हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

सावलीची थेंबाचा प्रवास कथा आणि रंगवुनी आसमंत दोन्ही खूप आवडले. अंजलीची चित्रेही अगदी साजेशी.
डॉ. शीतल आमटेंचे प्रकाशवाटा अंतर्मुख करणारे. वाईनची कूळकथा आणि अश्विनीमामींचे ''विश्व सुगंधाचे'' हे लेखही आवडले. बाकी बरेच वाचायचे आहे. वाचत जाईन तसे अभिप्राय लिहीन. अंकाचे मुख्यपृष्ठ विलोभनीय. कर्णमधुर गायनाची साथसंगत सोनेपे सुहागा! Happy

अतिशय सुरेख अंक ! रंगसंगती, सुरुवातीची ऑडियो क्लिप, एकंदरीतच अंकाचा ले-आऊट खूप छान झाला आहे. डावीकडे साहित्यप्रकारांनुसार आणि वर संकल्पनांनुसार केलेली विभागणी आवडली. त्यामुळे अंक नेटका झाला आहे. संपादकमंडळ आणि इतरांनी अतिशय विचारपूर्वक बांधणी केली आहे हे जाणवत आहे. अंकासाठी हातभार लागलेल्या सर्वांचेच अभिनंदन Happy
सगळ्या विभागांवर नुसती नजर फिरवली. हे वाचू की ते असं झालं आहे. आता पुढचा अभिप्राय अंक वाचून झाल्यावर Happy

अतिशय नेटका आणि सुंदर अंक.
अंकातील विविध सदरे सहजगत्या शोधता, वाचता येतात. प्रभावी, आकर्षक आणि दर्जेदार असं अंकाच रूप आहे. छान वाटलं. कुठेही बटबटीतपणा जाणवला नाही.

एक गोष्ट मात्र फारच खटकते.
ती म्हणजे अनेक लेखकांची टोपणनांवे.
श्रेयनामावलीत देखील बरीच टोपणनांवे आढळली.
ही टोपणनावे अंकाच्या दर्जाला बाधक वाटतात.

एक तर महाजालावर माणसं एकमेकाला प्रत्यक्ष ओळखत असण्याची शक्यता कमी असते. त्यातून टोपणनांव, म्हणजे पारदर्शकता अधिकच कमी झाल्यासारखी वाटते. (काही प्रसिद्ध व्यक्ती देखील टोपण नांवं वापरतात हे जरी खर असलं तरी त्यांची खरी नांवे आपल्याला ठाऊक असतात.)
टोपणनांवाबरोबर खरं नांव देखील देण्यात यावे. खर नांव न देता टोपण नांव का वापरलं जातं यामामागची मानसिकता लक्षात येत नाही. प्रसिद्धी पराङमुखता हे कारण नक्कीच नसाव.

नांवात काय आहे असा युक्तीवाद केला गेल्यास तो फोल आहे.

विचार करा ...सदर पोस्ट, मी टोपण नावाने (खोट्या नावाने) केला असता तर वाचताना काय मत झालं असतं ? उल्हास भिडे या माझ्या खर्‍या नावाने पोस्ट न करता, 'क्षपणक' 'झोल्या' 'विक्षिप्त' 'निंबूस' 'दणकेबाज' 'बेपर्वा' 'संदिग्ध' 'चाचामी' 'मीमामा' 'अबक' 'उरा५२' 'मावळा' 'QWERTY' 'स्पष्टवक्ता' 'गोजिरा' 'विस्थापित'
असलं काहीतरी नांव वापरलं असतं तर ?
तर वाचकाला, टोपण नांवाबाबत मी घेतलेल्या आक्षेपापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात,
मी घेतलेल्या त्या नावाचा राग आला असता.

याबद्दल विचार केला जावा अशी, संपादक मंडळ आणि सल्लागार यांस नम्र विनंती.
प्रांजळ मत दिलं आहे. हा आगाऊपणा वाटल्यास क्षमा असावी.

सही झाला आहे अंक. मांडणी अगदी मस्त. मुसंबा आणि संपादक मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमीच ! त्यांनी घेतलेली मेहनत जाणवते. उत्तरोत्तर असाच दर्जेदार अंक मिळत राहावा.

पूर्ण नाव देण्याची सुचना मलाही योग्य वाटते. देता आले तर पाहावे. ऑफकोर्स द्यायलाच पाहिजे असे नाही, पण भिड्यांचा व वरही आधी आलेला मुद्दा ह्या बाबतीत योग्य वाटतो. मायबोलीवर आयडी एकमेकांना ओळखतात, पण दिवाळी अंक इतरही लोक आवर्जून वाचतात.

उत्तम अंक, हळूहळू वाचतो आहे, अश्विनीमामींचा लेख आवडला
पण दिवाळी अंक इतरही लोक आवर्जून वाचतात.>>> तसे तर नित्य माबो वाचणारे अनेक लोक आहेत, त्यांना कुठे 'खरे' लोक माहिती असतात?
भिड्यांचा मुद्दा मलातरी कळला नाही, तुम्ही आयडी काहीही घ्या, त्याने तुमच्या पोस्टच्या/लेखाच्या पर्सेपशनमधे काय फरक पडणार? तुमचा मुद्दा असंबद्ध, खोटा, इ. असेल आणि तुम्ही खर्‍या नावाने पोस्ट केलीत तरी प्रतिक्रिया विरोधाचीच येणार. तुमची पोस्ट, लेख, त्यातले विचार हीच तुमची सर्वात महत्वाची ओळख आहे.
असो, विषयांतर फार झाले.

मुखपृष्ठ सुरेख आहे, अतिशय आवडले. हितगुज नावाची कॅलीग्राफी पण सुंदर. अंक एकूण देखणा झालाय. संपादक मंडळाने अंक बनवण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत हे अंकाच्या "फील" वरून लक्षात येतय.

पण "लेख" या एकाच साहित्य प्रकाराची "भरमार" झाली आहे. नुसती माहिती माहिती माहिती!
अंकाची थीम "दुसर्‍या कलाकारांवर किंवा त्यांच्या कलेवर लिहिलेले साहित्य" अशी आहे की काय असे वाटावे!!
(तसेच फक्त थीम वरचेच साहित्य स्विकारल्यामुळे उत्स्फुर्त लिखाण नाहीये असे वाटते आहे. पुढच्या वर्षी थीम असली तरी त्याचा एक विभाग ठेवून ईतर साहित्य पण स्विकारले जाईल ही अपेक्षा आहे.)

संपादक मंडळाचं आणि मदत समितीचं अभिनंदन , कव्हर एकदम प्रोफेशनल दिसतय.
बाकी अभिप्राय निवान्त वाचून देते :).

सुंदर आहे अंक...निवांतपणे वाचायला हवा..मांडणी फारच आकर्षक आहे...संपादक मंडळाचे आणि लेखकांचे खास अभिनंदन!

अभिप्रायांबद्दल सर्वांना धन्यवाद.

दिनेशदा,
आपण दिवाळी अंक Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolutionमधे पाहील्यास आपल्या बर्‍याचश्या शंकांचे आपोआप निरसन होईल. (हे या धाग्यावर सुरूवातीलाही नमूद केलेले आहे.)
तसेच, आपण निदर्शनास आणलेली लेखक/लेखिकांची नावे म्हणजे त्या त्या व्यक्तींचे मायबोली-आयडी आहेत. ते अंकात त्या प्रकारे येणेच अपेक्षित आहेत.
कृष्णमेघ यांच्यासंबंधीचा लेख हा एक 'दिवाळी संवाद' आहे. संवादांचे शब्दांकन करताना नेहमी प्रथमपुरुषी सर्वनामेच वापरली जातात.

सावली,
हा धागा खास दिवाळी अंकावरील अभिप्रायांसाठीच सुरू केलेला आहे. आपण आपले अभिप्राय इथेच देऊ शकता. म्हणजे सर्वांनाच ते वाचता येतील.

कमां. दिलीप दोंदेंना सलाम. त्यांच्याबद्दल आधीही वाचले आहे पण इथे वाचायला मजाच आली. अभिलाष टोमीला एकल प्रदक्षिणेसाठी शुभेच्छा!
मुलाखत चांगली झाली आहे.

अजय चित्र जबरी आली आहेत.

आभार संपादक, आवर्जून दखल घेतल्याबद्दल. (कृष्णमेघ यांच्यावरच्या लेखाच्या फक्त शीर्षकाबद्दलच मी मत मांडले होते )
बाकी आयडींच्या नावाबाबत इथे उलट सुलट चर्चा झालीय. मला आठवतेय, पुर्वी मायबोली दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रिया देणार्‍यांचे पण खरे नाव इथे दिसत असे.

मुखपृष्ठ उत्तम आहे, पण त्यात एक तांत्रिक चूक आहे असे वाटतेय. तो दोरा जर भोवर्‍याला गुंडाळण्यासाठी वापरायचा असला, तर त्याच्या एका टोकाला गाठ हवी (दोन बोटात धरण्यासाठी).
ज्या लोकांनी लहानपणी भोवरे फिरवले आहेत, त्यांनी मत द्यावे.

बाकि बहुतेक अंक वाचून झाला. लेह लडाखचा अनुभव, अंगावर शहारा आणणारा.

ऊमा चा लेख पण वाचनीय. (पण यापेक्षा अस्वलाचा वेगळा विपरीत अनुभव आलेला, एक चित्रपट आला होता, असे वाचल्याचे आठवतेय.)

आमटे कुटुंबांबद्द्ल काय लिहावे ? अश्विनीचा लेख उत्तम. तिच्याकडे माहितीचा आणि अनुभवाचा मोठा खजिना आहे. (त्यातले फारच थोडे या लेखात उतरलेय)
चित्रे आणि फोटोग्राफी अप्रतिम. या प्रत्येक चित्रावर / प्रकाशचित्रावर त्या त्या कलाकारांनी भाष्य करायला हवे होते.
रैना ची कथाही उत्तम. सचिनवरचा लेख उत्तम. "तालबद्ध" लेख आवडला. या क्षेत्रातील काही व्यक्ती माझ्या परिचयाच्या आहेत, आणि त्यांना भारतात काय अडचणींना तोंड द्यावे लागते, त्याची कल्पना आहे.

डिजेने आता मेंदी मधे असीम प्राविण्य मिळवले आहे. (आता दुसर्‍या क्षेत्रातील कामगिरी बघायला आवडेल)

मिनोती चा कर्नाटकी कशिदा अप्रतिम. याबद्दल शांता शेळके एकदा दूरदर्शनवर बोलल्या होत्या. त्याचे काही नमूने एका प्रदर्शनात बघितले होते. पण ते नेमके कसे करतात, हे या लेखातून छान कळते. शिवाय जून्या काळात हा कशिदा काढणे, किती कौशल्याचे होते तेही कळते.

अरूंधती, प्रविणपा, रोहन यांचे लेख खूप आवडले.

सावली चा लेख चांगला को फोटो चांगले, हा संभ्रम पडला.

रांगोळी सुलेखनातील अक्षरे बघताना, ती काढताना हात किती सराईतपणे वळला असेल ते जाणवतेच.

कट्यार काळजात घुसली, मधे नव्या जून्या कलाकारांचा उल्लेख हवा होता. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाशिवाय, हे नाटक इतके सुश्राव्य होणे अशक्य होते.

ऋयामचा लेखही उत्तम.

काहि लेख मात्र मला झेपले नाहीत.

उल्हास भिडे, केदार,

नियमावलीमध्ये खालील नियम समाविष्ट केला होता. लेखकांने आपली पसंती कळविली आहे, त्यानुसार लेखांमध्ये नावे टाकली आहेत. Happy

"दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तसे कळवावे. उदाहरणार्थ पूर्ण नाव की फक्त नाव की नाव आणि आडनाव. "

अतिशय सुंदर अंक Happy
आत्ता पर्यंत वाचलेल्यामध्ये टण्याची कृष्णविवर आवडली. खरतर याला आवडली म्हणावे का आणखी काही हे सुचत नाहीये.
साजीर्‍याची कॅटवॉक एकदम मस्त. प्रवीणपा यांच्या लेखातील फोटो सुंदर!!
अजुन वाचतीये परत लिहीनच.

मस्त अन्क आहे -- भन्नाट..!!

सचिन वरच लेख आवडला -- त्याची कप्तान्शिप सुद्धा मस्तच होति -- he was a great captain too -- हे मि सहज सिद्ध करु शकतो. त्याचे bowlers दाखवले तर कळेलच. मला वाटते केदार १ match विसरल जिथे तेन्डल्याने १४० मारल्या आणि ४ wickets सुद्धा घेतल्य.

पण छन होता लेख..

सचिन पहिल चप्तान होता जो Fast Bowlers ला घेवुन जिन्कला and not 4 spinners like अझर /वाडेकर. match fixing झाले नसते तर सचिन भारताचा सगल्यात यशस्वी कप्तान झाला असता. He was not ready to take on captainship due to match ficinf things. Ganguley won teh 1st ODI series against South Afrika when Cronje was FULL in charge fixing every match.

सुन्दर अंक. आकर्षक आणि सुबक मांडणी. प्रत्येक लेखात एक तरी चित्र/ पेंटिंग . एकदम प्रो झालाय त्यामुळे.

चंदन, पाटील, योगेश, दीपांजली यांची कलाकारी अफलातून. मस्त मस्त मस्त.

सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा !!!

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. अंक सुरेख.
मिनोतीची कसुती, हिम्सकूलचं रांगोळी सुलेखन आणि डीजेची मेंदी खास.
सावली, थेंबाचा प्रवास मस्त. कविता, वटवृक्ष आणि गवत सुरेख. रैनाची कथाही मस्त.
अंजलीची चित्रं अगदी समर्पक आहेत. आभार अंजली.
बाकीचं वाचायचंय अजून.

पण त्यात एक तांत्रिक चूक आहे असे वाटतेय. तो दोरा जर भोवर्‍याला गुंडाळण्यासाठी वापरायचा असला, तर त्याच्या एका टोकाला गाठ हवी (दोन बोटात धरण्यासाठी).>>>>>>>>> Lol विनोदी आहात दिनेशदा. अहो, गाठ मारायच्या आधी फोटो काढला येवढच. हे म्हणजे धोत्राचा सोगा खोचायच्या आधी फोटो काढला तर तो तांत्रिक दृष्ट्या चुक आहे म्हणण्यासारखं आहे.
असो, तो फोटो खरच खुप सुंदर आलाय. लाकडी फळ्या, भवरे आणि पोत्याचे डिटेल्स अफलातून आहेत.
कित्येक वर्ष झाली असतील भवरा बघून सुद्धा!

संपादकांचे आणि त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांचे अभिनंदन!

निसर्गायनातली अजयची जलरंगातली चित्रे भन्नाट आहेत.

नविन भोवरा असल्याने अजून गाठ मारायचीय. बादवे, मी तर कधीकधी गाठ न मारता बोटाला दोर्‍याचे २ वळसे देत असे भोवरा फेकायच्या आधी. चालून जायचं Lol

मला तर मुखपृष्ठ लईच आवडलं. त्यातील वस्तूंचं टेक्स्चर व मांडणी सुंदर Happy

Pages