Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ
Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution
---------------------------------
हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.
विषय:
Groups audience:
शेअर करा
सूर्यकिरण ,रुनी धन्यवाद
सूर्यकिरण ,रुनी धन्यवाद
पाटिल यांची "केल्याने देशाटन (जलरंग)" आणि धनश्री पेंडसे यांची "स्पंदन"
सगळी चित्र अतिशय सुंदर.
अरभाट यांची "मी 'रिलेट' करु शकलो (नाही)" आवडला. याला रिलेट करु शकले म्हणाव की करु शकले नाही म्हणाव हा तसा प्रश्नच पडलाय
कविता नवरे ची "वटवृक्ष आणि गवत" कथा गोड.
साजिरा "कॅटवॉक" मस्त.
उत्तराबद्दल धन्यवाद संपादक.
अंक देखणा.... खूsssssssssप
अंक देखणा.... खूsssssssssप वाचायचंय... निवांत वाचून अभिप्राय देईन...
अरभाट, चांगला मुद्दा मांडला
अरभाट, चांगला मुद्दा मांडला आहेस. मुद्दा चांगला मांडला आहेस.
> आपल्याला अज्ञात प्रदेशसुद्धा पूर्णपणे अज्ञात चालत नाहीत.
Godel, Escher, Bach मधील १२वे प्रकरण Minds and Thoughts हे आहे. त्यात Doug ASU बद्दल बोलतो (Alternative Structure of the Union instead of USA). वाचले नसशील तर आवडेल तुला वाचायला (तु उल्लेखलेली चौकट ही मार्व्हीन मिन्स्की च्या फ्रेम्स सारखी आहे: http://web.media.mit.edu/~minsky/papers/Frames/frames.html)
त्या चौकटींमुळेच average चेहरे आपल्याला सर्वात जास्त आवडतात.
अतिशय देखणा अंक !! सगळ्या
अतिशय देखणा अंक !! सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन
सध्या वाचायला सवड नाहीये.... 
अरभाटचा लेख पुर्णपणे
अरभाटचा लेख पुर्णपणे पटला.
अश्विनीमामीचा लेखही खूप छान माहितीपुर्ण.
वाचायला सुरूवात केली आहे
वाचायला सुरूवात केली आहे
मुखपृष्ठ मस्त आहे, पण its just a photograph! फोटो म्हणून सुंदर आहे. पण दिवाळी अंकाचे मुपृ म्हणून भावले नाही. वाचनाच्या मजकूराची टेम्प्लेट मस्त आहे. पार्श्वभूमी पांढरी ठेवून फेड होत जाणारे वेगवेगळे रंग.. पण हेडर्समध्ये वैविध्य हवे होते.. नॅव्हिगेशन छान आहे. वर चार थीम्स आणि डावीकडे विभागवार मांडणी.. ती आवडली.
कथाविभाग पूर्ण वाचला. रैना, टण्या, पेशवा आणि ललिताच्या कथा प्रचंड आवडल्या. एकसे एक आहेत. बढिया! प्रत्येकाची शैली निराळी आहे, तरीही अत्यंत प्रभावी मांडणी आणि कथा. फार आवडल्या. बालकथा गोड आहेत
'कॅटवॉक'- डायरी फॉर्म आणि कॉलेजचे दिवस- साजिरा can definitely do better than that!
'बळी'चा विषय मस्त आहे, पण थोडी लांबली असं वाटलं.
अर्भाट, डिटेल आणि मस्त लेख.
मामींचा लेख, विथ मामी टच आवडला.
बाकी, अजून वाचतेय.
दिवाळी अंक आवडला. मुखपृष्ठ
दिवाळी अंक आवडला. मुखपृष्ठ फारसं आवडलं नाही. पण अंकाच्या आतील प्रत्येक पान नेत्रसुखद झालं आहे. प्रत्येक संकल्पनेतली हेडरमध्ये असलेली चित्रे खूप आवडली. हेडरला चार संकल्पना आणि डाव्या समासात विभागवार मांडणी हेही खूप आवडलं. त्यामुळे नॅव्हिगेशन सोपं झालं आहे.
संपूर्ण संपादक मंडळाचं अभिनंदन. दिवाळी अंकासाठी घेतलेल्या कष्टांबद्दल त्यांची पाठ दुखेपर्यंत शाबासकी!!
आता अंक सावकाशीने वाचून अभिप्राय देणार.
अभिप्रायांबद्दल पुन्हा एकदा
अभिप्रायांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
अंकाच्या पीडीएफबद्दल काहींनी विचारणा केली आहे. तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की लवकरच अंकाची पीडीएफ आवृत्ती उपलब्ध करून देण्यात येईल.
अंक आवडला. संपादक मंडळ आणि
अंक आवडला. संपादक मंडळ आणि इतर सहकलाकारांचे अभिनंदन. धन्यवाद छान अंक दिल्याबद्दल.
अविष्कार वाचून काढलं.
केल्याने देशाटन आवडलं.
योगेशची निसर्गशिल्प मस्तच
दीपांजलीचं मेहंदी सजते लाकडावरही ग्रेट. सही आयडीया.
रांगोळी सुलेखन फारफार आवडले. आजोबांना नक्की सांगा. व्यक्तीचित्रेही आवडली खास्करून दिलिप प्रभावळकर आणि अभिनेत्री.
धनश्रीचं स्पंदनही छान अजून लिहिलं असतं तरी चाललं असतं.
मिनोतीने कसूती मस्त शिकवलीये. फोटो ..डीटेलिंग सहीये.
शामलीची कवितेचे देणे अजून नाही ऐकली. आणि ह्यावर्षी दिवाळी अंकात कविता दिसल्याच नाहीत की मला सापडल्या नाहीत
प्रकाशवाटा आवडलं ! अल्पनाचा नियोजन कशाशी खातात लेख चांगला आहे. बरीच नविन माहिती मिळाली.
मराठी वेबसाईट्स.. अभिनंदन प्रसाद !
सुगंधाचे विश्व अप्रतीम ! एकदम गंधीत करून टाकलं. आणि एका वेगळ्या क्षेत्राची माहिती मिळाली. मामींची अजुन माहिती मिळाल्यास आवडेल वाचायला.
कला आणि जाणिवा वाचायला वेळ लागेल.
मिलिंद मुळीक ह्यांच्यावरचा लेख छान. अरभाटाचा 'रिलेट' होण्याबद्दलचा लेख फारच सुंदर विवेचन !
अजुन बाकी खूप आहे !
अजुन खुप वाचायचंय..
दिवाळी अंक पाहिला.चाळला.
दिवाळी अंक पाहिला.चाळला. वाचायला सुरुवात केली.
मुखपृष्ठानेच उत्कंठा वाढली पाहिजे तसे झाले नाही. मुळात या चित्राचे या दिवाळी अंकावर असण्याचे प्रयोजन काय हाच विचार सुरु झाला. संपादकीय वाचनीय. त्यात असणारे सूरही अत्यंत तरल, सुरेल!
चार संकल्पनांवर आधारित दिवाळी अंक ही कल्पना नवीन होती ती यशस्वीपणे साकार केल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन. पण चारही संकल्पनांसाठी इतके समर्पक साहित्य असताना पुन्हा डावीकडे शब्दलिपी, कथाशिल्प विचारगर्भातून असे विभाग करुन त्यात उभ्या नॅव्हिगेशनमधले साहित्य पुन्हा का आहे हे नाही कळाले. त्यामुळे 'चार संकल्पनांवर आधारित दिवाळी अंक' हे ठसत नाही. रंगसंगती आल्हाददायक.
'रंग उमलत्या मनाचे' वाचायला घेतले. साजिर्याची 'कॅटवॉक' खास त्याच्या शैलीत. 'आज दिनांक' ची आठवण झाल्यावाचून राहावत नाही. तो डायरी लिहिणारा नायकच इथे प्रत्यक्ष दिसत राहतो. आकांत पुन्हा पुन्हा हवा असण्याची जाणीव कित्येकदा झालेली लख्खकन जाणवलं. कथेचा गाभा वर लिहिण्याची कल्पना सुंदरच! साजिर्याच्या त्या पॅराबद्दल काय बोलावे! लिहीत रहा! रैनाची अनिकेत, अश्वत्थ सुरेख!! काही काही जाणीवा इतक्या सुंदर व्यक्त झाल्यात की बस्स! लाटांची आदत से मजबूर लपलप, चंद्राची तलखी, वार्यानं चंद्र फटकारला जाणं.. आहाच! टण्याची कृष्णविवर. समर्पक शीर्षक! ती तगमग, कासावीशी खास उतरलीये. अनंत ध्येयासक्ती(चिनूक्सने दिलेली मनोगते पाहिली, वाचली नाहीत अजून.) आणि सचिनसारखी (वाचायचंय.) असाधारण व्यक्तिमत्वे वगळल्यास हल्लीच्या मनाच्या उमलत्या रंगांत फक्त वांझोटा संताप, जगावरचा राग, वैफल्यग्रस्तता, काहीच न बदलता येण्यानं येणारी कार्यशून्यता एवढंच उमटतं का? असाही प्रश्न पडला.
पूनमचं संगीत कट्यार काळजात घुसली आवडलं. ओघवतं आणि हलकंफुलकं. आता हे नाटक पाहायची उत्सुकता लागली.
रांगोळीचे सुलेखन अत्यंत कलाकारी! या वयातही इतक्या वळणार्या बोटांचा हेवा वाटला!
डिजेची मेंदी अ प्र ति म!
कथांमधे दिसणारी चित्रे किती सुंदर आहेत!
अश्विनीमामींचे 'विश्व सुगंधाचे' दरवळत राहणार मनात! ही माहिती खास दिवाळीचं औचित्य साधून दिल्याबद्दल धन्यवाद अमा!
अरभाटाचा लेख वाचून एकच जाणीव उरली - अजून खूप बाकी आहे! अजून खूप बाकी आहे!!
पेशवाची मिथक, कविता नवरेची वटवृक्ष आणि गवत तसेच स्मिताकेची सात पर्यांची कहाणी वाचल्या. आवडल्या.
अनंत अमुची ध्येयासक्ती मध्ये चिनूक्सने केलेली प्रस्तावना मनोगतांइतकीच प्रभावी, प्रेरणादायी. अजित जोशी, तेजस्विनी वाचून झाले. हॅट्स ऑफ! वीणा जामकरचे मनोगतही व्यवस्थित.
टण्याचे चांगदेव चातुष्टय अभ्यासपूर्ण. अतिशय आवडले.
दिवाळी अंक थोडाफार वाचला.
दिवाळी अंक थोडाफार वाचला. मुखपृष्ठावरील फोटो खूप आवडला... पण ह्या वर्षी निसर्ग अशी थीम होती ना? मग एखादे निसर्गचित्रही चालून गेले असते, असे वाटले, पण फोटो म्हणून सह्हीच आहे.
अजय पाटील, चंदन, योगेश२४, धनश्री पेंडसे ह्यां सगळ्यांच्याच कलाकृती सुरेख आहेत. खूप आवडल्या!
मनाकु ह्यांनी काढलेली व्यक्तीचित्रेही सुरेख. मिनोती, डीजे, हिमस्कूल ह्यांच्या कलाकृतींचे व्हिडिओज् अजून पहायचे आहेत. झेलम आणि श्यामलीचे ऑडिओ पण ऐकायचे आहेत अजून.
नंदनने नेहमीप्रमाणे सुरेख लिहिलं आहे. नीरजाने बास्कियाबद्दल लिहिलेल्या लेखामुळे मागे एकदा ह्याच्याबद्दल वाचले होते ते पुन्हा एकदा आठवले. लेखामध्ये नीरजाने लिहिलेय की "हा लेख म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्याची भलावण नव्हे. हा लेख म्हणजे ह्या प्रकारची कलाच श्रेष्ठ, असं काही पटवण्याचा अट्टहासही नव्हे." >>
हे तर ठीकच, तरीही कलाप्रवाहात किती प्रयोग होतात, आणि प्रत्येकाच्या कलाजाणिवा किती वेगवेगळ्या असतात, हे, ह्या लेखामुळे लक्षात येते, हेही चांगलेच आहे की! ग्रेसची कविता हा लेख फारच संक्षिप्त वाटला. थोडे अजून लिहायचे होतेस की देवा
गिरिश कुलकर्णींचा लेखही सुरेख!
कथाविभाग ठीकठाक. सगळ्या कथा चांगल्या आहेत. कविता विभागाची उणीव जाणवली. शब्दलिपी ह्या विभागातील सर्वात आवडलेला लेख म्हणजे गंगेच्या काठी! फार सुरेख, मनापासून लिहिलेलं आहे आणि खूप आवडलं. 'कोलाहलाचा रंगीत कोलाज' हा लेख मात्र सुरु होता होताच संपला! संवादमधील सागरपरिक्रमा ही मुलाखत वाचून झालीये, आणि आवडली.
बाकीचं अजून वाचून, पाहून आणि ऐकून व्हायचय. एकूणात अंक मस्तच आहे!
सजावट आणि मांडणी खुपच छान
सजावट आणि मांडणी खुपच छान आहे.
आत्ताच वाचायला घेतला आहे. रोज २-३ तरी लेख वाचण्याचा विचार आहे.
व्वा व्वा दिवाळी अंक नुसता
व्वा व्वा दिवाळी अंक नुसता चाळला .. सजावट, रंगसंगती, मांडणी सुरेख... संपादकीय वरचे गाणे पण मस्त...
कविता विभाग नाही हे बघून वाईट वाटले ...
बाकी प्रतीक्रिया अंक वाचून झाल्यावर
एवढा देखणा अंक दिल्याबद्दल संपादक मंडळ आणि त्यांना मदत करणार्या सर्वांनाच खूप धन्यवाद
अंकात एवढे लिखाण आहे ते बघूनच माबोकरांना गरगरल्यासारखे होईल असे संपादकांना वाटले असेल म्हणून तसे मुखपृष्ठ असेल
अंकात एवढे लिखाण आहे ते बघूनच
अंकात एवढे लिखाण आहे ते बघूनच माबोकरांना गरगरल्यासारखे होईल असे संपादकांना वाटले असेल म्हणून तसे मुखपृष्ठ असेल >>:हाहा:
मला तो फोटो दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणून नाही आवडला.
अंकात एवढे लिखाण आहे ते बघूनच
अंकात एवढे लिखाण आहे ते बघूनच माबोकरांना गरगरल्यासारखे होईल असे संपादकांना वाटले असेल म्हणून तसे मुखपृष्ठ असेल >>>
मिल्या येड्या ('येड्या हे मैत्रीमध्ये), इतकी जबरा कॉमेन्ट आली नव्हती!
हा हा हा हा!
-'बेफिकीर'!
निसर्गायण मधे सावलीनी सादर
निसर्गायण मधे सावलीनी सादर केलेली फोटो मालिका, चन्दन , अजय यांचं कम पण सुंदर :).
स्मिताच्या 'सात पर्यांची गोष्ट' अतिशय क्युट :).
हिम्स्कुल,
आजोबांनी रेखाटलेलं ' रांगोळी सुलेखन' फार सुंदर !
मस्त आहे अंक एकदम. संपादक
मस्त आहे अंक एकदम. संपादक मंडळाचे अभिनंदन.. आत्तापर्यंत फक्त श्र चा कला आणि नकला लेख वाचून झाला आहे. खूप आवडला. आणि दीप्स चा व्हिडीओ. अप्रतिम आहे दिप्स .. तुझ्या आयडीया एकदम मस्त असतात
आणि हो रांगोळी सुलेखन अप्रतिम..
थँक्स रचना आणि इतर सर्व
थँक्स रचना आणि इतर सर्व प्रतिसादांना !
व्हिडिओची क्वालीटी साध्या कॅमेरानी शुट केल्यामुळे मनासारखी झाली नाहीये , पुढच्या वेळी चांगल्या व्हिडिओ कॅमॅरानी शुटिंग करून घेण्याची काळजी नक्की घेइन :).
व्हिडिओ एडिटींग, स्टिच याचे सहकार्य केल्या बद्दल संपादक मंडळाचे आणि दिवाळी अंकासाठी मदत केलेल्या सर्वांचे आभार.
फक्त व्हिडिओ थोडा उभा स्ट्रेच झाल्या सारखा वाटतोय का ?
( कदाचित फुल स्क्रिन करून बघताना मला वाटला असु शकेल.)
आत्तापर्यंत जितके वाचले त्यात
आत्तापर्यंत जितके वाचले त्यात पेशवाचे मिथक आवडले. जबरदस्त एकदम!!
यात विनोद का नाही ?? हे भाजीत
यात विनोद का नाही ?? हे भाजीत मिठ नसल्यासारखे वाटते
avdhut, तोच तर मोठा विनोद
avdhut, तोच तर मोठा विनोद आहे. तुम्ही झाडं पाहतांना जंगलाला विसरता आहात.
मुखपृष्ठ फोटो म्हणून खूप
मुखपृष्ठ फोटो म्हणून खूप आवडला!
अंकात एकही कविता नाही?
बाकी प्रचंड आवडावं असं या अंकात काहीच भेटलं नाही.
सगळ्या फोटो आणि चित्रमालिका
सगळ्या फोटो आणि चित्रमालिका आवडल्या.
फोटो वगैरे मलाही आवडले सगळेच.
फोटो वगैरे मलाही आवडले सगळेच. बाकी पिकासो, ग्रेस वगैरे मंडळींशी काही देणंघेणं नाही तेव्हा वाचायच्या फंदात पडणार नाही.
फोटो आणि चित्रमालिका सुपर्ब
फोटो आणि चित्रमालिका सुपर्ब आहेत !
जोरदार झाला आहे दिवाळी
जोरदार झाला आहे दिवाळी अंक.
वाचून होईल तसं लिहीनच.
चाळताना..हे बघू की ते बघू झाले होते !
एवढ्या सुंदर अंकाबद्दल संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!
खूप मस्त वाटतोय अंक. आत्ता
खूप मस्त वाटतोय अंक.
आत्ता चाळला, आता निवांत वाचून प्रतिक्रिया देते.
छान आहे अंक. वाचला नाही आणि
छान आहे अंक. वाचला नाही आणि पूर्ण वाचेनच अशी शाश्वती नाही, प्रयत्न असेल.
संपादक आणि सर्व स्वयंसेवक आणि लेखकांचे अभिनंदन !
सहज चाळला. मांडणी वेगळी आहे.
कविता कुठे दिसल्या नाहीत. नाहियेत की मला सापडल्या नाहीत?
पेशव्याची कथा खूप आवडली.
पेशव्याची कथा खूप आवडली. अजयबरोबर आपणपण हेलकावे खात राहतो. शिर्षकासह अत्त्युत्तम!
खरं सांगायचं तर दरवेळी दिवाळी
खरं सांगायचं तर दरवेळी दिवाळी अंकावर इतकी मेहनत घेतात सर्व कार्यकर्ते पण वाचक मंडळी फक्त आम्ही चाळला इतपत प्रतिक्रिया देतात आणि एक दोन लेख वाचतात. अंकाचे फार असे चीज होतचं नाही.
Pages