मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

कनू,
अभ्यास करताना पुस्तक पहिल्या पानापासून उघडायचे असते.
याच धाग्यावर रच्यकने अन दिवे देण्याची हजार तरी स्पष्टीकरणे असतील. कोणताही धागा पहिल्या पानापासून वाचायचे कष्ट करा पाहू?

रच्याकने = स्त्या च्या डे ने. = बाय द वे.
दिवे घ्या = टेक लाईट्स = टेक इट लाईटली = हलके घ्या, रागावू नका, मी गम्मत करतो आहे, असा अर्थ.

गोन्डूल्या. विपु म्हणजे विचारपूस . प्रत्येक आयडीच्या अवलोकानामध्ये विचारपुशीची सोय असते. तिथे जाउन एखाद्या आयडीची तुम्ही विचारपूस करू शकता .:)

Thanks nandya...i tried that n posted poem in gulmohar please have a look in it..sry for English but not able to type in Marathi on cell..

Thanks nandya...i tried that n posted poem in gulmohar please have a look in it..sry for English but not able to type in Marathi on cell..

mi kaahi divasaaMpaasun dev nagari script madhye type karu shakat naahI aahe. Marathi select kele tari Roman script yete. ase kaa hot aahe?

मी अमि :- जर Internet Explorer वापरत असाल, तर compatibility बटन दाबा. मलाही ही अडचण होती, बघा जमतं का.

मी अमि घरच्या कंप्युटरवर आय.ई. ८/९/१० असेल तर मदतपुस्तिकेतला हा धागा बघा
विंडोज ८ किंवा आय. ई. ८+ यांवर देवनागरी लिहीता येत नाही.
अन्यथा, घरच्या ब्राउजरची कॅश आणि कूकीज स्वच्छ करून बघा.

मी प्रतिसाद पोस्ट केल्यावर साधारण दीड तास आधीची वेळ दिसते त्यावर. चालू वेळ दिसण्यासठी काय करावे लागेल?

'लोक धर्मांतर का करतात' असा एक धागा होता.७-८ दिवसांपासून तो धागा दिसत नाही. तर काय करावे?
तसेच नवीन धागा सुरु कसा करावा?

मजकुरात image (चित्र) कसे द्यावे...??

शिवम,
माझे सदस्यत्व मध्ये खाजगी जागा यामध्ये आपली इमेज अपलोड करा ,
आपण ज्या ठिकाणी लिखाण करता आहात तिथे (त्याखाली चौकोनाच्या बाहेर) मजकूरात image किंवा link द्या. असा मजकूर दिसेल त्यामधील इमेज वर क्लिक केल्यास तुम्ही तुमच्या खाजगी जागा येथे पोहचाल तेथील आपली इमेज सिलेक्ट करा ,
त्या इमेजच्या वरती send to text area अस दिसेल त्यावर क्लिक करा त्या इमेजची लिंक तुमच्या मजकुरात/लिखाणात पेस्ट होईल ( लिखाणात लगेच इमेज दिसणार नाही) त्यानंतर पुढील लिखाण करु शकता, ते लिखाण सेव्ह केल्यानंतर ती इमेज दिसेल

मोहना
माझे सदस्यत्व मधे गेल्यावर संपादनाची सोय दिसेल तिथे जावून युजर नेम बदलू शकता

जुने लिखाण केलेले धागे संपादन करताना एका वेळी अनेक ग्रुपांचा पर्याय निवडायची सोय दिसतेय. पण नवे लिखाण करताना ते कोणत्यातरी ग्रुपात करावे लागते आणि तिथून एकाच वेळी दोन किंवा जास्त ग्रुपांमध्ये ते लिखाण कसे घालायचे ते कळत नाहीये. माहितगारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

कृपया हे प्रोफाईल डिलीट करावे ही विनंती.
(मध्यंतरी वर्षभर प्रोफाईल वापरले नव्हते. आताही सहा महीने लॉग इन केलं नव्ह्तं. आपोआप डिलीट झालं नाही) .

मायबोलीवर एखाद्या लेखाच्या खाली Likes किती ते दिसतात. Like करण्यासाठी फेसबूकवर लॉगइन करावे लागते. पण फेसबूकवर हे लाईक्स कुठे दिसतात? कुठल्या पानावर? १० वेळा लॉग इन / लॉग आउट करुन पाहिलं तरी कुठे दिसलं नाही त्यामुळे हा अडाणी प्रश्न विचारतेय Wink

मला मायबोलीसारखी दुसरी साइट काढायचीय आणि इथले सगळे मेंबर्स आपोआप तिकडे ट्रान्स्फर होतील अशी व्यवस्था आहे. कृपया मदत करावी.

वेबमास्टर या पोस्टसाठी जागो मोहन प्यारे यांच्याकडे विचारणा करण्यात येईल.
अ‍ॅडमिनच्या पदासाठी मास्तुरे, गामा पैलवान, आंबा १, आंबा २, आंबा ३, शेळी, पिसाळलेला हत्ती, रानडुक्कर हे सदस्य विचाराधीन आहेत. काही सदस्य गुप्त राहतील.
अ‍ॅडमिनचा आयडी अहो अ‍ॅडमिन असाच असेल. त्यामुळं ठराविक लोकांनाच या शब्दाचा जयघोष करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
गप्पांच्या बाफावर ठराविक सदस्यांना इतरांची बदनामी करण्याची मुभा असेल.
काही लोकांना असांसदीय भाषेचा वापर करू दिला जाईल.
संयुक्तपणे ठराविक धर्माच्या, जातीच्या, पक्षाच्या, लिंगाच्या लोकांना टार्गेट केल्यास बीप वाजेल. त्यानंतर आयपीअ‍ॅड्रेस डिटेक्ट होऊन संबंधित हार्डडिस्क क्रॅश होईल. पहिल्या वेळी ही सौम्य कारवाई करण्यात येईल.
लाडक्या आयडींच्या तक्रारी या बालमोहनाच्या खोड्या या वर्गात जमा केल्या जातील. या साईटवर सरळ सरळ पार्शलिटी करण्यात येईल. नावडीच्या आयडींचे हातपाय बांधून त्यांना झोडपण्यात येईल. अ‍ॅडमिन स्वतःच ड्युआय काढून नको असलेल्यांना छळतील. अनेक स्पर्धा आयोजित करण्यात येतील ज्यांचे परीक्षक सन्माननीय प्रा. सतीश देवपूरकर हे असतील.

ज्यांना रस आहे त्यांनी शक्यतो सर्व मदत करावी ही विनंती.

Pages