कितीवेळा होणार देव जाणे.
..काहीही वाचलेलं आवडलं म्हणताना आता मात्र ते का आवडलं हा प्रश्न सतावणार. आणि आपण अजूनही कंफर्ट झोनमधेच राहणं पसंत करतोय हे त्रास देणार..

स्वप्नाचा लेख आवडला..मधे मधे वापरलेले शेर तर मैफिलीमंधे दाद घेऊन जातील असे..ते योग्य ठिकाणी वापरून लेख अजूनच रंजक झाला आहे. स्वप्ना तुझे मागचे सगळे लेख पुन्हा शोधून वाचावे लागणार. Happy

बाकी वाचल्यानंतर...

संपादक मंडळाचे अभिनंदन...अंक छान आहे.
मुखपृष्ठ आवडले.फोटो कोणी काढला आहे?मस्त रंगसंगती....
वाचल्यावर लेखांवर प्रतिक्रिया देईन.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!

अंक एकदम देखणा दिसतोय !!सुंदर मुखपृष्ठ आणि रंगसंगती. सजावट आणि नेव्हिगेशन अतिशय प्रोफेशनल झाले आहे!! सर्व संबंधितांचे अभिनंदन !!

दिपांजली मस्त Happy
मिनोती कसुतीची माहीती आवडली , माझ्यासाठी एकदम नविन आहे.
लेख वाचल्याबद्दल आभार Happy

टण्याची "कृष्णविवर" कथा पण आवडली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * शुभदिपावली २०१० * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

दिवाळी अंक फार सुंदर बनला आहे! रंगसंगती वगैरे एकदम झक्कास!!!

सध्या तरी 'सावली' चे लेख आणि केदारचा 'सचिन' वाचला आहे! एक नंबर!!! Happy

संपुर्ण वाचायला वेळ लागेल आणि मुद्दामच तो पुरवून पुरवून वाचणार आहे.
शिर्षकं आणि लेखकांची यादी बघूनच एकदम भारी वाटलं, 'एवढं सगळं एकदम वाचायला मिळणार!!' म्हणून...

एकदम मस्त 'फराळ' दिलात संपादक मंडळी, अत्यंत आभारी आहे!!! Happy

* ह्या अंकामधे मलाही एक लेख लिहायला संधी आणि प्रोत्साहन दिलंत याकरता विशेष आभारी आहे!
मनापासुन धन्यवाद!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * शुभदिपावली २०१० * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

अत्यंत देखणा अंक! सध्या नुसताच चाळलाय. आता सावकाश वाचायला घ्यावा. Happy

संपादक मंडळ आणि अंक उभारणीसाठी मदत करणार्‍या सगळ्या मायबोलीकरांचं मनःपूर्वक अभिनंदन!!!!

रैनाची गोष्टही मस्तच. सुरवातीचा पॅरा खास 'रैना' स्टाईल.
पण तिने गोष्टीत बरीच मॅड्/वेडसर लोकं का घेतली न कळे Proud
टण्याची चांगदेव चतुष्ट्यही छान. त्याच्या नजरेतून पुन्हा एकदा नेमाडे वाचायला हवेत.

दिवाळीच्या दिवशी पन्चपक्वान्नाची मेजवानी मिळालीये.
अविष्कार पाहुन , ऐकून झालाय. डीजे मिनोती व्यक्तीचित्रण ,निसर्ग चित्र झक्कास!हिम्स्कूल लाजवाब सुलेखन. काय वय असेल आजोबान्चे?
झेलम किती गोड आवाज आहे तुझा. उद्याच्या घरच्या दिवाळी गटग त सगळ्या छोटया दोस्तान्ना ऐकवणार आहे ही गोष्ट .
बाकी अन्क नंतर वाचून सविस्तर लिहिनच. सर्व मायबोलीकराना दीपावलीच्या शुभेच्छा!
संपादक मंडळ व सर्व टीमचे अभिनन्दन !

अंक छान झालाय. Happy अजुन वाचला नाही.
संपादक मंडळाचे आभार आणी अभिनंदन!
मायबोलीकरांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!

ऋयामचा 'सोनी कुडी' मस्तच. एकदम वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देणाअरा.
हिम्सकूल, तुझे आजोबा अफलातून कल्पक. त्यांची चित्रकलाही जबरीच. गंगाधरायनमः लिहून काय सफाईने त्यांनी पिंड आणि गाय काढली.

आत्ताच अंक चाळला नुसता. मस्त दिसतोय एकदम Happy
>>दिवाळी अंक जन्माच्या वेणा साहिलेल्या सगळ्या सगळ्यांचे खूप आभार>> दाद ला अनुमोदन Happy

दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा!

१. अंकाची सजावट व रंगनिवड आवडली.

२. तांत्रिक बाबी फारच सुरेख, शिस्तबद्ध व आकर्षक आहेत व नक्कीच त्या तशा करण्यामध्ये खूप एफर्ट्स असणार हे लक्षात येत आहे.

=======================================================

कन्टेन्ट्सबाबत - ही वैयक्तीक मते आहेत व कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही.

१. टण्या यांचे कृष्णविवर - ही स्वतःची निर्मीती आहे ही बाब मला उल्लेखनीय वाटते. (त्या विभगात सर्व स्वतःच्याच निर्मीती आहेत हे माहीत आहे मात्र 'आस्वाद' मधील चांगदेव विचारात घेऊन असे लिहीत आहे. ) कृष्णविवरची कल्पना सुपर्ब आहे. शिव्या अनावश्यक व अंगावर येणार्‍या वाटल्या! शैली कंटाळवाणी आहे. मात्र 'कल्पना' या एकाच घटकावर मेरिट लेव्हल! सध्याच्या तणावग्रस्त मनस्थितीत जगणार्‍या लाखो लोकांच्या विचारांचे प्रतिनिधित्व यात आहे यामुळे हा लेख महत्वाचा!

२. अरभाट यांचे 'रिलेट होणे' - हा लेख विस्कळीत वाटला. या लेखात लेखक स्वतःकडे कोणतेही श्रेय घेत नाही ही उल्लेखनीय बाब वाटली. कल्पना जुनीच वाटली. संदर्भ खूप झाले आहेत असे जाणवले. एक उप-कल्पना मात्र फारच आवडली. (कल्पना म्हणण्यापेक्षा मत!) ते म्हणजे, 'पूर्ण अज्ञात बाबही आपल्याला थोडीशी ज्ञात असावी अशी अपेक्षा असते हे आश्चर्यकारक आहे'! फार सुंदर मत आहे.

३. मधुबाला - लेख फार आवडला. स्वप्ना राज यांनी साध्या शब्दात लिहीला आहे.

४. टण्या यांचे चांगदेव चातुष्ट्य - आस्वाद व आस्वादाची शैली आवडली. स्वनिर्मीत लेखांपेक्षा आस्वादाची शैली अधिक आकर्षक वाटली. 'झोपण्यापुरती बायको' हा उल्लेख दोन्हीकडे आला असावा असे वाटते. याला प्रभाव म्हणावे की काय हे माहीत नाही. मात्र, आस्वाद तो आस्वाद!

५. नीधप यांचे सेमो - कंटाळवाणे वाटले.

६. केदार यांचे सचिन तेंडुलकर - खूपच शिस्तबद्ध लेखन! सर्वांचे आवडते व्यक्तीमत्व असल्याने लेख सर्वांना आवडेलच! मलाही आवडला.

बाकी हळूहळू वाचेन व प्रतिसाद देईन!

कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व!

महत्वाचे - दीपावली अंकाशी संबधीत सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन! यात निर्माते व लेखक दोघेही!

धन्यवादा!

-'बेफिकीर'!

वा वा सुंदर दिसतोय अंक!!! वाचून अभिप्राय लिहीनच.
सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आत्तापर्यंत रैनाची कथा, साजिर्‍याची कॅटवॉक वाचल्यात आणि डीजेचा व्हिडीओ बघीतलाय मेंदीचा.
रैनाची कथा खूपच आवडली.
मेंदीचा व्हिडीओ एकदम सही.

Pages