हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

कॅटवाक .... साजिरा जबरी रे
सचिन तेंडुलकरवरचा लेख त्याच्या स्ट्रेट ड्राईव्ह सारखा......
योगेश २४ च्या कॅमेरातला निसर्ग अफलातुन.....
पक्क्या भटक्या .... तु भेट कधीतरी.....
पाटीलसाहेब जलरंग क्लासच.....
चंदन ... जिओ यार.....मस्तच.

बाकीच्या फराळालावर पण ताव मारायचाय ... खुप भुक लागलीय.

मला तर मुखपृष्ठ लईच आवडलं. त्यातील वस्तूंचं टेक्स्चर व मांडणी सुंदर<<<<
अगदी अगदी...
मला एकूणच साधेपणा लय म्हणजे लयच आवल्डाय!! त्यामुळे मॅटरकडे जास्त लक्ष देता येतंय. Happy

शंतनू यांचा लेहच्या ढगफुटीवरचा लेख मस्त. ढगफुटीबद्दल माहिती, स्वानुभव आणि ढगफुटीच्या अनुषंगाने येणारा वेगवेगळ्या साच्यातला मानवी स्वभावाचा प्रत्यय... करेक्टेय!!

श्र चा कला आणि 'न'कला लेख उत्तम. आर्ट फोर्जरीची संकल्पना छान समजावून सांगितली आहेस. आणि त्याबद्दल असणारे अ‍ॅन्टी व प्रो दोन्ही प्रकारचे मतप्रवाहही छान विषद केलेयस.

सागरपरीक्रमा मधली चिनूक्सने घेतलेली मुलाखत आणि कृष्णमेघ कुंटेची मुलाखत वाचल्या. छान झाल्या आहेत. सागरपरीक्रमा मुलाखत खूप आवडली.

सगळी रखाटनं मस्त आहेत. लेहलडाख, कॅटवॉक वाचलं. आवडलं. आता उद्या वाचेन अजून काही आणि प्रतिक्रिया देईन.

अंक बघितला .. छान वाटतो आहे .. संपादक मंडळाचे आभार आणि शुभेच्छा!

आधी नमूद केल्याप्रमाणे अंकातलं browsing खूपच सुलभ आहे त्याबद्दल स्पेशल धन्यवाद!

ज्याच्याशी मी रिलेट होऊ शकत नाही, ते शोधत राहणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. ते जे काही आहे ते स्वतःला आवडणे महत्त्वाचे नाही. 'स्वतः' हा प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी केंद्रस्थानी नसावा. खरेतर तो बहुतेक वेळा नसतोच, पण आपण ते मान्य करत नाही. ज्यात 'मी' दिसत नाही, असे आरसे शोधावेत. सतत आरशासमोर उभे राहणे, हे कुठल्याच मानवी संस्कृतीत प्रगल्भतेचे लक्षण मानले जात नाही. असे स्वतःच्याच रुपाच्या प्रेमात पडण्याचा कोणत्याच मानवी समाजाने पुरस्कार केलेला नाही. मग आयुष्यात इतरत्र तरी स्वतःचीच प्रतिबिंबे का शोधावीत?

'द इंटरनॅशनल' या चित्रपटातली एक व्यक्तिरेखा दुसर्‍या व्यक्तिरेखेला म्हणते, 'Well, this is the difference between truth and fiction. Fiction has to make sense'. मानवी स्वभावाची गंमतच ही की, आपल्याला अज्ञात प्रदेशसुद्धा पूर्णपणे अज्ञात चालत नाहीत. अगदी कल्पनेतसुद्धा. कल्पनाशक्तीला जाणिवांचे जोखड आणि जाणिवांना कल्पनाशक्तीची वेसण अशी आपली अवस्था... स्वतःचेच शेपूट गिळणार्‍या सर्पासारखी. जाणिवा-कल्पनाशक्ती-प्रातिभविचार यांचे अनादि-अनंत चक्र आणि त्या चक्राच्या नाभीपाशी होणारे सृजन यांचे कोडे अवघड आहे खरे, पण ते सोडवायचा प्रयत्न का करावा? प्रयत्न एकच असावा, स्वतःशी 'अनरिलेटेड' गोष्टी शोधण्याचा. स्वतःला ताणण्याचा. ते अनादि-अनंत चक्र सतत वाढवत नेण्याचा. त्या जगड्व्याळ चक्रावर फक्त फिरत राहण्यातून जो आनंद मिळतो, तोच इतका समृद्ध करणारा आहे की, खुद्द सृजनदेखील साध्य न होता, साधन होते.. स्वत:च्या समृद्धीकरणाचे.

सिंप्ली ग्रेट... आरभाट... अफाट...!!!! खुप खुप आभार...

मिलिंद'रंग बेस्ट आहे. फार सुंदर चित्रे, असा कलाकाराची ओळख करुन दिल्या बद्दल खुप आभार,

रांगोळी सुलेखन - फार सुंदर व्हिडीओ मस्त, आजोबांना नमस्कार कळव...

सेमो म्हणे! - ह्य कले बद्दल अजुन माहीती हवी होती, चित्रांमध्ये येवढ काय ग्रेट आहे हे कळण्यासाठी मी फाअर खुजा आहे.

मेंदी सजते ... लाकडावरही ! - फारच सुंदर... कक्षा मोडुन तेच पण वगळं करण्याची जिद्द...
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे - अरभाट नी दिलेल्या विंदाच्या ओळी तुमच्यासाठीच...

कवितेचे देणे -- श्यमली खासच .. मस्त..पुन्हा पुन्हा ऐकणार

'कट्यार काळजात घुसली' - सुरवात फार घाई घाईत झाल्या सारखी वाटते आहे, खुप सांगायचा आहे कधी एकदा सांगुन होतय अस वाटत आहे. त्यामुळे मार खाल्ला, पण शेवट हळुवार आणि छान आहे.

'सोनी' कुडी - छान वेगळा विषय छान मांडणी, दिप्तीला शुभेच्छा!!!

ग्रेसची कविता - नाही आवडला, ग्रेस वरचे सगळे लेख आणि प्रतिक्रिया ह्या अशाच असतात. तेच तेच्...आहे, लेख का लिहीला, " मी ग्रेसचा चाहता आहे" हे सांगण्यासाठी?

ग्रेसचे काही चाहते " मी ग्रेसचा चाहता आहे" हे ठणकावून सांगण्या साठीच चाहते असतात, असं मला वाटत. एखादी कविता ऐकवायची मग विचारायच,
"कशी वाटली?"
"नाही कळाली?"
"अरे काय? तुला नाही झेपणार ग्रेस, त्याला क्लास लागतो"
मग समजवुन सांगा..
"हाच तर प्रॉब्लेम आहे तुम्हा लोकांचा. ग्रेसच्या कवितांमध्ये अनुभुती असते. समजवुन सांगायच्या पलिकडे असतात त्या" (ह्यांच्याही समजण्याच्या पलिकडे असतात त्या, कुठली अनुभुती? माहित नाही. माहित नसलेली अनुभुती कशी असते हे मला माहीत नाही.)
(समोरच्याच्या बुद्धीची किव करुन)" तरीही सांगतो ... .... असा असा... काहीसा अर्थ आहे, मला पण नक्की माहित नाही . पण काय शब्द.. काय गहन अर्थ (न कळलेला)"
मग समोरच्याला कळतं, की कोणालाचा नक्की काय ते न कळणं यालाच "अनुभूती" म्हणतात. मग तोही चाहता, मग तो दुसर्‍याला विचारतो, "काय कशी वाटली?" पुढे चालू...

ग्रेसची एखादी कळलेल्या कवितेचं (समजवून घेतलेल्या कवितेच) रसग्रहण का करत नाही कोणी?
ग्रेसची प्रत्येक कविता आणि त्यातिल प्रत्येक शद्ब हा त्यांनी पुर्ण विचार करुनच लिहीलेली असतो हे त्यानी दिलेल्या मुलखती ऐकल्यावर कळत. पण तथाकथित चाहते ग्रेसच्या कवितांवर आणि ग्रेस वर "दुर्बोध" शिक्का मारुन अनुभुती द्यायला, घ्यायला मोकळे.

देव "पर्सनली घेउ नका" पण ग्रेस आणि त्यांच्या कवितांवर तेच तेच वाचुन आणि ऐकुन कंटाळा आला. तुमचा लेख हा फक्त निमित्त.
<--
ग्रेसच्या कवितेतली आशयघनता ही माझ्या मते पूर्णपणे चाहत्यांच्या रसिकतेवर किंवा त्यांच्या ग्रेसच्या कवितेबद्दलच्या समजेवर अवलंबून आहे.

जाता जाता मला एका ब्लॉगवर वाचलेली मर्ढेकरांची एक ओळ आठवली. 'जर तुम्हांला कविता कळली नसेल तर ती तुमच्यासाठी नाहीये'. त्यामुळे जर का कुणाला ग्रेसची कविता कळत नसेल तर ती त्याच्यासाठी नाहीये, असं समजावं आणि त्या कवितेला किंवा स्वतःच्या बुद्धीला दोष न देता फक्त त्या कवितेतल्या शब्दांचा आनंद घ्यावा आणि पुढे जावं. --> इथे गाडी रुळ तोडुन सुटली,

तुम्हीच अर्थ सांगताय वर तुम्हीच सल्ला देताय.
"अजून एक मित्रत्त्वाचा सल्ला - ग्रेसची कविता कुणाकडूनही समजावून घेण्याचा प्रयत्न करू नका." इथे शेतात घुसली. असच आहे तर येवढा मोठा लेख लिहीणाचे आणि आम्हा वाचणार्‍यांचे कष्ट फुकट.

अंक वाचनिय आहे. ते मुखपृष्ठ काही झेपल नाही, म्हणजे थिमशी जोडता नाही आलं. कुणी समजवून सांगितलत तर बरं होईल. बाकी फोटो म्हणुन छानच आहे.

संपादकांचे, कार्यकारी मंडळाचे, प्रसासनाचे आणि सर्व कलाकांरांचे खुप खुप आभार.

ऋयामचा सोनी कुडी वाचला. आवडला. जपानी भाषा शिकुन त्यात अभियांत्रिकी शिक्षण घेणे सोपी गोष्ट नाही. दिप्तीला शुभेच्छा.

टण्याचं कृष्णविवर वाचलं. भारी लिहिलंय. त्यातल्या निलेशची अवस्था वाचून हबकून जायला होतं. मधे मधे शिव्यांचा भडीमार आहे पण मला वाटतं मनातले विस्फोट/ उद्रेक / उद्वेग बाहेर पडतानाची क्रिया आहे ती. त्या शिव्यांना या ठिकाणी शब्दशः अर्थ काहिच नाहिये.

अंक छान दिसतो आहे (audio-video-slides, menus are professionally done)

कथा वाचल्या. सगळ्या सफाईदार झाल्या आहेत. सोबतच्या चित्रांसहीत.

'बळी' थोडी निराशावादी पण त्याचवेळी वास्तववादी पण आहे. आवडली. काही शब्दांच्या व्याख्या देता आल्या असत्या तर बरे झाले असते. एकांगी नाही पण किंचीत ब्लॅक अँड व्हाईट वाटली. तोच उद्देश असेल तर साध्य झाला आहे.

ग्रंथस्नेहची कल्पना उत्तम (पण ती यादी इतर साहित्यात थोडी लपल्यासारखी वाटते आहे). त्यातील (निदान काही) पुस्तकांमधील १-२ उतारे कुठे देता आले तर उत्तम होईल.

दिवाळी अंका संबंधीत सर्वांचं अभिनंदन! कार्यकारी मंडळाची मेहेनत दिसतेच आहे पण सत्यजित म्हणतो तसेच माझेही झाले:
>>मुखपृष्ठ काही झेपल नाही, म्हणजे थिमशी जोडता नाही आलं. कुणी समजवून सांगितलत तर बरं होईल. बाकी फोटो म्हणुन छानच आहे.

विशेषतः चार वेगळ्या थिम्स घेतल्या असताना शिवाय डावीकडे "शब्दलिपी", "विचारगर्भातून" वगैरे द्यायचे प्रयोजन काय? ऊ.दा: "सचिन रमेश तेडुलकर" हा लेख शब्दलिपी या मध्ये शिवाय रंग ऊमलत्या मनाचे यामध्येही दिसतो. फरक काय? आणि शब्दलिपी, विचार्गर्भातून वगैरे शीर्षकातून काहीच नक्की convey होत नाही, त्यापेक्षा कथा/कविता/ललित इतकं साधं नेहेमीचं वर्गीकरणही योग्य ठरलं असतं असं वाटतं... शिवाय मुखपृष्ट डिझाईन मध्ये वरती ते तबला, पॅलेट, नर्तकी, वगैरे देण्याचं विशेष प्रयोजनही नाही कळलं. त्याने अंकाचे सौंदर्य विशेष वाढत आहे असे मला तरी वाटत नाही. दिवाळी अंक आहे तर काही खास दिवाळी स्पेशल jpegs टाकता आले असते निश्चित? थोडक्यात अरभाट च्या भाषेत "मी रिलेट करू शकलो नाही" Happy

असो. सर्व लेख वाचन चालू आहे.. जमेल तसे ईथे अभिप्राय लिहीन म्हणतो.
तूर्तास वाचलेलं:
मिथकः आवडली
SRT: सचिन्/साहेब आवडतात तेव्हा या लेखात तितकी नविन मजा विशेष नाही तरी लेख आवडला Happy
सेमो म्हणे: या चित्रांमध्ये काहिच विशेष दिसत नाही अन त्यातून मुद्द्दाम वेगळे अर्थ किंव्वा गूढ काहीतरी शोधून काढायचा प्रयत्न करणे अजीबात झेपले नाही. लेख लिहीण्यातील मेहेनत कौतुकास्पद आहे पण "मुद्दा" पोचत नाही.
मिलिंद रंगः उत्कृष्ट
ग्रेसची कविता: ह्म्म्म्म्म... अर्धा लेख आवडला पण ग्रेस अन त्यांच्या कविता हा विषय निव्वळ धावते समालोचन करून श्रोत्यांपर्यंत त्यांचे/त्यांच्या कवितांचे अनेक गुण पोचवायचा- असा नाहीये.
मराठी वेब्साईट्स्चे दुकानः प्रसाद यांचे विचार अत्यंत प्रामाणिक असल्याने थेट भिडतात
तालब्ध्ध वाटचालः सुंदर माहितीपूर्ण लेख्/संवाद

>>>विशेषतः चार वेगळ्या थिम्स घेतल्या असताना शिवाय डावीकडे "शब्दलिपी", "विचारगर्भातून" वगैरे द्यायचे प्रयोजन काय?>>>
योगच्या या मुद्द्याला अनुमोदन. सुरवातीला अंक उघडला तेव्हा डावीकडच्या नी वरच्या कॅटेगरीत वेगळं काही असणारे असा गैरसमज झाला होता. (म्हणजे वाचायला भरपूर )

विशेषतः चार वेगळ्या थिम्स घेतल्या असताना शिवाय डावीकडे "शब्दलिपी", "विचारगर्भातून" वगैरे द्यायचे प्रयोजन काय?>>> ते एक मॅट्रिक्स आहे. क्रॉस रेफरन्स देता येतो. असे असेल बहुतेक.

देखणा अंक. सजावट, मांडणी, मुखपृष्ठ सगळच उत्तम Happy

मंजुडे, र्‍हिदमीक जिम्नॅस्टीक्स क्षेत्रातली मुलाखत खूप आवडली.

आता लेख, कथा, संवाद वाचते निवांतपणे.

दिवाळी अंक चाळला. छान आहे ह्यावेळचा अंक. सर्वप्रथम अंकाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद. सुरुवातीचा भोवर्‍याचा फोटो छान आहे.

आता आत्तापर्यंत जे काही वाचलेले आहे त्यावर:

ट्ण्याची कृष्णविवर कथा सुरेख आहे. अगदी मनापासून आवडली. ट्ण्याचे 'चांगदेव चतुष्टय'सुद्धा मस्त आहे. एखादे पुस्तक का आवडले हे सांगणे मला नेहमी अवघड वाटते, त्यामुळे असे पुस्तकं उलगडून दाखवणारे लेख आवडतात.

रैनाची कथाही छान आहे. आवडली. साजिर्‍याने लिहिलेले कॅटवॉकपण आवडले. पण त्याने 'डायरी' हा प्रकार पुन्हा वापरल्यामुळे थोडी निराशा झाली. पूर्वी त्याने ह्याच स्टाईलने मायबोलीवर लिहिलेले वाचले आहे.

अस्चिगने लिहिलेल्या 'नैसर्गिक भरार्‍या'चा सुरुवातीचा भाग जरा क्लिष्ट आहे, पण उत्तरार्ध छान जमला आहे. अरभाटने सुरेख लिहिले आहे. हा लेख मायबोलीवर आला असता तर त्याच्यावर उत्तम चर्चा झाली असती. जरा इतरांचे विचारही वाचायला मिळाले असते. 'कोलाहलाचा रंगीत कोलाज' हा लेख तर सुरु व्हायच्याआधीच संपतो असे वाटले. फारच संक्षिप्त लिहिले आहे. पिकासोची दोन चार चित्रे घेऊन त्यावर (लेखकाने स्वतःचे) परिक्षण लिहिले असते तर लेख जास्त छान झाला असता असे वाटले. नियोजनाचा अल्पना यांचा लेख चांगला आहे. चांगली ओळख करुन दिली आहे त्या क्षेत्राची.

तेंडुलकरवरचा केदारचा लेख छान आहे. विशेषतः चॅपेलबद्दल त्यात थोडेफार वाईट लिहिलेले वाचून सूक्ष्म आसुरी आनंद मिळाला. Proud

ग्रेसवरचा लेखही छोटा वाटला. अजून विस्ताराने लिहिलेले वाचायला छान वाटले असते. काही बाबतीत सत्यजितच्या पोष्टीला अनुमोदन. ते मर्ढेकरांचे आणि गुरुदेवांचे वाक्य तिथे द्यायचे प्रयोजन कळले नाही. उगीचच elitist विचारसरणीचे समर्थन केल्यासारखे वाटले.

'संकल्पनांवर आधारित' असा साचा नसला असता तरी ह्याच पद्धतीचे लेख आले असते. त्यामुळे संकल्पनांचा काही फरक पडला असे वाटत नाही. किंबहुना त्यामुळे वैविध्य कमी झाले असे वाटले. ह्यावेळी विनोदी लेखन दिसले नाही. 'संपादकीय'मध्ये लिहिल्याप्रमाणे पुढे जर एका संकल्पनेवर आधारित दिवाळी अंक निघाला तर कंटाळवाणा होऊ शकतो असे वाटले. पण नवीन प्रयोग करुन पाहण्याचा संपादक मंडळाचा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. Happy

बाकीचे वाचून झाले की पुन्हा प्रतिक्रिया लिहिणार. Happy

संवेदचा पिकासोची ओळख करून देणारा लेख वाचला. लेख वाचायला सुरु केला आणि लगे संपलाच. संपूर्ण रीसर्च पेपर न वाचता नुसते अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वाचायला मिळाल्यासारखे वाटले ते.
प्रसाद शिरचा मराठी वेबसाइट्स बद्दलचा लेख वाचला. प्रामाणिक वाटला. त्याच्याकडून खूप सार्‍या मराठी साइट्स घडोत.
सावलीची थेंबाचा प्रवास गोष्ट वाचली. गोऽड आहे. आणि त्यातली अंजलीने काढलेली चित्र तर एकदम जबऽरी आहेत.

आत्ताच चाळला अंक.. मस्त झालाय.. आता रवंथ करेन हळू हळू..
मेहनत जाणवतेय.. मस्त वाटलं अगदी..

अंक मस्त जमून आलाय. वाचनीय आणि सुश्राव्य दोन्ही..:)
कॅटवॉक, अश्वत्थ, मिथक, कृष्णविवर सगळं आवडलं. आविष्कार जबरी. अरभाटच्या लेखाशी रिलेट होऊ शकलो.
अभिनंदन सर्व मंडळींचं..:)

सत्यजित, मी लेखात कुठेच म्हंटलं नाहिये कि मी ग्रेसचा निस्सिम चाहता आहे किंवा ग्रेसच्या सगळ्या कविता मला कळतात. मी कधी कधी ग्रेसच्या कवितांशी रिलेट करू शकतो एवढंच म्हणतोय. मी फक्त ग्रेसच्या कवितेबद्दल मला काय वाटतं याच्याबद्दल लिहिलं आहे. आता ते तुम्ही स्विकारावं असंही मी म्हणत नाही. अरभाट म्हणाल्याप्रमाणे, "ज्याच्याशी मी रिलेट होऊ शकत नाही, ते शोधत राहणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. ते जे काही आहे ते स्वतःला आवडणे महत्त्वाचे नाही."
बाकी, तुमचे वाचनाचे कष्ट फुकट घालवल्याबद्दल क्षमस्व.

अंक आत्ताच बघितला..अतिशय सुंदर अन मन प्रसन्न करणारी मांडणी आहे..त्यामागचे कष्ट दिसून येतात. वाचून झाल्यावर परत प्रतिक्रिया देईनच. पण अशा अंकात स्थान दिल्याबद्दल संपादक मंडळाचे धन्यवाद

मुखपृष्ठावरचं सुंदर डिझाईन, डॉ. शितल आमटे यांनी लिहिलेला सुंदर लेख, मंजूडी यांनी लिहिलेलं एका वेगळ्याच विषयावरचं "The Rising - GYMNASTICA" सुंदर झालाय. श्यामलीची कविता, चंदनचे केल्याने देशाटन, पक्याचे दुर्गभ्रमण - राजगड, योग्याची फोटो मेजवानी, मंजीरी सोमण यांचा गुगली लेख .. पहिल्यांदा मिलिंद सोमण वरच लिहिलाय काय? Wink असच वाटलं. निसर्गायण अन नव्या वाटांमधले लिखाण विशेष आवडले.

सावली .. एका थेंबाची कथा मस्तच गं ..

विविध कलागुणांच्या अविष्काराने मायबोली कलाकार दिवाळी अंकावर छाप पाडून गेले, हे छापिलपणे नमुद करतो.

संपादक मंडळाचे, मायबोली अ‍ॅडमीनचे अन समस्त मायबोलीकरांचे आभार.

Pages