हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

सर्व संपादकांचे अनेक आभार! तसेच त्यांना सहाय्य करणार्‍या मुद्रणशोध, तांत्रिकी बाबी सांभाळणार्‍यांचेही आभार. माझ्या कथा व लेख, दोहोंत, एकेक शब्दावर संपादकांनी मेहेनत घेतली, योग्य बदल सुचवले त्यामुळेच त्या ह्या पातळीस तरी पोचल्या.
चिनूक्सने मुखपृष्ठांचा कोलाज करुन दिल्याबद्दल त्याचेही आभार मानतो.

नोकरीनिमित्ताने मला सप्टेंबरमध्ये बाहेर जावे लागले. हाताशी पुस्तके नव्हती. तेव्हा 'शोनू'ने चारही पुस्तके मला मागितल्या क्षणी कुरिअरने पाठवली. तिच्यामदतीशिवाय चतुष्टय पूर्ण करता आले नसते. आणि स्वाती आंबोळे, सायो, केदार, रैना ह्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चा-वादांतूनच मी बरेचसे मटेरिअल उचलले आहे. Happy

नेहमीप्रमाणेच चांगला अंक, चार थीम ना बर्‍यापैकी न्याय दिलाय.
काही ठिकाणी कला आणि करागीरी यात गल्लत झालेय असे मला वाटते.
वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे मधले-सागरपरिक्रमा आणि मराठी वेबसाईट्‌स्‌चे दुकान चालवताना तसेच 'सोनी' कुडी आवडले. सागरपरिक्रमा खास करुन आवडले कारण ही बातमी वाचताना त्याचे फार काही विषेश वाटले नव्हते, मात्र लेखात पुर्ण परिक्रमा आणि त्यामागचे परिश्रम पहिल्यांदाच जाणवले.

कला आणि जाणिवा- मधले फक्त 'मिलिंद'रंग वाचलेय.
मुलाखत चांगली झालीय. नविन माहिती फारशी नसली तरी येकंदरीत प्रश्नांची निवड उत्तम.
व्यक्तीश: मला अजुन काही प्रश्नांची उत्तर वाचायला आवडली असती उदा. त्यांचा कलरीस्ट त टोनलिस्ट प्रवास, त्यांनी अलिकडे केलेले अमुर्त कलाविश्कार ( त्यांचा यंदाच्या Moods N Minds - आर्ट्२डे ला झालेल्या शो मधली त्यांची चित्र आणि गेल्या वर्षी च्या आर्ट फ्युजन - नेहरु सेंटर मधली चित्र अमुर्त कले कडे झुकणारी होती) याबाबत वाचायला आवडले असते.
तसेच नेट सॅव्ही असलेले फार कमी चित्रकार आपल्याकडे आहेत त्यात त्यांचे नाव अग्रक्रमाने यायला हवे, ब्लॉगींग, फेसबुक , e- mentor कोर्स यातुन त्यानी नेट्चा वापर केलाय, त्यामुळे त्यांचा सोशल मीडीया बाबतचा अनुभवा बद्दल वाचयला आवडेल. मुलाखतकाराने पुन्हा भेटण्याचे मनात पक्के ठरवून आम्ही बाहेर पडलो असे लिहलेय म्हणजे या प्रश्नांची पुढे उत्तरे मीळायची शक्यता आहे Happy

निसर्गायण मधे जे वाचल्/पाहिले त्यात लेह-लडाख मधील ढगफुटी आणि रंगवूनी आसमंत जास्त आवडले.
रंग उमलल्या मनांचे मधली कृष्णविवर शेवट प्रेडीक्टेबल असुनही आवडली.
अजुन बराचसा अंक वाचयचाय, त्यावर पुन्हा प्रतिक्रीया लिहिन
आणि माझ्या पेंटींग्ज वरच्या अभिप्रायाबद्दल आभार.

या प्रश्नांची पुढे उत्तरे मीळायची शक्यता आहे >>>>>>> पाटील, तुमचं खरं आहे, अजून बरंच काही विचारायचं आहे, जाणून घ्यायचं आहे... परंतु, लेख किती लांबवावा हा मुद्दा डोक्यात असल्यामुळे विचारलेल्या इतर बर्‍याच गोष्टींना लेखात स्थान दिले गेले नाहीये... त्यांच्यातल्या नेट सॅव्ही चित्रकारावर एक वेगळा लेख होऊ शकेल Happy

बाकी, तुमची जलरंगातली चित्रे छान आहेत, तुमचे गुरू कोण??

अरभाट, विचार करायला लावणारा जबरदस्त लेख!

मुसंबाईची कथा चांगली आहे... अचानक संपल्यासारखी वाटते...

स्वप्ना_......, एका वेगळ्याच विश्वात घेवुन गेलीस गं Happy
मधुबाला हे एक सदैव आवडणारं, पुन्हा-पुन्हा पडावं वाटणारं असच स्वप्न आहे Happy

कविताची लघु (रुपक) कथाही आवडली. Happy

माबोकर मित्रांनो,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद...

हिदिअं मस्त आहे. संपादक मंडळ, धन्यवाद!
पूर्ण वाचला नाही अजून. जेवढ बघितलयं त्यात...
सगळ्या चित्रमालिका मस्तच! अमा, तुमचा लेख मस्त. शैली आणि माहिती दोन्ही छान!
चिनूक्स, तुमची "सागर परिक्रमा" छान!
'प्रकाशवाटा' पण आवडला.

रैनाची 'अनिकेत;अश्वत्थ' आवडली. त्यातले रेखाटनही चांगली वातावरणनिर्मिती करून जाते.
अरभाटचा लेख आवडला आणि पोचलाही. धावता वाटला.
साजिर्‍याची कथा पण वाचली. साजिराशैली नेहमीप्रमाणेच खास. पण पूनमच्या अभिप्रायाशी सहमत.
मिनोतीचा लेख, श्यामलीचे कवितेचे देणे आवडले. हिम्सच्या आजोबांचे रांगोळी सुलेखन आवडले.

आज अजून काही वाचले...
कृष्णविवर - भिडली.. एकदम भिडली रे, टण्या. डिप्रेशन... कृष्णंविवर खरं.

बागवासरी - दोनदा वाचली... अप्रतिम आहे.

ढगफुटी - शंतनू, वाचून अंगावर काटा आला. एकदम रारंगढांगची आठवण आली.

रंगवुनी आसमंत - सुवर्णं वृक्षांनी श्रीमंत लेख Happy . फोटो अप्रतिम.

सचीन - केदार, हा नक्कीच एक माहितीपूर्णं लेख आहे. सचीनबद्दल सच्चं प्रेम असल्याचा हा पुरावा.. नाहीतर कोण गोळा करेल ही अंकांची गिचमीड?

आजच्या लोकसत्ताच्या ’ठाणे वृत्तांत’ पुरवणीने आपल्या अंकाची माहिती प्रकाशित केली आहे. सोबत अंकाचं मुखपृष्ठही दिलं आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=115...

यावेळी वाचक छान प्रतिक्रिया नोंदवत आहेत. मी आत्ताच दिवाळी अंक पहिल्यांदा पाहिला. मामी तुझा लेख छान उतरला आहे.

छानच.

पैलतीराचा अंक ऐलतीरावर कौतुकप्राप्त झाला. खूप कष्ट घेतलेल्या संपादक मंडळाचं आणि साहित्यीकांचं अभिनंदन!

ट्ण्याची कथा आधी वाचली मग लागोपाठ रैना, साजिरा आणि पेशवाची, टन्याची कथा वाचुन डोक्याला मुंग्या आलेल्या असतानाच इतर कथा वाचल्या मुळे (काही संबंध नसताना) कदाचीत सगळ्या तशाच वाटल्या (मुड टिकुन राहीला), पण खरोखर मजा आला. पेशवाची कथा सोडता इतरही कथांना शेवट हवा होता, किंवा वाचत रहाव अस वाटणं हेच कथेच आणि लेखकाच आणि लेखिकेच कसब..!!!

गंगेच्या काठी - अप्रतिम लेख.. केवळ अप्रतिम. प्रिंट काढून घेऊन स्वस्थपणे पुन्हा वाचणारय.
राजगड - लेख, फोटो सुंदर आहेच... पण छत्रपतींची पालखी नाचवण्याचा फोटो बघितला आणि...सर्रकन अंगावर काटा आला...
मोटर्बाईकची सफर - मस्तचै. मोटरबाईकवरून एकदा का भटकण्याचा लुत्फं घेतला की कार-बीर एकदम फडतुस वाटायला लागतात... दुमतच नाही! ते फोटो कसले फंडु आलेत... "त्या" बाप-लेकाच्या नानाची...
सोनी-कुडी - नाव झक्कास.... घरापासून दूर वगैरे राहून अभ्यास-बिभ्यास काय्येक करावं लागलेलं नाही... त्यामुळे दिप्तीसारख्यांचं प्रच्चंड कौतुक वाटतं. मुलं किती हुशार आणि मेहनती सुद्धा. मिळवायचं म्हटलं की जे लागेल ते करायची, झटायची तयारी.... ये हुई ना बात!
सुंदर लेख.

भरघोस प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार.

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

अंकाची सजावट आणि मांडणी मस्तच आहे. संपादक मंडळाचे खूप खूप आभार. अजून सगळा वाचून झालेला नाही. ऋयामचा "सोनी कुडी" आवडला. रांगोळी सुलेखन अप्रतिम. ठिपक्यांची रांगोळी काढताना आमच्या नाकी नऊ येतात आणि आजोबा कसे झरझर काढत होते. कमालच! केल्याने देशाटन (जलरंग) ही खूप आवडलं. पाहिलेल्या ठिकाणांची अशी चित्रं काढता येण्याची कला असणं किती भाग्याचं आहे. केल्याने देशाटन (कॅमेरा) मधले सगळे फोटो छान आहेत पण मला ५, ६ आणि ८ विशेष आवडले.

सध्या निसर्गायण वाचतेय. त्यातले सात पर्‍यांची कहाणी, थेंबाचा प्रवास, वटवृक्ष आणि गवत आणि गंगेच्या काठी वाचून झालेत. फार आवडले. सगळ्या लेखक्/लेखिकांच्या प्रोफाईलची लिंक असती तर व्यक्तिगतरित्या कळवता आलं असतं असं वाटतंय. माझ्या लेखाबद्द्ल प्रतिक्रिया कळवलेल्यांचे आभार!

सागरपरिक्रमा एकदम छान व माहितीपूर्ण. त्यांच्या मोटिवेशन व साहसाला सलाम. म्हादेइ अगदी लाडकी आहे बोट. जाम आवड्ली. जे लोक खरे मोठे कार्य करतात ते किती संयत व कमी गाजावाजा करणारे असतात नाही का? त्या चौघांच्यातील बाँडिंग ची पण कल्पना येत आहे. उपकरणीकरण मंजे काय?

Pages